अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>तिसरीसाठी मॉडरेटर म्हणून अर्णब गोस्वामीलाच आणायला हवे
लोल्झ...

मला यावेळी ऑनेस्टली झोप लागली मध्येच डिबेटमध्ये केव्हातरी. सारखं कुणी "ओ रियली" आणि/किंवा "माय कँपेन..." असं तत्सम म्हणायला लागलं की तिथेच विकेट पडते मग निदान थोडं शांत व्हावं म्हणून ते त्या धोंडोपंताप्रमाणे जाग आली ती शेजारच्याने उठवल्यावर.. इथे फक्त शेजारी मुलगा होता.."आई, मी चॅनेल बदलू का?" असं निरागसपणे विचारताना. आता बातम्या वाचताना पण झोपच येणार.

राज - ती बातमी नसून एडिटोरियल आहे. ओपिनियन पीस! "क्लार्क काउण्टी (ऑफिस) मधे सगळे डेमोक्रॅट्स भरले आहेत" अशी मौल्यवान वाक्ये त्यात आहेत Happy आणि आणखी वाचता असे दिसते की सही चेक करणेच बंद करण्याबद्दल डेम्स वर जो आरोप केला आहे - तो चुकीचा दिसतो. त्या AB4 बिल मधे तसे काही नाही - हे दुसर्‍या बातमीतून. मी बिल वगैरे वाचलेले नाही (६४ पानी आहे!)

Trump’s remarks on Monday wrongly implied that there is no signature verification of mail-in ballots. AB4 details a process by which election officials check the signature of a voter on a mail-in ballot against the voter signature they have in government records.

The process of signature verification, which includes an opportunity for the voter to correct the issue if their ballot is flagged for mismatched signatures, ultimately disqualified nearly 7,000 ballots during the mostly mail June primary.

>>राज - ती बातमी नसून एडिटोरियल आहे.<<
म्हणजे तशी काहि हालचाल नसतानाहि, मेडप किंवा फेक न्युज? बरं. वेगस/नेवाडाच्या व्यतिरिक्त, फ्लोरिडा, पेन्सिल्वेनिया, कोलराडो इ, राज्यांमधे सुद्धा सिग्नेचर वेरिफिकेशन्च्या विरोधात कोर्टात दावे ठोकलेले आहेत. काय कारण असेल यामागचं...

राज तुला नक्की हीच बातमी द्यायची होती का ? एकदा परत चेक कर प्लीज. हे तू दिलेल्या लिम्क वरूनच कॉपी करतोय.

Following guidance from state authorities, the county mailed ballots to all of its 1.3 million registered voters in the Las Vegas area, but 223,000 were never delivered, according to a new report authored by the conservative nonprofit Public Interest Legal Foundation and confirmed by the Las Vegas Review-Journal. Although the report attributed the undeliverable ballots to residents having moved without updating their voter registration, the problem alludes to ones other counties could face if they pursue mail-only voting in the November presidential election.

"These numbers show how vote by mail fails. New proponents of mail balloting don't often understand how it actually works," Public Interest Legal Foundation President J. Christian Adams said in a statement. "States like Oregon and Washington spent many years building their mail voting systems and are notably aggressive with voter list maintenance efforts. Pride in their own systems does not somehow transfer across state lines. Nevada, New York, and others are not and will not be ready for November."

Oregon and Washington have held elections entirely by mail for years, but the June primary was Nevada's first election conducted fully through the mail because of concerns around the coronavirus pandemic. However, 93,585 voters listed as 'active' never had the chance to vote, as the USPS returned their ballots to the election commission saying they were undeliverable, the report shows.

तिथे conservative nonprofit Public Interest Legal Foundation चा रिपोर्ट आहे त्यात हे दिलय.

