बिर्याणी हेट क्लब

Submitted by VB on 25 December, 2020 - 18:54

पार्टी चा भात म्हणजे बिर्याणी असे कितीतरी जणांचे मत असल्याचे लक्षात आले. माझ्या ओळखीच्या दहा पैकी आठ लोकांना बिर्याणी आवडते. अन म्हणून मला बिर्याणी आवडत नाही म्हणून ते नाकही मुरडतात.
पण खरेच माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना बिर्याणी आवडत नाही. पूर्वी मी कधीतरी खायची बिर्याणी, पण आता बघवतही नाही. तसेही हल्ली चांगली बिर्याणी मिळत सुद्धा नाही आवडायला. बरेचदा तर बिर्याणी च्या नावाखाली भाज्या/चिकन/मटण/कोलंबी नावापुरता घातलेला अन मसाल्याने थबथबलेला भात देतात. तो प्रकार तर अजून भयानक असतो. कदाचित ह्या सगळ्या मुळे असेल पण मला बिर्याणी आता बिलकुल आवडत नाही.
माबोवर पण खाऊगल्लीत बरेचदा बिर्याणी दिसते अन तिची प्रशंसा करणारे पण. म्हणून सहज उत्सुकता म्हणून जाणून घ्यायला आवडेल की माझ्यासारखे अजून कोणी बिर्याणी हेटर्स आहेत का इकडे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हलके घ्या लोक्स:
बटाटा हेटर्स क्लब

गेम ऑफ थ्रोन्स - हेटर्स क्लब

जीवनातले किती तरी सुखोपभोग न आव्डणारे लोक असतात. >> हो ना. मी चक्क शेपूची भाजी न आवडणारे लोक सुद्धा पाहिलेत. चालायचंच.

Meera.. Happy

मी चक्क शेपूची भाजी न आवडणारे लोक सुद्धा पाहिलेत. चालायचंच.

>>> मला नाही आवडायची शेपू पण आता आवडीने खातो.
तसचं बिर्याणीचही.

बायकोच्या मैत्रिणीने घरी आणून दिलेली चिकन बिर्याणी, ती आवड्ली. आता प्रॉन्स बिर्याणी कधी देते याची वाट पाहत आहे Lol

शेपू फॅन क्लब आहे का? तिथे जाते मग.

व्हिबी, बिर्याणी हा मेहेनती पदार्थ आहे, प्रत्येकाला तो जमेलच असे नाही. जसे आपल्याला पुरणाच्या पोळ्या, तीळाच्या पोळ्या जमतात तसे मुस्लिम स्त्रियांना व पुरुषांना बिर्याणी हमखास जमते असे मला वाटते. हरीहर यांचा बिर्याणी धागा आठवला. मी बिर्याणी खाल्ली होती ती व्हेज होती. ( मी व्हेजच आहे ) माझ्या चुलत नणदेने बनवली होती. बिर्याणी काय असते हे माहीत नसल्याने, मध्ये मध्ये हा पांढरा शिजवलेला भात हिने का घातला असे मनात विचार करत मी ती खाल्ली होती. चक्क बरी लागली कारण तिच्या हाताला चव आहे.

बाकी वर अमा यांनी दिलेल्या पद्धतीने ट्राय कर. तुझ्या हातचीच असल्याने तुला नक्कीच आवडेल.

चिकन बिर्याणीचे सुद्धा शाहरूखसारखेच दिसतेय

यूह कॅन लव्ह चि बिर्याणी
यूह कॅन हेट चि बिर्याणी
बट यूह कॅन नॉट इग्नोर चि बिर्याणी... येऊ दे एक लेग पीस अजून Happy

मी बिर्याणी खाल्ली होती ती व्हेज होती.
>>>

बिर्याणी हि नॉनवेजच असते. वेज बिर्याणी हा भ्रम आहे. ग्राहकांची फसवणूक आहे.

मी चक्क शेपूची भाजी न आवडणारे लोक सुद्धा पाहिलेत. चालायचंच.
>>>
चहात फरसाण टाकले की नाकं मुरडणारी लोकंही असतात. पण स्वत: मात्र तीच लोकं चहात बिस्कीट बुडवून खातात.

