Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@ म्हाळसा
@ म्हाळसा
पण एकटं बघण्यापेक्शा ग्रूपमधे बघण्यासारखा मूव्ही वाटला..
>>>
मला नेमके उलटे वाटले. म्हणजे मला असे पिक्चर स्टोरीत घुसून एकटेच बघायला बरे वाटतात.
तेच परवा कुछ कुछ होता है आणि आज मै हू ना ग्रूपमध्ये पाहिले.
अर्थात पसंद अपनी अपनी, ग्रूप अपना अपना
अरे हो, दोन्ही छान पिक्चर आहेत. मेन म्हणजे दोघांना रिपीट वॅल्यू आहे जी गेली कित्येक वर्षे माय नेम ईज खान आणि चेन्नई एक्सप्रेस नंतर शाहरूखच्या कुठल्या चित्रपटात आढळली नाही. त्यामुळे कोणी बघितले नसल्यास जरूर बघा.
नेटफ्लिक्स तोर्बाज बरा आहे.
नेटफ्लिक्स तोर्बाज बरा आहे. संजय दत्त, नर्गिस फाक्री इ. हृदयद्रावक इ व्हायला खूप वाव होता. पण इतक्या पैशात इतकीच अॅक्टींग करू असे सर्वच कलाकार असल्याने कथा कळते, वाईट वाटतं पण आतडे-काळीज वगैरे पिळवटून निघत नाही.
दरबान पाहिला
दरबान पाहिला
पिक्चर चांगला आहे.लोकेशन, सिनेमॅटोग्राफी सुंदर.सर्व कलाकारही चांगले अभिनयात.
पण बंगाली लोक इतक्या डिप्रेसिंग कथा का लिहितात हा प्रश्न परत पडला
कथेतल्या कोणाला म्हणजे कोणालाच सुखाने जगूच द्यायचं नाही.प्रत्येकाचा काही न काही कारणाने बँड वाजवायचा.
(बहुधा माझ्या बाबतीत गाढवाला गुळाची चव काय असेल.)
लक्ष्मी च्या धक्क्यातून कुटुंब अजून न सावरल्याने दुर्गामती पासून कटाक्षाने लांब राहणार.
पूर्णा हा खऱ्या घटनेवर आधारित
पूर्णा हा खऱ्या घटनेवर आधारित राहुल बोसचा चित्रपट पाहिला
अतिशय संथ आणि कमालीचा प्रेडिक्टेबल
म्हणजे मी बेट लावली की हा प्रसंग क्लायमॅक्स ला पुन्हा दाखवणार
अगदी तसाच झालं
13 व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणारी ही आदिवासी मुलगी
तिचा संघर्ष खूप चांगल्या पध्दतीने मांडता आला असता पण तद्दन फिल्मी करून टाकालाय
लक्ष्मी च्या धक्क्यातून
लक्ष्मी च्या धक्क्यातून कुटुंब अजून न सावरल्याने दुर्गामती पासून कटाक्षाने लांब राहणार.>>>>>>>>
ट्रेलर बघूनच हि़मत होत नाही हे दोन्ही सिनेमे बघायची.
लेथ जोशी फायनली बघितला.
लेथ जोशी फायनली बघितला..कधीपासून लिस्टित होता. भारी आहे. शेवट पाहून त्रास झाला पण असाही असू शकतोच शेवट, सो ठीके.
दुर्गामती पाहिला...
दुर्गामती पाहिला...
भूमी ला अनुष्का शेट्टी सारखा अभिनय करण्यासाठी अजून सात जन्म घ्यावे लागतील...
अभिनय कॉपी करायचा प्रयत्न दिसून येतोय...
पण कुठे रॉयल अनुष्का आणि कुठे ही ओव्हररेटेड भूमी...
Wolfwalkershttps://www.imdb
Wolfwalkers
https://www.imdb.com/title/tt5198068/
लै भारी हाये ह्यो पिच्चर
भूमि आणि राधिका आपटे दिसेल
भूमि आणि राधिका आपटे दिसेल म्हणून वेबसिरीज बघायचीच भिती वाटते मला. त्या आल्या की लगेचच सॅड वाटायला लागतं.
