चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

TENET पहिला आवडला > मला हा सिनेमा पाहिल्यावर मागच्या गणेशोत्सवातील काही शशक कथा/कोड्यांची आठवण झाली. नोलानचा सिनेमा म्हणून फारच अपेक्षा होत्या पण कमी बुध्यांक असल्यानेही चित्रपट तेवढा झेपला नसेल मला.

TENET थिएटर मध्ये पहिला , ठाणे विवियाना मॉल ला.
science च्या काही कल्पना, संकल्पना ची सरभेसळ आहे. एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे , फक्त सुरवात ते शेवट कुठेच काही मिस केलात तर मात्र नाही समजत पुढे .

खरंच बराच confusing आहे मूवी. पन एकदा नक्कीच पाहण्यासारखा आहे , ख्रिस्तोफर नोलान साठी

प्राईम वर ओके जानू बघितला.
नसरुद्दीन शहा आणि त्याच्या बायकोचा ट्रॅक अनावश्यक वाटला.
बाकी मुव्ही प्रेडिक्टेबल आहे.

आदित्य रॉयकपूर हा तरूण राज बब्बर ची आवृत्ती वाटतो. भुवया, ओठ. खांदे आणि मान उडवणे, हातवारे करणे यालाच तो अभिनय समजत असावा. ओके जानू मधे तो कायम अवघडलेला वाटतो.

मला तर श्रद्धा कपूर ला पण ऍक्टिन्ग येते असं वाटलं नाही.
फक्त डायलॉग पाठ करून म्हंटले म्हणजे झालं असं वाटत तिला.

आदित्य रॉयकपूरचा भाऊ प्रोड्युसर आहे. अभिनयात ठीकठाक. तश्याही त्याला कोणी कस लागेल अशा भूमिका देत नाही, जे मिळते त्याची पाटी तो टाकतो. चित्रपट आपटला तरी भावाचे पैसे वसूल होत असतीलच. त्यामुळे सगळेच विन-विन आहे. उदय चोप्रापेकशा आदित्य बरा दिसतो हे प्रेक्षकांसाठी विन-विन. उदय चोप्रा मसल वाढलेल्या ओरांगउटाण सारखा दिसतो व वागतो.

ओके जानू, हा मणिरत्नम च्या एका तमिळ सिनेमाचा रिमेक आहे ( OK Kanmani )
त्यात दलकीर सलमान आणि नित्या मेनन होते

नसरुद्दीन शहा आणि त्याच्या बायकोचा ट्रॅक अनावश्यक वाटला. >> तिकडूनच आलाय , प्रकाश राज आणि कोणीतरी होत Happy

उदय चोप्रा बघवत नाही. पण त्याला ढापलेला का होईना अभिनय जमतो. अवघडलेला वाटत नाही तो. आदित्य राय कपूरचे संवाद ऐकणे सुद्धा शिक्षाच वाटते. आवाज सुद्धा मोकळा नाही त्याचा. असुरक्षितता वाटते त्याच्या एकूण वावरामधे. या गोष्टी टाळल्या तर तो नक्की सुसह्य होईल. उदय चोप्रा मात्र कधीच सुसह्य वाटत नाही.
श्रद्धा कपूर अभिनय छान करते.

येस.. श्रद्धा चा स्त्री चित्रपट जरूर बघा ज्यांना तिच्या अभिनयाविषयी शंका असेल तर...

कुठलीही अभिनेत्री, चित्रपट, पदार्थ, ठिकाण ई
आवडण न आवडण हे व्यक्ती सापेक्ष असतं.
मला अमूक एक जण आवडत नाही मी माझं मतं सांगितलं
इतरांनी माझ्या मताशी सहमत व्हा असं म्हणाले नाही.
किंवा तुमचा मुद्दा पटवून देण्यासाठी मला उदाहरणं द्या (चित्रपटांची) असं तर अजिबातच नाही.
मी अमूक एक अभिनेत्री आवडून घेण्यासाठी तिचे चित्रपट कशाला पाहू??
नाही आवडत. तर नाही आवडत
विषय तिकडेच संपला.

मी रुचा, आपल्याला आपली आवड जपायचा हक्क आहे हे अगदी मान्य. पण आपण म्हणालात की >>> मला तर श्रद्धा कपूर ला पण ऍक्टिन्ग येते असं वाटलं नाही.>>> त्यामुळे आपल्या या मतावर लोकं आपले मत व्यक्त करणे स्वाभाविक आहे Happy

बाकी मला श्रद्धा कपूर फार भारी अभिनेत्री वाटत नाही. पण ठोकळाही वाटत नाही. तिचा लूक वेगळा आहे त्यामुळे चारचौघींपेक्षा ईंटरेस्टींग वाटते. हेच तिच्या परमपूज्य पिताश्रींनाही लागू Happy

केव्हढं ते लेक्चर. तुम्हाला कुणी सक्ती केलीये का आवडून घायची ? तुमचं जे मत आहे ते माझं मत नाही इतकंच सांगितलंय. बळंच काहीही Lol
हां आता अभिनयकलेचं आकलन ही व्यक्तीसापेक्ष बाब असेल. पण एखाद्याला तो जमतो कि नाही ही फॅक्ट असेल.

