Submitted by पाथफाईंडर on 24 March, 2020 - 02:39
सभ्य स्त्री पुरुष हो,
कोरोना नावाचे हे वादळ अचानकच आपल्या जीवनात आले. त्याचे आपल्या जीवनावर आत्तापर्यंत फार कमी प्रमाणात प्रभाव पडला आहे. अजून काय काय घडू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी हा धागा.
( सक्तीच्या बंदीवासात बसून रिकामटेकडे पणा करण्यासाठी मजेशीर प्रतीसाद अपेक्षीत)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक भला मोठा प्रतिसाद डिलीट
एक भला मोठा प्रतिसाद डिलीट केला. योजाटा आहे.
असो. इथले पॉझिटिव्ह रिस्पॉन्स चालू द्या. ऑल द बेस्ट टु एव्हरीवन.
कोरोनामुळे, अमेरीकेत, ७
कोरोनामुळे, अमेरीकेत, ७ मिलिअन लोकांनी बेरोजगारी क्लेम फाइल केलाय.
in the coming year, and the results will define the country for a generation. These are perilous times.
https://www.theguardian.com/business/2020/apr/02/us-unemployment-coronav...
_________
फक्त आर्थिक दॄष्ट्या जॉब वर लोकं अवलंबुन नसतात तर जॉब गेला तर, मेडिकल इन्श्युरन्सही जातो. ज्यांना क्रोनिक आजार असतात किंवा फक्त 'मॅनेजेबल' डिस ऑर्डर्स असतात, त्या लोकांकरता करता कठीण आहे.
_________
मोदी फक्त ४ तासांची नोटीस देउन चुकलेले आहेत.
ट्रंपने तर निराशाच केलेली आहेच.
माझ्याकडून दोघांचाही सपोर्ट, काढून घेतलेला आहे.
https://www.independent.co.uk/voices/coronavirus-us-south-korea-economy-...
काल रात्री 11:21 ला ऋन्मेष
काल रात्री 11:21 ला ऋन्मेष यांनी दिलेली एक लिंक बघितली आणि screenshot काढलेला तेव्हा कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या 59727 इतकी होती. आत्ता काही मिनटांपुर्वी लिंक परत चेक केली तर तो आकडा 64427 इतका वाढलाय..
खुप डिप्रेस फिल होतंय. माझ्या घरातले मित्रमैत्रिणी सेफ आहेत हा असा विचार अगदी काल-परवापर्यत करणारी मीच होते. याचीच आत्ता लाज वाटतीये.
आणि screenshot काढलेला तेव्हा
आणि screenshot काढलेला तेव्हा कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या 59727 इतकी होती.
>>>>.
मी सुद्धा असे हे स्क्रीनशॉट काढून दोनतीन दिवस चेक केलेले..
मग फार टेंशन यायला लागले..
हा कोरोनाचा नाही तर त्याने मेलेल्यांचा आकडा आहे.. जास्त विचार केला की फार भयंकर वाटते..
इथे मागच्या पानांवर जी पिटीशन
इथे मागच्या पानांवर जी पिटीशन दिली होती तिची दखल मा. सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. आशा आहे की त्यांची टीम मदत त्याला परत आणायला मदत करू शकेल.
इथल्या वाचकांनी पटत असेल तर अजूनही साइन करा. मोअर द बेटर
येत्या रविवारसाठी कोणता खेळ
येत्या रविवारसाठी कोणता खेळ दिलाय मोदिंनी?
ओडिसा, पंजाब इकडे lockdown 1
ओडिसा, पंजाब इकडे lockdown 1 मे पर्यंत वाढवला आहे.
आपल्याकडे रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना मा. मुख्यमंत्री उठा हा निर्णय का घेत नाहीयेत?
की ह्या साठी नरेंद्र मोदींची परवानगी घ्यायची आहे त्यांना?
मोदींनी नेशनवाइड lockdown
मोदींनी नेशनवाइड lockdown जाहीर करायच्या दोन दिवस आधीच ठाकरेंनी महाराष्ट्रात lockdown जाहीर केला होता.
इकडे घरकाम करून पार कंबरडे
इकडे घरकाम करून पार कंबरडे मोडले आहे.
भांडी घासून घासून हात रुक्ष होऊन गेलेत.
कधी संपणारे हा लॉकडाऊन??
मला एक कळत नाही.
पुण्यामध्ये सगळ्या पेठा, हडपसर, कोंढवा, येरवडा ई भागात जास्ती रुग्णसंख्या आहे. कोथरूड, बावधन, औंध, बाणेर, पाषाण इकडे त्यामानाने कमी रुग्णसंख्या आहे. मग ह्या एरियात ल लोकडाऊन partially उठवा.
अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त ही इतर सेवा हळू हळू का होतं नाही सुरु करा. जसे की भुसार मालाशिवायची दुकानें स्टेशनरी, गिफ्ट शॉप्स.
मोठी नसली तरी छोटी हॉटेल्स, टपऱ्या.
असं कितीदिवस राहायचं लॉक डाऊन मध्ये??
ज्या एरिया तले नागरिक नियम पळतायेत त्यांचा लॉक डाऊन शिथिल करा.
अक्ख च्या अक्ख पुणे लॉक डाऊन मध्ये का ठेवताय?
अक्ख च्या अक्ख पुणे लॉक डाऊन
अक्ख च्या अक्ख पुणे लॉक डाऊन मध्ये का ठेवताय?
<<
कारण हे हाताबाहेर गेलं, तर इथे कुणीतरी म्हटलं होतं. रस्त्यावर काहीतरी दिसेल म्हणून. तसं होऊ नये अशी आशा आहे.
राहिला प्रश्न घरकाम अन भांडी घासण्याचा. विलायतेत शिफ्ट व्हायचा विचार करा. तिथे कपडे देखिल घरीच धुतात म्हणे. स्वयंपाक मात्र बरेचदा करत नाहीत, बाहेर जेवतात असंही ऐकून आहे.
कारण हे हाताबाहेर गेलं, तर >
कारण हे हाताबाहेर गेलं, तर >>टप्प्याटप्प्याने लॉक डाऊन उठवणे ही strategy इकडे अपेक्षित आहे.
एकदम लॉक डाऊन उठवला तरी 30 एप्रिल काय 30 मे पर्यंत जरी लॉक डाऊन ठेवला तरी comnunity spread ची दाट शक्यता आहे.
आधी म्हणाले 14 एप्रिल नंतर म्हणाले 30 एप्रिल नंतर 3 मे.. तारीख पे तारीख असं तर.. जून पर्यंतही चालेल ..
सगळी हॉस्पिटल सप्टेबर पर्यंत
सगळी हॉस्पिटल सप्टेबर पर्यंत प्लेनिंग करून आहेत
करोना वॉर्ड काम केले की परमनंत करू अशा ऑर्डर बी एम सी देत आहे
ते करून ही डॉक्टर मिलेनात म्हणून महाराष्ट्रातील डॉक्टर ना कॉल करून त्याना गाड़ी पाठवत आहेत
त्यातही कुणी मिलेनात म्हणून 2017 ला जे लोक रिजेक्ट झाले होते त्याना सिलेक्शन ऑर्डर आपोआप देत आहेत , फोन वरुन या म्हणतात, तुम्ही पारामनान्त झालेत , डॉक्टर बोलतो , कुठे पोस्टिंग ? तर बोलतात कस्तूरबा ! डॉक्टर नै म्हणतो ! सगळी रिजेक्ट यादी सिलेक्ट केलेली आहे
Mbbs मिलेनात 80 के देऊन , म्हणून बी ए एम एस 60 के आणि होमिओपेथी 50 के
असे दरपत्रक दिले आहे
तरीही डॉक्टर कमी आहेत,
50 लाखाचा विमाहि आहे
मि म्हटले मि आहे ति नोकरी दिवसाची सोडनार नाही , फक्त रात्रि ड्यूटी देणार असेल तर दया
मी असे वाचले आहे (सी एन एन वर
मी असे वाचले आहे (सी एन एन वर) की या विषाणूला सूर्यप्रकाश अजिबात सहन होत नाही. तसेच उष्ण पाणी, साबण याने तो त्वरीत मरतो. भारतामध्ये सूर्यप्रकाशाची मुबलकता आहे, ही फार उत्तम गोष्ट आहे.
लोक थातुर-मातुर कारण देत
लोक थातुर-मातुर कारण देत घराबाहेर अशीच पडत राहणार असतील.तर जुनपर्यत सहज चालेल हे लॉकडाऊन.
https://mobile.twitter.com
https://mobile.twitter.com/PIBFactCheck/status/1243784468642402304
There is no evidence to prove that Sunlight can kill the new #Coronavirus
For better prevention, avoid touching your eyes, nose and mouth.
सामो, हे वाचा
Permanent करू कोण बोलतेय ? हे
Permanent करू कोण बोलतेय ? हे टेम्पररी कॉन्ट्रैक्ट बेसिसवर काम आहे ना डॉक्टर ?
.
हेही आहेच
हेही आहेच
पण ह्यावर फारसे लोक उत्सुक नाहीत , म्हणून परमनत च्या मोकल्या जागा या निमित्ताने भरुन घेण्याचेही सुरु आहे
ओके धन्यवाद.
ओके धन्यवाद.
BAMSसाठी पर्मनेंट ऑर्डर नोटीस संबधी काही असेल तर मिळेल का तो मेसेज?