त्या दरबान बद्दल आधी मुलीने
त्या दरबान बद्दल आधी मुलीने 'आई आपण डर्बन नक्की बघायचाय' म्हणून सांगितलं>
माझ्या डोक्यात तो म्युनिच हल्ल्यातला कोणता प्रसिद्ध हॉलीवूडपट होता तोच आला.
मग नंतर बघायला लागल्यावर अरे यात डर्बन शहराबद्दल काहीच नाही, सगळं भारतातच आहे कळल्यावर नाव आणि वर्णन परत वाचलं आणि ते दरबान असल्याचा साक्षात्कार झाला.
शिवाय 'दरबान' हा शब्द अजून मुलीला माहित नाही हेही नव्याने कळलं. (एरवी त्यांचा हिंदी पोर्शन एकदम खतरनाक असतोय.खूप कठीण कठीण शब्द असतात.)
लक्ष्मी च्या धक्क्यातून
लक्ष्मी च्या धक्क्यातून कुटुंब अजून न सावरल्याने दुर्गामती पासून कटाक्षाने लांब राहणार.
>>>>>
भूमी ला अनुष्का शेट्टी सारखा अभिनय करण्यासाठी अजून सात जन्म घ्यावे लागतील...+ ११११११११
लक्ष्मी च्या धक्क्यातून
लक्ष्मी च्या धक्क्यातून कुटुंब अजून न सावरल्याने दुर्गामती पासून कटाक्षाने लांब राहणार. >>>
मी इथे वाचून लक्ष्मी बघायचा नाही ठरवलं, नवऱ्याला पण सांगितलं. सेम दुर्गामतीबद्दल. थोर उपकार इथल्या लिहिणाऱ्या सर्वांचे.
पूर्णा हा खऱ्या घटनेवर आधारित
पूर्णा हा खऱ्या घटनेवर आधारित राहुल बोसचा चित्रपट पाहिला>>>>>>>>>>> त्यात पूर्णाचे काम जिने केलेय आदिती इनामदार ती माझी भाची आहे.
हॉटस्टार वर डोंबिवली रिटर्न्स बघितला (पळवत) एवढा काही खास नाहीये.
त्यात पूर्णाचे काम जिने केलेय
त्यात पूर्णाचे काम जिने केलेय आदिती इनामदार ती माझी भाची आहे. >>> हो तू मागे सांगितलं होतंस बहुतेक, आता मोठी झाली असेल ना ती. तिच्यासाठी मी प्रोमोज बघितले होते, मस्त काम केलं होतं तिने.
भूमी ला अनुष्का शेट्टी सारखा
भूमी ला अनुष्का शेट्टी सारखा अभिनय करण्यासाठी अजून सात जन्म घ्यावे लागतील.
>>>
दोघी योग्य आहेत आपल्या जागी. जिथे टिपिकल सौथेंडियन भडक ॲक्टींग भुमिकेची गरज आहे तिथे अनुष्का सरस वाटणार ईतकेच.
हो तू मागे सांगितलं होतंस
हो तू मागे सांगितलं होतंस बहुतेक, आता मोठी झाली असेल ना ती. >>>>>>>>>>हो नुकताच १८ वा वाढदिवस झाला.
तिच्यासाठी मी प्रोमोज बघितले होते, मस्त काम केलं होतं तिने.>>>>>>> थँक्यू
दुर्गामतिचा ट्रेलर युज्वली
दुर्गामतिचा ट्रेलर युज्वली भुताखेताच्या मुव्हीचे असतात तसाच वाटला पण हॉरर मुव्ही बघायला आवडत नसल्याने बघण्याची शक्यता नाहि.
भुमीची अॅक्तिन्ग मला आवडते
http://www.misalpav.com/node
http://www.misalpav.com/node/47984
ही स्मिता पाटील बाई कायम अभद्र भूमिकाच करत होती का ?
घर सोडलेली बाई
नवर्याने सोडलेली बाई
नवऱ्याला सोडलेली बाई
जंगलातील बाई
जमीनदारावर मिरची उधळणारी बाई
आणि आता हे , 3 तोंडाचे विचित्र पोर असलेली बाई !
https://youtu.be/4mmcLn63hy8
दिवसरात्र अभद्र भूमिकांचेच चिंतन करून म्हणूनच बहुदा लवकर मेली असावी
बंडखोर भूमिकाच स्वीकारत असेल
बंडखोर भूमिकाच स्वीकारत असेल बहुतेक
नमक हलाल मध्ये, आखीर क्यो मध्ये नॉर्मल रोल्स आहेत.
