Submitted by VB on 25 December, 2020 - 18:54
पार्टी चा भात म्हणजे बिर्याणी असे कितीतरी जणांचे मत असल्याचे लक्षात आले. माझ्या ओळखीच्या दहा पैकी आठ लोकांना बिर्याणी आवडते. अन म्हणून मला बिर्याणी आवडत नाही म्हणून ते नाकही मुरडतात.
पण खरेच माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना बिर्याणी आवडत नाही. पूर्वी मी कधीतरी खायची बिर्याणी, पण आता बघवतही नाही. तसेही हल्ली चांगली बिर्याणी मिळत सुद्धा नाही आवडायला. बरेचदा तर बिर्याणी च्या नावाखाली भाज्या/चिकन/मटण/कोलंबी नावापुरता घातलेला अन मसाल्याने थबथबलेला भात देतात. तो प्रकार तर अजून भयानक असतो. कदाचित ह्या सगळ्या मुळे असेल पण मला बिर्याणी आता बिलकुल आवडत नाही.
माबोवर पण खाऊगल्लीत बरेचदा बिर्याणी दिसते अन तिची प्रशंसा करणारे पण. म्हणून सहज उत्सुकता म्हणून जाणून घ्यायला आवडेल की माझ्यासारखे अजून कोणी बिर्याणी हेटर्स आहेत का इकडे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्हॉट्सऍपवर तर उलट हा मेसेज
व्हॉट्सऍपवर तर उलट हा मेसेज फिरत आहे:
म्हणजे आज जास्त डिमांड नसेल. खुशाल मागवा.
१२ नंतर दिवस पलटतो. १
१२ नंतर दिवस पलटतो. १ जानेवारी. हॅपी न्यू ईयर. शुक्रवार
१२ नंतर दिवस पलटतो >
१२ नंतर दिवस पलटतो > पंचांगानुसार सुर्योदय ते सुर्योदय असा दिवस असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडेपर्यंत थांबावे लागेल नाहीतर शिळी खाऊ शकता.
व्हेज बिर्याणी म्हणजे गंगाधर
व्हेज बिर्याणी म्हणजे गंगाधर आणि नॉनव्हेज बिर्याणी म्हणजे शक्तिमान. रूप वेगवेगळे पण गाभा तोच.
व्हेज बिर्याणी म्हणजे
व्हेज बिर्याणी म्हणजे शक्तिमान आणि नॉनव्हेज बिर्याणी म्हणजे गंगाधर. रूप वेगवेगळे पण गाभा तोच.
व्हेज बिर्याणी म्हणजे नितीश
व्हेज बिर्याणी म्हणजे नितीश भारद्वाज आणि नॉनव्हेज बिर्याणी म्हणजे स्वप्नील जोशी. रूप वेगवेगळे पण भूमिका तीच.
बोकलत
बोकलत
!
जिद्दु , ज्जे बात
-एका शाकाहारीतर्फे.
पंचांगानुसार सुर्योदय ते
पंचांगानुसार सुर्योदय ते सुर्योदय असा दिवस अस
>>>>
ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताला पंचांगाचे काय काम
तू माझी व्हेज बिर्याणी मी
तू माझी व्हेज बिर्याणी मी तुझ्या मनाचे खेळ प्रिये
झोमॅटोचा सर्वे आलाय .
झोमॅटोचा सर्वे आलाय . त्यानुसार 2020 मध्ये प्रत्येक मिनिटाला त्यांनी २२ बिर्याणी डिलिव्हरी केल्या अस निरीक्षण नोंदवलं आहे.
बिर्याणी रॉक्स
22 मधल्या 21 व्हेज बिर्याणी
22 मधल्या 21 व्हेज बिर्याणी होत्या हे डिटेल पण सांग की!
हा हा व्हेज बिर्याणी म्हणजे
हा हा
व्हेज बिर्याणी म्हणजे Vs नॉनव्हेज बिर्याणी. सहीच आहेत एकेक उपमा.
कॉलेजात असताना "ठरवून केलेलं लग्न विरुद्ध प्रेमविवाह" अशी चर्चा आठवली. लग्न झाल्यावर कळले, दोन्ही सारखेच, लग्न करणारे कोण आहेत त्यावर अवलंबून आहे. तसे इथे म्हणावे वाटते खाणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे.
तसे त्यांनी काही मेन्शन केले
या इमेजमध्ये मेन्शन केलं नाही अमित. म्हणून मी तसे लिहिलेलं नाही
पण बातमी गुगल करून पहिली तेव्हा हा पॅरा दिसला
Biriyani truly is India’s comfort food with citizens ordering in kilos to cope with the lockdown. According to Zomato, the food platform delivered 22 orders of biriyani every minute of 2020. And before the veg biriyani is not biriyani debate begins, Zomato delivered 1,988,044 veg biryani this year.
अन्नदाता सुखी भव
ही लिंक
https://www.thenewsminute.com/article/zomato-2020-bengaluru-man-places-m...
