बिर्याणी हेट क्लब

Submitted by VB on 25 December, 2020 - 18:54

पार्टी चा भात म्हणजे बिर्याणी असे कितीतरी जणांचे मत असल्याचे लक्षात आले. माझ्या ओळखीच्या दहा पैकी आठ लोकांना बिर्याणी आवडते. अन म्हणून मला बिर्याणी आवडत नाही म्हणून ते नाकही मुरडतात.
पण खरेच माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना बिर्याणी आवडत नाही. पूर्वी मी कधीतरी खायची बिर्याणी, पण आता बघवतही नाही. तसेही हल्ली चांगली बिर्याणी मिळत सुद्धा नाही आवडायला. बरेचदा तर बिर्याणी च्या नावाखाली भाज्या/चिकन/मटण/कोलंबी नावापुरता घातलेला अन मसाल्याने थबथबलेला भात देतात. तो प्रकार तर अजून भयानक असतो. कदाचित ह्या सगळ्या मुळे असेल पण मला बिर्याणी आता बिलकुल आवडत नाही.
माबोवर पण खाऊगल्लीत बरेचदा बिर्याणी दिसते अन तिची प्रशंसा करणारे पण. म्हणून सहज उत्सुकता म्हणून जाणून घ्यायला आवडेल की माझ्यासारखे अजून कोणी बिर्याणी हेटर्स आहेत का इकडे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पॅरेडाईजमधली विजयवाडा बिर्याणी फार आवडते..
मेक्सिकोत असताना एका बिहारी मैत्रिणीकडे कठल बिर्याणी खाल्लेली.. ती ही फार आवडली होती..
असं म्हणतात की जगात ३६५ प्रकारच्या बिर्याण्या बनतात.. म्हणजे वर्षभर एकवेळेसच्या जेवणात मला कोणत्याही प्रकारची बिर्याणी दिली तरी मला खायचा कंटाळा येणार नाही..
कोणी परदा चिलमन चिकन बिर्याणी खाल्ली आहे का? पूर्वी न्यूयाॅर्कमधे रहात असताना एका पाकिस्तानी शेजारणीने शिकवली होती ही बिर्याणी.. एक नंबर असते

अरे भौत भाग री बिर्यानी तो ... अच्चा है अच्चा है.

मी पण लॉक डाउन काळात चिकन मिळणे अवघड होते तर तेलंगणा अंडा बिर्याणी बनवली होती. यु ट्ञूब वरची रेसी पी. लिहिते इथे.
मस्त होते खेडवळ चवीची.

पुण्यात भारती विद्यापीठच्या समोरच्या इमारतीत 101 Biryanis म्हणून एक हॉटेल होते. तिथे 101 प्रकारच्या बिर्याणीज मिळत होत्या अणि विशेष म्हणजे मातीच्या हंडीतून ते बिर्याणी पार्सल देत असंत. खूप चांगला दर्जा होता. पण आता ते हॉटेल नाही, तिथे डॉमिनोज सुरू झालेय. आता याच नावाने कोथरूड मध्ये एक दिसतेय पण ते तेच असेलसे वाटत नाही. वरती 365 बिर्याणींचा उल्लेख आलाय त्यावरून हे विस्मृतीत गेलेलं हॉटेल आठवलं.

मोदींचे कंदी पेढे घेतले, पण नाही आवडले.

>>>> लाटकरांचे खाऊन पहा ते पण झेड पी जवळच्या दुकानातून, कारण त्यांचीपण ३-४ दुकाने आहेत सातार्‍यातचं

>>मिरजेच्या तसेच वाडीच्या पेढ्यांची सर कुठेच नाही.

सातार्‍याच्या कंदी पेढे व मिरज/नरसोबावाडी/कुरुंदवाड/गणेशवाडी इथे बनवण्यात येणार्‍या खव्याचे पेढे म्हणजे पुलाव आणि बिर्याणी Happy

मलापण आवडतात वाडीचे पेढे आणि बासुंदी Happy
बाकी जन्म कोल्हापूरचा, बालपण सांगली जिल्ह्यात, गाव सातारा आणि सासुरवाडी कराड असल्यामुळे त्या पट्ट्यातल्या कशालाही पुलाव आणि कशालाही बिर्याणी म्हंटलात तरी आपली काही हरकत नाही Wink