त्यात तरी कुठे फार नॉर्मल रोल
त्यात तरी कुठे फार नॉर्मल रोल आहेत ?
आखीर क्यू मध्येही पहिल्या नवराचे वाटोळे होते , त्याची 1 लफडे , मग हिचेही 1 लफडे
आखिर क्यू ?
राकेश रोशन मरत नाही बहुतेक
राकेश रोशन मरत नाही बहुतेक
फक्त ही राजेश खन्ना चा आधार घेऊन आशाश्री नावाने प्रसिद्ध लेखिका बनताना राकेश रोशन ची मेहुणी कम बायकोशी भांडणं चालू होतात.(पण नवऱ्याने टाकलेली वगैरे क्लॉज आहेच.)
पूर्ण नॉर्मल भूमिका मला फक्त नमक हलाल ची माहिती आहे.
हो , राकेश रोशन मरत नाही
हो , राकेश रोशन मरत नाही
मला फक्त तो शेवटचा सीन अखिर क्यू लक्षात होता, म्हणून वाटले होते तोही मेला की काय
आता गुगलवर बघितले , तो जगतो , पण त्याचे वाटोळे होते
दिवसरात्र अभद्र भूमिकांचेच
दिवसरात्र अभद्र भूमिकांचेच चिंतन करून म्हणूनच बहुदा लवकर मेली असावी >>>>>>>> तुम्हाला एखादी अभिनेत्री आवडत नसेल तर तो तुमचा प्रश्न. पण एखाद्याच्या/ एखादीच्या मृत्यूचे खर कारण माहित नसताना त्या मृत्यूची मस्करी करणे पटत नाही. ट्रोलिन्गला पण काहीतरी मर्यादा असावी.
त्यात तरी कुठे फार नॉर्मल रोल आहेत ?
आखीर क्यू मध्येही पहिल्या नवराचे वाटोळे होते , त्याची 1 लफडे , मग हिचेही 1 लफडे
आखिर क्यू ? >>>>>>>> त्या चित्रपटाचे आणि तिच्या भूमिकेचे खरे मर्म तुम्हाला कळलेच नाही.
खरी स्टोरी अशी आहे की राकेश रोशनला फक्त घर साम्भाळण्यासाठी आणि बाहेर मिरवण्यासाठीच बायको हवी असते. कुठलीच अटॅचमेण्ट नसते तिच्याशी. लग्न झालेल असतानाही तिच्या नकळत त्याचे एका मुलीशी अफेअर सुरुच असते. नन्तर तो टिना मुनीमच्या सौन्दर्यावर भाळून तिच्याशी लफड करतो. राकेश रोशन स्मिताला घरातून अपमानित करुन हाकलून देतो. मुलीलाही नेऊ देत नाही तिच्याबरोबर . घरातून बाहेर पडल्यानन्तर तिला आपल्या अस्तित्वाबद्दल प्रश्न पडतात. आधी ती दुरर्शनवर निवेदिकेचे काम करते ( खर्या आयुष्यात ती निवेदिका म्हणून काम करायची. ) नन्तर ती राजेश खन्नाच्या प्रेरणेमुळे ती लेखिका बनते. तिलाही राजेश खन्नाबदल प्रेम वाटत असत, पण त्या काळच्या समाजाला घाबरुन ती पहिल्यान्दा लग्नाला नकार देते.
शेवटचा सीन अखिर क्यू लक्षात होता, >>>>>> तुम्ही तो सीन नीट बघितला नाही का?
बंडखोर भूमिकाच स्वीकारत असेल बहुतेक >>>>>>> मग चुकीच काय त्यात जर ती बंडखोर भूमिका करत असेल तर? बंडखोर भूमिका अभद्र कशा?
नमक हलाल मध्ये फक्त ती शोपीसच होती. पावसातल्या गाण्यापुरतीच दिसली होती तिथे.
व्हाय सो हेट्रेड टू हर?
व्हाय सो हेट्रेड टू हर?
