चीन आणि पाकिस्तान आपली शेजारी राष्ट्रे ज्यांनी वारंवार आपल्या परराष्ट्रीय धोरणांमधल्या त्रूटी किंवा राजकीय नेत्यांचा अतिविश्वास शोधून विश्वासघात केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनशी पुढे व्यापार करावा की नाही, पाकिस्तान ला औषधे द्यावी किंवा नाही यावर नागरिक मत प्रदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी छ.शिवाजी महाराज दगाबाज शत्रूशी कसे वागले ही इतिहासप्रेमी निनाद बेडेकरांनी चिंचवड मधील जिजाऊ व्याख्यानमालेमधील अपरिचीत गोष्ट सांगाविशी वाटते.
आता पुढील शब्द निनाद बेडेकरांचे आहेत जे अनेक वर्ष मनात, हृदयात साठवलेले आहेत.
शिवाजी महाराज शुर होते, मुत्सद्दी होते, राजकारण निपुण होते इ अनेक गुण अनेकांना माहित होते. पण शिवाजी महाराज कसलेले व्यापारी होते हा गुण अनेकांना माहित नसेल. याचे कारण आजवर इतिहास लिहीला गेला त्याचा आधार बखरी, नोंदी किंवा पत्रव्यवहार जो महाराजांनी केला किंवा इतरांनी महाराजांशी केला या माध्यमातून आहे.
मी इंग्लडला गेल्यावर मुद्दाम एका संग्रहालयात गेलो जिथे इस्ट इंडीया कंपनीचा पत्रव्यवहार साल आणि महिन्यांनुसार संग्रह केलेला आहे.
मी शिवाजी महाराजांच्या कालखंडातील एक ईस्ट इंडीया कंपनीचा कालखंड उघडला आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एक पत्र मिळाले. ज्यात भारतातील एका ईस्ट इंडीया अधिकाऱ्याने शिवाजी महाराजांशी तांबे विकुन व्यापार करताना ईस्ट इंडीया कंपनीला ३२% नुकसान का सोसावे लागले याची कहाणी आहे.
तेंव्हा आणि आजही तांबे भारताला आयात करावे लागते. शिवाजी महाराजांनी ईस्ट इंडीया कंपनी सोबत तांब्याच्या बदल्यात चांदी असा देण्या घेण्याचा करार केला.
यातील शर्ती अश्या होत्या.
१) इंग्रजांनी प्रथम तांबे दाभोळला द्यायचे.
२) बदल्यातली चांदी रायगडावर येऊन घेऊन जायची.
३) शिवाजी महाराज स्वतः चांदी वजन करून देतील.
४) वजनकाटा रायगडावरील असेल.
५) चांदी देताना, चांदीचा exchange rate ज्या दिवशी चांदी दिली जाईल त्या दिवशीचा असेल.
तांब्याची डिलीव्हरी घेतल्यानंतर ईस्ट इंडीया कंपनीला चांदी मिळवण्यासाठी अनेक खेटे मारावे लागले. दाभोळ ते रायगड प्रवास करून गेल्यावर अधिकारी शिवाजीमहाराज स्वतः चांदी मोजून देतील अशी शर्त दाखवून ते आत्ता रायगडावर नाहीत असे सांगत. शेवटी एकदा खुप नजर ठेऊन ईस्ट इंडीया अधिकारी शिवाजी महाराजांच्या पाठोपाठ वसुली साठी रायगडावर दाखल झाले.
चार दिवसांनी महाराज भेटले आणि एकदाची चांदी दिली. यात शिवाजी महाराजांनी चलाखीने खराब काट्यावर वजनात चांदी कमी दिली तसेच त्या दिवशी चांदी खरेदी रेट वाढल्यामुळे सुध्दा चांदी वजनाला कमी मिळाली. यासर्व व्यवहारात शिवाजी महाराजांनी ३२% तोटा ईस्ट इंडीया कंपनीला सोसायला लावला.
पुढे निनाद बेडेकर म्हणाले जनतेच्या गवताच्या काडीला सुध्दा हात लाऊ नका असे सैन्याला आदेश देणारे शिवाजी महाराज व्यवहारात असे का वागले ? निनाद बेडेकरांच्या मते इंग्रज व्यापाराच्या नावाखाली साम्राज्य विस्ताराची स्वप्ने पहात होते जे पुढे अर्धे जगावर राज्य करून इंग्रजांनी सिध्द केले. अश्या व्यापार्यांना सुरवातीलाच व्यवहारात नुकसान पत्करायला लावले तर तर ते साम्राज्य विस्ताराचे स्वप्न साकार करू शकणार नाहीत ही शिवाजी महाराजांची निती होती.
