शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या खेळासाठी एक परिच्छेद दिलेला आहे.
विषय : शालेय शिक्षणाचे माध्यम

त्यातील काही शब्द पुसून तिथे कंसात अंक घातले आहेत. अंक = पुसलेल्या अक्षरांची संख्या. उदा. (१), (३).
तुम्ही सर्व (शब्द) ओळखून अर्थपूर्ण वाक्ये करायची. नंतर सर्व वाक्ये एकत्रित वाचल्यावर वर दिलेल्या आशयाचा परिच्छेद झाला पाहिजे.
आपण ४ तास वेळ घेऊ. उत्तराची वेळ झाली की मगच आपापला परिच्छेद डकवा. असे करताना आधीचे प्रतिसाद वाचू नका !
………………………………………………………….

शालेय शिक्षणाचे माध्यम (४) असावे असे जगभरातील अनेक (४) वेळोवेळी सांगत आलेले आहेत. जगातील बऱ्याच प्रगत देशांनी त्याबाबतीत हे (३) स्वीकारलेले दिसते. परंतु भारतासारख्या (५) देशात मुळातच गोची झालेली आहे. दिवसेंदिवस (४) नकोच आणि सर्वांनीच इंग्रजीतून शिकावे असा विचार (५) दिसतो. यासंदर्भात बरेचजण गेल्या शतकातील एक थोर शिक्षणतज्ञ विष्णुशास्त्री (७) एका विधानाचा संदर्भ देतात. मुळात विष्णुशास्त्रीनी इंग्रजीला (४) दूध म्हटले होते हे अर्धसत्य आहे. त्यांनी केलेले संपूर्ण (३) असे आहे,

“इंग्रजी भाषेला (४) दूध म्हणून बरेच विद्वान (४) आहेत खरे, परंतु या दुधावर (२-३) सर्वत्र मेषपात्रेच (४) असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे.”

नीट विचार केला तर या विधानातील (३) आजही पटेल. इंग्रजी (५) शिकले, (६) चुकीचे पण फाडफाड इंग्रजी बोलले आणि टाय घालून (४), म्हणजे जग जिंकले, असे (५) कारण नाही. शिकून सवरून आपापल्या क्षेत्रात (३) ज्ञान (४) केल्यासच या दुधातून (२) निपजतील. अन्यथा सर्वत्र मेषपात्रांचाच (५) होईल. माझ्या माहितीतील (९) स्वच्छता विभागात सेवक असणाऱ्या गृहस्थांचे (५) सांगतो. त्यांच्या घरात मोठे सगळेच अशिक्षित. त्यांनी (५) परवडत नसतानाही हट्टाने त्यांच्या मुलाला (३) इंग्रजी (४) शाळेत घातले.

शाळेमध्ये (८) मुलगा चाचपडत होता. घरी त्याचा अभ्यास (५) घेणे कोणालाच शक्य नव्हते. अखेर तो मुलगा कसाबसा (६) दहावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर पुढे शिकण्याचा (६) त्याच्यात राहिलेला नव्हता. अशी कितीतरी उदाहरणे आपल्या (६) दिसतात. पाल्याला जर आपण (६) इंग्रजी माध्यमात शिकवणार असू, तर आपल्यालाही त्याचा अभ्यास (५) घेण्याची मानसिक तयारी करावी लागेल. अन्यथा पुढे आपल्या पाल्याची (3), न घरका, न घाटका अशी होऊ शकते.

जाता जाता एक विनोद सांगतो. आपल्या घरांमध्ये (३) जाणाऱ्या भाषेला (५) का म्हणतात, पितृभाषा का नाही, असा (२) कधी तुमच्या मनात आला आहे काय ? तर त्याचे (३) असे आहे, की घरामध्ये (४) आईच बोलत असते, (४) फारसे तोंड (५) संधीच मिळत नाही !
...................................................................

मी आहे, देते ४ तासांनी
परंतु या दुधावर (२-३) सर्वत्र मेषपात्रेच --- हा शब्द २ किंवा ३ अक्षरी घ्यावा? की ५ अक्षरी = २+३ अशी फोड आहे?

