Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सून ओ हसीना पागल दीवानी...
सून ओ हसीना पागल दीवानी... सावन में लग गयी आग...
हे मिका सिंग चे गाणे आहे ना?
हे मिका सिंग चे गाणे आहे ना? बरेच जुने आहे
याच गाण्याने तर फेमस झालेला तो
अंजु . चांगला आहे.. लहान
अंजु . चांगला आहे.. लहान मुलांसोबत देखील बघू शकता... >>> धन्यवाद. बघायला हवा.
हे मिका सिंग चे गाणे आहे ना?
हे मिका सिंग चे गाणे आहे ना? बरेच जुने आहे>>>>>> त्याचे रिमिक्स केलेय आता.
आधीचं छान होतं बरेच बीट वालं
आधीचं छान होतं बरेच बीट वालं.रिमिक्स काल ऐकलं ते गोंधळलेलं वाटलं.
जुनी किंवा अस्तित्वात असलेली शांत गाणी घेऊन त्यात विचार करून बीट टाकले की चांगले रिमिक्स बनते.
पण इंडिपॉप मधलं आधीच चाम्गले बीट असलेलं गाणं परत रिमिक्स करण्यात काय व्हॅल्यू ऍड आहे?म्हणजे कालच्या राहिलेल्या पुलीओगरे भाताला आज डायरेक्ट शेजवान फ्राईड राईस बनवून गोंधळून टाकल्या सारखं.
व्हॅल्यू ऍड?? लोल...
व्हॅल्यू ऍड?? लोल...
फक्त मार्केटिंग आणि पब्लिसिटी साठी असतात हे प्रकार... आणखी एक कारण म्हणजे जुनी गाणी नवीन पिढीला( टीनेजर्स) माहीत नसतात...
म्हणजे, मला तम्मा तम्मा किंवा
म्हणजे, मला तम्मा तम्मा किंवा दीदार दे किंवा मुकाबला चे रिमिक्स ऐकायला आवडले तितका सावण मे लग गई आग चा नाही आवडला.
ज्यांना जुनं माहित नसेल त्यांना पूर्ण नवं गाणं म्हणूनपण ऐकायला आवडणार नाही असं वाटलं.
एकंच गाणं दोन सिनेमात टाकणं
एकंच गाणं दोन सिनेमात टाकणं योग्य आहे का पण?
मला ओरिजिनल च रिमिक्स आहे असं
मला ओरिजिनल च रिमिक्स आहे असं वाटत होतं
मिका सिंग चे
त्यातही ऑटो ट्यून वगरे आहेच
माझा मुद्दा तोच आहे आशु
माझा मुद्दा तोच आहे आशु
जे गाणं मुळातच रिमिक्स वाटेल असं ढ्यांण ढ्यांण आहे त्याला परत रिमिक्स का करावे
हो त्याला आक्षेप आहेच
हो त्याला आक्षेप आहेच
आता ते श्रद्धा कपूर चे हम्मा हम्मा चे रिमिक्स
मुळात इतका भारी रेहमानिय टच असताना गाण्याला परत त्यात बिट्स ऍड करून काय साध्य केलं?
ऐकवत नाही ते गाणं
सुरियारे पोट्टरू पाहिला.
सुराराई पोट्टरू पाहिला. प्राईम वर.
सुरिया चां म्हणूनच पाहिला.
गरिबांना परवडेल अशी डेक्कन एयरलाईंस सुरू करणारा सुरीया शिवकुमार. त्याच्या बायकोचा रोल करणारी अपर्णा बालमुरली आणि एरलाईन्स किंग, jaz कंपनीचा चा मालक परेश रावल ह्यांची कामे मस्त. बाकी प्रकाश बलावदी वगैरे साईड आहेतच. सुरियाची धडपड, त्याची पेटलेली ठिणगी, पब्लिक सपोर्ट आदी गोष्टी टिपिकल साऊथ मसाला असला तरी एकवेळ बघनेबल.
बेकरी चालवणारी, नवऱ्याशी भांडणारी आणि त्याच्याच पाठीमागे असणारी बॉम्मी(सुंदरी) चे काम केलेली अपर्णा बालकुमार ला फुल्ल मार्क्स.