बी ए एम एस , बी एच एम एस
बी ए एम एस , बी एच एम एस ऑर्डर परमनेन्ट नसतात
परमानेन्ट ऑर्डर , एम बी बी एस , वय 38 की 40 च्या खाली व 2017 ला ििइंटरवह्यू अटेंड केलेल्या काही लोकाना आहेत , ते तेंव्हा रिजेक्ट झाले होते , वेटिंग लिस्ट वर होते , पण आता ते विविध ठिकाणी निघुन गेले आहेत, तेहि फारसे उत्सुक नाहीत, आहे ते जॉब सोडून आता ह्यांच्या मागे कोण लागणार ?
7 हिल्स वालेहि रिक्रूट करत आहेत ( मरोळ अंधेरी , विजय मल्ल्याचे हॉस्पिटल ,)
OhhOk
OhhOk
माहितीसाठी धन्यवाद डॉक्टर
वाचावं ते नवलचं...काही
वाचावं ते नवलचं...काही लोकांना इतरांच्या किंवा देशाच्या काळजीपेक्षा स्वतःला भांडी घासावी लागू नयेत म्हणून लाॅक डाऊनमध्ये सूट हवीय..वा !! मानाचा मुजरा स्विकारा ह्या गरीबाकडून..
हात रूक्ष होतात म्हणे.. इथे लोकांची आयुष्ये रूक्ष व्हायला लागलीत..तरीसुद्धा काही लोक कुठलीही तक्रार न करता सरकारला सपोर्ट करतायेत.. अहोरात्र झटत असलेल्या डाॅक्टर आणि नर्सच्या चेहर्याकडे बघा कधी..जड मास्क लाऊन लाऊन चेहर्यावर व्रण उठायला लागलेत त्यांच्या..त्यांनीही कधी कांगावा केला नाही...तुमचीच भांडी तुम्ही घासली तर हात रूक्ष होतात.??
साॅरी टू बी रूड...तुम्ही स्वतःच्या comfort पेक्षा समाजाचा देशाचा विचार करावा..असं माझं प्रांजळ मत आहे..बाकी तुमची इच्छा ....
सध्या सारे कसे शांत शांत
सध्या सारे कसे शांत शांत चालले आहे. प्लंबर, रद्दीवाला, इलेक्ट्रिशियन, मेस्त्री या नेहमी घरी येऊन सेवा देणाऱ्यांना खुशालीचे दोन दोन फोन करून झाले. दूरस्थांचे फोन येतात. आम्हीही करतो. कधीकाळची मित्रमंडळी एकदम जागृत होऊन फोन करू लागली आहे. बाकी कामे वाटून घेतली आहेत. आठवड्यातून एकदाच कुणीतरी बाहेर पडून आवश्यक सामान आणायचे असा सक्त नियम आहे. मग नंतर सगळे कपडे, सामानाच्या पिशव्या धुणे, प्लास्टिक बॅग्सवर लाय्झॉल्चे मंत्रजल शिंपडून, शक्य असेल तर स्नान घालून त्यांना पावन करून घेणे वगैरे इतरांसारखेच सुरू आहे. घरातले जिन्नस (साठा असला तरी) पुरवून पुरवून खायचे हाही सक्त नियम आहे. अधेमधे तोंडात टाकण्यासाठीच्या जिनसांची तीव्र टंचाई आहे. वगैरे.
एक आहे. प्रदूषण खूपच कमी झाल्यामुळे रात्रीचे आकाश फार आल्हाददायक वाटते. गेल्या पौर्णिमेचा सुपर मून हा या आधीच्या सुपर मून्सपेक्षा कितीतरी अधिक मोठा, तेजस्वी आणि लालसर दिसला. इतकेच नव्हे तर अगदी अष्टमीपर्यंत या कृष्णपक्षातही चंद्र अगदी लखलखत होता. इतर ग्रहतारेही स्पष्ट दिसताहेत. गुरु चंद्र मंगळ युतीसुद्धा पाहाता आली. एकंदरीत पहाटे आकाशनिरीक्षणात बराच वेळ घालवता येतो.
गरजा कमी झाल्या आहेत. निवांतपणा आला आहे.
बाय द वे, मघईची पानवेल हातासरशीच आहे आणि कदाचित लॉक डाउनमुळे ती चांगली तरारली आहे. तेव्हा अधूनमधून सर्वांसाठी छानसे विडे लावणे हे एक काम नवीन घेतलेय. निवांतपणे देठ नखलून पानजोडीवर निवांतपणेच गुलकंद, मध, ( हो मध!) बाकी मसाला घोळवून घोळवून लावणे. ह्यामुळे निवांतपणात भरच पडतेय!