Unlike Washoe County and others, Clark County (Las Vegas metro) opted to send actual mail ballots to every registered voter on file for the June 2020 Primary election.The figures released by the Clark County Election Department to the Foundation outline the risks of the forthcoming all-mail election for Nevada purely from costand process error standpoints.Prior to the election, county officials testified that an all-county mailing would be needlessly expensive and result in significant amounts of ballots sent to wrong or outdated addresses, given that “inactive” registrantswould be included in the bulk mailings. They projected an expense of $184,738to send to inactive registrants with an expectation that at least 90% would bounce back undeliverable in the mail

ह्याचा अर्थ डेम चा नक्की फायदा कसा काय होतोय ? गहाळ झालेले पोस्ट ऑफीस मुळे झालेत ना ? पोस्ट ऑफीस कोणाच्या अंडर येते ? तिथे चाललेला गोंधळ कोणी घातलाय सध्या ? मेल इन बॅलोट्स मधे ईश्यू येउ शकतात ह्याचा अर्थ 'डेम्स त्यांच्या फायद्यासाठीच सही न तपासता बॅलट वॅलिडेट करा म्हणतात.' असा कसा निघाला ?

अणि मूळ प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. "" मग ते सहि तपासुनंच (किंवा इतर मार्गे) बॅलट वॅलिडेट करावं याकरता डेम्स विरोध का करत आहेत" हे डेमोक्रॅटिक पार्टी ला सगळी कडे करायचे आहे हा निष्कर्ष कसा काढलास ते अजूनही कळले नाही.

जाता जाता :
१, हे नेवाडा बद्दल
https://www.factcheck.org/2020/09/trumps-false-claim-about-mail-ballot-s...
२. हे पेनसिल्वेनियामधल्या लॉ सूट बद्दल
https://apnews.com/article/pennsylvania-lawsuits-pittsburgh-elections-el...
"The suit, filed by the League of Women Voters of Pennsylvania, the Urban League of Greater Pittsburgh and two individual voters, seeks to force election officials to give voters the chance to fix ballots that are either missing signatures, or where there’s a perceived signature mismatch."

आणि हे तर वाचच
A bill spearheaded by Sens. Amy Klobuchar (D-Minn.) and Ron Wyden (D-Ore.), the Natural Disaster and Emergency Ballot Act, would make a series of changes to ease voting options during the coronavirus pandemic. Among those changes, Democrats are proposing that all states allow voters the opportunity to verify any ballot signatures deemed to be a mismatch.

“Notice of a discrepancy must be provided to voters by at least two methods including: regular mail, phone, electronic mail, and text message,” according to a bill summary from Democrats. “A voter has until the day before certification of election results to provide confirmation that the signature in question is their genuine signature. The confirmation can be provided through any of the notice methods. A final determination shall be made by three election officials, at least one of whom is of an opposing party, taking into account information provided by the voters, through a unanimous vote if a ballot is valid. Only through a unanimous vote that a ballot is not valid shall a vote not be counted.”

The bill lays out a bipartisan process for approving or rejecting ballots with signature issues. It does not end signature verification requirements.

https://www.washingtonpost.com/politics/2020/08/11/trumps-latest-falseho...

माहीत नाही. निदान तेथे (नेवाडा) दिसत नाही. मी फक्त ही न्यूज चेक केली.

डेमोक्रॅट लोक ज्या ज्या प्रकारे शक्य आहे त्या प्रकारे व्होटिंग फ्रॉड करु इच्छिते कारण अशा प्रकारची बोगस मते त्यांनाच मिळणार आहेत. बेकायदा घुसखोर, नागरिक त्व न घेतलेले व्हिसावर काम करणारे हे सगळे. तशात सोरोस नामक गडगंज श्रीमंत दैत्य अशा लोकांना भरपूर पैसा पुरवत आहे. हा सोरोस तमाम BLM आणि अँटिफा (तीच ती ज्याला बायडन एक विचारपरंपरा मानतो संघटना नाही!) ह्यांनाही पैसा पुरवून त्यातील विध्वंसक लोकांना पोसण्याची, त्यांच्या जामीनाची व्यवस्था करत आहे.

अनेक लोक अशा डिबेटा करमणूकीसाठी बघत असतात. जो जास्त करमणूक करतो त्याला मत असा साधा हिशेब असतो. असे लोक तरी ट्रंपच्या "मी जे ४७ दिवसात केले ते तू ४७ वर्षात करू शकला नाहीस" ह्या टोमण्यावर खूष होऊन त्याला मत देतील अशी आशा. बायडनकडून डिबेटमधे चमकदार संवाद सोडाच, मधेच डोक्यातला फ्युज उडून काही भलते सलते बरळले जाऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे. त्यामुळे तिथून फार काही आशा नाही.

