चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Tony: My Mentor the Serial Killer
हा हिंदी चित्रपट पाहिला... 2020 मधील मी पाहिलेला सर्वोत्तम थ्रिलर ...
तसा चित्रपट 2018 चा आहे पण इंडिपेंडेंट चित्रपट आहे पब्लिसिटी नसल्यामुळे माहीत नव्हता...थेटरात रिलीज नव्हता...
Imdb 8 आहे...
नक्की पहा...

Tony: My Mentor the Serial Killer
हा हिंदी चित्रपट पाहिला... 2020 मधील मी पाहिलेला सर्वोत्तम थ्रिलर ...
तसा चित्रपट 2018 चा आहे पण इंडिपेंडेंट चित्रपट आहे पब्लिसिटी नसल्यामुळे माहीत नव्हता...थेटरात रिलीज नव्हता...
Imdb 8 आहे...
नक्की पहा...

पेमेंट इन्फो न जोडता ५ व ६ डिसेंबर नेटफ्लिक्स फ्री ही ऑफर फक्त भारतासाठीच आहे का? मला तर इथे अकाउंट तयार करताना पेमेंट इन्फो द्यायला सआंगतातच आहेत.

मी तर भारतात आहे पण मलाही पैसे भरायला सांगत आहे नेफ्ली. फुकट काही नशिबात नाही बहुतेक माझ्या.

आता अंधाधुंद पाहिला नेटफ्लिक्सवर.
मस्त पिक्चर आहे. मागे यातील अर्धवट एंडवर लोकांच्या चर्चा झाल्याचे माहीत होते. मलाही एंड पुन्हा मागे जाऊन बघावा लागला. तो कळला (वा गेस केला). अंधाधुनचा धागा शोधून तो लिहिला. आताच झोप येईल Happy

ऋन्मेषला नेफि फ्रि कस पाहायला मिळाल? मी इमेल केला होता नेफिला स्ट्रीमफ्रि फेस्ट साठी तर 'तुम्हाला पुढच्या आठवडयात फ्रि स्ट्रीमिन्गची तारीख ठरवली जाईल असा रिमाईण्डर आला साईटवर. आजच्या आणि उद्याच्या फ्रि सर्विसची नोटीफिकेशनसुद्दा आली नाही इमेलवर.

ऋन्मेषला नेफि फ्रि कस पाहायला मिळाल?
>>>>

भाई तकदीर होती है किसी किसी की..
मी आजवर माबोवर शेकडो धागे काढले, त्यावर लाखो पोस्ट पडल्या, ज्या हजारो लोकांनी फुकटात वाचल्या... हे पुण्य फुकट जाणार नव्हते Happy

मला पण फ्री नाही दिसत आहे नेफ्लि. सगळे कसे म्हणताय की 5 आणि 6 फ्री असेल असं? मला पण सुलू यांच्यासारखा मेसेज आला. ते streamfest opt करण्यासाठी नेफ्लि डालो करावं लागेल का? लुडो पहायची खूप इच्छा होती...

नवऱ्याने बघितलं तर तिथून मेसेज आला, नावनोंदणी करून ठेवा. पुढच्यावेळी असेल तेव्हा कळवू. आत्ता कोटा संपला. मी त्याला काही नोंदणी वगैरे करू नको सांगितलं.

फ्री द्यायचा आताचा कोटा कालच संपला. आपल्याकडे फुकट ते पौष्टिक असते.

आता आपली इमेल देऊन ठेवायची. परत फ्री असणार तेव्हा मेल करतील.

काही वेळात अशी इमेल द्यायचा कोटाही भरलेला आढळेल. Happy

माझ्याकडे पेड नेटफ्लिक्स आहे पण मला बघायला वेळ मिळत नाही. कधीतरी बिंज वगैरे करणारे असे स्वप्न आहे...

आमच्याकडे amazon prime, hotstar वगैरे पैसे भरून घेतलंय. बघितलं जात नाही.

ते बघितलं जावं म्हणून मी केबल फक्त फ्री channels ह्या महिन्यापासून घेतलं तरी दोनशेला पाच कमी रुपये भरावे लागतात पण ११५ वाचले Lol

मुलान

म्युजिक बाहुबलीगत वाटले

तर लगेच स्टंटही सेम आहेत , बर्फ़ाचा डोंगर कोसळणे , ढाली एकत्र करून कवच , पेटता गोळा फेकणे , भिंतीवरून उडया मारून महालात घुसणे

शेवटच्या स्टंटला मुलान आणि व्हिलन एका ओंडक्यावर असतात , त्याला दोरी बांधलेली असते , अगदी मनात आले होते , ही दोरी कापून ओंडका व व्हिलन खाली पाडणार व स्वतः दोरी धरून वर जाणार
अगदी तसेच घडते
Proud

मध्ये मी hollywood action वर Trust no. 1 मराठीतून अर्धवट बघितला म्हणजे शेवटी तासभर बघितला तरी मला शेवट समजला नाही (मराठी डबड असून), संदिग्ध वाटला. त्या हिरोची बायको काय लपवते चीप असते का ती आणि त्याचा भाऊ दुसरी चीप त्या जंगलात लपवतो का. दोन्ही चीप त्याच्याकडे असतात का, ते जरा confusing वाटलं. कोणी बघितला असेल तर सांगा.

