खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

20200324_130413.jpg
आजचा मेन्यू सँडविच, पावभाजी मसाला पुलाव व सलाड...
हा धागा मस्त आहे.. सगळे मेनू यम्मी...
खाली कालचा मेन्यू पालक पुर्या आणि छोले20200323_131643.jpg

एक महत्वाची सुचना:

प्रथम गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा.

आपल्या मोबाईल/ संगणकांतील जुने खाद्यपदार्थांचे फोटो शोधून ठेवा अन इथे डकवा.

अजून २१ दिवस काढायचे आहेत. ....... Rofl

Todays special रबडी . पहिल्यांंदाच केली.
मी खात नाही. साबा आणि लेकाला आवडते.
हे dinner dessert . आता आमरस पूरी चोपून झालीयं.

IMG_20200325_134703_0.jpg

आंबे आले बाजारात?
या गडबडीत ही मिळाले तुम्हाला? अभिनंदन.

Rabdi yummy distie! Ambe milale? Congratulations! amhala kal ek litter dudh milala tich achievement wattie! Aaj amcha bet- Puran poli, katachi amti, Batatyachi bhaji, Kakdi koshimbir!

ओ नाही ओ नाही. Happy आंबे कसले. सध्या भाज्या मिळतात तेच खूप.
विकतचा आमरस. ग्राहक मधून डब्बे मागवून ठेवतो एक दोन.
वर्ष भरात वापरले जातात. हा गेल्या वर्षी मागवलेला.

हा गेल्या वर्षी मागवलेल>>>> कित्ती कित्ती गुणी आहात! आमरसाचा डबा असा कसा न फोडता राहू शकतो?ऐतेन.

सौं नी केलेली पुरण पोळी>>>> मस्त तलम आहे.

देवकी Happy .
ताज्या आंब्याला मागणी , रसाला उठाव नसतो.

२१ दिवसांसाठी लोकं घरी आहेत याचा बदला तुम्ही सगळेच असे भारी भारी पदार्थ टाकुन घेणार असाल तर...........तुमचा घोर निषेध Sad

@swasti, masta idea..mazya su bai ghari karun thevtat asa ras!
@pashupat- aprateem distayt pu.po! Saunna nakki sanga!
Shrikhanda hi yummy! Happy

Nivagrya
हे काय असते? तांदुळाचे असते का?

Pages