Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगला आहे की
चांगला आहे की
फक्त कोण कुणाची कुठल्या जन्मांतली बायको हेच समजत नाही, तिन्ही पुरुष वेगळे वेगळे दिसतात , पण तिन्ही बायका दोन्ही जन्मात एक सारख्या दिसतात
ल्युडो घरच्यांसमोर
ल्युडो घरच्यांसमोर बघण्यासारखा आहे का?>>>>
सुरवातीला मेल न्यूड आहे पाठीमागून कॅमेरा, हे दृश्य दोनदा येते. एक पॉर्न क्लिप आहे जी दिसत नाही पण संवाद व उसासे ऐकू येतात. ही क्लिप किमान 3 दा तरी ऐकायला मिळते. हे घरच्यांसमोर बघताना अगदीच कानकोंडे होत नसेल तर बघा.
आजच्या नॉर्मनुसार अगदीच अंगावर येत नाहीत ही दृश्ये पण प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असू शकते.
ल्यूडो म्हणजे अशक्यप्राय
ल्यूडो म्हणजे अशक्यप्राय घटनांचा समूह आहे.
सान्या मल्होत्रा आणि आदित्य रॉय कपूर मॅट्रिमोनिअल साईटच्या माध्यमातून एकमेकांना भेटतात. आदित्यला ती आवडते, तिला आदित्य आवडतो पण लग्न नको असते आणि सेक्स चालणार असते कारण लग्न श्रीमंताशी करायचे. मग ती आदित्यसोबत संबंध ठेवते आणि लग्न अगरबत्ती कारखान्याच्या मालकाशी ठरवते. लग्न व्हायच्या काही दिवस आधी आदित्य व सान्याचा एक तसला व्हिडीओ लिक होतो. हा व्हिडीओ इंटरनेटवरुन हटवावा असे आदित्यला वाटते. पोलिस म्हणतात सान्याची तक्रार असल्याशिवाय अॅक्शन घेणार नाहीत. सान्या आधी तयार होत नाही म्हणून आदित्य गुंडांची मदत मागतो. सत्तूभाई म्हणतो की भिलई च्या हॉटेलवाल्यांनी हे केले असेल. पण त्याचवेळी स्फोट होऊन सत्तू जखमी होतो. मग सान्या तयार होते आणि आदित्य + सान्या पोलिसांची मदत मागतात. तर पोलिस म्हणतात हे घ्या इंस्ट्रूमेंट आणि एक मोठी पेटी देतात तुम्हीच सर्व हॉटेलांत जा आणि पाहा कुठे कॅमेरा बसविला आह ते. त्यानिमित्त आदित्य + सान्या पुन्हा भिलईमधल्या अनेक हॉटेलांत जातात. इतक्या सर्व हॉटेलांत ते पूर्वी राहिलेले असतात का? की आपण नेमक्या कोणत्या हॉटेलांत राहिलो होतो ते त्यांना आठवत नाही?
सत्तूभाईला जखमी स्थितीत जेव्हा अँबुलंन्समधून नेतात तेव्हा त्याच्या सोबत रिव्हॉल्वर आणि नोटांनी भरलेला बॉक्स देखील असतो हे कसे काय? पोलिसांच्या समक्ष जखमींना हलविले जाते ना? पुढेही जेव्हा सत्तू हॉस्पीटल्मध्ये असतो तेव्हा रिव्हॉव्हर पुन्हा सोबत कसे काय असते?
अनेक न पटणार्या बाबी या कथा पुढे ढकलण्याकरिता कोंबल्या आहेत.
अभिषेक आणि लहान मुलीचे सीन्स चांगले आहेत. भानु उदय अनेक वर्षांनी दिसला पण त्याला फारसा वाव नाहीये. अडीच तास वाया गेले. यापेक्षा सूरज पे मंगल भारी बघितला असता तर बरे झाले असते. अर्थात नियमावलीचे कठोर पालन केले जात असेल तर मला थिएटरमध्ये सोडणार नाहीत.
सहसा हिंदी चित्रपट बघताना 'हे
सहसा हिंदी चित्रपट बघताना 'हे असे का व ते तसे का' असले प्रश्न न विचारता जे ताट समोर वाढलेय त्याचा आनंद घ्यायचा. त्यात चित्रपट कॉमेडी म्हणून समोर वाढला असेल तर अजिबातच डोके लावायचे नाही.
तसा डोके न लावता मी वेलकम, नो
तसा डोके न लावता मी वेलकम, नो एन्ट्री , टोटल धमाल वगैरे बघते.
पण हाऊसफुल्ल 4 मध्ये हसूही येत नसल्याने काय बघावे हा प्रश्न पडतो
नॉनसेन्स असण्यातही काहीतरी सेन्स असावा लागतो.सर्वाना नॉनसेन्स लिहिता येत नाही.