शालेय शिक्षणाचे माध्यम (मातृभाषा-४) असावे असे जगभरातील अनेक (सुधारक-४) वेळोवेळी सांगत आलेले आहेत. जगातील बऱ्याच प्रगत देशांनी त्याबाबतीत हे(माध्यम(३) स्वीकारलेले दिसते. परंतु भारतासारख्या (कृषीप्रधान५) देशात मुळातच गोची झालेली आहे. दिवसेंदिवस मातृभाषा(४) नकोच आणि सर्वांनीच इंग्रजीतून शिकावे असा विचार बोकाळलेला/ पसरलेला(५) दिसतो. यासंदर्भात बरेचजण गेल्या शतकातील एक थोर शिक्षणतज्ञ विष्णुशास्त्री (चिपळूणकर?-७) एका विधानाचा संदर्भ देतात. मुळात विष्णुशास्त्रीनी इंग्रजीला वाघिणीचे(४) दूध म्हटले होते हे अर्धसत्य आहे. त्यांनी केलेले संपूर्ण विधान(३) असे आहे,

“इंग्रजी भाषेला वाघिणीचे(४) दूध म्हणून बरेच विद्वान प्रशंसित(४) आहेत खरे, परंतु या दुधावर काही सोडून(२-३) सर्वत्र मेषपात्रेच (आढळत-४) असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे.”

नीट विचार केला तर या विधानातील (सत्यता-३) आजही पटेल. इंग्रजी (माध्यमातून-५) शिकले, (व्याकरणदृष्ट्या -६) चुकीचे पण फाडफाड इंग्रजी बोलले आणि टाय घालून (मिरवीत-४), म्हणजे जग जिंकले, असे (समजण्याचे-५) कारण नाही. शिकून सवरून आपापल्या क्षेत्रात (उत्तम-३) ज्ञान (४) केल्यासच या दुधातून (हिरे/वी-२) निपजतील. अन्यथा सर्वत्र मेषपात्रांचाच (खेळखंडोबा-५) होईल. माझ्या माहितीतील (महानगरपालिकेत-९) स्वच्छता विभागात सेवक असणाऱ्या गृहस्थांचे (उदाहरण-५) सांगतो. त्यांच्या घरात मोठे सगळेच अशिक्षित. त्यांनी (आर्थिकदृष्ट्या-५) परवडत नसतानाही हट्टाने त्यांच्या मुलाला (प्रसिद्ध-३) इंग्रजी (माध्यमाच्या-४) शाळेत घातले.

शाळेमध्ये (८) मुलगा चाचपडत होता. घरी त्याचा अभ्यास (५) घेणे कोणालाच शक्य नव्हते. अखेर तो मुलगा कसाबसा (रडतखडत/महत्प्रयासाने-६) दहावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर पुढे शिकण्याचा (६) त्याच्यात राहिलेला नव्हता. अशी कितीतरी उदाहरणे आपल्या (अवतीभोवती-६) दिसतात. पाल्याला जर आपण (जबरदस्तीने-६) इंग्रजी माध्यमात शिकवणार असू, तर आपल्यालाही त्याचा अभ्यास (५) घेण्याची मानसिक तयारी करावी लागेल. अन्यथा पुढे आपल्या पाल्याची (अवस्था-3), न घरका, न घाटका अशी होऊ शकते.

जाता जाता एक विनोद सांगतो. आपल्या घरांमध्ये (बोलल्या-३) जाणाऱ्या भाषेला (मदरटंग-५) का म्हणतात, पितृभाषा का नाही, असा (किंतू-२) कधी तुमच्या मनात आला आहे काय ? तर त्याचे (कारण-३) असे आहे, की घरामध्ये (नेहेमीच-४) आईच बोलत असते, (बाकीच्यांना-४) फारसे तोंड (उघडण्याची-५) संधीच मिळत नाही !

देवकी , छान ! तुम्ही अचानक आल्याने आनंद झाला.
फक्त ...