>>वाडीची बासुंदी आता कोथरूडमध्येही उपलब्ध असते

हो... आणि ती जेंव्हा इतरत्र ॲव्हेलेबल नव्हती तेंव्हा एसटीच्या ड्रायव्हर बरोबर मागवायचो आम्ही ती वाडीहून Happy

अंडा बिर्याणी
Egg Biryani.jpg
चिकन बिर्याणी
Chicken Biryani.jpg
मटण बिर्याणी
Mutton Biryani.jpg

मिशिगनला गेलात तर नक्की try कराच>>> ओह! चांगली बिर्याणी हुकली माझी.
२ वर्ष आधीपर्यंत मिशिगनला वर्षातून एक चक्कर असायची. तेव्हा माहीत असते तर नक्कीच खाल्ली असती.

पुलाव म्हटले की पाव भाजी आठवते.. हे कॉम्बिनेशन फक्त मुंबईकर समजू शकतो..
>>>
हाफ भाजी पुलाव हा आम्हा पोरांचा दर नवरात्री गणपतीचा डिनर मेनू असायचा. यात हाफ प्लेट पुलाव, हाफ भाजी आणि दोन पाव मिळायचे मस्का मार के ..

IMG_20201108_173738.jpg
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 29 December, 2020 - 21:55
<<
याला फार तर बैदा राईस म्हणावं इतपत आहे. ही बिर्याणी नव्हे.

बिर्याणी अजिब्बात आवडत नाही. पुर्वी आवडायची पण गेल्या कित्येक वर्षात प्रत्येक पार्टीत बिर्याणी बघुन/खावून कंटाळा आला आणि आता तर बिर्याणी बघवत नाही. इथे जागो जागी बिर्याणी $६ मध्ये बिर्याणी ट्रे विकणारी रेस्टॉरंट्स निघाली आहेत. इतक्या स्वस्त बिर्याणी विकायला परवडती कशी तर तिखट जाळ मसाला आणि कॉस्टकोचा फ्रोजन मिक्स भाजीचा पॅक ज्यात कॉर्न/ब्रोकोली वगैरे असते वापरून केलेला भात म्हणजे बिर्याणी .

पुलाव मात्र खुप आवडतो. एव्हरेस्टचा शाही पुलाव मसाला वापरून फार सुरेख पुलाव होतो. पाव भाजी आणि पुलाव आणि त्यावर फालुदा आईसक्रीम हे अत्यंत भारी मेनु कॉम्बो आहे.

>>मिरजेच्या तसेच वाडीच्या पेढ्यांची सर कुठेच नाही.>>>
अगदी. मुळात दुधाचा दर्जाच इतका उत्तम असतो कि कोणतेही दुधाचे पदार्थ मस्त लागतात.

याला फार तर बैदा राईस म्हणावं इतपत आहे. ही बिर्याणी नव्हे.
नवीन Submitted by आ.रा.रा. on 30 December, 2020 - 19:28
>>>>>>

मी दिलेल्या लिंकमध्ये त्याला अंडा बिर्याणीच म्हटले आहे. मग मी उगाच मला पाककृतीतले काही माहीत नसताना त्याला विरोध करून बैदा राईस का म्हणावे?
म्हणून शक्य झाल्यास तुम्ही बैदा राईस कसा असतो त्याची लिंक द्या? मग येथील जाणकार मिळून ठरवतील की याला काय म्हणायचे Happy

अवांतर - बैदा शब्द का वापरायचा अंड्याला? भाषा बदलल्याने पदार्थ थोडी ना बदलतो. अंडा राईसही म्हणू शकला असता याला, किंवा शुद्ध मराठीत अंडे भात Happy

$६ मध्ये बिर्याणी ट्रे विकणारी रेस्टॉरंट्स निघाली आहेत.
>>> अक्खा ट्रे 6 मध्ये?? प्लेन राईस ट्रे देखील 6 ला दिला तर परवडणार नाही.. कोणते शहर आहे हे??
मी जिथे राहतो तिथे व्हेज बिर्याणी $11 ला मिळते.. ट्रे म्हणजे 35 ला..