हाऊसफुल series चे चारही
हाऊसफुल series चे चारही चित्रपट बघताना हसू येत नाही, केवळ humshakals पेक्षा बरे इतकेच काय तो plus पॉईंट
सेन्स आहे वा नाही हि वेगळी
सेन्स आहे वा नाही हि वेगळी गोष्ट झाली.
कॉमेडी आहे वा नाही हि वेगळी गोष्ट झाली.
जाई सैराट मध्ये ओपनिंग शॉट च
जाई सैराट मध्ये ओपनिंग शॉट च त्यांचा आहे. अजिबात गावठी बाई वाटत नाही. >>>
अगदी. सगळीकडे तेच. देऊळ, वळु पण तसेच. उगाच ओढून ताणुन काहीतरी. इतकं कृत्रिम वाटत ते.
इतके दिवस लिहायच होत पण वाटत होत कि मलाच तस वाटतं.
जाई सैराट मध्ये ओपनिंग शॉट च
जाई सैराट मध्ये ओपनिंग शॉट च त्यांचा आहे. अजिबात गावठी बाई वाटत नाही. >>>
अगदी. सगळीकडे तेच. देऊळ, वळु पण तसेच. उगाच ओढून ताणुन काहीतरी. इतकं कृत्रिम वाटत ते.
इतके दिवस लिहायच होत पण वाटत होत कि मलाच तस वाटतं. Lol
+100
सिरियसली! सैराट इतका authentic मुव्ही, सगळं कास्ट नवीन आणि त्या त्या रोलमध्ये फिट झालेलं. अशा वेळी सुभाष बाई इतक्या out of place वाटल्या. इतका लहान रोल पण नाहीच जमला तोही.
ल्युडो मधे सगळ इतक फास्ट घडत
ल्युडो मधे सगळ इतक फास्ट घडत की इतके बारिक पॉइन्ट कळतही नाहित.
छलान्ग बघितला , स्टोरित नविन काहिच नाहिये पण एकदरित बरा आहे, नुसरतचा वावर आणी अॅक्टिन्ग दोन्हि आवडतात मला, एक प्लेझेन्ट अॅपियरन्स आणी फ्रेशनेस असतो पण ह्या टाइपचे रोल केलेत तिने आधी, राजकुमार राव ऑन द लाइन ऑफ आयुश्यमान खुराणा?
छलांग चे पहिल्या पाउण-एक
छलांग चे पहिल्या पाउण-एक तासातील संवाद व सीन्स भारी आहेत. प्रमुख तीन चार पात्रे एकमेकांना सतत जे जॅब्ज देतात ते धमाल आहेत. नंतर जरा सपक होत जातो पिक्चर.
ल्युटो मधे अनेक ठिकाणी बरेच बारकावे आहेत विनोदी. पुन्हा एकदा बघायला हवा.
सुभाष बाई ओव्हररेटेड आहेत..
सुभाष बाई ओव्हररेटेड आहेत..
हाऊसफुल series चे चारही
हाऊसफुल series चे चारही चित्रपट बघताना हसू येत नाही,
>>>>कसे शक्य आहे...भरपूर कॉमेडी आहेत...पाहिले 3 तर नक्कीच...
छलंग मध्ये नक्की कोण जिंकावे
छलंग मध्ये नक्की कोण जिंकावे हे समजत नाही.. दोघेही चांगले वाटतात...
सुभाष बाई ओव्हररेटेड आहेत.
सुभाष बाई ओव्हररेटेड आहेत.
>>>
मी तर ओळखतही नाही. सगळी चर्चा डोक्यावरून गेली. अश्यांना ओव्हररेटेड कसे म्हणावे...
हाऊसफुल आधीचे तीन फुल्ल नॉनसेन्स कॉमेडी आहे. हमखास हसवणारे आहेत. आणि ऑलमोस्ट सतत हसवणारे आहेत. तिसरा तर मुका लंगडा आंधळा वगैरे तर सर्वात जास्त नॉनसेन्स आहे. पण तरीही दुसरयांदा तिसरयांदा बघतानाही हसवतो.
त्यताले अभिषेक बच्चनचे रॅप साँग.. अभि षेक अभी अभी षेक तर माझे फार फेव्हरेट. कौतुकाने गात असतो
छलंग मध्ये नक्की कोण जिंकावे
छलंग मध्ये नक्की कोण जिंकावे हे समजत नाही..
>>>
पण कोण जिंकणार हे समजते.
जसे त्या छिछोरेम्ध्ये कोण हरणार हे सुद्धा समजले होते.
ल्युटो मधे अनेक ठिकाणी बरेच
ल्युटो मधे अनेक ठिकाणी बरेच बारकावे आहेत विनोदी. पुन्हा एकदा बघायला हवा.>>>>. सहमत. डार्क ह्युमर आहे. राजकुमार रावचा मुद्राभिनय सुद्धा गम्मत आणतो. त्याचा व पिंकीचा होडीतला सिन. तो वैतागून बडबड करतो, ती सगळे खरे मानून मान डोलावून थांक्यु म्हणते आणि तो वळून हतबुद्ध होऊन तिच्याकडे बघतो हा क्षणही फटकन हसवून जातो.
