खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेऽऽष, केक छान स्पाॕन्जी दिसतो आहे . तु मागे टाकलेल्या चिकन लाॕलीपॉप ची कृती टाक ना.

वर्णिता, बिट कटलेट यम्मी .

आदू, मस्त!
ऋन्मेष ,अफलातून!
शीतल, पाव पहिल्याच फटक्यात असे मस्त झाले ते पाहून आनंद झाला असेल ना?
वर्णिता,कटलेट्स एकदम झकास!

pedhe .. nankatai.. gharguti cake.. yummy distey... colour shape pan mastch.. gharguti cake tar same to same ayyangar rava cake sarkha distoy..

शीतल , पाव मस्तच .
मानसी , मसालेभात आणि मठ्ठा , लाळ्गाळू

@ऋन्मेष केक मस्त.. रवा केक आहे न?

@वर्णिता कट्लेटला छान रंग आलाय

@सुमित्रा धन्यवाद

@देवकी धन्यवाद, हो आनंद झाला, परंतु फक्त सहा पाव झालेत एकावेळी. बाहेरून आणण बरंय 12 रुपयाला लादी. अगदीच बाहेर नाही मिळाला, आणि खायचाच असेल तर ठीक आहे घरी करायला..

@श्रवु धन्यवाद.. dry yeast चं कमाल

@मानसी मसालेभात छानचं दिसतोय

@स्वस्ति धन्यवाद

आज आकाड (आषाढ) तळला..

कापण्या

IMG-20200710-WA0010.jpg

चकल्या कडबोळी राहिलीच तरी.. Proud Proud Proud

IMG-20200710-WA0011.jpg

parathe gobi.jpg

कोबीचे पराठे, ठेचा, दही

शीतल येस्स,
रवा केक - अय्यंगारच जणू Happy

बाई दवे,
धाग्याचे पोट भरले. नवा काढूया Happy

Pages