एका कॉन्जर्वेटिव ट्रंप समर्थकाचे बोलके ट्वीट
"ट्रंपने जोरदार झुंज देऊन डिबेट जिंकली, ख्रिस वॉलेसला एकदम धूळच चारली! स्टेजवर एक दुसरा म्हातारा मनुष्यही होता जो स्वतःशीच काहीतरी पुटपुटत हातवारे करत होता पण त्याच्याकडे कुणी फारसे लक्ष दिले नाही!".

>>हे डेमोक्रॅटिक पार्टी ला सगळी कडे करायचे आहे हा निष्कर्ष कसा काढलास ते अजूनही कळले नाही.<<
आय्ला, हा तर फुल्टॉस आहे. बल्ला घुमाउ? Proud

>>आणि हे तर वाचच<<
अरे बाबा, रेप्स मेलइन बॅलटला सरसकट विरोध करत नाहित (जे शेकडो वर्षं चालु आहे), त्यांचा विरोध केवळ स्लॅक सजेस्टेड ऑन टाइट स्क्रुटिनीवर आहे. आणि डेम्स आर थ्रोइंग देर वेट ऑन रिलॅक्सिंग दोज गाइडलाइन्स. या मुद्द्यांवर फोकस कर, मग कळेल तुला मी काय म्हणतोय ते...

कुणीतरी हंटर घेऊन बायडनच्या मागे लागणे आवश्यक होते. ते ट्रंप करतो आहे हे चांगलेच आहे.
ह्या प्रकरणात बरेच पाणी मुरते आहे. आपला बाप अमेरिकेचा उपाध्यक्ष पदी आहे ह्याचा फायदा घेऊन हंटरने बरेच जंतरमंतर केले आहे ते उघडकीस यायला हवे.

ह्या डिबेट मॉडरेटर लोकांना किती पगार असतो? नाही म्हणजे किती रकमेसाठी माणूस असं इतकं सहन करू शकतो????? दोन्ही उमेदवारांकडून इतका दंगा...

>>तशात सोरोस नामक गडगंज श्रीमंत<<
जॉर्ज सरोस? न्हाऽऽऽ. तो आणि माइक ब्लुमबर्ग बहुतेक टॅक्स क्रेडिट घेतील त्यांच्या या सोकॉल्ड फिलांथ्रपी वर... Lol

अरे बाबा, रेप्स मेलइन बॅलटला सरसकट विरोध करत नाहित (जे शेकडो वर्षं चालु आहे), त्यांचा विरोध केवळ स्लॅक सजेस्टेड ऑन टाइट स्क्रुटिनीवर आहे. आणि डेम्स आर थ्रोइंग देर वेट ऑन रिलॅक्सिंग दोज गाइडलाइन्स. या मुद्द्यांवर फोकस कर, मग कळेल तुला मी काय म्हणतोय ते... >> तू एकदा ते मूळ बिल वाच आणि मग बोल कि त्यात काय चूकीचे आहे. हे घे परत देतो

The confirmation can be provided through any of the notice methods. A final determination shall be made by three election officials, at least one of whom is of an opposing party, taking into account information provided by the voters, through a unanimous vote if a ballot is valid. Only through a unanimous vote that a ballot is not valid shall a vote not be counted.”

The bill lays out a bipartisan process for approving or rejecting ballots with signature issues. It does not end signature verification requirements.

ट्रम्प चे टॅक्स रिटर्न कधी बघयला मिळतील ह्यावर इन्शाल्ला असे म्हटले. देवाची इच्छा असेल तर. पण ह्याचा औपरोधिक अर्थ कधीच नाही असा होतो. इन्शाल्ला हा शब्द अशा अर्थाने वापरणे मुसलमानांना रुचले नाही असे दिसते आहे.

