माबोकरांचे प्रचि दालन.. (सूर्योदय आणि सूर्यास्त..)

Submitted by अ'निरु'द्ध on 10 October, 2020 - 10:08

माबोकरांचे प्रचि दालन..
अर्थात सबकुछ फोटोग्राफी..

प्रकाश-चित्रे : मायबोली आर्ट गॅलरी..

मायबोलीच्या गणेशोत्सव स्पर्धेत रंगाची जोडी या प्रकाशचित्रण उपक्रमाला छानंच प्रतिसाद मिळाला..
रोज वेगळ्या रंगाची जोडी असल्यामुळे रोज नवीन धागा असायचा.
अनेक मायबोलीकर छान फोटोग्राफर आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
या आधी फोटो न टाकणाऱ्या अनेक सभासदांनीही नवीन आहोत म्हणत छान फोटो टाकले आणि सगळ्यांनीच त्यांच कौतुक केलं, प्रतिसाद देऊन हुरुप वाढवला.

आपल्यापैकी अनेक जण उत्तम फोटो काढतात, त्या फोटोंचे विषयही खूप निरनिराळे असतात.
इतरांचे चांगले फोटो पाहून डोळ्यांना, मनाला बरं तर वाटतंच पण काही शिकायलाही मिळतं, नवीन संकल्पना कळतात.
त्याच ठिकाणचा किंवा त्याच विषयावर आपण काढलेलाही एखादा छान फोटो असतो.

तर असे सर्व फोटो एका जागी, एका ठिकाणी बघायला मिळावेत यासाठी हा धागा..

जे प्रकाशचित्र आपण देऊ त्या प्रत्येकाबद्दल एखादी आठवण म्हणा, ठिकाणाबद्दल म्हणा, कशा प्रकारे फोटो काढला यावर चार अथवा जास्त ओळीत माहिती दिली तर अति उत्तम.

चांगल्या चांगल्या फोटोग्राफर्सनी काही टीप्स दिल्या, कॅमेराबद्दल, सेटिंग्ज बद्दल माहिती दिली तर सोन्याहून पिवळं..

फोटोग्राफीच्या काही टिप्स देणारी, मायबोलीकर अवल यांच्या Simple Photography ह्या ब्लॉगची लिंक : https://photographyforcommonpeople.blogspot.com/?m=1

तेव्हा चला मायबोलीकरांनो.. आपापली प्रकाशचित्रं इथे द्यायला सुरुवात करा..
नवोदितांच्या चांगल्या फोटोंचं, आठवणींचंही स्वागतच आहे..

मसाई मारा- केनया : निळी जांभळी सायंकाळ..

जंगलातल्या पार्क राऊंडनंतर जंगललॉजवर परतताना संध्याकाळ गडद होत गेली. आणि एक अविस्मरणीय दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं;
मसाईमारातला सूर्यास्त.

सर्व साधारणत: आपल्याकडे सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही केशरी रंग छटांत होतात पण मसाईमाराच्या स्थानानुसार किंवा काय माहित नाही पण सूर्यास्तावेळी निळ्या रंगाच्या छटा दिसतात.
विस्तीर्ण गवताळ कुरण, घननिळी संध्याकाळ आणि मसाईमारातील Typical अकॅशियाच्या विशिष्ट छत्रीसारख्या (Topiary) आकारामागे मावळणारा सूर्य.


टीप : प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे.

सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.

सर्व प्रकाशचित्रे स्वतःची असावीत. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

या धोरणाचे कृपया पालन करावे..

तसेच "ज्यांना मायबोली.सीसी या किंवा अशा उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यानी कृपया हा फोटो मी प्रताधिकार मुक्त करत आहे असे फोटोखाली लिहा." अशी वेमांची सूचना आहे..
त्याचा विचार व्हावा..

(मी या धाग्यावरचे माझे प्रचि प्रताधिकार मुक्त करित आहे..)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भिगवणचा सूर्यास्त..
आणि मावळत्या सूर्यावरुन जाणारे रोहित पक्षी (अग्निपंख, Flamingos)


समुद्रावरचा सुर्यास्त, डोंगरावरचा सुर्यास्त पाहिला होता. पण मोकळ्या माळरानावरचा- देशावरचा सुर्यास्त प्रथमच बघितला तो बांधवगडला। बांधवगड सिरिजमधे हा तुम्ही बघितला असेल पण आज पुन्हा आठवण Happy
भर उन्हाळा असल्याने पानविरहित झाडे। अशा निष्पर्ण फांद्या एरवी छान दिसत नाहीत। पण सुर्यास्ताच्या लालिमाच्या सौदर्यात त्या कॉट्रास्ट बनून भरच घालत होत्या।
IMG_20201014_074448.jpg

निरु मला हा धागा फार आवडलाय Happy हाय जॅक करणार बहुदा मी Wink
प्रत्येक फोटो खरतर एक गोष्ट सांगत असतो।कधी ती सहजी दिसते कधी शोधावी लागते। कधी खुप लपून बसलेली असते।
असं मानतात की फोटो कधी फ्लॅट दिसता कामा नये। भले टु डामेऩ्शनल असेल पण फोटोत नजर फिरली पाहिजे। त्यासाठी मग फोटोग्राफीचे काही सोपे नियम समजून घ्यायचे। मग तुमचा फोटो बोलू लागतो,
इतरांचे फोटोही तुमच्याशी बोलू लागतात। है ना Happy

>>असं मानतात की फोटो कधी फ्लॅट दिसता कामा नये। भले टु डामेऩ्शनल असेल पण फोटोत नजर फिरली पाहिजे।

क्या बात!

