शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४. आपला आपण खा हा जंगलातला काटकोन (५) --- स्वावलंबन
आपला आपण खा = स्वाहा (करणे)
खा हा = हा काढून टाका
स्वा उरला
जंगल = वन -- ( हे उत्तर आधी टिक झालेय )
काटकोन = लंब
जंगलातला काटकोन = व ( लंब) न
स्वा + व ( लंब) न

१. स्वतःच्या वास्तूत शत्रू म्हणतो माझे सर्वांचे आवडत्या गोष्टी मिळण्याचे ठिकाण (६) = स्वयंपाकघर.
२. लांबून बघा पण जवळच बसा (५) = दूरदर्शन
३. यात रबरापेक्षा हिरा लवचिक ? (६)
४. आपला आपण खा हा जंगलातला काटकोन (५) = स्वावलंबन
५ पोचायचा की मारायचा (२)
६ विस्कळीत प्रयत्न निश्चित सुरवाती नंतर अंतर मग शेवटी हाती काहीच नाही (६)

३. यात रबरापेक्षा हिरा लवचिक ? (६) ---
ताणीय क्षमता / ताणीय विस्तार (ability to withstand changes in length under lengthwise tension)

५ पोचायचा की मारायचा (२) ---
तुक्का ?
वेग = पोचायचा वेग;
मारायचा वेग म्हणजे घोड्याचा चाबूक (की लगाम नक्की आठवत नाही)

५ पोचायचा की मारायचा (२) ---
तुक्का ?
वेग = पोचायचा वेग;
मारायचा वेग म्हणजे घोड्याचा चाबूक (की लगाम नक्की आठवत नाही)

गोटा/ बत्ता/तुका >> नाही. उगाच काहिही मारू नका. मग कसे योग्य जागी पोचाल. Happy दोन अक्षरी शब्दासाठी किती क्लू ते. Happy

ताणीय क्षमता / ताणीय विस्तार
> छान. आतानयाला एक मराठी शब्द शोधा.
Submitted by विक्रमसिंह >>>>>
अरे, अजून आहेच का शिल्लक? मला वाटले झाला ६ अक्षरी...

तन्यता वर्धनीयता आठवतायत....
बल-ज-तन्यता
बल-ज-वर्धन

बल-ज-तन्यता / वर्धन --- बलामुळे उद्भवलेले ताणलेपण / लांबलेपण सहन करण्याची क्षमता

पोचायचा की मारायचा.
नाही. उगाच काहिही मारू नका. मग कसे योग्य जागी पोचाल.
इथे तुम्ही मगास पासून तेच करताय.

आता दोन अक्षरी शब्दासाठी हे तीन क्लू झाले. Happy

अक्षर दो, क्लू तीन. ये नाइन्साफी है - गब्बर

बल-ज-तन्यता
बल-ज-वर्धन >> नाही. पण तुम्हाला नक्की माहिती आहे तो गुणधर्म. Happy

असावाच लागेल. नाहीतर १०वी पासचे सर्टिफिकेट सरंडर करावे लागेल ना.....
३. यात रबरापेक्षा हिरा लवचिक ? (६) ---
प्रत्यास्थ मापांक ( नेटवरून)
स्थितिस्थापकता ( माहिती होता, आता आठवला)

१. स्वतःच्या वास्तूत शत्रू म्हणतो माझे सर्वांचे आवडत्या गोष्टी मिळण्याचे ठिकाण (६) = स्वयंपाकघर.
२. लांबून बघा पण जवळच बसा (५) = दूरदर्शन
३. यात रबरापेक्षा हिरा लवचिक ? (६) =स्थितिस्थापकत्व
४. आपला आपण खा हा जंगलातला काटकोन (५) = स्वावलंबन
५ पोचायचा की मारायचा (२)
६ विस्कळीत प्रयत्न निश्चित सुरवाती नंतर अंतर मग शेवटी हाती काहीच नाही (६)

विस्कळीत प्रयत्न निश्चित सुरवाती नंतर अंतर मग शेवटी हाती काहीच नाही>>
नि (निश्चितची सुरूवात) + अंतर चा समनार्थी शब्द, हे बरोबर.

Pages