शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५ नजराणातबक/नजराणापत्रक
Submitted by विक्रमसिंह
+
* ५ नजराणा >>> साधारण यातली अक्षरे जरा वेगळी करून पहा.
Submitted by कुमार१
>>>>>
५. अधिकाऱ्याला खुश करण्यासाठी (७, न * * * * * क ) ----- नजराणासंदूक ?
मोठ्या प्रमाणात नजराणा?

नजराणासंदूक >>> नाही.
नजराणा नको, पहिली ३ अक्षरे वापरा.

८. 'मराठी' (कोशानुसार) आहे ना कल्पना नाही. >>> मला तरी नाही मिळाला. उर्दू असल्यास नको.
अपेक्षित अनेक वर्षे 'मराठी' आहे.

सुधारित :

२. “ त्याला पैसे द्यावेत”. ( ४, ना * * ग ) ( यात एक सोपे आडनाव पण आहे).
३. लबाड कुठला ( ४ , ग * * ड)

४. काय भीती नका बाळगू ! (६, ड * * * * न )
५. अधिकाऱ्याला खुश करण्यासाठी (७, नजरमुबारक )

६. काय बेक्कार आहे राव ( ६, कर्मकटकट)

८. गाजवा अधिकार न काय / हिशेबात पण आहे (५, त * * * त )

४. काय भीती नका बाळगू ! (६, ड * * * * न ) ---
* डरल्यावाचून.... नसावे, डरल्या आणि वाचून कॉम्बो ठीक नाही दिसत
* डचकाविहीन ( डचका= धसका, धक्का )

कारवी,
४ साठी डर शब्द दोनदा वापरून बघा बरं. एक मजेदार शब्द तयार होईल !
...................
आता अधिक ताणायला नको.
शेवटची चार तासांची मुदत ठेवतो.
त्यानंतर उत्तरे जाहीर.
सर्वांचे प्रयत्न सुरेख आहेत !

उत्तरे
२. “ त्याला पैसे द्यावेत”. ( ४, ना * * ग ) ( यात एक सोपे आडनाव पण आहे). >>> नामजोग

३. लबाड कुठला ( ४ , ग * * ड) >>> गन्ठीखोड

४. काय भीती नका बाळगू ! (६, ड * * * * न ) >>> डरडरावून

८. गाजवा अधिकार न काय / हिशेबात पण आहे (५, त * * * त ) >>> तसलमात

एकदम नसनखवडा सारखे शब्द आहेत. यातील कुठलाच शब्द ऐकला नव्ह्ता. अंदाज लावण्याच्याही पलीकडचे.
शब्दांची फोड कशी करायची ज्यातून तो दिलेला अर्थ निघेल? ते सांगा ना प्लीज.
उदा खोडकर -- खोड्या काढणारा, मस्ती करणारा तसे गन्ठीखोड चे काय विश्लेषण? आणि बाकीचेही ३.

तसलमात >>> अर. तस्लीमात्-तस्लीम = सलाम याचें अव.

नामजोग >>> हे गुजरातीतून उगम
गन्ठीखोड>>>> प्राकृत उगम

४. काय भीती नका बाळगू ! (६, ड * * * * न ) >>> डरडरावून >>>>

म्हणजे, काही घाबरू नका = डरडरावुन रहा! ?

नवा खेळ : शब्दशोध आणि वाक्यरचना

भाग 1 : खाली एक उतारा दिला आहे त्यातील १३ शब्द पुसून त्याजागी कंसयुक्त अंक घातले आहेत. अंक म्हणजे संबंधित शब्दाची अक्षरसंख्या. असे कंसातील सर्व समर्पक शब्द शोधा.

भाग 2 : सर्व शब्द शोधून झाले की ते ओळीने लिहिल्यावर एक अर्थपूर्ण वाक्य तयार झाले पाहिजे.
...............
ते मुळातच (५) असल्याने त्यांच्या कविता सुंदर असतात. सध्याच्या (५) कविंपैकी ते एक आहेत. मुळात त्यांची जातकुळी (५) आहे. त्यांच्या कामासाठी लागणारी प्रचंड (५) ते कुठून आणतात ते काही कळत नाही. (४) विषयांवर ते लिहितात. त्याच जोरावर त्यांनी (५) मागे टाकले आहे. मराठी साहित्यातील हे एक (६) प्रकरण आहे. एखाद्या विषयाबाबत स्वतःला जे काही (३) ते लिहायचेच, ही त्यांची वृत्ती. (२) सर्व काही आले. त्यांना पाहून प्रथम आपण (४) होतो. त्यांच्यासारखे काम आपल्याकडून काही (५) नाही हे पटते. (२) जणांनाच असे जमते; सर्वांना (२).
…………..
वेळ ४ तास.

मी आहे.
५-६ अक्षरी ५-६ शब्द, तयार होणारे वाक्य कठीण आहेसे वाटते. प्रयत्न करते.

मी,भाग १ टाकते.

