Submitted by VB on 25 December, 2020 - 18:54
पार्टी चा भात म्हणजे बिर्याणी असे कितीतरी जणांचे मत असल्याचे लक्षात आले. माझ्या ओळखीच्या दहा पैकी आठ लोकांना बिर्याणी आवडते. अन म्हणून मला बिर्याणी आवडत नाही म्हणून ते नाकही मुरडतात.
पण खरेच माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना बिर्याणी आवडत नाही. पूर्वी मी कधीतरी खायची बिर्याणी, पण आता बघवतही नाही. तसेही हल्ली चांगली बिर्याणी मिळत सुद्धा नाही आवडायला. बरेचदा तर बिर्याणी च्या नावाखाली भाज्या/चिकन/मटण/कोलंबी नावापुरता घातलेला अन मसाल्याने थबथबलेला भात देतात. तो प्रकार तर अजून भयानक असतो. कदाचित ह्या सगळ्या मुळे असेल पण मला बिर्याणी आता बिलकुल आवडत नाही.
माबोवर पण खाऊगल्लीत बरेचदा बिर्याणी दिसते अन तिची प्रशंसा करणारे पण. म्हणून सहज उत्सुकता म्हणून जाणून घ्यायला आवडेल की माझ्यासारखे अजून कोणी बिर्याणी हेटर्स आहेत का इकडे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बिर्याणी हा मूळ प्रकार
बिर्याणी हा मूळ प्रकार मांसाहारातून सुरू झाला.
त्याचे वेज बिर्याणी हे शाकाहारी वर्जन निघाले ज्याची पद्धत पुलाव मसालेभातापेक्षा वेगळी आहे.
पण कित्येक हॉटेलमध्ये वेज बिर्याणी मागितल्यावर जे मिळते ते त्या बिर्याणी पद्धतीने बनवलेले नसते.
पण कित्येक हॉटेलमध्ये वेज
पण कित्येक हॉटेलमध्ये वेज बिर्याणी मागितल्यावर जे मिळते ते त्या बिर्याणी पद्धतीने बनवलेले नसते. >>>
हेच नॉन व्हेज बिर्याणीला देखिल लागू आहे. पण ह्यामधे त्या बिचार्या बिर्याणीचा काय दोष !
बिर्याणी हा मूळ प्रकार
बिर्याणी हा मूळ प्रकार मांसाहारातून सुरू झाला. >>> AGREED !
त्याचे वेज बिर्याणी हे शाकाहारी वर्जन निघाले >>> AGREED
ज्याची पद्धत पुलाव मसालेभातापेक्षा वेगळी आहे. >>> Agreed !
बिर्याणीची सुरुवात हरिणाच्या
बिर्याणीची सुरुवात हरिणाच्या मांसापासुन बनवण्यात झाली असं कुठेतरी वाचलेलं.
जर पुलाव आणि बिर्याणी च्या
जर पुलाव आणि बिर्याणी च्या बनवण्याच्या मेथड मध्ये फरक असेल तर व्हेज बिर्याणी ला बिर्याणी म्हणण्यात मूर्खांचे नंदनवन कसे?
)
काहीतरी ग्लॅम नाव देता यील, फाईव्ह स्टार हॉटेल मधल्या सारखे
'ऍरोमॅटिक लॉंग ग्रेन राईस सेंटेड विथ सॅफ्रॉन अँड एंरीचड विथ व्हेजिटेबल अँड प्रॉबायोटिक कर्ड विथ गोल्डन ब्राऊन ओनीयन':) .पण हे अतिशय मोठं असल्याने आम्ही बिर्याणीच म्हणणार.
केक मध्ये अंडे असते.पण उद्या कोणी किटो डायट वाल्यांने अंडे नसलेला मैदा नसलेला व्हेगन नॉन ग्लूटेन केक बनवला तरी त्याला केकच म्हटले जाते ना?
https://en.m.wikipedia.org/wiki/Biryani
मुख्य व्याख्या 'मिक्स राईस डिश' आहे.त्यात काय मिक्स करा तो ज्याचा त्याचा प्रश्न.(फक्त शेपू किंवा दोडका न घालून जगाचे रक्षण करा इतकेच
अतुलनी लिंक दिलीय तेव्हा
अतुलनी लिंक दिलीय तेव्हा लक्षात आलं हे व्हेज बिर्याणी म्हणण्यावर आक्षेप घेण्याचे खूळ कुठून आलेय ते.
