चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कदाचित स्मिता पाटील ना इतर साधे झाडाभोवती पळत गाणे वाले पिक्चर्स आले असतील पण ते नाकारले असतील या अर्थाने.

हो , हेच म्हणायचे होते,

तिचे सगळे रोल विचित्र होते.

तिचा मृत्यू कसा झाला , हे मलाही माहीत आहे , अशा विचित्र भूमिका करणे व अकाली मरणे ह्यांचा तसा काहीही संबंध नाही , पण तरीही चुटपुट लागते की साधे रोल केले असते तर ...

हा फक्त योगायोग आहे , मलाही माहीत आहे , चांगले रोल करून दिव्या भारतीही लवकरच मेली .

असाच विचित्र योगायोग एका मराठी अभिनेत्रीबाबत घडला असे ऐकून आहे, तिने एक एल आय सी ची जाहिरात केली होती , त्यात ती एका रस्त्यावर पांढरी साडी घालून उभी आहे , तिची सावली पडलेली आहे ,शेजारी नवर्याचीही सावली आहे , पण शेजारी नवरा नाही

ही जाहिरात आली आणि थोड्या दिवसात तिचा नवरा खरोखरच मेला म्हणे, हाही ऐकिवच किस्सा आहे, नाव मुद्दाम लिहिले नाही , नैतर माझ्यावर लोक ओरडतील.

योगायोग आहे फक्त , मला माहित आहे,

हे अमानवीय धाग्यावरचे किस्से होऊ शकतील

साधना, चांगली माहिती.
पूर्वी 'आर्ट मूव्ही' 'कमर्शियल मूव्ही' 'साधी हिरॉईन' 'व्हॅम्प' अश्या स्पष्ट कॅटेगरी असायच्या.
आता सगळ्यांत सगळं असतं.
फक्त आर्ट मूव्ही मध्ये काम करणार्‍यांना कमी पैसे आणि पिक्चर आपटण्याचा धोका असेल.
पुरस्कार वगैरे मिळून पण त्याचा पैश्यांना उपयोग नसेल.

असाच विचित्र योगायोग एका मराठी अभिनेत्रीबाबत घडला असे ऐकून आहे, तिने एक एल आय सी ची जाहिरात केली होती , त्यात ती एका रस्त्यावर पांढरी साडी घालून उभी आहे , तिची सावली पडलेली आहे ,शेजारी नवर्याचीही सावली आहे , पण शेजारी नवरा नाही
ही जाहिरात आली आणि थोड्या दिवसात तिचा नवरा खरोखरच मेला म्हणे, हाही ऐकिवच किस्सा आहे, नाव मुद्दाम लिहिले नाही , नैतर माझ्यावर लोक ओरडतील.

नीना कुलकर्णी का?

स्मिता पाटीलने झाडाभोवती पळत गाणे असलेले चित्रपटही केले आहेत. मला ती 'डान्स डान्स' चित्रपटात मिथुन चकवर्तीबरोबर आलिशा चिनॉयच्या आवाजात 'सुपर्ब डान्सर' ओरडत डिस्को करताना बघून आश्चर्याचा धक्का बसला.

चित्रपटात व्हिलन बनलेल्यांनी कितीतरी अभद्र कामे पडद्यावर केलीत. त्यांचे काय वाईट झाले? किती तरुण वयात गेले?

नीना कुलकर्णीची जीवन विम्याची जाहिरात दिलीप कुलकर्णी गेल्यानंतर आली होती. आणि त्या आधी ती नाटक सिनेमात भरपूर कामे करत होतीच. त्यात कधीही विधवेचे काम केले नसणारच का?

काही लोकांचे विचारच किती अभद्र असतात... इतरत्र जे मिळेल त्यावर टीका करायची आणि स्वतः असले योगायोग आणि काय काय शोधत बसायचे...

ब्लॅककॅट, अतिशय वाईट अभिरुचीहीन पोस्ट.

>>>>+११११११

असल्यांना पोकळ बांबूंचे फटके द्यायला हवेत

काल ginny weds sunny या नावाचा पिक्चर पाहिला. ती यामी गौतमी दिसली म्हणून.. पण बरा वाटला.. बरा वेळ गेला

फार उत्सुकतेने पाहिला आणि अगदीच अपेक्षाभंग झाला - सूरज पे मंगल भारी..>> अगदिच, ट्रेलर मधेच जे काय बरे होते ते विनोद दाखवुन टाकलेत,खुप अ‍ॅबरप्ट वाटलाय मुव्हि,त्यातही मराठी कुटुन्ब दाखवल्यावर ते हिन्दी अ‍ॅक्सेन्ट मधल मराठी बोलत तेव्हा अजुनच वैताग येतो, सगळ्यात भारी काम सुप्रियाच झालय.कथेत आणी विनोदात दम नसल्याने अ‍ॅक्टर चान्गले असुनही उपयोग नाही.