बिर्याणी हि नॉनवेजच असते. वेज बिर्याणी हा भ्रम आहे. ग्राहकांची फसवणूक आहे.>>> +१००००
मी ही माझ्या प्रतिसादात तेच म्हटलंय . पुलाव नामक पदार्थाला व्हेज बिर्याणी संबोधून फसवणूक करतात
मीरा, तुझा प्रतिसाद आवडला Happy

Actually मलासुद्धा बिर्याणी खूप आवडते.
मृणाली यांचा प्रतिसाद मलाही आवडला. Hate या शब्दाची शेड जरा निगेटिव्ह होते. नावड आणि hate हे दोघेही वेगळे पदार्थ झाले.
मात्र त्यावर VB यांची प्रतिक्रिया प्रचंड उथळ आणि पर्सनल वाटली. कुठलंही कुठे उकरून काढण्यापेक्षा धाग्याला अनुसरून उत्तर अपेक्षित होतं.

इराणी बिर्याणी मी try केली आहे. म्हैसूरला असताना खाल्ली होती आणि आवडली सुद्धा होती. मी सहजी मटण खाणारा नाही, चिकनवर भर असतो शक्यतो, पण या इराणी कॅफेत फक्त मटणच होतं म्हणून नाईलाजाने खाल्ली, आणि हाय... कसली जबराट चव होती त्या बिर्याणीची! त्या आधी बिर्याणी म्हणजे थबथबित मसाला, दही रायता आणि शोरबा पाहण्याची सवय असलेल्या मला जेव्हा त्या कॅफेने सर्व केलेली मटण पीस वेगळे आणि केशराच्या पाण्यात भिजलेला मिडीयम लांबीचा भात असलेली डिश समोर आली तेव्हा नाक मुरडले होते. पण जसा खायला लागलो, with every spoon, i fell in love with that dish! Unfortunately, म्हैसूर सोडायच्या महिनाभर आधी ह्या कॅफेचा शोध लागला म्हणून 2 वेळाच खाल्ल्या गेली. पुण्यात आल्यावर मात्र मी इराणी रेस्टॉरंट शोधण्याच्या भानगडीत पडलो नाही. *म्हैसूरच्या त्या कॅफेतल्या डिशची चव आजसुद्धा लक्षात आहे कारण मी पुन्हा कधीच तो पदार्थ खाल्ला नाही. चांगल्या आठवणींचं मातेरं करायचं नव्हतं मला!*

आमचा कूक म्हणतो, *भैया आप जो है खानेपे बहोत प्यार करते है! आपको खाते वक्त देखते है तो हमारा दिल खुस हो जाता है" तर ह्या कूकने आमच्या फ्लॅटवर मी खाल्लेल्या सर्वोत्तम बिर्याणींपैकी एक बनवली. अहाहा काय त्याचं कौशल्य! पहिल्यांदा बनवली तेव्हा घाईघाईने बनवली तरी मी त्याचं इतकं कौतुक केलं की त्याच्या पुढच्याच रविवारी भावाने शास्त्रशुद्ध पद्धतीने बिर्याणी बनवून दिली. म्हणजे आदल्या रात्री चिकन मॅरीनेट करायला स्पेशली तो आला. आल्या आल्या सांगितलं, "भैया कल सुभा जो है, हम आपके इहा सबसे लास्ट में आयेंगे, लेकीन आप नाश्ता वाषता मत करिएगा" तरीही पैलवान सकाळीच 5 वाजता हजर. काहीतरी कांदे वगैरे कापून तो त्याच्या पुढच्या घरी निघून गेला तर दुपारी 12 वाजता उगवला तो डेगची घेऊन. तिथून पुढे अर्ध्या तासात त्याने बिर्याणी मंद आचेवर ठेवली आणि गप्पा हाणत बसला. बरोबर 2 वाजता बिर्याणी उतरवून, पीठाने सील केलेलं झाकण जसं काढलं, वासानेच तोंडाला पाणी सुटलं ना! निव्वळ अप्रतिम चव!! दोघेच खाणारे आणि एक किलो चिकन होतं त्यात.. म्हणून त्यालाही खायला लावली बिर्याणी. ह्या cookचं नाव अॅलेक्स. पिंपळे सौदागर भागात कोकणे चौकाच्या भागात काम करतो हा

बिर्याणी(आम्ही व्हेजच खातो आणि पुलाव खपवला असला तरी बिर्याणीच म्हणतो Happy ) बाबत न्यूट्रल आहे.म्हणजे कधी आवडते कधी नाही बेहरुज ची बरीच ओरिजिनल वाटली.केशराचा वास येत होता.हैदराबाद हाऊस ची आवडते पण तेलकट वाटते.
बिर्याणी न आवडणारी माणसं जवळपास खूप आहेत.मी 'आईस्क्रीम आवडत नाही' म्हटलं की लोकांच्या चेहऱ्यावर 'मग काय उपयोग तुझ्या जगण्याचा' वाला डिसगस्ट दिसतो. Happy
बिर्याणी चांगली योग्य रेसीपीने, ताज्या वस्तू आणि खरे केशर वापरून बनवली असेल तर थोड्या प्रमाणात सर्वाना आवडावी.