तो चर्चेचा नव्हे तर हिणवण्याचा विषय असल्याने पूर्ण पास.
व्हेज बिर्याणी असते. मी एका
व्हेज बिर्याणी असते. मी एका ठिकाणी खाल्ली आहे. लोकांक डे. तिथे स्पेशल कुक आली होती तिने ३५ मसाले पडतात असे सांगितले होते. पनीर बिर्या णीची पण जाहिरात बघितली आहे. ( हे भगवान!!!!)
दुस्रे म्हणजे इंडिअन चायनीज पण असते. कोलकात्यात टांग्रा का तांग्रा चायनीज फूड म्हणतात. हे मी शेफ रणवीरच्या व्हिडीओज मध्ये बघितले आहे. तो बनव्तो त्या बहुतेक रेसीपीज मॉडीफाइड फॉर इन्डिअन चॉइसेस असतात. परवा मॅगी घालून रामेन बनवलेले त्याने ( हे राम!! )
पास्ता कुकर मध्ये घालुन उकडून छान होतो टाइप लोक पण असतात. ( आय अँ स्पीचलेस्स.)
मी सुवर्ण मध्य निवडते घरी बनवताना बनवण्याच्या पद्धतीत जमेल तितके ऑथेंटिक व क्लासिक प्रोसेस ला धरूनच बनवायचे. थोडे मॉडिफाय करायचे. जसे उदा. रामेन बनवताना बीफ स्टॉक लागतो त्या ऐवजी चिकन स्टॉक बनवेन. घटक पदार्थ पण जरा धावपळ करून सर्व आणायचे.
हिणवण्या चा प्रश्नच येत
हिणवण्या चा प्रश्नच येत नाही. अर्धी मानवता व प्राणी पक्षी जनता अन्न्न पाण्यावाचून भुकेली तड फडत मिळेल ते खात असते. हाउ कॅन यु हेट गुड फूड. रुसु बाई रुसु
चव आवडली नाही तर दिलेले खाउन नमस्कार करुन उठायचे. बिर्याणी हजम बात खतम.
अर्धी मानवता व प्राणी पक्षी
अर्धी मानवता व प्राणी पक्षी जनता अन्न्न पाण्यावाचून भुकेली तड फडत मिळेल ते खात असते. हाउ कॅन यु हेट गुड फूड. >>>>>>>>>
अमा अगदी मनातलं
असतात लोकांच्या आवडी निवडी.
असतात लोकांच्या आवडी निवडी. एवढं काय मनाला लावून घ्यायचं त्यात?
तुमच्याही असतीलच की.
अमा, मालक आवडते पनीर बिर्याणी
अमा, मालक आवडते पनीर बिर्याणी. (पनीर चं काहीही फॉर that mattter)
लहानपणापासून मीट खायची सवय नसल्याने जमत नाही. Try केला, आवडलं नाही त्यामुळे आम्ही आपले फ्लॉवर, बटाटा आणि मटार टाकूनच खातो बिर्याणी.
हेट फुडचा फेव्हरीट फुड क्लब
हेट फुडचा फेव्हरीट फुड क्लब झाला. पण माहिती बरीच मिळाली.
व्वा...बिर्याणी वरून कॅट फाईट
व्वा...बिर्याणी वरून कॅट फाईट... अजून थोडी लांबली असती.. मानव उगाच मध्ये पडता राव तुम्ही..
बाकी माझे मत -
चिकन घालून बनवतात ती चिकन बिर्याणी
लॅम्ब घालून बनवतात ती लॅम्ब बिर्याणी
बेबी गोट घालुन बनवतात ती गोट बिर्याणी
झिंगा घालून बनवतात ती प्रॉन्स बिर्याणी
तसेच व्हेजिटेबल्स घालून बनवतात ती व्हेज बिर्याणी...
पण जाई यांना समजू शकतो... काही गोष्टी खटकतातच.. आता सिंगल मॉल्ट मध्ये कोणी कोक घालत असेल तर दर्दी लोकांना खटकते की नाही? ( मलाही खटकते) तसेच व्हेज घातलेली बिर्याणी त्यांना खटकू शकते..