काय स्टोरी आहे
मला 15 मिनिटे समजला नाही , म्हणून बंद केला

David म्हणजे तोच सिनेमा का? डेव्हिड नावाच्या दोन युवकांची पैरलल स्टोरी सुरू असते? विक्रम पण आहे ना त्या सिनेमात?

हो

मी पण पाहिला आहे.. छान वाटला... सुरुवातीला पटकन लक्षात येत नाही काय सुरू आहे पण चांगला आहे सिनेमा.. दोन वेगवेगळ्या काळातल्या डेविड नावाच्याच युवकांबद्दल..

दिवसरात्र अभद्र भूमिकांचेच चिंतन करून म्हणूनच बहुदा लवकर मेली असावी >>>>>या वाक्याची कीव करावी वाट्ली .. असो!

दोन नाही तीन. १९७५ मधला डेव्हिड निल नितीन मुकेश फ्रॉम लंडन, १९९९ मधला एक अज्ञात कलाकार फ्रॉम मुंबई, आणि २०१० मध्ये विक्रम फ्रॉम गोआ..

पैकी निनिमु ७५ मध्येच मरतो, निनिमुच्या मुलामुळे अज्ञात कलाकार फ्रॉम मुंबईचे जीवन १९९९ मध्ये पूर्णपणे बदलून जाते, आणि अज्ञात कलाकार फ्रॉम मुंबई विक्रमला त्याच्या जीवनाचे महत्व सांगतो. इंटरेस्टिंग पार्ट हा कि, ह्या तिघांच्या लाईफचा intersecting पॉईंट १२ ते १५ सेकंदच असतो.

मी बरेच दिवस झाले सिनेमा पाहून.. खऱ मी आधी तीनच लिहिले होते पण गुगलवर पाहिले तर तीथे दोन दिसले म्हटलं अरे मी स्टोरी विसरले वाटतं मग एडिट करून दोन केले होते. Happy IMG_20201221_144822.JPG

आपला माणुस पाहिला काल ईथे धागा आहे का अनेक प्रश्न अनुत्तरीत राहीले..दुसर्या बाजूने काही मांडले गेलेच नाही

आपला माणुस पाहिला काल ईथे धागा आहे का अनेक प्रश्न अनुत्तरीत राहीले..दुसर्या बाजूने काही मांडले गेलेच नाही
नवीन Submitted by aashu29 on 21 December, 2020 - 19:11>> हो मलाही असंच वाटलं होतं तो पिक्चर बघून

कसा बघितला तुम्ही तो.. chewing गम सारखा ताणला आहे... प्रचंड मोठा केलाय चित्रपट.. गरज नसताना...

बराच अतार्किक आहे, मेन म्हणजे सासरा सुनेला खड्या सारखं बाजुला काढायला बघतो आणि बिल म्हातारपण वार फोडतो असे कुणालाही वाटले नाही

मी तर सासू सासऱयांसोबत थिएटर मधे जाऊन बघितलेला.. त्यांच्याही डोक्यात गेलेला तो पिक्चर .. नाना पाटेकरने का बरं केलं त्यात काम देव जाणे

पकाव पिक्चर आहे
काही शेवटची वाक्य सोडल्यास बाकी उगीच स्वतः तिरसटपणा करून बाकीच्यांना दोष दिलाय.
संदेश चांगला असेल पण तो सतत डोक्यात मारत राहिल्याने डोक्यात गेलाय.
आणि ताणाला आहेच.

मेन म्हणजे सासरा सुनेला खड्या सारखं बाजुला काढायला बघतो आणि बिल म्हातारपण वार फोडतो असे कुणालाही वाटले नाही>> मलाही अगदीच असे वाटले होते. भयंकर दाखवलाय तो माणूस. सून म्हणजे बाहेरची असे सरळ सरळ म्हणतो मुलाला. सून उशिरा आली तर बिचार्‍या लांब राहणार्या नातवाला फोन करुन सांगतो लगेच.

Pages