सान्वीताई hdmovieshub वेबला भेट द्या. प्रचंड मोठा खजिना आहे. तुम्हाला जे हवंय ते देखिल तिथेच मिळेल.

ओडबॉल ऍमेझॉन prime वर गेलाय वाटत , ते पण भारतातून दिसत नाहीये ..
नेटफ्लिक्स वर पण नव्हता , कुठे पाहता येईल ?

चित्रपट संपायच्या काही मिनिटे आधी भूत नाही हे लॉजिकली दाखवून देत असतानाच शेवटच्या मिनिटात पुन्हा भूत आहे असंच पिल्लू सोडून देत अनपेक्षित वळणावर संपतो - दुर्गामती.

हो.

कॉपी असो वा लॉजिक नसो... मनोरंजन वॅल्यू आहे का पिक्चरला? बघू शकतो का? ते सुद्धा रात्रीचे एकटे सोफ्यावर लोळत?

कॉपी असो वा लॉजिक नसो... मनोरंजन वॅल्यू आहे का पिक्चरला? बघू शकतो का? ते सुद्धा रात्रीचे एकटे सोफ्यावर लोळत?

ते सुद्धा रात्रीचे एकटे सोफ्यावर लोळत? >>>>
मी काल रात्रीच बघितला. भूमी पेडणेकरचा दुर्गामती अवतार बघताना भीती वाटण्यापेक्षा हसू येत होतं मला. २ - ३ ठिकाणी दचकायला होतं. हॉरर फिल्म बघणे आवडत असेल, तर रात्री एकटे बघू शकता.

भूमी पेडणेकरचा दुर्गामती अवतार बघताना भीती वाटण्यापेक्षा हसू येत
>>>
मला तर अशीही फार गोड वाटते ती. त्यामुळे मनाला गुदगुल्या होण्याचे चान्सेस जास्त आहेत Happy
पण भिती वाटणार नसेल तर बघायला हरकत नाही. बाकी काही नाही मग नंतर उगाच स्वप्ने पडत राहतात...

शुक्रवारी रात्री Ludo पाहिला.
चांगला टाईमपास झाला. मलातरी confusing नाही वाटला.
Movie treatment सहीच आहे.
एक सीन परत दाखवताना ,अरे , आपण अगोदर हे का नाही बघितलं असं वाटतं.
सत्तूभाईचं , "ओ बाबूजी " गाणं म्हणणं एकदम जमून आलयं आणि त्यावेळी त्या salesman मुलाचा चेहरा एकदम भारी.
मिनी , बाबु , बेबी रूही , मोठी रुही -- सगळी बच्चा कंपनी खूप गोड आहे.
रा.रा साठी जीव तुटतो. त्याचा मिथून डान्स बघून फार वाईट वाटतं.

मी पण काल लुडो बघायचा प्रयत्न केला.. मूव्ही टाईमपास वाटला ..मुलींनी क्लायमॅक्स बघू दिला नाही पण एकटं बघण्यापेक्शा ग्रूपमधे बघण्यासारखा मूव्ही वाटला.. फातिमा शेखला उगाचच एक्स्पोझ करायला लावलंय असं वाटलं.. रारा चा मेनू सांगतानाचा सीन भारी आवडला म्हणून ३ वेळा बघितला. बाकी नर्स आणि सेल्स पर्सनचं कॅरेक्टर जास्त आवडलं.

दुर्गामती कसला भंकस सिनेमा आहे. सौदिंडियन छाप भडक अतार्किक गोष्ट, आगापिछा नसलेली कॅरेक्टर्स आणि प्रेक्षकांना मूर्ख समजून प्रत्येक गोष्टीचे अनावश्यक एक्सप्लेनेशन २-३ वेळा. शेवटचे एक दोन ट्विस्ट बरे वाटु शकले असते पण त्यामागे पिळू दर्दभरी बॅक्स्टोरी घातल्याने फ्लॉप झाले.

काल दुर्गामती बघायला घेतला. तब्बल साडेतीन सेकंद पाहिला. तेवढ्यातच ती कसलीशी पायवाट आणि घाणेरडी मुजिक अंगावर आली आणि लगेच चॅईनेल चेंज Happy

मग शोधाशोधीत बद्रीनाथ आणि त्याची दुल्हनिया भेटली. मध्यंतरी हमप्टी चौधरी/शर्मा/गुप्ता? आणि त्याची दुल्हनिया बघून झालेली. बरे लोकं वाटलेले. म्हणून त्याच लाईनवर बद्रीसुद्धा बघितला. बरा वाटला हा सुद्धा.

दुर्गामतीसाठी मात्र साडेतीन सेकंद पुरेसे आहेत. फिरून आयुष्यातील अडीच तास द्यायची ईच्छा नाही Happy

Pages