आता सुध्दा जो माल ( फक्त आणि फक्त ) भारतातच तयार होतो तो चीनला विकताना अनेकपट किंमत वाढवून विकला तर आज खास करून चीन सोबत आयात जास्त व निर्यात कमी ही तुट कमी होईल. भारतीय हुशार व्यापारी आणि मोदींजीचे देशहीताचे सरकार याही पेक्षा काही वेगळे घडवू शकतील. याची चुणूक आपल्याला कोरोनासाठी चे औषध अमेरिकेला देताना पहायला मिळाली.
मांजरी सोबत घोडा फ्री पण मांजर तीन लाख रूपयांना विकायची या पंचतंत्रातील गोष्टी काय फक्त वाचण्यासाठी असतात ?
©नितीन जोगळेकर
नावासकट काॕपी पेस्ट किंवा शेअर करा.
Apple आणि blackberry ?
Apple आणि blackberry ?
Bb वाळलाच.
निकषांची पूर्तता न करताच
निकषांची पूर्तता न करताच चीननं भारतात पीपीई किट्स पाठवल्याचा प्रकार चर्चेत असताना आणखी एक मुद्दा समोर आला आहे. चीननं पाठवलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्स चुकीच्या आहेत, असा खळबळजनक दावा राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे राजस्थान सरकारनं चीनमधून आलेल्या या किट्सचा वापर करणं थांबवलं आहे.
राजस्थान सरकारनं मंगळवारी चीनमधून आलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्स न वापरण्याचा निर्णय घेतला. यामुळे चीनमधून आयात करण्यात आलेल्या टेस्टिंग किट्सच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. “चीनमधून आणण्यात आलेल्या या रॅपिड टेस्टिंग किट्सनं ९० टक्के अचूक निकाल देणं अपेक्षित आहे. पण, या किट्स फक्त ५.४ टक्केच अचूक निकाल देत आहेत. त्यामुळे या किट्सचा वापर करण्याचा काहीही उपयोग नाही. या किट्सबद्दल आयसीएमआरला (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) माहिती देण्यात आली आहे,” अशी माहिती राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी दिली.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-rajasthan-ceases-u...
रूनमेष
रूनमेष
वाचत आहेस ना बिचाऱ्या चीन च कर्तृत्व.
गंभीर आजार जगात सुरू आहे.
जग संकटात आहे asya वेळी सुद्धा लोकांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे कृत्य चीन करत आहे.
ना लज्जा ना शरम.
हेच किट जर काँग्रेसने आणले
हेच किट जर काँग्रेसने आणले असते तर काँग्रेस दोषी ठरवली गेली असती,
अन या केस मध्ये मात्र चीन दोषी
केंद्र सरकार निष्पअप
दुकानं मधून जेव्हा आपण सामान
दुकानं मधून जेव्हा आपण सामान मागवतो आणि त्या मधील काही सामान खराब निघते तेव्हा आपण दोषी असतो की दुकानदार.
ते सरकार भाजप की काँग्रेस
ते सरकार भाजप की काँग्रेस यावर अवलंबून असावे बहुतेक
दुकानं मधून जेव्हा आपण सामान
दुकानं मधून जेव्हा आपण सामान मागवतो आणि त्या मधील काही सामान खराब निघते तेव्हा आपण दोषी असतो की दुकानदार.
आणि तुम्ही नोकराला पैसे दिलेत
आणि तुम्ही नोकराला पैसे दिलेत आणि त्याने आणले , तर मग कोण जबाबदार ?
तुमचा रोख लक्षात आलं.
तुमचा रोख लक्षात आलं.
तुम्ही डॉक्टर आहात सामान सुद्धा त्या क्षेत्राशी संबंधित आहे.
जो अधिकारी खरेदी करण्यास गेला असेल त्याला सामानाची पारख करायची असेल तर कोणता मार्ग उपलब्ध असतो का अशा प्रकारच्या सामना मध्ये.
chinese-city-turns-into-ghost
chinese-city-turns-into-ghost-town-after-samsung-shifts-operation-to-india-
नोएडा मध्ये जगातील सर्वात मोठी मोबाईलचा कारखाना सॅमसंग ने चालू केला आहे.
लाल छत्री वाल्यांचं तोंड पाहण्यासारखं होईल ही बातमी वाचून.
https://m.economictimes.com/tech/hardware/chinese-city-turns-into-ghost-...
