कोरोना चे तुमच्या जीवनावर परीणाम

Submitted by पाथफाईंडर on 24 March, 2020 - 02:39

सभ्य स्त्री पुरुष हो,

कोरोना नावाचे हे वादळ अचानकच आपल्या जीवनात आले. त्याचे आपल्या जीवनावर आत्तापर्यंत फार कमी प्रमाणात प्रभाव पडला आहे. अजून काय काय घडू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी हा धागा.

( सक्तीच्या बंदीवासात बसून रिकामटेकडे पणा करण्यासाठी मजेशीर प्रतीसाद अपेक्षीत)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>तुम्हाला का असं वाटतं की पिटीशन्स हा पर्याय नाही?<<
पिटिशन हि लाँग प्रोसेस आहे. इन्स्टेड, ट्विटर कुड बी मोर इंपॅक्टफुल. मी वर लिहिल्या प्रमाणे या परिस्थितीत वडिलांना घानावरुन आणणॅ, इज नॉट अ‍ॅन ऑप्शन. त्या मुलीला (आणि कुटुंबाला) सर्वार्थाने सपोर्ट देणे हि प्रमुख, तातडिची गरज आहे. आणि या बाबतीत लोकल प्रतिनिधीच आवश्यक ती मद्त देउ शकतील. इथले माबोवरचे मुंबईकरहि त्यांचे कॉटॅक्टस अ‍ॅक्टिवेट करु शकतील, मी सुद्धा तयार आहे गरज लागली तर...

साधना, स्वच्छतेचा फार आग्रह नाही पण बेसिक हायजिन मेंटेन करण्यासाठी रोज आम्ही केर काढतो आणि अल्टरनेट डे mopping.
मला सांधेदुखीचा त्रास आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या घरकामाचा जास्ती त्रास होतोय.
मंजूताई, जमल्यास जवळच्या दुकानातून mopy आणा त्यानी तुम्हाला फार त्रास होणार नाही.
वरच्या मुलीचं ऐकून फार वाईट वाटलं...

मला सांधेदुखीचा त्रास आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या घरकामाचा जास्ती त्रास होतोय.>>>

Ok. पण रोज पेनकिलर घेणे चांगले नाही.

पाफा, कांदिवली.

आदिश्री धन्यवाद☺️

सीमंतिनी, लग्न ही तशी नाजूक बाब असते, म्हणून कोणालाही जास्तीचे सल्ले द्यायला भीती वाटते.

त्यांचे त्यांना ठरवू दे, काहींना असते हौस नटायची मुरडायची लग्नात. सो त्याला सांगितले आहे की फक्त सांभाळून रहा अन शांत मनाने सर्व विचार करून निर्णय घे.

फक्त एकच प्रार्थना की बाकीच्यांना करोना झालाय म्हणून सोसायटीच्या लोकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले नसावे.>>>

कोरोनातून वाचलेल्यांची संख्या मृत्यू पावलेल्यांपेक्षा जास्त असूनही लोकांनी कोरोना म्हणजे मृत्यू असे ठरवून टाकल्यामुळे सध्या कोरोनाग्रस्तांच्या निरोगी कुटुंबियांना खूप त्रास होतोय असे वाचायला मिळते. बाजारात गर्दी करतील पण इथे कुटुंबातील दोन चार लोकांशी संबंध तोडतील अशी स्थिती आहे.

माझी वहिनी bmc मध्ये कामाला आहे. तिला जावेच लागतेय रोज. तसा तिच्या नावासकट आदेशच आहे, अजूनही खूप लोक कामावर जाताहेत. मूनसिपालिटी बंद राहून चालणार नाहीच हे माहीत आहे पण आपल्या माणसाची काळजी वाटतेच ना...

तुम्ही पिटीशन वाचली तर दिसेल की तिची बाबांच्या साइडची आज्जी आणि चुलत भाऊ तिच्याकडे आता आहेत.
Please read the petition if you can although it’s a long shot they must have thought about the fact that we don’t know what we don’t know. And thanks Raj and all for making it clear.