स्मिता आज तुम्ही सांगितलेल्या
स्मिता आज तुम्ही सांगितलेल्या कुठंच डिलीव्हरी मिळत नव्हती
बिग बाईत तर निगडी ला आहे असं कळलं
शेवटी मग पिके मधूनच आणली
काय आता असतील ती कोंबडी कुत्री कावळे चेपायचं
सोबत डबल ब्लॅक आहेच साथीला
चितळे बाकरवडी पण आहे आणि सुहाना चकली
टीव्ही वर काहीही बघणार नाही
तोंड फाडून वेडसर हसणारा स्वप्नील जोशी किंवा साड्या नेसून भयाण विनोद करणारे भाऊ कुशल किंवा तेच तेच घिसेपिटी हिंदी गाण्यावर कवायत डान्स करणारे मराठी कलाकार बघून शिसारी येते
स्मिता आज तुम्ही सांगितलेल्या
स्मिता आज तुम्ही सांगितलेल्या कुठंच डिलीव्हरी मिळत नव्हती
बिग बाईत तर निगडी ला आहे असं कळलं
शेवटी मग पिके मधूनच आणली >>
तुम्ही थोडं उशीरा शोधाशोध सुरु केली...असो...कुठली का होइना मिळाली ना बिर्याणी मग झालं तर...

पिके पण चांगलच आहे
आमचं नव वर्ष सेलिब्रेशन आज आहे....
बिग बाईट मधे ऑर्डर दिली आहे...जमलं तर टाकीन इथे फोटो
आमचं नव वर्ष सेलिब्रेशन आज
आमचं नव वर्ष सेलिब्रेशन आज आहे.. >>
मस्तच! आमचं पण. आम्ही आज सकाळी घरी केलेला केक सोबत नीर दोसा आणि मेदुवडे. जेवायला जरा गोडधोड + विदर्भी वडाभात. बिर्याणी प्रोग्रॅम 5 ता. ला.
धागा आत्ता वाचला सगळा.
धागा आत्ता वाचला सगळा. बिर्याणी कधी खाल्ली नसल्याने हेट करण्याचा विषयच येत नाही पण धागा हेटक्लब चा आहे आणि प्रतिसाद तर सगळेच्या सगळे उलट आहेत व्हीबी यांचा अपवाद सोडला तर. असा पहिलाच धागा पाहिलाय ज्यात धाग्याशी सम्बन्धित काहीच नाही. नशीब त्या कोबीच्या धाग्यावर आम्हाला कोबी कशी फार आवडते, कोबीच्या चांगल्या डिश मिळणाऱ्या हाटेलांची यादी वगैरे असे काही वाचण्याचे भाग्य नाही लाभले.
बादवे चांगली ऑथेंटिक व्हेज बिर्याणी कुठे मिळेल पुण्यात ?
घ्या. धाग्याच्या विषयावर
घ्या. धाग्याच्या विषयावर कोणीच लिहील नाही वगैरे लिहून शेवटी : बादवे चांगली ऑथेंटिक व्हेज बिर्याणी कुठे मिळेल पुण्यात ?

(No subject)
पुण्यातले लोक बिर्याणी
पुण्यातले लोक बिर्याणी पेक्ष्या दाल खिचडी प्रेफर करतात...
बिर्याणी पेक्ष्या दाल खिचडी
बिर्याणी पेक्ष्या दाल खिचडी प्रेफर करतात...
>>>>
आई ग्ग.. यावर तर एक वेगळा धागा निघेल. दाल खिचडी हेट क्लब नावाचा.. आजारी पडले की खायचे खाणे आहे ते
आजारी पडले की खायचे खाणे आहे
आजारी पडले की खायचे खाणे आहे ते >>> कोण म्हणाले असे, आमच्या मेसमध्ये दर रविवारी असतो हा मेन्यू.
आता दर रविवारी आम्ही आजारी थोडीच असतो.
मी तर आठवड्यात एकदा कधी दोनदा
मी तर आठवड्यात एकदा कधी दोनदा पण बनवते मग आम्ही आजारी थोडीच असतो.
पोळपाट/लाटणे आजारी पडत असेल.
पोळपाट/लाटणे आजारी पडत असेल.
मला तर दाल खिचडी कधीही आवडते.
मला तर दाल खिचडी कधीही आवडते. गरोदरपणात पहिले तीन महिने सारखी खिचडीच खायचे. तेव्हा बघून बघून साबाच कंटाळल्या होत्या.
दाल खिचडी फॅन क्लबचा मी पण
दाल खिचडी फॅन क्लबचा मी पण मेम्बर आहे. आठवड्यातून एक दोनदा असतेच आमच्या कडे.
टूर वर असताना बाहेरचे खाऊन कंटाळा आल्याने मी रात्री बहुत करून दाल खिचडी खातो.
आजारी चर्चा D :हाहा
आजारी चर्चा
>> दाल खिचडी फॅन क्लबचा मी पण
>> दाल खिचडी फॅन क्लबचा मी पण मेम्बर आहे
+१
मी पण ! दलिया खिचडी /दाल
मी पण ! दलिया खिचडी /दाल खिचडी/ मुग डाळ खिचडी /माडगे सगळ्याला +१.
आमच्या मेसमध्ये दर रविवारी
आमच्या मेसमध्ये दर रविवारी असतो हा मेन्यू.
>>>>
रविवारी
रविवार तर मस्त झणझणीत चमचमीत मसालेदार आणि खात असाल तर मांसाहार करायचा दिवस असतो ना
Pages