(मदरटंग) ??? का बरे ?
मी इंग्लिश शब्द बरा वापरेन अशा उताऱ्यात ! Bw

हरकत नाही .
आता इतरांची वाट पाहू

शालेय शिक्षणाचे माध्यम (मातृभाषा४) असावे असे जगभरातील अनेक (भाषातज्ञ४) वेळोवेळी सांगत आलेले आहेत. जगातील बऱ्याच प्रगत देशांनी त्याबाबतीत हे (धोरण३) स्वीकारलेले दिसते. परंतु भारतासारख्या (बहुभाषिक ५) देशात मुळातच गोची झालेली आहे. दिवसेंदिवस (मातृभाषा४) नकोच आणि सर्वांनीच इंग्रजीतून शिकावे असा विचार (सगळीकडे५) दिसतो. यासंदर्भात बरेचजण गेल्या शतकातील एक थोर शिक्षणतज्ञ विष्णुशास्त्री (चिपळूणकर७) एका विधानाचा संदर्भ देतात. मुळात विष्णुशास्त्रीनी इंग्रजीला (वाघिणीचे) दूध म्हटले होते हे अर्धसत्य आहे. त्यांनी केलेले संपूर्ण (विधान३) असे आहे,
“इंग्रजी भाषेला (वाघिणीचे४) दूध म्हणून बरेच विद्वान (४) आहेत खरे, परंतु या दुधावर (२-३) सर्वत्र मेषपात्रेच (भरलेली ४) असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे.”
नीट विचार केला तर या विधानातील (सत्यता३) आजही पटेल. इंग्रजी (माध्यमातून५) शिकले, (आत्मविश्वासाने६) चुकीचे पण फाडफाड इंग्रजी बोलले आणि टाय घालून (मिरवले४), म्हणजे जग जिंकले, असे (समजण्याचे५) कारण नाही. शिकून सवरून आपापल्या क्षेत्रात (उत्तम ३) ज्ञान (मेहनत४) केल्यासच या दुधातून (तज्ञ२) निपजतील. अन्यथा सर्वत्र मेषपात्रांचाच (गजबजाट५) होईल. माझ्या माहितीतील (महानगरपालिकेत९) स्वच्छता विभागात सेवक असणाऱ्या गृहस्थांचे (उदाहरण५) सांगतो. त्यांच्या घरात मोठे सगळेच अशिक्षित. त्यांनी (आर्थिकदृष्ट्या५) परवडत नसतानाही हट्टाने त्यांच्या मुलाला (ख्रिश्चन ३) इंग्रजी (माध्यमाच्या ४) शाळेत घातले.
शाळेमध्ये (आंधळ्यामुलाप्रमाणे८) मुलगा चाचपडत होता. घरी त्याचा अभ्यास (करवून५) घेणे कोणालाच शक्य नव्हते. अखेर तो मुलगा कसाबसा (किमानगुणाने६) दहावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर पुढे शिकण्याचा (उमेद उत्साह६) त्याच्यात राहिलेला नव्हता. अशी कितीतरी उदाहरणे आपल्या (आजूबाजूला६) दिसतात. पाल्याला जर आपण (बळजबरीने६) इंग्रजी माध्यमात शिकवणार असू, तर आपल्यालाही त्याचा अभ्यास (करवून५) घेण्याची मानसिक तयारी करावी लागेल. अन्यथा पुढे आपल्या पाल्याची (अवस्था3), न घरका, न घाटका अशी होऊ शकते.
जाता जाता एक विनोद सांगतो. आपल्या घरांमध्ये (बोलल्या ३) जाणाऱ्या भाषेला (मायबोलीच५) का म्हणतात, पितृभाषा का नाही, असा (प्रश्न२) कधी तुमच्या मनात आला आहे काय ? तर त्याचे (उत्तर३) असे आहे, की घरामध्ये (सदोदित४) आईच बोलत असते, (वडिलांना४) फारसे तोंड (उघडण्याची५) संधीच मिळत नाही !
...................................................................