मला तर ट्रंप चे टॅक्स रिटर्न बघण्यात काहीच इंटेरेस्ट नाही. त्याने जर काही अवैध केले असेल (आणि हे खरे तर किती जणांना कळेल नुसते रिटर्न बघून?) आय आर एस आहे कोर्ट आहे, ते करतील की. इतकी वर्षे हा विषय चघळला जातो आहे त्यातून आत्तापर्यंत काहीहि निघाले नाही नि आता निघणार नाही. निदान माझ्यावर तरी त्याचा काही परिणाम होणार नाही.
"डेमोक्रॅट लोक ज्या ज्या प्रकारे शक्य आहे ........ जामीनाची व्यवस्था करत आहे."
अहो मग हे सगळे सिद्ध करून त्यावर काही कारवाई करा की. अत्तपर्यंत कितीतरी वेळा रिपब्लिकन प्रेसिडेंट होऊन गेले, कुणि काहीच केले नाही? गेली तिनाहून अधिक वर्षे रिपब्लिकन प्रेसिदेन्त आहे, २ वर्षे हाउस नि सिनेट मधे रिपब्लिकन होते, नि तरी नुसती बोंब मारण्यापलीकडे कही केले नाही. नुसतेच ओबामाला नि डेमॉक्रॅट्स ना शिव्या नि आरोप.
रिपब्लिकनच काय सगळेच राजकारणी सारखेच - बोंबा मारण्यात नि दुसर्‍याला शिव्या देण्यात पटाईत, स्वतः काहीहि करणार नाहीत.
चुकून कुणि काही करायला निघाला तर त्याला विरोध करायचा.
कसले राजकारण! नि काय आपण चर्चा करायची!
बरे आहे मला तरी काही उद्योगधंदे नाहीत, पण म्हणून असल्या फालतू गोष्टीत जास्त वेळ घालवत नाही.

बाय द वे हा बायडन इन्शाल्लाह वगैरे गिमिक्स कशाला करतोय? बर्नी काश्मीर प्रश्नी, पाकिस्तान प्रो काहीतरी बोललेला. हे लोक चड्डीत का नाही रहात? Sad

बाय द वे हा बायडन इन्शाल्लाह वगैरे गिमिक्स कशाला करतोय? बर्नी काश्मीर प्रश्नी, पाकिस्तान प्रो काहीतरी बोललेला. हे लोक चड्डीत का नाही रहात? Sad

पुढच्या डिबेटला म्युट बटण येणार ऐकलं. व्हाईट हाऊस स्टाफ म्हणतंय डिबेट झाल्यावर ते बटण आम्हाला लोन करा.

कशाला पुढचं डिबेट मुळात?! Proud

मलातर आवडलं इन्शाल्लाह म्हटलेलं. अगदी नेमका चपखल वापर केला बायडनने.

>>> इन्शाल्ला हा शब्द अशा अर्थाने वापरणे मुसलमानांना रुचले नाही असे दिसते आहे.
इन्शाल्ला हा शब्द अशा अर्थाने वापरणे काही मुसलमानांना (आणि काही नॉन मुसलमानांनाही) रुचले नाही असे दिसते आहे. काहींना आवडलंय.

इन्शाल्ला हा शब्द अशा अर्थाने वापरणे काही मुसलमानांना (आणि काही नॉन मुसलमानांनाही) रुचले नाही असे दिसते आहे. काहींना आवडलंय. >> Happy

गेली तिनाहून अधिक वर्षे रिपब्लिकन प्रेसिदेन्त आहे, २ वर्षे हाउस नि सिनेट मधे रिपब्लिकन होते, नि तरी नुसती बोंब मारण्यापलीकडे कही केले नाही. नुसतेच ओबामाला नि डेमॉक्रॅट्स ना शिव्या नि आरोप. > >झक्की थेट धोतरालाच हात घालतात बा लोकांच्या Lol