सुलू,
सुलू,
मला काही प्रॉब्लेम नाहीये गं स्मिता पाटीलशी.
मी फक्त ब्लॅक कॅट च्या 'सगळ्या भूमिका अश्याच कश्या' वर विचार करत होते त्यात ते लिहीलेलं आहे.कदाचित स्मिता पाटील ना इतर साधे झाडाभोवती पळत गाणे वाले पिक्चर्स आले असतील पण ते नाकारले असतील या अर्थाने.
मी फक्त ब्लॅक कॅट च्या
मी फक्त ब्लॅक कॅट च्या 'सगळ्या भूमिका अश्याच कश्या' वर विचार करत होते त्यात ते लिहीलेलं आहे.कदाचित स्मिता पाटील ना इतर साधे झाडाभोवती पळत गाणे वाले पिक्चर्स आले असतील पण ते नाकारले असतील या अर्थाने. >>>>>>> तस असेल तर ठीक आहे, पण कुठलाही चित्रपट नीट न बघता त्याच्या कथेवर आणि एखाद्याच्या भुमिकेवर कसलेही तर्कवितर्क काढले जातात हे मात्र अतर्क्यच आहे.
स्मिता पाटीलने झाडामागे
स्मिता पाटीलची झाडामागे पळापळी बघायची असेल तर "जाने कैसे कब कहां" बघायच. आधी सूचीपर्णी झाडाखाली, मग प्रेअरीसारख्या गवताळ प्रदेशातून धावत, मग ट्रॉपिकल जंगलात ... बजेट संपलं म्हणून बाई थांबल्या, नाहीतर वाळवंटातही धावून आल्या असत्या...
दिवसरात्र अभद्र भूमिकांचेच
दिवसरात्र अभद्र भूमिकांचेच चिंतन करून म्हणूनच बहुदा लवकर मेली असावी
>>>
हे मलाही खटकले. अश्या पोस्टी राजकीय धाग्यांवरच शोभतात. ईथे टाळल्यास उत्तम.
बाकी मला स्मिताचा एकच पिक्चर माहीतेय. आज रपट जाये तो हमे ना ऊठय्यो. छान वाटली की त्यात.
सीमंतिनी, सहमत. यात राजकीय
यात राजकीय काही नाही पण बाई आहे. Black cat ह्या आईडीला हिंदू धर्म व स्त्री ह्या दोन गोष्टींचा तिरस्कार आहे. मायबोलीवरून ह्या आईडीला आजवर 100 वेळा तरी हाकलले गेले आहे. पण तरीही परत येऊन मिळेल त्या कुठल्याही धाग्यावर स्वतःचे हे दोन तिरस्कार तो आईडी लिहीत असतो. इतके विचित्र व अभद्र विचार असलेला दुसरा आईडी मायबोलीवर पाहिला नाही.
स्मिताने तिच्या झाडामागे
स्मिताने तिच्या झाडामागे पळापळीचे कारण तेव्हा सांगितले होते. बॉलीवुड तेव्हा बॉलिवूड झाले नव्हते तसेच तेव्हा कमर्शियल व आर्ट अशा दोन समांतर धारा हिंदी चित्रपट सृष्टीत तेव्हा होत्या. आर्ट मध्ये गंभीर चित्रपट येत ज्यांना भरपूर बक्षिसे मिळत पण प्रेक्षकवर्ग मिळत नसे. स्मिताने कित्येक आर्ट फिल्म्समध्ये उत्तम अभिनय केलेला आहे. तिच्या मते झाडामागे पळापळ केलेल्या चित्रपटात तिला बघून चेहरा ओळखीचा वाटल्याने एखादा माणूस आर्ट फिल्मच्या पोस्टरवर तिला पाहून तो चित्रपट बघायची शक्यता असे. तिला पाहून तरी दोन चार प्रेक्षक येतील ही आशा.... (नंतर त्यातले काही शिव्या घालत जातील, एखादाच असेल ज्याला आशय समजून चित्रपट आवडेल.)
आता आर्ट व कमर्शियल हा भेद नाहीसा झालाय. बिनडोक मनोरंजन व थोडे डोक्याला खाद्य असे सर्व चित्रपट येतात. सगळ्यांना सर्वत्र काम मिळते.
Pages