शालेय शिक्षणाचे माध्यम मातृभाषा (४) असावे असे जगभरातील अनेक तत्त्ववेत्ते / भाषातज्ज्ञ / जाणकार (४) वेळोवेळी सांगत आलेले आहेत. जगातील बऱ्याच प्रगत देशांनी त्याबाबतीत हे धोरण (३) स्वीकारलेले दिसते. परंतु भारतासारख्या अविकसित / विचारशून्य / बहुभाषिक (५) देशात मुळातच गोची झालेली आहे. दिवसेंदिवस मातृभाषा (४) नकोच आणि सर्वांनीच इंग्रजीतून शिकावे असा विचार बळावताना (५) दिसतो. यासंदर्भात बरेचजण गेल्या शतकातील एक थोर शिक्षणतज्ञ विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या (७) एका विधानाचा संदर्भ देतात. मुळात विष्णुशास्त्रीनी इंग्रजीला वाघिणीचे (४) दूध म्हटले होते हे अर्धसत्य आहे. त्यांनी केलेले संपूर्ण विधान (३) असे आहे,

“इंग्रजी भाषेला वाघिणीचे (४) दूध म्हणून बरेच विद्वान नावाजत (४) आहेत खरे, परंतु या दुधावर परि-पोषित / अधि-पोषित (२-३) सर्वत्र मेषपात्रेच निपजत (४) असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे.”

नीट विचार केला तर या विधानातील सत्यता (३) आजही पटेल. इंग्रजी माध्यमातून (५) शिकले, निखालसपणे (६) चुकीचे पण फाडफाड इंग्रजी बोलले आणि टाय घालून मिरवले (४), म्हणजे जग जिंकले, असे समजण्याचे (५) कारण नाही. शिकून सवरून आपापल्या क्षेत्रात उत्तम (३) ज्ञान संपादन (४) केल्यासच या दुधातून वाघ (२) निपजतील. अन्यथा सर्वत्र मेषपात्रांचाच सुळसुळाट (५) होईल. माझ्या माहितीतील महानगरपालिकेत (९) स्वच्छता विभागात सेवक असणाऱ्या गृहस्थांचे उदाहरण (५) सांगतो. त्यांच्या घरात मोठे सगळेच अशिक्षित. त्यांनी आर्थिकदृष्ट्या (५) परवडत नसतानाही हट्टाने त्यांच्या मुलाला प्रसिद्ध (३) इंग्रजी माध्यामाच्या (४) शाळेत घातले.

शाळेमध्ये मार्गदर्शनाअभावी / परभाषामाध्यमात (८) मुलगा चाचपडत होता. घरी त्याचा अभ्यास समजावून (५) घेणे कोणालाच शक्य नव्हते. अखेर तो मुलगा कसाबसा रडतखडत (६) दहावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर पुढे शिकण्याचा उत्साहदेखील (६) त्याच्यात राहिलेला नव्हता. अशी कितीतरी उदाहरणे आपल्या अवतीभवती (६) दिसतात. पाल्याला जर आपण अट्टाहासापायी (६) इंग्रजी माध्यमात शिकवणार असू, तर आपल्यालाही त्याचा अभ्यास स्वशिरावर / बिनबोभाट / विनातक्रार (५) घेण्याची मानसिक तयारी करावी लागेल. अन्यथा पुढे आपल्या पाल्याची अवस्था (3), न घरका, न घाटका अशी होऊ शकते.

जाता जाता एक विनोद सांगतो. आपल्या घरांमध्ये बोलल्या (३) जाणाऱ्या भाषेला मातृभाषाच (५) का म्हणतात, पितृभाषा का नाही, असा प्रश्न (२) कधी तुमच्या मनात आला आहे काय ? तर त्याचे उत्तर (३) असे आहे, की घरामध्ये प्रामुख्याने (४) आईच बोलत असते, वडिलांना (४) फारसे तोंड उघडण्याची (५) संधीच मिळत नाही...

शालेय शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे असे जगभरातील अनेक मान्यवर वेळोवेळी सांगत आलेले आहेत. जगातील बऱ्याच प्रगत देशांनी त्याबाबतीत हे धोरण स्वीकारलेले दिसते. परंतु भारतासारख्या बहुभाषिक देशात मुळातच गोची झालेली आहे. दिवसेंदिवस मातृभाषा नकोच आणि सर्वांनीच इंग्रजीतून शिकावे असा विचार पसरलेला दिसतो. यासंदर्भात बरेचजण गेल्या शतकातील एक थोर शिक्षणतज्ञ विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या एका विधानाचा संदर्भ देतात. मुळात विष्णुशास्त्रीनी इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हटले होते हे अर्धसत्य आहे. त्यांनी केलेले संपूर्ण विधान असे आहे,

“इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणून बरेच विद्वान संबोधत आहेत खरे, परंतु या दुधावर (२-३) सर्वत्र मेषपात्रेच (४) असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे.”

