Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
Submitted by भरत. on 26 March
Submitted by भरत. on 26 March, 2020 - 07:01 >>> +१
As dormant carriers will
As dormant carriers will continue to roam around and again there will be surge in cases.
Submitted by रेवा२ on 26 March, 2020 - 09:15 >>
किती २१ दिवसांनी dormant carriers जागृत होतील का? या विषाणूचे परिणाम किती दिवसांत दिसतात?
Who चीफ चे आज काय म्हणणे आहे
Who चीफ चे आज काय म्हणणे आहे हे कोणी सांगेल का?
What WHO is saying ' do more test' . After looking at numbers I don't think we have done enough . That's going to be dangerous ,once we lift the ban. As dormant carriers will continue to roam around and again there will be surge in cases.>>>>
बरोबर. फक्त भारतात टेस्ट करण्यासाठीचे इन्फ्रास्ट्रुक्टर आहे का हा विचारही करायला हवा. 135करोड मधल्या 0.1 टक्के लोकांचे टेस्टिंग करायचे म्हटले तर तेही शक्य नाही. म्हणून तर सरकारने सरसकट सगळ्यांना घरी बसायचा आदेश दिलाय. आता भारताने ही सोय आधीच का केली नाही म्हणत टीकेची झोड उठवता येईल.
आणि हा आदेश धुडकावून बाहेर फिरणाऱ्या लोकांची संख्या पाहता 21 दिवसानंतर अजून 21 दिवस गळ्यात पडायची शक्यता फार मोठी आहे. यामुळे इकॉनॉमि खड्ड्यात जाणार यात वाद नाहीच. पण रस्त्यावर प्रेते बघायची की इकॉनॉमि रस्त्यावर बघायची यात सरकारने दुसरा पर्याय निवडलेला आहे. पहिला पर्याय निवडला असता तरिही तितकीच टीका झाली असती.
ज्यांची हातावर पोटे आहेत त्यांना आधार कार्ड व्हलीडेशन शिवायच, केवळ वोटर कार्ड दाखवून जास्तीचे धान्य मिळेल असे रेडिओवर ऐकले. वेगवेगळ्या राज्यांनी लोकांना पैसे/धान्य वगैरे द्यायची सोय केली आहे असे बातम्यात येते आहे.
पाकिस्तान सरकारची इकॉनॉमि आधीच खड्ड्यात गेलीय. तिथल्या सरकारने लोकांना जितके दिवस जगायला मिळते तितके मिळुदे म्हणत देश बंद करायचे नाकारले. हा निर्णय घेणे किती कठीण गेले असणार त्या सरकारला ह्याची कल्पना इम्रान खानचे भाषण बघताना येते.
पाकिस्तान सरकारची इकॉनॉमि
पाकिस्तान सरकारची इकॉनॉमि आधीच खड्ड्यात गेलीय. तिथल्या सरकारने लोकांना जितके दिवस जगायला मिळते तितके मिळुदे म्हणत देश बंद करायचे नाकारले. हा निर्णय घेणे किती कठीण गेले असणार त्या सरकारला ह्याची कल्पना इम्रान खानचे भाषण बघताना येते.
नवीन Submitted by साधना on 26 March, 2020 - 11:32
>>>
पाकिस्तान चीन चा व्यापारी मित्र. आंतरराष्ट्रीय दबावाखाली काही काळ मैत्रीत दुरावा आला होता.
आता या परिस्थितीत काय घडत असेल / काय घडले असेल हे काही काळाने कळेलच.
भरत यांना माझाही +७८६
भरत यांना माझाही +७८६
पॅनिक सिच्युएशन टाळता आली असती. भाषणात जीवनावश्यक बाबींचे काय हा मुद्दा लॉकडाऊन घोषणेसोबतच हवा होता.
मोदींचे भाषण संपताच माझ्या वडिलांचा मला मुंबईहून फोन आला. म्हणाले २१ दिवस लॉकडाऊन आहे. सगळे सामान भरून घ्या. पळ आताच. सगळे पळताहेत.
मीच त्यांना मग शांतपणे म्हणालो की लोकांना पळू दे पण प्लीज तुम्ही त्या "गर्दीत" नका पळू. अन्यथा लॉकडाऊन सुरु व्हायच्या आधीच करोना व्हाईरस घेऊन घरी याल. आतापुरते सामान असेल गाठीशी तर सावकाश दोन दिवसाने जा. जे खरेच जीवनावश्यक आहे ते नक्की मिळेल.
मी स्वत:ही अजून त्या भाषणानंतर कुठे बाहेर पडलो नाही. कारण गर्दी टाळायची होती. आज वा उद्या बाजारहाटीला जाईन. हे दोन दिवस शांतपणे जे आठवेल तसे एकेक लिस्ट बनवत आहे.