<<<निरु मला हा धागा फार आवडलाय Happy हाय जॅक करणार बहुदा मी Wink>>>

अवल, जरुर..
हा धागा तुम्ही आणि तुमच्या सारख्या अनेकांनी वारंवार हायजॅक केला तर जास्तच आवडेल.
तोच खरं तर या धाग्याचा प्रमुख उद्देश आहे..
सो लगे रहो...

मलासुद्धा हा धागा खूप आवडलायं...
अवल, स्वरूप, निरुजी .. खरचं खूप सुंदर फोटो..
हे सारे फोटो पाहून मन अगदी प्रसन्न होते.

स्वरुप, पिक्चर इन पिक्चर आणि आदिम फिल्टर... दोन्हीही मस्तच..

<<प्रत्येक फोटो खरतर एक गोष्ट सांगत असतो।कधी ती सहजी दिसते कधी शोधावी लागते। कधी खुप लपून बसलेली असते।
असं मानतात की फोटो कधी फ्लॅट दिसता कामा नये। भले टु डामेऩ्शनल असेल पण फोटोत नजर फिरली पाहिजे। त्यासाठी मग फोटोग्राफीचे काही सोपे नियम समजून घ्यायचे। मग तुमचा फोटो बोलू लागतो,
इतरांचे फोटोही तुमच्याशी बोलू लागतात। है ना Happy>>

@ अवल... सुंदर मांडलंत.
इथे फोटोग्राफीचे तुम्हाला माहिती असतील ते सोपे नियम द्या ना.
बाकीच्या जाणकारांनीही द्या.
बऱ्याच जणांना नक्की मार्गदर्शक ठरतील..

निरु नाय रे बाबा इथे दिग्गज लोकं आहेत, मी काय सांगणार नियम बियम

केरळला गेलेलो तेव्हा पाहिलेला हा सुर्यास्त। आधीच्या दिवशी मारे सनसेट पॉईंटला जाऊन आलो पण तिथे ढग आले अन सनसेट दिसलाच नाही। पण आमचं नशीब जोरावर होतं। रिसॉर्टवरूनच हा सुर्यास्त दिसला। की त्याने आम्हाला बघितले?
क्षितिजावर त्याही दिवशी ढग होते अन त्यामुळे अंधारही दाटलेला। पण मधेच फट होती अगदी डोळ्याच्या आकारात। अन सुर्य अगदी बरोब्बर त्या फटीमधून खाली जात गेला। अन हा नयनरम्य नजारा बघायला मिळाला Happy

1.jpg

भिगवण : अजून एक सूर्यास्त..

दुपारपासून मनःपूत पाहिलेले पाणपक्षी.. सरत्या दुपारनंतर कलत्या संध्याकाळपर्यंत बोटीतून प्रवास.. छोट्या छोट्या बेटांपैकी एखाद्यावर पायउतार तर बाकीच्या बेटांची बोटीतूनच लांबून पहाणी...
प्रवास संपून उतरताना हळूहळू अस्ताचलाला जाणारा सूर्य... दाटणारा संधीप्रकाश.. सूर्यबिंबावरुन सरकणारे पक्षी..
त्यातच हा धरेला टेकलेला सोन्याचा गोळा..


या फोटोत सुर्यास्त जरी नीट दिसत नसला तरी वेळ सुर्यास्ताचीच होती.
शिकागोमधल्या John Hancock टॉवरवरुन टिपलेले हे दृश्य!
20201017_112021.jpg

मस्त मस्त फोटोज. मी पण टाकते.
20191012_071358.jpg
हा एक सूर्योदय, घरातून दिसलेला.

हा संधाकाळी आजू-बाजूला चालताना काढलेला.

हे अजून काही मावळत्या दिनकराचे! वेगवेगळ्या ठिकाणांहून काढलेले.
20190324_191037.jpg20190630_211509.jpg20191228_174052.jpg20190324_190746.jpg20191230_174927.jpg

निरु तुम्ही म्हणालात की नियम सांगा। पण मी काही फोटोग्राफिचं टेक्निकल शिक्षण घेतलेलं नाही। ट्रायल एरर, काही वाचन इत्यादींतून काही गोष्टी कळत गेल्या। मागे एकदा काही मैत्रिणींनी आग्रह केला म्हणून एक ब्लॉग काढला अन फोटो काढताना मनात येणारे नियम तिथे सांगण्याचा प्रयत्न केला.
सध्या वेळ जरा कमी आहे म्हणून त्या ब्लॉगचीच लिंक इथे देऊन ठेवते। सवडीने इथे लिहेनही।
पुन्हा एकदा सांगू इच्छिते मी एक हौशी फोटोग्राफर आहे। काही चुकलं तर तज्ञांनी जरूर दुरुस्त करावं।
http://photographyforcommonpeople.blogspot.com

शुभसंध्याकाळ Happy

हिवाळी धुक्यातली सकाळ
24068795_1636237686432613_8688699303930404187_o.jpg

००२
10983545_862702440452812_7460865435026359896_o.jpg

रायगड सुंदर फोटो!

हा फोटो मेळघाटात गेलो असताना काढलेला आहे.
सुर्यास्त समयी इतका मोठा आणि लोभस दिसत होता सुर्य की दुपारी त्यानेच दिलेल्या त्रासाबद्दल चा सगळा राग विसरून जावे.
१.
DSC04025.JPG
२.
DSC04037.JPG

Pages