>>
गेली तिनाहून अधिक वर्षे रिपब्लिकन प्रेसिदेन्त आहे, २ वर्षे हाउस नि सिनेट मधे रिपब्लिकन होते, नि तरी नुसती बोंब मारण्यापलीकडे कही केले नाही. नुसतेच ओबामाला नि डेमॉक्रॅट्स ना शिव्या नि आरोप. > >झक्की थेट धोतरालाच हात घालतात बा लोकांच्या Lol
<<
असले गैरव्यवहार हे डेमोक्रॅटिक सरकार असलेल्या राज्यात होते आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार राजाश्रयानेच होत आहेत. त्यामुळे त्यामागच्या लोकांना पकडणे सोपे नाही. जेव्हा कुंपणच शेत खात असते तेव्हा त्याला आवर घालणे कठिण आहे. भारतातही हे पहायला मिळते.
त्यामुळे कधीतरी हिमनगाचे बारीकसे टोक वाटेल इतके काहीतरी उघडकीस येते तेव्हा ते कळते. पण ह्या प्रकाराला मुळापासून नष्ट करणे शक्य आहे की नाही ह्याविषयी शंका आहे. बर्‍याचशा डेमॉक्रॅटिक राज्यात एकपक्षीय सत्ता गेले २०-३० वर्षे आहे ती ह्या असल्या प्रकारामुळेच की काय असे वाटते.
अमेरिकेत राज्यांना जास्त ( उदा. भारतापेक्षा) अधिकार आहेत. केंद्रीय शासन किती हस्तक्षेप करेल ह्याला मर्यादा आहेत. त्यामुळे ह्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणे हे निदान पहिले पाऊल तरी उचलले जाते तेही नसे थोडके.

https://www.dawn.com/news/1582477
डॉन ह्या पाकिस्तानातील पेपरातील बातमी. ह्यात बायडनने हा शब्द वापरला म्हणून जे काही म्हटले आहे त्याला कौतुक वा स्तुतीसुमने म्हणवत नाही.

रुल चेंज ने खरच काय फरक पडणार आहे. ज्याला बोलायचे तो तसाही मधे बोलणारच. उगाच धारपांच्या पुस्तकात असते तशी पाठीमागून खसखस ऐकायला येईल. Wink

अँटिफा आणि बी एल एम भरपूर नायनाट, लुटालूट, जाळपोळ, खुनाखुनी, विद्रूपीकरण करणार. कंबरडे मोडलेल्या उद्योगांना आणखी गलितगात्र करणार. हजारो लोकांच्या नोकर्‍या जाणार आणि त्याविरुद्ध डिबेटमधे बोलायचे नाही. कारण अमेरिकेच्या कायद्यांपेक्षा डिबेटचे नियम जास्त शिरोधार्य. वा! खूप छान.
अशा हिंसाचारावर उत्तर काय तर पोलिस दलात काटछाट करणे! म्हणजे पुन्हा असले गुन्हे घडले तर तपासाला वा त्यांना थांबवायला पुरेसे पोलिसच मिळू नयेत. आणि डिबेटच्या नियमात बसत नाही म्हणून ह्यावर काहीही बोलायचे नाही. वा छान!
अमेरिकेत मोठी शहरे ही अर्थव्यवस्थेची केंद्रे आहेत. अशा केंद्रांमधे कायदा सुव्यवस्थेचा अभाव, अराजक, हिंसा वगैरे फोफावत गेले तर सर्व देशाला त्याची किंमत चुकवावी लागेल. कुण्या जॉर्ज फ्लॉईडच्या वा ब्रेओना टेलर वा रेशार्डचा अन्यायकारक मृत्यू झाला म्हणून तमाम शहरे अशा प्रकारे बरबाद करण्याचा परवाना मिळाला अशा थाटात ही अराजक करणारी मंडळी वागत आहेत. डेमॉक्रॅट लोक एक तर त्यांना आणखी हिंसा करायला चिथावत आहेत किंवा दुर्लक्ष करणे वा तोंडदेखला बुळबुळीत निषेध करणे इतपत विरोध करत आहेत. त्याच वेळी ट्रंप केंद्रीय सुरक्षा दल पाठवू पहात असेल तर त्याला ह्या विध्वंसक लुटारूंपेक्षा धोकादायक ठरवणे.
पण डिबेटच्या नियमात बसत नाही म्हणून अशा अमेरिकेच्या नरडीला नख लावण्याच्या प्रकाराबद्दल काही बोलायचे नाही. छान. छान!