मला बिर्याणी आवडते पण उठसुठ
मला बिर्याणी आवडते पण उठसुठ खायला नाही आवडणार. ४-६ महिन्यांतून एकदा घरी निगुतीने केलेली चिकन/मटण बिर्याणी खायला आवडते. मासा/ कोलंबी वाली बिर्याणी नाही आवडत, कोलंबीची कायस्थी पद्धतीची खिचडीच आवडते. दोघांसाठीच करायला रुचीपालट म्हणून कमी कष्टाची अंडा बिर्याणी महिन्या दिड महिन्यातून एकदा होते. घरी शाकाहारी पाहुणे येणार असतील तर काजू-बेदाणे न घालता अंजलीच्या कृतीने वेज बिर्याणी करते. अगदी भारतातून आलेले पाहूणे देखील रेसीपी मागतात.
मी देशात होते तेव्हा महाराष्ट्रात तरी विकतची बिर्याणी हा प्रकार फार मर्यादित होता. साहाजिकच बिर्याणी ही कुणा घट्ट मैत्रीतल्या मुस्लीम कुटुंबातली, पारंपारिक पद्धतीने घरी बनवलेलीच चाखली होती. तिच चव जिभेवर घेवून देश सोडला. इथे स्वतः रांधले तरच अशी परीस्थिती असल्याने इथेही बिर्याणी ही घरच्याच चवीची असे झाले. अजून तरी आठवणीतली 'ती चव' जमलेय असे म्हणणार नाही. माझी नणंदबाई उत्तम कच्चे गोश्त की बिर्याणी बनवत असे. जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या मुस्लीम कुटुंबाकडून तिच्या आजेसासूबाई शिकल्या ते पुढे परंपरेने तिच्या पर्यंत आलेले. एका भारत भेटीत तिने मलाही कशी करायची ते दाखवले . इथे आल्यावर लगेच करुन बघायला हवी होती पण आजारपणं, साचलेली कामे यात मागेच पडले. जसा काळ गेला तसे बघितलेले/शिकलेले अंधूक झाले आणि माझे धैर्यही गळत गेले. आताशा वयोमानाने नणंदेला विसरायलाही होते आणि शरीरही साथ देत नाही. तिच्या हातची बिर्याणी आता एक आठवण आहे.
भारत भेटीत दोनदा विकतची बिर्याणी खाण्याचा योग दोन वेगवेगळ्या शहरात होस्टच्या कृपेने आला. त्यांनी ऑर्डर दिली होती, जे काही होते ते तेलकट आणि मसालेदार होते. अन्न दाता सुखी भव म्हणून जेवलो मात्र ती जर का माझी बिर्याणीशी पहिली ओळख असती तर मी बिर्याणीला 'माझा पास ' म्हटले असते.
Craps, खटकू दे की. तुम्ही
Craps, खटकू दे की. तुम्ही सुध्दा ते कुठल्या वनात रहातात याची फिकीर करत बसता का

जाईटिम्ब शुभेच्छांबद्दल धन्यवाद. लहानांना मोठ्यांचे अहंकार आणि hypocrisy लगेच दिसतात
तसेच व्हेज घातलेली बिर्याणी
तसेच व्हेज घातलेली बिर्याणी त्यांना खटकू शकते..>>>> खटकली तर खटकू दे. पण तिला पुलावच म्हणा असा अट्टाहास कशाला?
व्हेज पुलाव, चिकन पुलाव, व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणी हे ४ वेगवेगळे पदार्थ आहेत. नावात गल्लत करू नये. हे नंदनवनात राहणाऱ्यांचे म्हणणे आहे.
बिर्याणी आणि पुलाव या दोन
बिर्याणी आणि पुलाव या दोन वेगळ्या पाककृती आहेत आणि त्या दोन्हीत व्हेज आणि नॉन व्हेज दोन प्रकार आहेत. मी (नॉन व्हेज) बिर्याणी फॅन असले तरी बिर्याणी व्हेज असते हे मला
अगदीच मान्य आहे.
भारतात पिकणार्या तांदळाला
भारतात पिकणार्या तांदळाला पर्याय नसल्याने भारतीय मुस्लिम संस्कृतीत बिर्याणीचा उगम झाला असे म्हणतात.