की लोकांच्या चेहऱ्यावर 'मग काय उपयोग तुझ्या जगण्याचा' वाला डिसगस्ट दिसतो. Happy >>> हे एक जगातील सर्वात जुने फॅड आहे. कुणाला काही आवडत नसेल तर काही लोकांना आपल्या आवडीवर गदा आली असे वाटते की काय, असे मला वाटते.

बाकी व्हेज बिर्याणी हैद्राबादला सुद्धा मला फक्त पॅराडाईजची आवडते. नॉनव्हेज बिर्याणी खूप ठिकाणी छान मिळते, पण हैद्राबादला येउन व्हेज बिर्याणी खायची असेल तर मी फक्त पॅराडाईज सुचवेन.

मी 'आईस्क्रीम आवडत नाही' म्हटलं की लोकांच्या चेहऱ्यावर 'मग काय उपयोग तुझ्या जगण्याचा' वाला डिसगस्ट दिसतो. Happy
>>>>
मलाही आईसक्रीम केक चॉकलेट ईत्यादी जराही ते फारसे आवडत नाही. पण मी मात्र उलट हे खाणार्‍यांना छ्या काय तुम्ही मिळमिळीत गुळमुळीत पदार्थ खातात. आपण तर बाबा चि बिर्याणी, चि तंदूरी असले पदार्थ खातो म्हणत ताठ मानेने त्यांच्याकडे बघतो . मग काय कोणाची मजाल जो आपल्याला कुठला डिसगस्ट लूक देईल Happy

त्यातही समोरचा पोरगा असेल तर त्याला हे पोरी खातात रे म्हटले की त्यांचा पुरुषी अहंकार आणखी दुखावतो Happy

आवडनिवड ही व्यक्तिसापेक्ष असते. मला अत्तराचा वास थोडा वेळ बरा वाटतो. जास्त वेळानी डोकं दुखतं. लहानपणी माझ्या बिछान्याच्या खाली आंब्याची आढी होती. दिवसरात्र त्या वासानं मला आंबेही ही आवडत नसत. दुस-याच्या आवडीनिवडीला रिस्पेक्ट द्यावा.

पिंपळे सौदागर भागात कोकणे चौकाच्या भागात काम करतो हा

>>>> अजिंक्यराव, हॉटेल आहे का त्याचं ?

कि बिर्याणी हाऊस टाईप काही आहे?

मला पण अजिबात नाही आवडत बिर्याणी. कुणाकडे जेवायला गेल्यावर नुसती बिर्याणी असेल तर माझ्या पोटात गोळा येतो. कदाचित मी टेस्टी कुठे खाल्ली नसेन.
त्यापेक्षा वरणभात, फोडणीचा भात आवडीने खाईन.

अजिंक्यराव, हॉटेल आहे का त्याचं ?>> नाही, cook आहे तो. लोटस हॉस्पिटलच्या गल्लीत म्हणजे शिव साई लेन मध्ये 7, 8 घरांमध्ये cooking चे काम करतो तो. 2000 रुपये पर हेड!

बिर्याणी(आम्ही व्हेजच खातो आणि पुलाव खपवला असला तरी बिर्याणीच म्हणतो Happy ) बाबत न्यूट्रल आहे. +100

काही लोक शाकाहारी लोकांनाच हेट करतात आणि त्यामुळे व्हेज बिर्याणीबद्दलही हेट्रेड निर्माण होत असावा असं वाटलं इथे निगेटिव्ह प्रतिक्रिया वाचून.
व्हेज बिर्याणी चेंज म्हणून खायला आवडते विशेषतः थंडीच्या दिवसात. इथे एक ठिकाणी चांगली मिळते.

काही लोकांच्या विनोदबुद्धीची (!) आणि अचाट कल्पनाशक्तीची गंमत वाटते Biggrin

भातात चिकन घालून शिजवले की तो चिकन पुलाव किंवा फार तर चिकन खिचडी होते Wink .