काळबोक्याचा मूळ रोग भाजपद्वेष
काळबोक्याचा मूळ रोग भाजपद्वेष आहे. मग तो किट राजस्थान मध्ये सदोष निघो की गुजरातमध्ये.
किट वापरून पाही पर्यंत कसं सांगणार तो व्यवस्थित आहे की नाही?
पण काहीही झालं तरी यांचं वड्याचं तेल भाजप च्या वांग्यावरच निघणार
{नोएडा मध्ये जगातील सर्वात
{नोएडा मध्ये जगातील सर्वात मोठी मोबाईलचा कारखाना सॅमसंग ने चालू केला आहे.
लाल छत्री वाल्यांचं तोंड पाहण्यासारखं होईल ही बातमी वाचून.}
https://news.samsung.com/in/samsung-inaugurates-worlds-largest-mobile-fa...
तो मूळ इलेक्ट्रॉनिक्स चा कारखाना १९९६ मध्ये नरसिंह रावांच्या कारकिर्दीत चालू झाला. २००७ पासून (मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत) तिथे मोबाईलचे उत्पादन सुरू आहे.
आता त्याची क्षमता साधारण ७५% नी वाढवण्यात येत आहे.
भारत उत्पादन क्षेत्रात अशीच प्रगती करत राहो ही सदिच्छा!
फेसबुकने रिलायंस जियो मध्ये
फेसबुकने रिलायंस जियो मध्ये $५.७ बिल्यन्स गुंतवुन जवळपास १०% एक्विटि घेतली.
ह्म्म, फेसबुक इज ए नेसेसरी इविल, आय गेस...
जिओने जी दोन apps. Jionews
जिओने जी दोन apps. Jionews & JioTv दिली आहेत ती अफलातून आहेत.
करोनाग्रस्तांच्या चाचण्या
करोनाग्रस्तांच्या चाचण्या वेगानं व्हाव्यात व त्यांना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारनं रॅपिड टेस्ट किट्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सर्व राज्यांना हे किट्स केंद्र सरकारकडून पुरवण्यात आले. महाराष्ट्राला हजार रॅपिड टेस्ट किट्स मिळाले. मात्र, आता हे सर्व किट्स भंगारात टाकून देण्याची वेळ आली आहे. याउलट छत्तीसगड सरकारनं दक्षिण कोरियाकडून घेतलेले किट्स उत्तम रिझल्ट देत आहेत. यावरून शिवसेनेनं केंद्र सरकारला घेरलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून केंद्र सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/how-can-government-...
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/south-korean...
व्हिएटनाम
व्हिएटनाम
टर्की
बांग्ला देश
ब्राझिल
चीन मधील कंपन्या इकडे हलणार म्हणे
आणि भक्ताडे नाचत आहेत ह्यांचे हावड़ी इकडे आणणार आहेत म्हणून
इकडे आल्या ह्या कंपन्या येथील
इकडे आल्या ह्या कंपन्या येथील गोर गरीब वंचित लोकांना काही रोजगार तर मिळेल.
भक्त शिकले सावरलेले आहेत.
अमेरिकेत जावून नोकऱ्या करतील.
म्हणून ही तळमळ.
दुसरे आरक्षण,अनुदान,सर्व गोष्टी मोफत देण्या साठी सरकार कडे पैसा पण वाढेल त्या कंपन्या इथे आल्या तर.
नाही तर वरील सर्व सुविधा इच्छ्या असून सुध्धा सरकार देवू शकणार नाही.
तिजोरी खाली असल्या वर सरकार काय देणार.
केळ
चीनमधून आयात करण्यात आलेले
चीनमधून आयात करण्यात आलेले रॅपिड टेस्ट किट सदोष असल्याची तक्रार अनेक राज्यांमधून करण्यात आली आहे. यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) तूर्तास या किट्सचा वापर थांबवण्याचा आदेश दिला. मात्र चीनमध्ये या रॅपिड टेस्ट किटची निर्मिती करणाऱ्या कंपनीने आपल्या किटमध्ये काही समस्या नसून भारतातील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून त्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचा दावा करत भारतावरच खापर फोडलं आहे.
मिग विमानाच्या वेळेस सुद्धा
मिग विमानाच्या वेळेस सुद्धा भारतावर च आरोप झाला होता अत्याधुनिक विमान चालवण्याची कुवत भारतीय वैमानिक मध्ये नाही असा.
एक प्रश्न तसा खूप दिवस मनात
एक प्रश्न तसा खूप दिवस मनात येत आहे.
सरकारी दवाखान्यात च उपचार चालू आहेत.
आणि ह्या कामात नुकतेच शिक्षण पूर्ण केले आहे डॉक्टर च जास्त असणार..