<<
अन्नं वै प्राणः नावाची एक लेखमालिका माबोवर आहे. त्यात मला वाटतं बिर्याणीबद्दल आलेलं आहे.
"हरिणाचे मांस व मसाले घालून शिजवलेला भात" सीतेला फार आवडत होता असे वर्णन रामायणत आहे, ते बिर्याणीचे सगळ्यात जुने लिखित वर्णन आहे असे म्हणतात.
सापडली अन्नं वै प्राणः .
सापडली अन्नं वै प्राणः . वाचतो, धन्स आरारा.
मस्त पोस्टी आहेत सगळ्यांच्या.
मस्त पोस्टी आहेत सगळ्यांच्या.
चर्प्स +१
चर्प्स +१
काहीही बोलले नसताना स्वतःवर ओढवून घेऊन चर्चेत राहण्याचे , येनकेनप्रकारेण प्रसिद्धी मिळवण्याची काही आयडीची धडपड बघून गंमत वाटली. किती तो recognition मिळवायचा अट्टाहास ! चालू देत. मजा येतेय 
अर्धी मानवता व प्राणी पक्षी जनता अन्न्न पाण्यावाचून भुकेली तड फडत मिळेल ते खात असते. हाउ कॅन यु हेट गुड फूड>>>
अगदी हेच म्हणायचे होते .
बाकी मस्त करमणूक झाली.
वेज बिर्याणी आणि चिकन
वेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणी यांच्यामध्येही एक बिर्याणी असते....
अंडा बिर्याणी
आता अंडे हे शाकाहारी की मांसाहारी?
जर मांसाहारी समजत असाल तर हरकत नाही,
पण शाकाहारी समजत असाल तर अंडा बिर्याणीला बिर्याणी म्हणावे की अंडा पुलाव म्हणावे?
कि अंडे हे मिश्राहारी असते?
ज्यांना या वादात पडायचे नसेल त्यांनी या प्रसिद्ध सातारा अंडा बिर्याणीवर फोकस करा
..
आज दत्तजयंती आहे ना ? मग आज
आज दत्तजयंती आहे ना ? मग आज बिर्याणी ?
>>प्रसिद्ध सातारा अंडा
>>प्रसिद्ध सातारा अंडा बिर्याणीवर
आमच्या साताऱ्याचे कंदी पेढे प्रसिद्ध आहेत, भाव्यांची सुपारी, पालेकरांचे बटर वगैरे प्रसिद्ध आहेत.... अंडा बिर्याणी पहील्यांदाच ऐकतोय
@ स्वरूप, अहो माझी बायको
@ स्वरूप, अहो माझी बायको साताराकडची आहे आणि हि बिर्याणी तिने केलीय म्हणून सातारा बिर्याणी म्हटले
@ जाई, बिर्याणी फोटो आजचा नाही. धागा फारच कोरडा जात होता म्हणून टाकला.
@ दत्तजयंती, मी नास्तिक आहे, सणवार बघून शाकाहार मांसाहार ठरवत नाही. काल रात्रीचा हलवा (मासा) शिल्लक होता तो आज दुपारी खाल्ला. लेकालाही खाऊ घातला. घरच्या ईतर आस्तिकांनी दत्तजयंती पाळली आणि मेथी बटाट्याची भाजी खाल्ली
अच्छा असे आहे होय.
अच्छा असे आहे होय.
ऋन्मेऽऽष, अंडा बिर्याणीचा
ऋन्मेऽऽष, अंडा बिर्याणीचा फोटो मस्तय. पाककृती दिली तर कृपा होईल.
राइस +मिट् किवा भाज्या अर्धवट
राइस +मिट् किवा भाज्या अर्धवट शिजवुन परत एकत्र करुन दम देवुन शिजवल की झाली बिर्याणी.
तेच राइस आणी भाज्या एकत्र शिजवुन केले़ की पुलाव इतक सोप असताना उगाच खल कशाला? त्यामुळेच व्हेज बिर्याणि म्हणजे पुलाव नव्हे.
तेलकट मसालेदार बिर्याणि म्हणजे रेसिपीच गन्डलीये.
ऋन्मेऽऽष, अंडा बिर्याणीचा
ऋन्मेऽऽष, अंडा बिर्याणीचा फोटो मस्तय.
पाककृती मला पण पाहिजे
मृणाली +१
मृणाली +१
Pages