नीट विचार केला तर या विधानातील सत्यता आजही पटेल. इंग्रजी लिहावयास शिकले, व्याकरणदृष्ट्या चुकीचे पण फाडफाड इंग्रजी बोलले आणि टाय घालून मिरवले , म्हणजे जग जिंकले, असे समजण्याचे कारण नाही. शिकून सवरून आपापल्या क्षेत्रात संपूर्ण ज्ञान संपादन केल्यासच या दुधातून वाघ निपजतील. अन्यथा सर्वत्र मेषपात्रांचाच (५) होईल. माझ्या माहितीतील महानगरपालिकेत स्वच्छता विभागात सेवक असणाऱ्या गृहस्थांचे उदाहरण सांगतो. त्यांच्या घरात मोठे सगळेच अशिक्षित. त्यांनी आर्थिकदृष्ट्या परवडत नसतानाही हट्टाने त्यांच्या मुलाला अगदी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले.

शाळेमध्ये (८) मुलगा चाचपडत होता. घरी त्याचा अभ्यास समजवून घेणे कोणालाच शक्य नव्हते. अखेर तो मुलगा कसाबसा रडतखडत दहावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर पुढे शिकण्याचा (६) त्याच्यात राहिलेला नव्हता. अशी कितीतरी उदाहरणे आपल्या अवतीभवती दिसतात. पाल्याला जर आपण (६) इंग्रजी माध्यमात शिकवणार असू, तर आपल्यालाही त्याचा अभ्यास (५) घेण्याची मानसिक तयारी करावी लागेल. अन्यथा पुढे आपल्या पाल्याची अवस्था, न घरका, न घाटका अशी होऊ शकते.

जाता जाता एक विनोद सांगतो. आपल्या घरांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषाच का म्हणतात, पितृभाषा का नाही, असा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे काय ? तर त्याचे उत्तर असे आहे, की घरामध्ये कायमच / सदोदीत आईच बोलत असते, वडिलांना फारसे तोंड उघडण्याची संधीच मिळत नाही !

खेळखंडोबा ऐवजी सुळसुळाट
मिरवीत ऐवजी मिरवले
प्रशंसित ऐवजी म्हणालेले
मदरटंग ऐवजी आईचीभाषा
बाकीच्यांना ऐवजी इतरांना

सर्वांचा सहभाग सुंदर... धन्यवाद !

थोडा
परंतु या दुधावर (२-३) सर्वत्र मेषपात्रेच ...
यावर विचार करा.
काही वेळात माझा डकवतो .

हे घ्या मूळ...
....................
शालेय शिक्षणाचे माध्यम (मातृभाषा) असावे असे जगभरातील अनेक (भाषातज्ञ) वेळोवेळी सांगत आलेले आहेत. जगातील बऱ्याच प्रगत देशांनी त्याबाबतीत हे धोरण (स्वीकारलेले) दिसते. परंतु भारतासारख्या (बहुभाषिक) देशात मुळातच गोची झालेली आहे. दिवसेंदिवस मातृभाषा नकोच आणि सर्वांनीच इंग्रजीतून शिकावे असा विचार (बळावताना) दिसतो. यासंदर्भात बरेचजण गेल्या शतकातील एक थोर शिक्षणतज्ञ विष्णुशास्त्री (चिपळूणकरांच्या) एका विधानाचा संदर्भ देतात. मुळात विष्णुशास्त्रीनी इंग्रजीला (वाघिणीचे) दूध म्हटले होते हे अर्धसत्य आहे. त्यांनी केलेले संपूर्ण विधान असे आहे,

“इंग्रजी भाषेला (वाघिणीचे) दूध म्हणून बरेच विद्वान (नावाजत) आहेत खरे, परंतु या दुधावर (पोस-पोसून) सर्वत्र मेषपात्रेच (निपजत) असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे."

