शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी नाही आले इथे? ओके मीच एक देते. १२ पर्यंत फावल्या वेळाचा उद्योग म्हणून.
उद्या नवीन धाग्यावर नवीन कोडे येणार. तेव्हा शिळेपोळे पुढे जायला नको.

आवर दरारा पती मोलाचा वानर
शामसह नेईच जरी लूना वातावर

या अक्षरात लपलेले मूळ गाणे ओळखायचे आहे.

वा, छान
करतो प्रयत्न

कुमार सर ,बरोबर वाटतयं.
तुमच्या याआधीच्या प्रतिसादाने सुरेख सांगता झाली. अगदीच सहमत. धन्यवाद.

अस्मिता
धन्यवाद
आता नव्या धाग्यावर तुम्ही एक छान खेळ घेऊन या बरे !

पदरावरती..... Happy एकदम बरोबर.
मला वाटलेच होते पटकन सुटणार. शालू जमलाच नाही लपवायला.
@ अस्मिता. सोमवारपर्यंत सुटणार नाही असे द्या.
शुभरात्री, पुढच्या वर्षी भेटू.

Pages