. इतक्या स्वस्त बिर्याणी विकायला परवडती कशी तर तिखट जाळ मसाला आणि कॉस्टकोचा फ्रोजन मिक्स भाजीचा पॅक ज्यात कॉर्न/ब्रोकोली वगैरे असते वापरून केलेला भात म्हणजे बिर्याणी .>> देवा !! बिर्याणीत ब्रोकोली आणी कॉर्न?
एल जवळ एक मिनि इन्डीया टाइप ब्लॉक आहे (आर्टेशिया) तिथे बिर्याणि पॉट म्हणुन रेस्टॉरन्ट होत तिथे अस्सल हैदराबादी बिर्याणि मिळायची.सध्या बन्द झालय तिकडे राजधानीत उत्तम राजस्थानी थाली अगदी भारतिय अ‍ॅम्बियन्स आणि सर्व्हिन्ग स्टाइल मधे मिळते.

$६ मध्ये बिर्याणी ट्रे? ऐतेन. इथे साधी भाजी सुद्धा $१३,१४ खाली मिळत नाही.
बिर्याणीबद्दल प्रेमही नाही आणि नावडते असंही नाही. मी आजवर घरी कधीच ट्राय केलेली नाही. भाताच्या प्रकाराकरता इतके सोपस्कार आणि कष्ट करायला जीवावर येतं. बाहेर गेल्यावर ऑर्डर केलेली खाल्ली आहे.
वेजिटेरियन असल्यामुळे वेज बिर्याणीही (पुलाव नव्हे) खाल्ली आहे आणि जेवण संपवताना काहीतरी भाताचा प्रकार इतकंच महत्व मला त्याचं वाटलं आहे.

ट्रे छोटा असेल हो...तुमच्याकडच्या प्लेटएवढा असु शकतो. म्हणुन कमी असेल किंमत.
किंवा त्याच्याकडची बिर्याणी स्वस्तच असेल.

कदाचित तिचा किंमतीत गोंधळ झाला असावा. इकडे ज्या बिर्याणी आहेत ज्याचा पोर्शन साधारण दोन माणसांना पुरेसा होईल त्याची किंमत $१३ ते $१६ मध्ये आहे. ह्यात व्हेज, चिकन, लँब आणि गोट बिर्याणी आहेत.

आमच्या इथल्या रेस्ट्राॅंट्समधे 32 oz चिकन बिर्याणी जी दोघांना पुरेशी असते ती $१२ ला मिळते..घरून केटरिंग करणारेही त्याच किमतीत विकतात.. त्यांना बहुतेक $६० ला एक ट्रे म्हणायचं असेल

नाही म्हाळसा.. त्यांचे पुढचे वाक्य असे आहे - इतक्या स्वस्त बिर्याणी विकायला परवडती कशी तर
$६० स्वस्त कशी असेल... त्यांना $६ च म्हणायचे आहे...

आज मागवणार आहे
तिरंगा, पिके, पलंगे किंवा अजून काही पर्याय सांगता येइल का?
बेहरोझ ची खूप महाग वाटत आहे

तिरंगा, पिके, पलंगे किंवा अजून काही पर्याय सांगता येइल का? >

बिग बाइट बिर्यानी - झोमॅटो वर आहे.
"पुणे इट ऑउट्स (Pune Eat Outs)" नावाच्या फेसबुक ग्रुप वर भरपुर होम शेफ्स आहेत. पण तुम्हाला लवकर ऑर्डर द्यावी लागते.
जयश्रीज बिर्याणी म्हणुन एक जण आहे तिथे. गुगल करा नंबर मिळेल...उत्तम चवीची बिर्याणी बनवुन देतात.

सेनापती बापट रोड वर pavilion mall food court मधे जामवाली बिर्यानी (Jamawali Biryani) म्हणुन एक आउट्लेट आहे.
अतिशय सुरेख हलक्या फ्लेवर चा मसाला असलेली उत्कृष्ट बिर्यानी तिथे मिळते.
ऑनलाइन मागवता येते का ते माहित नाही. स्विगी/झोमॅटो वर चेक करुन बघा.

धन्यवाद स्मिता
चेक करतो मिळतेय का आज 31 च्या पार्टीसाठी

लोकहो,
आज प्लीज कोणीही बिर्याणी मागवू नका?
३१ ला मांसाचा तुटवडा होतो. हाताला लागेल ते जनावर पकडून बिर्याणीत टाकले जाते.
उगाच चिकन बिर्याणीच्या भ्रमात कौव्वा बिर्याणी आणि मटण बिर्याणीच्या नावाखाली कुत्ता बिर्याणी खाणे नशीबात येईल Sad

Pages