{{{ तिचा लूक वेगळा आहे त्यामुळे चारचौघींपेक्षा ईंटरेस्टींग वाटते. हेच तिच्या परमपूज्य पिताश्रींनाही लागू }}}

होय तेदेखील चारचौघींपेक्षा खूपच निराळे दिसतात.

आजकाल च्या अभिनेत्यांच्या अभिनयात चित्रपटातील दिग्दर्शकामुळे फार मोठ्या प्रमाणात अंतर दिसून येते, म्हणजे वरूण धवन बदलापूर आणि october मध्ये छान अभिनय करतो पण coolie no 1 आणि जुडवा2 मध्ये असह्य वाईट अभिनय करतो. श्रद्धा कपूर पण कधी बरा अभिनय करते पण baghi3 मध्ये फार सुमार काम करते. पहिले इतका फरक पडत नसे अभिनयात, उदा. अनिल कपूर चित्रपट किंवा दिग्दर्शक कितीही सुमार असला तरी अभिनय एका पातळी खाली नाही यायचा, उपवाद युवराज

मला तर श्रद्धा कपूर ला पण ऍक्टिन्ग येते असं वाटलं नाही.>>> त्यामुळे आपल्या या मतावर लोकं आपले मत व्यक्त करणे स्वाभाविक आहे Happy
>>> बरोबर... आता उद्या कोणी सचिन ला बॅटिंग जमत नाही असे त्याची एखादी मॅच ज्यात तो शून्य वर आउट झालाय असे म्हणाला तर लोक मत व्यक्त करणारच ना...

अहो कसले आगीत तेल..त्यांनी माझ्याच प्रतिसादाला उत्तर दिले होते..
स्त्री चित्रपट पहा असे मीच म्हणालो ना Happy

आता उद्या कोणी सचिन ला बॅटिंग जमत नाही असे त्याची एखादी मॅच ज्यात तो शून्य वर आउट झालाय असे म्हणाला तर लोक मत व्यक्त करणारच ना...
>>>>>>>>
मत व्यक्त करणार? अहो जीव घेतील... Happy
सचिन शतकाजवळ आल्यावर वैयक्तिक माईलस्टोनच्या दडपणाखाली यायचा आणि त्याचा गेम बदलायचा हे डोळ्याने कित्येक सामन्यात पाहिले आहे. पण ते बोलून दाखवले तर सचिनचे चाहते जाम उसळतात हे अनुभवले आहे.

असो, ईथे क्रिकेटवरून दंगे नको.
लोकांना ग्रेट वाटणारा कमल हसन मला ठिकठाक अभिनेता आणि रंगरंगोटी कलाकार वाटतो असे मत व्यक्त केल्यावर मला देखील त्याचे बरेच सिनेमे बघायची ऑफर आलेली. ते स्वाभाविकच असते. तुम्ही सेलिब्रेटींबद्दल मत व्यक्त केले की ईतरांनाही ते मत खोडायचा पुर्ण अधिकार आहेच.
पण मी कमल हसन कसा अभिनेता आहे यावर भाष्य न करता "तो मला आवडत नाही" ईतकेच म्हटले असते तर कोणी माझ्या मागे लागले नसते तो आवडून घ्यावा म्हणून...

असो, विषयाकडे वळूया.
आताच टीव्हीवर पेनल्टी हा चित्रपट पाहिला. बायकोनेच लावलेला. दहा पंधरा मिनिटे बघूया कसा आहे म्हणत बसलो तर पुर्ण संपवूनच उठलो. चांगला वाटला. पूर्वेकडच्या राज्यातील लोकांना कसे ऑटसायडर समजले जाते ही थीम होती. पण चित्रपट तिच्याभोवतीच काही घुटमळत ठेवला नाही. फूटबॉल, स्पोर्टस, यारीदोस्ती, समज, - गैरसमज, बदला, जिद्द, हलकासा लव्हअँगल वगैरे टाकून पुरेसा मनोरंजकही केला आहे. कोणाला व्हिलन के के मेनन टाईप्स चित्रपट आवडत असतील तर बघायला हरकत नाही

तुम्ही सेलिब्रेटींबद्दल मत व्यक्त केले की ईतरांनाही ते मत खोडायचा पुर्ण अधिकार आहेच.
>> करेक्ट ... मुक्ता बर्वे सगळीकडे सारखाच अभिनय करते, तिच्या तोंडावरची माशी देखील उडत नाही असे मी म्हणालो होतो... अर्थात काही लोकांना ते पटले, पण बरेच जण तिचा रुद्रम बघा म्हणत होते...

पण बरेच जण तिचा रुद्रम बघा म्हणत होते... >>> तिथे उडाली असेल माशी Happy बाकी मला ती स्मिता पाटील टाईप्स वाटते. तोंडावरच्या माश्या जास्त न उडवणे हिच अभिनयाची शैली असेल. आणि एखादी शैली असणे काही गैर नाही.

मलाही मुक्ता अजिबात आवडत नाही. ती खूपच पाट्याटाकू होत होती पण तेवढ्यात रुद्रम मालिका आली. ही फक्त मुक्ताची नव्हती तर सगळेच पॅकेज अफलातून होते. मुक्ताने खरेच सुंदर काम केले होते. मजा आलेली पाहताना.

Pages