@हीरा एकंदरीत पहाटे
@हीरा एकंदरीत पहाटे आकाशनिरीक्षणात बराच वेळ घालवता येतो.>>> माझा मुलगा जवळजवळ रोज रात्री अर्धा तास आत बाहेर करतो.. तो एक स्टार गेझींग app आहे ते वापरतो .star view free असे काही तरी it helps to locate...आम्हाला बरीच नक्षत्रे शोधता येतात. आकाशाच्या प्रचंड पसार्यात आपण किती क्षुल्लक आहोत हे बघून नम्र व्हायला होते .
@सामो या सि एन एन च्या बातमी नवर्याला सकारात्मक वाटत आहे...मला मात्र संमिश्र भावना आहेत. रोज काही तरी नवीन ऐकण्यात येते.
तेव्हा अधूनमधून सर्वांसाठी
तेव्हा अधूनमधून सर्वांसाठी छानसे विडे लावणे हे एक काम नवीन घेतलेय. >> वा काय आ ठवण काढलीत. मुंबईत चेतना शेजारीचा पानवाला व हैद्रा बादेत एका ठिकाणी मघईवाला जोड विडा खाल्ला आहे अक्षी विरघळतो. मध काही नको पन बारका चमचा गुलकंद बेस्ट. ह्या पानाची रेसीपी नक्की लिहा.
सोशल डिस्टन्सैन्ग ला नवा मराठी शब्दः साथ सोव ळे. लोकसत्तामध्ये आत्ताच वाचला. धारावी व झोपडप ट्ट्यांवरून लक्ष ठेवायला ड्रोनचा वापर करीत आहेत ह्या बातमीत आहे बहुतेक.
मी बराच वेळ मर्ज ड्रॅगन नावाची गेम खेळत असते. कोणी आहे का इथे. असले तर धागा काढते. मणी ड्रॅगन शिंपले झाडे फुले शेअर करता येइल.
अजय चव्हाण
अजय चव्हाण
सर्वात आधी ह्याचा प्रॉब्लेम मोठा त्याचा प्रॉब्लेम छोटा असे वर्गीकरण करणे बंद करा.
सध्या कित्येक जेष्ठ नागरिक आहेत की जे दोघेही उठून चालू फिरू शकत नाहीत त्यांना रोज दुध आणायला बाहेर पडणे शक्य नाही असे लोक कसे दिवस काढत असतील ह्याचा विचार केलाय का तुम्ही??
माझ्या सख्या मावशीचे यजमान म्हणजे हे कित्येक दिवसांपासून bed ridden आहेत. त्यांच्याकडे येणारा मुलगा आता येत नाहीय.सगळं एकटी मावशी करतीय.. (वय वर्षे 70!)
तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेमस छोटे वाटतं असतील तर वाटून घ्या.
इकडे प्रत्येकजण आपापल्या परीने ही situation फेस करतोय.
प्रत्येकाला रोजचा दिवस उजाडला की अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.
So be empathetic to others also...
तसंही मी माझ्या पोष्टीत माझा प्रॉब्लेम सांगितला होता.
त्यावरून इतरांचे प्रॉब्लेम छोटे आहेत असं कुठेही म्हंटल नाहीय..
तुम्हाला आता ह्या वर वाद घालायचाच असेल तर खुशाल घाला....
@me_rucha
@me_rucha
मला कुठलाही वाद घालायचा नाही मला ते आवडतही नाही..
प्रोब्लेम्स सगळ्यांकडे आहेत...पण तुम्ही तुमच्या आधीच्या पोस्टमध्ये काय लिहलयं ते परत एकदा वाचा....
तुम्ही स्पष्ट लिहल आहे. घरातली कामे करून कंबरडे मोडलं आहे, भांडी घासून हात रूक्ष झालेत वैगेरे तेव्हा लाॅकडाऊनमध्ये शिथिल व्हावं...लाॅकडाऊन शिथिल व्हायला फक्त हा विचार करून चालेल का??
असतील काहींचे genuin problems त्याबद्दल सहानुभुती आहेच.. पण सध्या comfort पेक्षा जीव महत्वाचा...सर सलामत तो पगडी पचास....
कारणे काहीही असली तरी लॉक
कारणे काहीही असली तरी लॉक डाऊन संपून सर्व काही पूर्वी सारखे व्हावे ही (तुमची सोडून ) माझ्या सारख्या बऱ्याच जणांची इच्छा आहे.
U can continue urself in lockdown may b post lifting of lock down also.. ur wish..
सध्या comfort पेक्षा जीव
सध्या comfort पेक्षा जीव महत्वाचा...सर सलामत तो पगडी पचास +१२३
सध्या comfort पेक्षा जीव
सध्या comfort पेक्षा जीव महत्वाचा...सर सलामत तो पगडी पचास +९९९
हात रुक्ष होऊ नये म्हणून
हात रुक्ष होऊ नये म्हणून gloves वापरू शकता
Pages