पिक्चर तमिळमध्ये आहे फक्त. इंग्लिश सबतायतल आहेत पण नसले तरी समजतो जवळपास. दोघांचे संवाद मात्र समजायला तमिळ शिकायची इच्छा झाली इतके गोड वाटतात ऐकायला.
एचबीओ मॅक्स वर "बाँम्बशेल"
एचबीओ मॅक्स वर "बाँम्बशेल" पाहिला. फॉक्स नेटवर्क मधे रॉजल एल्स विरोधात त्यातीलच वार्ताहर ग्रेचेन व मेगन केली यांनी आरोप केले त्याबद्दल व त्याच्या पार्श्वभूमीबद्दल आहे. चांगला आहे.
Thank u अस्मिता, नेफ्ली
Thank u अस्मिता, नेफ्ली नाहीये. मागे कधी एक महिना फ्री घेतलेलं, भाचीचा पिक्चर बघायला. >>>>>>>> अन्जू. ५ आणि ६ डिसेम्बरला नेफि पुर्ण फ्री आहे. पेमेण्ट इन्फॉर्मेशनशिवाय तुम्ही रजिस्टर करु शकता.
५ आणि ६ डिसेम्बरला नेफि पुर्ण
५ आणि ६ डिसेम्बरला नेफि पुर्ण फ्री आहे. पेमेण्ट इन्फॉर्मेशनशिवाय तुम्ही रजिस्टर करु शकता. >>> अच्छा, thank u.
एकंच गाणं दोन सिनेमात टाकणं
एकंच गाणं दोन सिनेमात टाकणं योग्य आहे का पण?
>>>>
शाहरूखने एकच एक्टींग जवळपास दहा चित्रपटात केली आहे. ते सुद्धा राहुल नाव घेऊनच. पण दहाच्या दहा पिक्चर हिट. योग्य आहे का हे
मॉरेल ऑफ द स्टोरी - असा काही रूल नाही. की यात काही प्रेक्षकांची फसवणूक नाही.
@ रिमिक्स गाणी
तर आधीच ढिंच्याक असलेली गाणी नवीन स्वरुपात येतात तेव्हा त्यांना रिमिक्स म्हणून न बघता रिमेक म्हणून बघा.
रेहमानिया टच असेना का गाण्याला पण त्यात एक्स्ट्रा बीटस अक्कल लाऊन भरले तर अजून छान डान्स ट्रॅक होऊ शकतो जो या डिजेच्या जमान्यात मजा देईल.
उदाहरणार्थ आंख मारे गाणे उडत्या चालीचे होते. पण आता त्यात असे काही मस्त बीटस भरलेत की पार्टीमध्ये त्यावर नाचायला आणखी मजा येते.
@ श्रद्धा कपूरचे हम्मा हम्मा वर्जन
मला तरी आवडलेले. ऐकायला मुळात नसतातच ती गाणी, नाचायला असतात. मी आमच्या आधीच्या घरात कपडे सुकत घालताना नाचायला जी गाणी लावायचो त्यात एक हे पण लावायचो.
आमच्या ऑफिस पार्टीला डान्स केलेला तेव्हाही मी बचना ए हसीनो चे रिमिक्स रणबीर वर्जनच वापरलेले. जरी सूर ताल ओरिजिनल गाण्याचे क्रेडीट असले तरी एक्स्ट्रा बीट्सने आणखी मजा भरली त्या गाण्यात.
मॉरेल ऑफ द स्टोरी - आधीच डान्स ट्रॅक असलेल्या गाण्याचे जे रिमिक्स गाणे बनते ते ऐकायला नाही तर नाचायला कसे वाटते यावरून जोखावे.
बाकी ते मिकाचे सावन मे लीग गयी आग तेव्हाही बकवासच वाटायचे मला. आम्ही कॉलेजात असताना भिकारयाच्या आवाजात ते गायचो आणि कॅंटीनचे टेबल बडवायचो.
>>मॉरेल ऑफ द स्टोरी - असा
>>मॉरेल ऑफ द स्टोरी - असा काही रूल नाही. की यात काही प्रेक्षकांची फसवणूक नाही.<<
तुझ्यासारख्या प्रेक्षकांची, असं कंसात लिहि रे. उगाच गैरसमज वाढतात...