ते मुळातच (प्रतिभावान ५) असल्याने त्यांच्या कविता सुंदर असतात. सध्याच्या (प्रथितयश.५) कविंपैकी ते एक आहेत. मुळात त्यांची जातकुळी (प्रज्ञावंताची/साहित्यिकाची ५) आहे. त्यांच्या कामासाठी लागणारी प्रचंड (बौद्धिकउर्जा ५) ते कुठून आणतात ते काही कळत नाही. (नानाविध ४) विषयांवर ते लिहितात. त्याच जोरावर त्यांनी (५) मागे टाकले आहे. मराठी साहित्यातील हे एक (६) प्रकरण आहे. एखाद्या विषयाबाबत स्वतःला जे काही (पटते/रुचते ३) ते लिहायचेच, ही त्यांची वृत्ती. (यात २) सर्व काही आले. त्यांना पाहून प्रथम आपण (प्रभावित ४) होतो. त्यांच्यासारखे काम आपल्याकडून काही (होण्यासारखे ५) नाही हे पटते. (काही/थोड्या २) जणांनाच असे जमते; सर्वांना (नव्हे/नाही.२).

बौद्धिकउर्जा >>>> पटत नाही,पण लिहून टाकले.

भाग 1 :
ते मुळातच सौंदर्यासक्त/कविमनाचे (५) असल्याने त्यांच्या कविता सुंदर असतात. सध्याच्या चाकोरीबाह्य/लोकप्रसिद्ध/प्रथितयश (५) कविंपैकी ते एक आहेत. मुळात त्यांची जातकुळी बंडखोरीची/हरहुन्नरी (५) आहे. त्यांच्या कामासाठी लागणारी प्रचंड कल्पनाशक्ती/विचारशक्ती (५) ते कुठून आणतात ते काही कळत नाही. तत्कालीन/नानाविध/अनवट/ साध्यासुध्या (४) विषयांवर ते लिहितात. त्याच जोरावर त्यांनी प्रस्थापितांना/भल्याभल्यांना (५) मागे टाकले आहे. मराठी साहित्यातील हे एक आश्चर्यकारक / मुलुखावेगळे / अजबगजब (६) प्रकरण आहे. एखाद्या विषयाबाबत स्वतःला जे काही वाटते/दिसते (३) ते लिहायचेच, ही त्यांची वृत्ती. यात (२) सर्व काही आले. त्यांना पाहून प्रथम आपण अचंबित / प्रभावित (४) होतो. त्यांच्यासारखे काम आपल्याकडून काही होण्यासारखे (५) नाही हे पटते. काही (२) जणांनाच असे जमते; सर्वांना नाही (२).

भाग 2 :
सौंदर्यासक्त, चाकोरीबाह्य, हरहुन्नरी कल्पनाशक्ती नानाविध/तत्कालीन प्रस्थापितांना आश्चर्यकारक वाटते यात अचंबित होण्यासारखे काही नाही.

भाग १ मध्ये काहीही बसू शकले. भाग २ ची त्यतल्यात्यात अर्थपूर्ण जुळवणी कशीबशी केली आहे.

देवकी, कारवी
दोन्ही छान !
मूळ जरा वेळाने....

मूळ :

ते मुळातच (सर्जनशील) असल्याने त्यांच्या कविता सुंदर असतात. सध्याच्या (प्रतिभावंत) कविंपैकी ते एक आहेत. मुळात त्यांची जातकुळी (साहित्यिकाची) आहे. त्यांच्या कामासाठी लागणारी प्रचंड (लेखनऊर्जा) ते कुठून आणतात ते काही कळत नाही. (कितीतरी) विषयांवर ते लिहितात. त्याच जोरावर त्यांनी (भल्याभल्यांना) मागे टाकले आहे. मराठी साहित्यातील हे एक (आश्चर्यकारक) प्रकरण आहे. एखाद्या विषयाबाबत स्वतःला जे काही (वाटते) ते लिहायचेच, ही त्यांची वृत्ती. (यात) सर्व काही आले. त्यांना पाहून प्रथम आपण (अचंबित) होतो. त्यांच्यासारखे काम आपल्याकडून काही (होण्यासारखे) नाही हे पटते. (काही) जणांनाच असे जमते; सर्वांना (नाही).
...............................
सर्जनशील प्रतिभावंत साहित्यिकाची लेखनऊर्जा कितीतरी भल्याभल्यांना आश्चर्यकारक वाटते यात अचंबित होण्यासारखे काही नाही.

नाही हो, सगळं काल्पनिक ! >>>> ओके, वाक्यांच्या रचनेवरून असे वाटले की कोणी खरीच व्यक्ती आहे जी मूळ कौशल्य / पेशाव्यतिरिक्त आपल्या उत्तम कवितांमुळेही ओळखली जाते.

एक गंमत खेळ.
प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे एखादे वाक्य तयार करायचे आहे. या वाक्याचे वैशिष्ट्य असे आहे:
वाक्यातील पहिला शब्द हा एकाक्षरी असेल. यानंतरचा प्रत्येक पुढचा शब्द फक्त एकेक अक्षराने वाढत जाईल.
उदाहरणार्थ, ‘मी तुला पाहिले’ (१,२, ३)

अशा प्रकारचे जास्तीत जास्त लांबीचे अर्थपूर्ण वाक्य तयार करा. केव्हाही तुमच्या सवडीने लिहा. जेव्हा आपले वाक्य लिहायला याल, तेव्हा ते त्याआधी लिहिलेल्या वाक्याइतके तरी लांब असावे किंवा किमान एका शब्दाने अधिक.
आपापले वाक्य स्वतंत्रपणे करा.

करा तर सुरवात ४ शब्दांच्या ((१, २, ३, ४) अशा वाक्याने....

Pages