नीट विचार केला तर या विधानातील (सत्यता) आजही पटेल. इंग्रजी माध्यमातून शिकले, (व्याकरणदृष्ट्या) चुकीचे पण फाडफाड इंग्रजी बोलले आणि टाय घालून (मिरवले), म्हणजे जग जिंकले, असे समजायचे कारण नाही. शिकून सवरून आपापल्या क्षेत्रात (सखोल) ज्ञान (संपादन) केल्यासच या दुधातून (वाघ) निपजतील. अन्यथा सर्वत्र मेषपात्रांचाच (सुळसुळाट) होईल. माझ्या माहितीतील (महानगरपालिकेच्या) स्वच्छता विभागात सेवक असणाऱ्या गृहस्थांचे उदाहरण सांगतो. त्यांच्या घरात सगळेच अशिक्षित. त्यांनी (आर्थिकदृष्ट्या) परवडत नसतानाही हट्टाने त्यांच्या मुलाला (खाजगी ) इंग्रजी (माध्यमाच्या) शाळेत घातले.

शाळेमध्ये (सुरुवातीपासूनच) मुलगा चाचपडत होता. घरी त्याचा अभ्यास (इंग्रजीतून) घेणे कोणालाच शक्य नव्हते. अखेर तो मुलगा कसाबसा (रडतखडत) दहावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर पुढे शिकण्याचा (आत्मविश्वासच) त्याच्यात राहिलेला नव्हता. अशी कितीतरी उदाहरणे आपल्या (अवतीभवती) दिसतात. मुलाला जर आपण (पहिलीपासून) इंग्रजी माध्यमात शिकवणार असू, तर आपल्यालाही त्याचा अभ्यास इंग्रजीतून घेण्याची मानसिक तयारी करावी लागेल. अन्यथा पुढे आपल्या पाल्याची (अवस्था) न घर का, न घाट का अशी होऊ शकते.

जाता जाता एक विनोद सांगतो. आपल्या घरांमध्ये (बोलल्या) जाणाऱ्या भाषेला (मातृभाषाच) का म्हणतात, पितृभाषा का नाही, असा प्रश्न कधी तुमच्या (मनात) आला आहे काय ? तर त्याचे उत्तर असे आहे, की घरामध्ये (सदोदित) आईच बोलत असते, (वडिलांना) फारसे तोंड (उघडण्याची) संधीच मिळत नाही !
...................................................................

तुमच्या उत्तरांतून हे जे पर्यायी शब्द आलेत ...

प्रशंसित, महत्प्रयासाने, किंतू, ख्रिश्चन, तत्त्ववेत्ते, निखालसपणे, अट्टाहासापायी, प्रामुख्याने

.... ते खरेच रोचक व चपखल !

ही विविधताच या खेळात मजा आणते.

६-८ अक्षरी शब्द अडले थोडे, पण बाकी चांगले होते
पोस-पोसून होता का २-३,
या दुधावर...... म्हणून पोसण्यासंबंधी ते कळले पण चिपळूणकरशास्त्री काय शब्द वापरतील अंदाज आला नाही.

संगम खेळ
दोन प्रकारांचा संगम असलेल्या खेळात आपले स्वागत!

भाग १
१० अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही शब्दांची शोधसूत्रे अशी :
(अंक म्हणजे अक्षरक्रम) :

२३ दक्षिण भारतीय वाद्यविशेष
५६ राजा असून टोचणारा !

चार नऊ दहा : बैठ्या खेळातील लाकडी वस्तू
१३ गाठीचा प्रकार

७३ प्रिय पण लुच्चा !
४८ हवीहवीशी पण हानिकारक

संपूर्ण शब्द : एक तंत्रकुशल सल्लागार
………………………………..
भाग २
वरील सल्लागाराची कृती
********
आता हा ८ अक्षरी शब्द असा तयार करायचा आहे:

खाली एकूण ८ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून हा शब्द तयार करायचा.

सारीपाटावर
कानफाट्याच्या
प्रशस्तीपत्रक

दिव्यभाषेच्या
सदऱ्यावरती
सरदारकीमुळे

इच्छेविरुद्ध
आवरताना
............................

2 3 घट
1 3 नाट? की निर/ सूर येईल?घट बरोबर असेल तर येणार नाही.

घट बरोबर.

सोंगटी? >>पर्यायी शब्द शोधा.
बाकी नाही.

Pages