अनुभव शून्य.
त्या मुळे किट्स वापरा वरचा आरोप एकदम चुकीचं पण असेल वाटत नाही.
नुकतेच शिकलेले डॉकटर हेल्पर
नुकतेच शिकलेले डॉकटर हेल्पर असतात
त्याच्या वर एम डी स्टुडंट
लेक्चरर
प्रोफेसर
एच ओ डी
इतर पर्मनंट स्टॅफ वगैरे असतात
चीनचा दावा मान्य केला तर मग
चीनचा दावा मान्य केला तर मग स्पेन व ब्रिटन मधलेही डॉकटर किट कसं वापरायचं ते जाणत नसावेत !
चीनचा आता किट वापरू शकणारे डॉकटर निर्यात करण्याचा प्लॅन असावा.
किट कसा वापरायचा हे फक्त चिनी
किट कसा वापरायचा हे फक्त चिनी भाषेत लिहिलं होतं. त्यामुळे तो कुणालाच वाचता येईना.))=((
Localisation च्या मामल्यात पण
Localisation च्या मामल्यात पण चिनी प्रोडक्ट्स चा आनंदीआनंद आहे. चीनी भाषेचे अगदी शब्दशः भाषांतर करून ते लोक manual बनवतात...
गेल्या महिन्यापासून
गेल्या महिन्यापासून लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे. परंतु अद्यापही ईलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करता आलं नाही. अशातच भारतीय बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी ओप्पो आणि शाओमी या कंपन्यांनी चीनमधून स्मार्टफोन्स आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या कंपन्या स्मार्टफोन्सचं उत्पादन भारतातच करत आहे. परंतु सध्याची मागणी पूर्ण करण्यासाठी चीनमधून फोन आयात करणं आवश्यक असल्याचं मत एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं व्यक्त केलं.
https://www.loksatta.com/lifestyle-news/xiaomi-oppo-import-smartphones-f...
पुरोगामी लोकांची विचारसरणी
पुरोगामी लोकांची विचारसरणी पाहता
उगीर लोकांना दिल्या जाणाऱ्या यातनांचा आणि मजुरांचे केले जाणारे शोषण या हे दोन मुद्दे म्हणजे पुरोगामी लोकांच्या हृदयातील तारा !
मग पुरोगामी लोकांनी चीन आणि चिनी वस्तू वर बहिष्कार टाकण्यात सर्वात पुढे असले पाहिजे होते .
पण प्रत्यक्षात जात्यात ढोंगी असल्या मुळे चीन ची भालामन करण्यात व्यग्र असतात .
यात पुरोगामी कोण आहे ?
यात पुरोगामी कोण आहे ?
भारतात इतक्या चायनीज वस्तू विकतात व घेतात , सगळ्या मोडिप्रेमींचे फोन मेड इन इंडिया आहेत का ?
चायनीज वस्तूंची आयात करा म्हणून ऑर्डरवर सही कोण करतो , मोदी की राहुल गांधी ?
साधारण पणें या गोष्टी ला दीड
साधारण पणें या गोष्टी ला दीड वर्ष तरी होत आले आहे. मी माझ्या पुरते बोलायचं म्हणाल तर , आमच्या ईडस्ट्री साठी लागणारे मिश्र धातूचे बार हे चीन मधुन येत अस. योग्य गोल आकाराचे व आपणास लागणारा साईज बरोबर देणारे, कुठेही हार्ड नसणारे असे ते बार असायचे. याउलट भारतीय बाार कुठेही हार्ड १५० साईज साठी आणले तर १४५ फिनिश साईज मिळायचा. कधी कधी क्रॅक त्यात दोन्हीची किंमत एकाच असायची. भारत सरकारने चीनच्या बार वर मागील कांहीं दिवसात ड्युटी वाढविल्याने चीनचे बार बंद झाले आहेत (फक्त ३००mm च्या वरचे बार चीन मधून येतात) व त्या जागी दक्षिण कोरियाचे बार येत आहेत. त्याची क्षमता चिनी बार इतकीच आहे. आता देश बदलणे हा कांहीं पर्याय होऊ शकत नाही. पण भारतीय नवीन निर्मिती साठी वेळ मिळू शकेल.
, सगळ्या मोडिप्रेमींचे फोन
, सगळ्या मोडिप्रेमींचे फोन मेड इन इंडिया आहेत का ? >>>>>>>>
मला एक समजत नाही चीन वर बहिष्कार चा विषय निघाला की युवराज आणि चाहते मंडळी सुप्त विरोध का करतात ?
Pages