आदिश्री, बिग हग !
देवकी,रूचा, राजसी कौतुक वाचून छान वाटले.
सीमा, स्वाती२ सामान मिळाले वाचून बरं वाटलं. आम्ही दोघच असतो तर खूप साठवणूक नसते पण अजून पंधरा दिवस बाहेर पडलं नाही तर चालून जाणारे.
विकु, छान काम!
वेका, फारच वाईट वाटलं.... लवकर काहीतरी मार्ग सापडो.
रूचा, अग तो पाणी काढायचा दांडा असतो ना खाली रबराची शीट लागलेली तो मुद्दाम बाई आली नाहीतर पुसायला आणलाय. तो दुसरा असतो ना तो पुसायचा तो फार जड होतो. तशी तेवढी म्हातारी नाहीये हं Happy गुडघा नुकताच दुखायला लागलाय अन आॅपरेशन करायचच नाहीये म्हणूण काळजी घ्यायची.

व्हीबी, त्यांना काय सल्ला द्यायचा नाही ग! इथला रिकामटेकडेपणा इथेच सोडून द्यायचा. ते पण इथे धागाकर्त्याने रिकामटेकडेपणा अपेक्षित म्हणून लिहील.
वेका, घाना-कुटूंबिय सॅड स्टोरी. पण काही तरी मार्ग निघेल एवढाच आशावाद आहे माझ्याकडे....

इथे tv वर 08046110007 हा कोरोनाचा हेल्पलाईन नंबर सतत दाखवतात. तिथे बघा काही मदत मिळते आहे का. वडिलांना परत आणणे अशक्य आहे. बाकीची काही मदत हवी असेल तर इथे सांगा. काही सेवाभावी संस्थेचे लोक माहीत आहेत त्यांना कळवीन आणि मग हे hopefully काहीतरी मदतीचे जमवतील.
शिवाय वडील जरी परत आले तरी त्यांना क्वारंटाईन व्हावे लागेल 14 दिवस त्यामुळे मुलीला काहीच उपयोग होणार नाही. आणि तोवर तिची आई आणि भाऊ बरे होतील, घरी येतील. वडिलांना जर आता infection नसेल तर उगीच धोक्यात का घाला Sad

आमच्या गावातले लोकं घाबरून दीडशे किलोमीटर चालत मुंबईहुन गावाला येत आहेत. माझ्या मावशीची फॅमिली रात्री घटकोपरवरून चालत गावी यायला निघाले होते. वाशीपर्यंत आले आणि पोलिसांनी परत माघारी पाठवलं. जे पोलिसांची नजर चुकवण्यात यशस्वी ठरले ते तीन चार दिवस चालत घरी आले. मनस्थिती काय असेल चालत येताना त्याची कल्पना न केलेली बरी ___/\___

जे पोलिसांची नजर चुकवण्यात यशस्वी ठरले ते तीन चार दिवस चालत घरी आले. मनस्थिती काय असेल चालत येताना त्याची कल्पना न केलेली बरी>>>>

एवढा त्रास का काढला त्यांनी?? जिथे आहात तिथेच राहा ही गोष्ट का समजू शकली नाही?? जाताना वाटेत कुठे संक्रमित झाले असतील तर? गावच्या लोकांना ही भेट त्यांनी दिली तर?

आमचे गाव सील केलेय. आता कोणीही परवाना नसताना आत बाहेर करू शकत नाही.

@साधना, मला वाटतंय लोकं घाबरलेत. कोरोना झाला की आपले जगण्याचे चान्सेस कमी आहेत असं वाटतंय त्यांना. त्यामुळे ते मुंबईतून गावी यायला पाहत आहेत. आमच्या इथे पण काही गावं सील आहेत बाहेरून येणार्यांना आत घेत नाहीत.

सगळीच गावं आणि शहरं ऑफिशियली सील आहेत पण प्रत्येक वाटेसाठी १ चोरवाट सुद्धा असतेच. सध्या त्याचा गैरवापर केला जातोय ... इतकंच Sad

बोकलत सहमत..

पण मृत्यूला घाबरून पळताना वाटेत आपण त्याच्या गावातून तर फेरी मारत नाहीये ना हा विचार व्हावा.

एखाद्या ठिकाणी कोरोना पसरत असेल तर तिथून पळावे हा विचार येतोच प्रत्येकाला. कारण अशा ठिकाणी इन्फेक्त व्हायचे प्रमाण जास्त आहे... किती दिवस वाचणार... त्यामुळे आपल्या गावी जिथे कोरोना अजून पसरला नाहीय तिथे आपल्या घरच्यांजवळ जावे असे वाटणे स्वाभाविक आहे....

मात्र घरी गेल्यानंतर दोन आठवडे आयसोलेशन मध्ये राहणे जरुरी आहे...