बिर्याणी करताना भात वेगळा शिजवायचा. आधी भात शिजवून घेऊन बाजूला ठेवायचा. भाताची कणी मोडली नाही पाहिजे, भात एकदम सुटा सुटा शिजला पाहिजे, भातात मीठ योग्य प्रमाणात असावं, भात शिजताना त्यात अगदी एक दोन आख्खे मसाले घालावेत म्हणजे मसाल्यांचा मंद 'फ्लेवर' (वास नाही) भाताला लागतो आणि चमचाभरच साजूक(च) तूप मस्ट. भात शिजवताना या गोष्टी तंतोतंत पाळल्या पाहिजेत.

मटण, चिकन असल्यास आदल्या रात्री मॅरीनेट करून ठेवावं. मॅरीनेट करताना योग्य प्रमाणात मसाले आणि दही असावं म्हणजे छान मुरतं आणि चवी-फ्लेवर्स उमलून येतात. चिकन-मटण आधी अर्धवट शिजवून मग भाताचे एका आड लेअर्स लावून 'दम' देत बिर्याणी शिजवायची. मसाले योग्य प्रमाणात असावेत, फार मसालेदार बिर्याणी अजिबात चांगली लागत नाही,साजूक तूप, केशराचं दूध, काजू-बेदाणे, कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कुरकुरीत कांदा एकदम मस्ट. त्याबरोबरच किंचीत केवड्याचं पाणी. बिर्याणी कुकरमधे कधीही शिजवायची नाही. खरंतर कुकरमधे शिट्टी लावून खिचडी, पुलावही शिजवू नयेत. पसरट भांड्यात कडेनं कणीक सील करून मंद आचेवर शिजवावी. चिकन्/मटण एकदम लुसलुशीत शिजायला हवं. अगदी योग्य प्रमाणात शिजलेलं मांस अलगद बोनपासून सुटून येतं. बोनलेस मीट कधी घेऊ नये. मग झाकण उघडलं की तो मंद 'रॉयल' सुगंध पोटभर जेवण केलेल्याचीही भूक चाळवते. मंद सुगंध, तसेच माइल्ड फ्लेवर्स, अलवार सुटून येणारं चिकन, केशर-केवडा-कोथिंबीर-पुदिना-तळलेला कांदा आणि या सगळा चवी मुरलेला भात!

याच पद्धतीनं मी व्हेज बिर्याणी करते आणि अट्टल बिर्याणी खाणारेपण थोडीशी तरी खातातच.
ही माझी रिक्षा Wink - https://www.maayboli.com/node/16224

हेट असा नाही करत मी, पण बिर्याणी कशी केलीय त्यावर आवडली/आवडली नाही हे ठरते. हैद्राबादला सर्वात चांगली बिर्याणी मिळते असे ऐकून होतो. म्हणून एकदा हैद्राबादला असताना दोन तीन विविध ठिकाणी खाल्ली. पण कुठेच आवडली नाही. जीरा राईस (उर्फ फोडणी दिलेला भात), त्याच्या आत थोडा मसाला आणि मोजून एक चिकन लेग पीस. सोबत दही रायता. झाले. ठीक होती. म्हणजे चांगलीच होती. पण यात इतके प्रसिद्ध असण्यासारखे काय आहे असे वाटले. वरती एकदोन प्रतिक्रियेत पॅराडाईजचा उल्लेख आहे. अर्थात मी तिथली नाही खाल्ली. पण मंचुरियन पुण्यात ज्याला आवडते त्याला प्रत्यक्ष चीन मध्ये ते आवडणार नाही. माझे कदाचित तसे झाले असावे अशी मी माझी स्वत:ची समजूत करून घेतली आणि गपगुमान खाल्ली Happy

बाकी, खाण्यापिण्यात आवडीनिवडी असाव्यात का हा स्वतंत्र्य चर्चेचा विषय होईल. जमल्यास वेगळा धागा कोणीतरी काढा. आवडीनिवडी असण्याचा व त्या व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहेच. ते प्रश्नांकित करण्याचा हेतू नाही. पण चर्चा करायला हरकत नसावी.

>> साजूक तूप, केशराचं दूध, काजू-बेदाणे, कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कुरकुरीत कांदा एकदम मस्ट. त्याबरोबरच किंचीत केवड्याचं पाणी..............चिकन्/मटण एकदम लुसलुशीत शिजायला हवं. अगदी योग्य प्रमाणात शिजलेलं मांस अलगद बोनपासून सुटून येतं.
>> Submitted by अंजली on 27 December, 2020 - 00:32

हे एक नंबर आहे. वाचूनच तोंपासू.... हे वाचताना कळले, बिर्याणीमध्ये फ्राईड राइस नसतो. माझ्या वरच्या प्रतिसादात लिहिताना गफलत झाली बहुतेक.

Pages