खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@लावण्या दहीवडा मन्चुरिअन मस्त.

@विक्रमसिह सुरळीच्या वड्या भारी 10/10

@मृणाली सोया पनीर टिक्का पुलाव सुंदर दिसतोय

@सुमित्रा काटभेंडी भाजी भारी.. पांढरट मोठी जाडी भेंडी असते न..

माझ्याकडे आज first attempt
Raw Green Papaya Thai salad

IMG-20200925-WA0004.jpg

Raw Green Papaya Thai salad
मस्त दिसतय..पण कधी खाल्ले नाहीये..

Red sauce exotic pasta
यमी....

एग पुडींग पण छान आहे..

धन्यवाद झंपी आणि देवकी.
मिरचीचा ठेचा, पिठलं, पोळी,भात आणि घरीच दुध आटवून केलेला कलाकंद. गजानन महाराजांना नैवद्य दाखविला तोच फोटो टाकला इथे.

जाई, simple आहे, hebbers ची फोल्लो केली थोडी मनाने.
सर्वात आधी दुप्पट पाण्यात किंचित मिठ आणि तेल घालून पेंने पास्ता उकडून घेतला.
बटर मध्ये कांदा, लसूण, सिमला मिरची, 2 टोमॅटो बारीक चिरलेला परतून घेतले. (टोमॅटो 4हवेत पण माझ्याकडे तेवढेच उरले होते.) हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि लाल तिखट, मीठ, किसलेलं चीझ घालायचं. वाफ अली चांगली की टमाटे डाव वापरून मॅश करायचे कढईतच.थोडं केचप टाकलं टमाटे कमी होते म्हणून आणि उकडलेला पास्ता घालून परतून घेतलं. झालं एवढंच

हो शितल. ह्या सिजन मध्येच मिळते भेंडी आणि मोहर सुद्धा .
तुम्ही कंदी पेढेची रेसिपी मागितली होती . दूध मंद आचेवर आटण्यासाठी ठेवणे. मध्ये मध्ये हलवत रहावे . घट्ट होत आले की साखर आणि वेलची पूड घालावे . गोळा होत आला की गॕस बंद करणे. थंड झाले की हाताला तूप लावून मळून गोळे करून घेणे.

लावण्या, भेंडी माझी पण फेवरेट. आणि ही तर खुपच.

Cuty, सातारी कंदी पेढे पाहून तुम्हाला माहेर आठवलं म्हणजे आपलं माहेर जवळजवळ आहे.

सगळे पदार्थ एकसे एक आहेत .

Mrunali, तो लच्छा पराठा पाहून जाळून खाक झाले.किती प्रॅक्टीस केली मी लॉकडाऊनमध्ये,पण असे पापुद्रे नाही जमले.

मृ.स तै, नक्कीच ब नवुन खावा लागेल आता.
भारी बनवलाय.......स्लर्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प्र्प

लावण्या वडापाव मस्तच.
मी मोबाईलवर फोटो काढले की त्यांची साईझ MB मधेच येतेय. त्यामुळे फोटो टाकता येईना. कमी साईझचे फोटो कसे काढायचे किंवा फोटोंची साईझ कमी कशी करता येईल?

Pages