लोक करोना ला घाबरून गावी पळत नाहित.मोठ्या शहरातला खर्च जेव्हा मोठ्या शहरातली कमाई चालू राहते तेव्हा भागतो.जेव्हा उत्पन्नाचे मार्गच बंद होतात, ऑफिशियल पेरोल किंवा लेबर लॉ लागू होत नाही, मदत कुठे आणि कशी मागावी इतकी साक्षरता नसते तेव्हा आपल्या गावी जाणं, खर्च कमी करून नवा मार्ग निघेपर्यंत उपजीविका करणं, किंवा अगदीच काही झालं नाही तर लहानपणी पासून असलेल्या ओळखीच्या जोरावर काही दिवस क्रेडिट मिळवणं इतका विचार असतो.
एरवी सुखासुखी 100-300 किलोमीटर डोक्यावर सामान आणि कडेवर पोर घेऊन लिमिटेड खाणं घेऊन चालत जायला कोणाला आवडेल?
मूळ प्रश्न यांचे एम्प्लॉयर्स हा आहे.आणि आता सरकार ने कायदा काढला आहे किमान उत्पन्न देण्याचा करोना मुळे काम न मिळालेल्या लोकांना.पण ऑन पेपर नसलेली रोजगारी, लोकांकडे कागदपत्रे नसणे यामुळे त्याने 100 टक्के प्रश्न सुटणार नाही.

आमच्या सारखे लोक पळून कुठे पळणार?

सुरुवातीला एक वॅळ दवाखाना बंद ठेवला होता परंतु संध्याकाळीच रक्तस्त्राव होत असलेली रुग्ण आली होती. तिचे डॉक्टर बांद्र्याला. तिथे टेस्ट ट्यूब बेबी(IVF) केलं होतं आणि दोन भ्रूण गर्भाशयात भरले होते. त्यातील एकाचा गर्भपात होत होता. त्यामुळे रक्तस्त्राव होत होता. सुदैवाने दुसरा गर्भ व्यवस्थित होता.
पोलीस इतर आरोग्य कर्मचारी डॉक्टर इ जातच आहेत. ते पाहून मला स्वतःला एक वेळ दवाखाना बंद ठेवल्याबद्दल लाज वाटली.

त्या दिवसापासून सकाळ संध्याकाळ ३ तास जातोच आहे
सकाळ संध्याकाळ दवाखान्यात जातो. तोंडाला मुखवटा लावून लावून कानाच्या मागे काचल्यासारखे होते आहे.
येणारा कोणता रुग्ण पॉझिटिव्ह असेल ते माहिती नाही. सारखा सारखा सॅनिटायझर वापरून हाताची त्वचा बुळबुळीत झाली आहे.

वडील ८४ वर्षाचे आहेत त्यांना हृदयरोग आणि फुफुसांचा रोग आहे. ७८ वर्षांची आई मागच्याच वर्षी कर्करोगातून उठली आहे तिला मधुमेह आणि रक्तदाब आहे. तिला रोज इन्स्युलिनचे इंजेक्शन द्यायला जावे लागते. ( ते दवाखान्याच्या वरच्याच मजल्यावर राहतात)

काळजी स्वतःची नाही. माझ्यामुळे त्यांना संसर्ग होऊ नये एवढीच इच्छा आहे.

बाकी ईश्वरेच्छा बलीयसी

खाजगी नोकरीत बऱ्याचदा एक एप्रिल हा ब्रेक असतो , मग लोक 2 एप्रिलला रुजू होतात

आता इथे 31 मार्च ते 14 एप्रिल मोठा गेप आहे, मग ह्यांच्या नोकर्या ब्रेक होतील का, मागचे इन्क्रीमेंट्स बुडणार का?

काही लोक स्वतःची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असतात पण त्याचा शो ऑफ करत नाहीत. BLACKCAT शो ऑफ न करता खाली मुंडी घालून काम करणाऱ्या तुमच्या सारख्या डॉक्टरांना सलाम.

आम्ही पण आमची ड्युटी पूर्ण वेळ करत आहे

होय

आपल्या सारख्या अनेक लोकांना सलाम

त्याकडे पाहूनच मी परत दवाखाना चालू केला आहे

अश्या काळात काम चालू ठेवणाऱ्या सर्व मेडिकल क्षेत्र वाल्याना सलाम.या काळात तुम्ही व तुमचे कुटुंबीय सर्व सुखरूप राहोत.

Pages