कालपासून म्हणजे नऊ सप्टेंबर 2019 पासून कलर्स मराठीवर स्वामिनी ही मालिका सुरू झाली आहे. दररोज रात्री साडेआठ वाजता प्रसारणाची वेळ आहे.
पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी मालिका .
या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.
मालिकेमध्ये गोपिकाबाईंच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या भूमिकेत ' सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' पर्वातील सृष्टी पगारे आणि माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन ही मंडळी आहेत.
पेशवाईचा काळ आणि माफक (नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे) का होईना, तत्कालीन ऐतिहासिक घडामोडी या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळतील अशी आशा आहे. (अपेक्षा म्हणायला नको उगाच).
माबोवर ह्या निमित्ताने चर्चा होऊन काही ऐतिहासिक माहिती समोर आली तर बरंच होईल. नाहीतर आहेतच 'पिसं'..
स्वामिनी - कलर्स मराठीवरील नवीन मालिका
Submitted by प्राचीन on 10 September, 2019 - 05:26
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिरीयल संपते आहे का? कारण आजच
सिरीयल संपते आहे का? कारण आजच सोनी मराठीवर ऐश्वर्या नारकरच्या नवीन सिरीयलचा प्रोमो बघितला. ऑक्टोबरपासून सुरू होतेय.
सिरीयल संपते आहे का
सिरीयल संपते आहे का
लॉकडाऊननंतर एक दोन भागच पाहिले.पण तोपर्यंत पानिपत झाल नव्हत.त्यानंतर माधवराव गादीवर बसले .एवढ इतक्या लवकर दाखवल असेल अस वाटत नाही .कारण मोठी रमा न.आवडल्याने मालिका बघण सोडून दिल.
नारकर बाई दुसर्या मालिकेत येत आहेत मग एकतर संपवत असतील किंवा दुसरा कलाकार घेतील.
Pages