खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोयाबीन.. कधी खाल्ले नाही, पण ही भाजी मस्त मसालेदार दिसतीये..
आलू पालक पराठा idea ,आवडली.. नाहितर नुसते बटाटा पराठेच केले जातात.

bake it for 5 7 mins at 180℃ . >>> bake as in convection mode ? म्हणजे proper baking ना ? मायक्रोवेव नाहीना ?

ताजा घाणा:

बोकलत भाऊ,

लई भारी हायती तुमचे बटाटेवडे,
आम्ही बनलोय जळकुकडे,
बाहेर पडले की पोलीसांचे दंडे,
आहात तुम्ही मनकवडे,
ओला स्विगी बंद हाय, तेवढं भुतांकडून पाठवायचं जमवा ना गडे.

fried rice, नानकटाई सुंदरच. सोयाबीनची भाजी बघून करायची इच्छा झालीय. बटाटा आणि पालक मिक्स पराठा यम्मी दिसतोय. बटाटेवडे तोंपासु , बोकलत , हाकामारी बरोबर पाठवले तरी चालतील . पाफांचा ताजा घाणा लय भारी .

माझे फोटो अपलोड होत नाहीत Sad

म्हणजे proper baking ना ? ~~ हो. केक बेक करतो तस. फक्त वेळ कमी आहे. बिस्किटं थोडी फुगतात पण.
मायक्रोवेव नाहीना ~~ नाही.
मायक्रो असेल तर कन्व्हेक्शन मोड वापरावा लागेल.. पण मी ,OTG मधे केलय, so detail माहीत नाही त्या फंक्शन बद्दल. साॉरी.

TI नक्की करून बघा, वेळखाऊ नाही हे.

माझे फोटो अपलोड होत नाहीत Sad
नवीन Submitted by निल्सन on 31 March, 2020 - 09:08
>>>>>

या लॉकडाऊन काळात अशी वेळ शत्रूवरही येऊ नये...
माझेही होत नाहीयेत गेले काही दिवस Sad
खाण्यापूर्वी फोटो काढावा पण तो अपलोड करता येऊ नये.. खाण्याची ईच्छा वेगाने मरून जात आहे. मोठ्या कष्टाने गिळवत आहे

jasa bakicha cookies la karava lagto? ~~ नाही TI .
फक्त अतिशय घट्ट पाहिजे. (Tightly mix)

बेसन लाडू.. कसले गोड, सुरेख दिसत आहेत.

रच्याकने.. quarantine संपे पर्यंत सगळे कपडे बसणार नाहीत वाटतं.
मी आज पासून दीक्षित आहार योजना सुरु केलीये. दुपारी 12.30-1 ला आणि संध्याकाळी 8-9 दरम्यान जेवण.
दुपारी 4.30-5 वाजता green tea.
इथे पाहून पाहून एक एक पदार्थ करायची हुक्की येते. Food addictive.
आता हा धागा फक्त रविवारी. Proud

Thanks Piku..aaj kelya nahit ata thet weekend la ch!
Besan ladu mhanje agdi hapus level che bhari zalet!mastach!

Pages