त्यांना रिमिक्स म्हणून न बघता
त्यांना रिमिक्स म्हणून न बघता रिमेक म्हणून बघा. >>
भेसळ म्हणून न बघता भेळ म्हणून बघा म्हणशील की रे उद्या... असो, तुझ्यावर राग काढण्यात अर्थ नाही. कुली नं १ चे रिमिक्स ऐकून मी आज कावलेली आहे!!!!!! रस्ते से जा रहा था, हुस्न है सुहाना इ चे रिमिक्सची काय गरज होती??? व्हॅल्यू सबट्रॅक्शन आहे...
शाहरूखने.....च्यापुढचे काही
शाहरूखने.....च्यापुढचे काही वाचू वाटले नाही.
रस्ते से जा रहा था, हुस्न है सुहाना इ चे रिमिक्सची काय गरज होती??? व्हॅल्यू सबट्रॅक्शन आहे...>>+१
मी पण शरूख वाचून पुढची अक्खी
मी पण शरूख वाचून पुढची अक्खी पोस्ट स्कीप केली

आज कण्णथिल मुथमित्तल हा २००२
आज कण्णथिल मुथमित्तल हा २००२ मधला मणिरत्नमचा तमिळ सिनेमा पाहिला. (अर्थात सबटायटल्स चालू करून)
आर माधवन्, सिमरन, चक्रवर्ती (सत्यामधला), नंदिता दास, प्रकाशराज, कीर्तना (बालकलाकार) अशी कास्ट आहे.
श्रीलंकेतली एक तमिळ स्त्री श्यामा (नंदिता दास) गरोदर अवस्थेत निर्वासित म्हणून भारतात रामेश्वरमला येते. तिथे तिला मुलगी होते. परंतु तिचा नवरा श्रीलंकेतच अडकलेला असतो. त्यामुळे ती बाळाला इथेच सोडून तिकडे परत जाते. या मुलीला मग माधवन आणि त्याची पत्नी दत्तक घेतात. पण त्यांनी ठरवल्याप्रमाणे ते मुलीच्या नवव्या वाढदिवसाला तिला वस्तुस्थिती सांगतात. मग त्या मुलीला आपल्या 'खऱ्या' आईला भेटायची ओढ लागते. तिच्या हट्टामुळे ते अनेक धोके पत्करून, तिला घेऊन श्रीलंकेत श्यामाला शोधायला जातात. ती आता एलटीटीईमध्ये सामील झालेली असते.
अशा कथेचा शेवट जसा व्हायला हवा असं आपल्याला वाटतं तसाच तो होतो, पण तत्पूर्वी यादवी युद्धाचा भीषण चेहरा आपल्यासमोर येऊन आदळतो. स्पष्टपणे रक्तबंबाळ देह न दाखवताही युद्धाची भेसूरता दिसते. 'जगात शांतता का नांदू शकत नाही?' हा माधवनचा वरवर भाबडा वाटणारा प्रश्न आपल्याही मनात येतोच.
मी काहीच नीट वाचलं नाहीये पण
मी काहीच नीट वाचलं नाहीये पण सीमंतिनी यांची स्मायली भन्नाट आहे
! रस्ते से जा रहा था, हुस्न
! रस्ते से जा रहा था, हुस्न है सुहाना इ चे रिमिक्सची काय गरज होती??? व्हॅल्यू सबट्रॅक्शन आहे...
>>>>>
धोनीने एखाद्या पायातल्या चेडूला हेलिकॉप्टर शॉट मारून सीमापार पाठवला तर त्याचे कौतुक करतो आपण.
ज्याला हे जमत नाही त्याने ते करून झेलबाद झाले तर असा वेडावाकडा शॉट मारायची गरजच काय असे म्हणतो आपण.
तसेच आहे हे
मॉरेल ऑफ द स्टोरी - हेलिकॉप्टर शॉट हा प्रकार वॅल्यू ॲडीशन म्हणजे रन ॲडीशन साठीच निर्माण झाला आहे. फक्त एखाद्याला वापरता येत नाही म्हणून तो फटकाच बाद होत नाही
लव्ह यू शाहरूख !