शेण्डे - ते दंगेखोर कोठून आणलेत मधेच? जे लुटालूट, हिंसा करत आहेत त्यांना नेउन घाला तुरूंगात. पण डिबेट मधे दोघांना प्रत्येकी दोन मिनीटे दिलेली असताना त्यातला जेव्हा एक बोलत असेल तेव्हा दुसर्‍याने पचकायचे नाही हा दोघांना सारखा लागू असलेला नियम अनफेअर कसा? १५ मिनीटांमधली ही दोन दोन मिनीटे झाली की मग उरलेली १०-११ मिनीटे आहेतच की प्रतिवाद करायला.

आता झालंय काय, तर ट्रंपने क्रिस वॉलेस पासुन सगळ्या मिडिया (इंन्क्लुडिन फॉक्स, आणि सोशल मिडिया वॉरियर्स) च्या शेपटिवर या साडे-तीन वर्षात कधिना कधि इंटेशनली/अनिंटेशन्ली पाय ठेवलेला आहे. तेंव्हा मौका मिळेल तेंव्हा ते आपापल्या औकाती नुसार फणा काढणार. दॅट्स गिव्हन. शेवटि प्रश्न हा उरतो कि, तुम्हि या शेपटि तुटलेल्यांचं अरण्यरुदन ऐकत बसणार कि अमेरिकेला सध्याच्या परिस्थितीत (ट्रंप्/बाय्डन) कोण स्टेबल, डिसाय्सिव लिडरशिप देउ शकेल याचा विचार करणार. अवर इमिजिएट थ्रेट इज चायना, डझ बाय्डन हॅज बॉल्स टु गो पुट लीश ऑन चायना? गो फिगर...

शेंडे Rofl

>>शेण्डे - ते दंगेखोर कोठून आणलेत मधेच? जे लुटालूट, हिंसा करत आहेत त्यांना नेउन घाला तुरूंगात.

लॉ अँड ऑर्डरचा मुद्दा डिबेटमधे आणणे कसे चूक आहे असे काही लोकांचे मत आहे. हे लॉ अँड ऑर्डर माझ्यामते ह्या गुंड संघटनांनी चालवलेल्या हिंसक आंदोलनाबद्दल आहे असा माझा समज आहे.
नेऊन तुरुंगात घालणार कोण? स्थानिक राज्यकर्ते ह्या प्रकाराला प्रणय सोहळा (लव्ह फेस्ट), प्रेमाचा वसंत (समर ओफ लव्ह) वगैरे विशेषणांनी गौरवत आहेत. कुणाला तो वांशिक समानतेकरता फोडलेला आर्त टाहो वाटतो आहे. ह्यात अनेक बिगर गोर्या वंशाच्या उद्योगांची राखरांगोळी होताना दिसते आहे वगैरे गैरलागू मुद्दे विसरू या क्षणभर (किंवा कायमचे). पण अशा गोष्टींना पहिला उपाय हा शहर, राज्य इथली सुरक्षा दले हा आहे. त्यांना डेमॉक्रॅटिक सरकारांनी लगाम, वेसण, झापडे वगैरे लावून हतबल केलेले आहे.

मला ट्रंपकडून आशा आहे की दुसर्‍या खेपेस तो अत्यंत निष्ठूरपणे हा विध्वंसक प्रकार मोडून काढेल. बायडन सरकारकडून असे काही केले जाईल अशी काडीचीही अपेक्षा नाही.
निदान डिबेटमधे ह्या संतापजनक प्रकाराला वाचा फोडणे आवश्यक आहे. असल्या आगलाव्या संघटनांना बोटचेपेपणा त्या आगीत तेल ओतणे अत्यंत घातक आहे. मग नियम गेले तेल लावत!

फोडु दे की वाचा. त्याला त्याची स्वतःची दोन मिनीटे कशाकरता दिलेली आहेत. नाहीतर पुढे जी चर्चा होईल त्यात बोलता येइल. बायडेन ला जी दोन मिनीटे दिली आहेत त्यात बोलायची काय गरज आहे.

Pages

Back to top