ज्योती सुभाषचे काम चि व
ज्योती सुभाषचे काम चि व चिसौकां मध्ये आवडले होते. ती भूमिका गोडच होती.
ल्युडो माझ्या डोक्यावरून
ल्युडो माझ्या डोक्यावरून चाललाय. अर्धा तास पाहिला पण अजून उलगडत नाहीये. ते एका होडीतून दुस-या होडीत जाताना फ्रीज करतात ते काय आहे? दोन माणसं डोंगरावर बसून ल्युडो खेळत असतात. खाली घटना घडत असतात.
हाऊसफुल आधीचे तीन फुल्ल
हाऊसफुल आधीचे तीन फुल्ल नॉनसेन्स कॉमेडी आहे. हमखास हसवणारे आहेत. आणि ऑलमोस्ट सतत हसवणारे आहेत.
>>>+1
4 मला तरी आवडला... हलकी फुलकी कॉमेडी...
एक धागा हवा हाऊसफुल सिरीज बद्धल..
लुडो दोनदा पहायचा चित्रपट आहे
लुडो दोनदा पहायचा चित्रपट आहे. तरीही अनेक गोष्टी सुटतील.
फारेंड वगैरेंनी कोलॅब करून चीट शीट बनवावी.
ओ बेटाजी... अरे ओ बाबूजी...
ओ बेटाजी... अरे ओ बाबूजी...
किसमत की हवा कभी नरम.. कभी गरम...
ल्युडो माझ्या डोक्यावरून
ल्युडो माझ्या डोक्यावरून चाललाय. अर्धा तास पाहिला पण अजून उलगडत नाहीये. ते एका होडीतून दुस-या होडीत जाताना फ्रीज करतात ते काय आहे? दोन माणसं डोंगरावर बसून ल्युडो खेळत असतात. खाली घटना घडत असतात.>>>>>
शेवटपर्यंत नेटानी पहा. सगळी उत्तर मिळतील! फ्रीझ करायचा प्रसंग आत्ता आठवत नाहीये.
रच्याकने, ती छोटी मुलगी पुर्वी डिस्नेच्या ऍडमध्ये होती उर्मिला कोठारेबरोबर. ती ऍड पण भारी होती. यु ट्युब वर आहे. नक्की बघा.
मलाही मजेशीर वाटला पण विशेष
मलाही मजेशीर वाटला पण विशेष कळला नाही.
जरा नीट बसून परत बघावा लागेल.
जाई सैराट मध्ये ओपनिंग शॉट च
जाई सैराट मध्ये ओपनिंग शॉट च त्यांचा आहे. अजिबात गावठी बाई वाटत नाही.>>>हो ओपनिंग शॉट त्यांचा आहे. पण मला तो शॉट आवडला आणि त्या पर्फेक्ट बसल्या आहेत त्या भूमिकेत अस मला वाटत. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकत. मला तो शॉट आवडलेला. रिवाईंड करून बघितलाय कितीवेळ.
दहावी फ , वळू वगैरेमध्येही त्यांनी चांगला अभिनय केलेला. चांगल्या अभिनेत्री आहेत . उगाच नाव ठेवायची म्हणून ठेवत नाही.
सैराट मध्ये फक्त सुभाष बाईंचे
सैराट मध्ये फक्त सुभाष बाईंचे कास्टिंग चुकलंय...
सोलापूर साईड वाटत नाही बिलकुल..
उच्चारावरही काही मेहनत घेतलेली नाही...
(No subject)
लुडो पाहिला. आय जस्ट लव रा रा
लुडो पाहिला. आय जस्ट लव रा रा :हार्टइमोजी: आता छलांग पण बघावा लागेल. त्याच्यासाठी.
बाकी लोक पण मस्त. अभिषेक पण आवडतो पण असा अभिषेक नेहमीच बघितलाय.
लुडो पुन्हा (पुन्हा) बघावा लागेल.
लुडो आवडला मला पण फटाफट अशी
लुडो आवडला मला पण फटाफट अशी माणसे मरतात/ मारतात ते जरा विचित्र वाटल.
मलाही अजून झेपला नाहीये
मलाही अजून झेपला नाहीये
घरच्यांसोबत विशेषतः लहान मुलांसोबत तर नक्कीच बघण्यासारखा नाही
दे टेकडीवरून ल्युडो खेळतात ते देव असावेत असं वाटतंय
तो बोलक्या बाहुला वाला अतिप्रचंड सुमार अभिनेता आहे
दंगल गर्ल्स मात्र लै भारी सुंदर दिसल्यात
आता मी स्फोट झालाय तिथवर येऊन ठेपलोय
Pages