खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मानसी. तुमचे चिट मिलचे दोन्ही पदार्थ छान आहेत.
व्हीबी तुम्ही नवीन माहिती दिलीत.
बोकलत आज गुरुपौर्णिमा म्हणून शाकाहार असं तर नाही ना Wink
ऋ कटलेट अगदी बिस्कीट सारखे दिसताहेत.

हो माझी बायको अश्या कटलेट पकौडे आयटममध्ये एक्सपर्ट आहे.
तिच्याकडूनच प्रेरणा घेत मी सुद्धा एकदा शिल्लक दालखिचडीच्या पकोड्याचा प्रयोग केलेला.

मला लिंक देता येत नाही सध्या. तरी ट्राय करतो. हा होता तो धागा.

डाळ राईस पकोडे .. (पिंट्या इज बॅक)
Submitted by ऋन्मेऽऽष on 30 June, 2016 - 21:33

त्या चिट मिल केक ची रेसिपी द्या न plz
सगळ्यांना एक विनंती आहे ,असे जरा वेगळे प्रकार असतील तर ठिडक्यात रेसिपी पण देत जा न प्लझ,फोटो बघून करायचा मोह होतो पण रेसिपी माहीत नसल्याने तसच राहते

Ok

1 कप मैदा+१कप साखर+१/२ कप कोको पावडर+१/२ टेबलस्पून बेकिंग सोडा+१/२ टीस्पून बेकिंग पावडर+१/२टीस्पुन मीठ+१ अंड+१/४ कप दही+१/२ कप गरम पाणी+१/४ कप तेल+१ टीस्पून व्हेनिला इसेन्स सर्व छान blend करून घ्या.इडली बेटर सारखी consistency ठेवा.fry pan madhe butter paper lawun chhan tel सर्व बाजूंनी लावा.pan जाड तव्यावर ठेवा.मंद गॅस वर ४५ मिनिटे झाकण लावून ठेवावे.खूप moist cake tayar hoto icing chi garaj nahi.pun majhyakade 2 dairy milk hote.mi te melt karun wer lawle.

वॉव चंपा हे सही आहे. पोरं खुश होतील ..
चॉकलेट कुठले वापरले? वितळवले कसे (ओवन गॅस?) आणि हे साचे ऑनलाईन मिळतात का? पण ईथे पुन्हा बंद झाली ऑनलाईन डिलीव्हरी Sad

IMG-20200707-WA0008.jpg
ऋ, असे चॉकोलेट आणि साचे असतात. डबल बॉयलर पद्धतीने चॉकोलेट वितळवतात किंवा मावे मध्ये. तूनळीवर व्हिडीओ मिळतील. आरिफच्या दुकानात सगळे सामान मिळते. Aarif lamoulde म्हणून गूगल सर्च करा. मला लिंक देता येत नाही. ऑनलाईन ही चॉकोलेट महाग आहेत मिळाली तरी.

Realistic dishes....... 1
IMG-20200707-WA0021.jpg

2
IMG-20200707-WA0019.jpg

Stuffed capsicum.. really tasty.. looks weired though.. smoky flavour
आमच्याकडे पदार्थ जळला किंवा करपला की smoky flavour म्हणायची पद्धत आहे

खऱ्याखुऱ्या दुनियेतील पदार्थ.. insta वाले नाही
........
IMG-20200707-WA0022.jpg
अंधारातली खिचडी आणि भजी
(बनवली आणि खाल्ली तेव्हा दिवे गेले होते,
मला।एक समजत नाही सारखेच दिवे जातात आमच्याकडे ..पण विद्युत वाले एवढा आकार कशाचा घेतात काय माहीत)

IMG-20200707-WA0017.jpg
Insta वाले कांदे पोहे
विशेष म्हणजे चवीला सुद्धा भन्नाट झाले होते..
ह्या पोह्यांची एक हृदय आठवण आहे, ही dish पुन्हा कधीच दिसणार नाही, फुटली हो... Sad बिचारी एकच होती अशी

<<>> मानसी, सेम कधीतरी बदल म्हणून खूप छान लागतो पोळा. अन असा क्रिस्पी असेल तर नुसता खायला पण आवडतो मला☺️

हो श्रवु काळ्या चण्याची भाजी, काळे वाटाणा उसळ अप्रतिम लागते.
बाहेर वातावरण खूप छान आहे, म्हणून आम्ही आज चिकन अन भाकरीचा बेत केला होता.

VB idli n mutton .. mi try karen ekda.. solapurla gele hote tevha tithe hoti hi dish hotel madhe..

पोहे भारी दिसतायेत.
हापिसात जाताना , वाटेत एका कडून पार्सल घ्यायचे नाश्त्यासाठी.
इंदूरी पोहे. Without कांदा. काय भन्नाट चव होती. ते आठवले.

Pages