हे म्हणजे गाणे आवडण्यासाठी ते
.
हे तसं नाही बरं... बाऊंड्री
हे तसं नाही बरं... बाऊंड्री बाहेर पडलेला बॉल स्टेडीयम मध्ये मारून रन मिळायची अपेक्षा करणे आहे..... असं खेळू नये, दॅट सिंपल.
जाऊ द्या, धाग्याचा विषय - अ लिटल केऑस नावाचा सिनेमा पाहिला. ख्रिसमस थीम वर नाही पण तरी ख्रिसमस काळात 'फिल गुड' असे काही बघायचे असल्यास चांगला आहे.
५ आणि ६ डिसेंबर फुकट
५ आणि ६ डिसेंबर फुकट नेटफ्लिक्सचा फायदा ऊचलत आताच लुडो पाहिला.
भारी आहे. मजा आली.
अभिषेक बच्चन शेवटी स्वत:च्या पोरीला दुसरया बापाच्या खांद्यावर ईथून तिथून बघतो आणि ती अजनबी बघितल्यासारखे तोण्ड फिरवत राहते तेव्हा फार तुटले. बहुधा तशीच सहा वर्षांची पोरगी मलाही असल्याने झाले असेल.
बाकी सगळ्याच स्टोरीज मस्त. तरी ती पॉर्नवाली लव्हस्टोरी जास्त भाव खाऊन गेली असे वाटते. मला तरी त्यांचे फायनली काय होते याची उत्सुकता जास्त होती.
बरेच लोकांकडून कन्फ्यूजिंग आहे किंवा चटकन आपसातला संबंध कळत नाही असे ऐजले, वाचले. पण तसे मला शून्य वाटले. उलट छान फाफटपसारा न लावता मुद्द्याचे घेत सर्व स्टोरीज पुढे सरकल्या.
बाई दवे,
नेटफ्लिक्स उद्या रात्रीही फुकट असेल.
काही असाच स्पेशल चित्रपट असेल तर गरीबांना सुचवा...
नेटफ्लिक्स उद्या रात्रीही
नेटफ्लिक्स उद्या रात्रीही फुकट असेल. >>> फक्त रात्रीच नेफ्ली फ्री की दिवसरात्र फ्री.
फक्त रात्रीच नेफ्ली फ्री की
फक्त रात्रीच नेफ्ली फ्री की दिवसरात्र फ्री.
Submitted by अन्जू on 5 December, 2020 - 06:46
दिवसा माबो आहे ना त्याला स्वतःची करमणूक आणि इतरांची पिळवणूक करायला.
५-६ डिसेंबर. दिवस रात्र.
५-६ डिसेंबर. दिवस रात्र.
मी रात्रीच बघू शकतो म्हणून रात्र लिहिलेय.
फा तुझ्या रेको मुळे
फा तुझ्या रेको मुळे hillbilly elegy पाहिला . मला आवडला.
तुझ्या रिव्ह्यू मधले हे फार पटले >> एकूण बाहेरील जगाशी फटकून असलेले, आर्थिक तंगी, अशिक्षितपणा, वाईट सवयी, व्यसने व एकूणच शिक्षणाबद्दल अनास्था असलेल्या कुटुंबांमधून जी मुले पुढे येउ पाहतात त्यांना यशस्वी होण्याकरता जी आव्हाने अगदी पदोपदी पेलावी लागतात त्याचे यात खूप चांगले चित्रण आहे. हे चित्रण "हिल्बिलीज" चे असू शकते, एखाद्या आफ्रिकन अमेरिकन कम्युनिटीज मधले असू शकते, किंवा भारतातील गावाबाहेरील वस्तीतील असू शकते. आणि "चांगले चित्रण' आहे कारण त्याच कम्युनिटीमधल्या, त्याच कुटुंबातील लोकांनी ते व्हिशस सर्कल तोडायचा प्रयत्न केलेला इथे दिसतो. यातील मुख्य कॅरेक्टर जे डी व्हान्स "जेडी" हा माझ्या दृष्टीने यातला हीरो नाही. त्याची आजी, आई आणि बहीण हे आहेत. >>> पर्फेक्ट लिहिलेस हे.
Pages