उदाहरणार्थ काल रात्री लाईट गेली. ईथे हे फारसे होत नाही. पण येत्या २१ दिवसांत वारंवार घडू शकेलही अशी शक्यता लक्षात घेऊन मेणबत्या लिस्टीत जोडल्या. मिळाल्या तर घेईन.
चीन मधल्या वू हान मध्ये
चीन मधल्या वू हान मध्ये कोरोनाचा एकही रुग्ण उरला नसून तो प्रांत स्वच्छ झाला आहे अश्या बातम्या अनेक दिवस येत होत्या. काल की परवा वू हान मध्ये सतत दोन दिवस एक एक लागण आढळली आहे असे वाचले.
तसेही कोरोनाची सध्याची लाट ओसरल्यासारखे वाटले तरी सहा सात महिन्यांनी दुसरी मोठी लाट उद्भवू शकते असेही वाचले होते. खरे का? इम्यूनिटी दोन तीन महिनेच टिकते म्हणे. हेही खरे का?
आपल्या देशाच्या लोकसंख्येचा
आपल्या देशाच्या लोकसंख्येचा विचार केल्यास इतक्या लोकांच्या चाचण्या करणे किंवा त्यांच्यावर उपचार करणे अशक्य आहे. अमेरिकेलाही शक्य नाही, त्यामुळे आपल्या सरकारला त्यासाठी कोणीही नावं ठेवणार नाही. फक्त आपल्या सरकारला ह्या रोगांचे गांभीर्य उशिरा कळाले ह्याबद्दल सरकारलाच जबाबदार ठरवले जाणार.
जागतिक आरोग्य संघटना सांगते
जागतिक आरोग्य संघटना सांगते आहे कि चाचण्या करा चाचण्या करा चाचण्या करा.
एका चाचणीची किंमत रुपये ४ हजार ५०० आहे.
Coronavirus test should not cost more than Rs 4,500: Government to private labs
अगदी सरकारी रुग्णालयात केली आणि खर्च ३००० रुपये धरला तरी केवळ १ टक्का लोकसंख्येची( १ कोटी ३० लाख) एकदा चाचणी करण्यासाठी ४ हजार कोटी रुपये खर्च येईल. मग तीच चाचणी दर आठवड्याला करा.
नेगेटिव्ह असलेल्या माणसाची पॉझिटीव्ह येणार का हे पाहण्यासाठी आणि पॉसिटीव्ह असल्याची नेगेटिव्ह होईपर्यंत.
या महाशयांना उंटावरून शेळ्या हाकायला काय होतंय?
नुसत्या चाचण्यांसाठी १०-१२ हजार कोटी रुपये खर्च करणे भारताला परवडेल का?
बाकी लोकशाही मध्ये सरकारवर टीका करण्याचा हक्क लोकांना आहेच.
पण प्रत्यक्ष तेथे काम केलेल्या माणसाला स्थिती काय आहे हे समजून येते.
बाकी चालू द्या.
एकदा कोरोनो होऊन गेला (सौम्य
एकदा कोरोनो होऊन गेला (सौम्य /तिव्र) व त्यातून बरं झालेल्या व्यक्तीला परत कोरोनाची लागण होऊ शकते का ?
बहुसंख्य विषाणूमुळे होणाऱ्या आजारात आपल्या शरीरात प्रतिपिंडे(antibodies) तयार होतात आणि या प्रतिपिंडाची आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशींमध्ये त्याची स्मरणशक्ती राहते.
यामुळे दुसऱ्यांदा परत याच विषाणूंचा प्रादुर्भाव झाला तर याच पांढऱ्या पेशी परत ती प्रतिपिंडे वेगाने तयार करतात आणि त्या विषाणूंचा होणारा प्रादुर्भाव रोखतात. यामुळेच आपल्याला गोवर कांजिण्या सारखे आजार परत होत नाहीत.
एच आय व्ही सारख्या आजारात हि प्रतिपिंडे तयार करणाऱ्या पेशींवरच विषाणू हल्ला करतात त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती लुळी पडते. अशीच स्थिती केमोथेरपी मध्ये होत असल्याने रुग्णाची प्रतीकारशक्ती खच्ची होते.
सध्याच्या या विषाणू बद्दल तो नवीन असल्याने आपल्याला पूर्ण माहिती नाही परंतु बाकी करोना गटाच्या विषाणूंमध्ये हा आजार परत होत नाही त्यामुळे या विषाणूत एकदा झाला तर पुन्हा होणार नाही असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.
कांही शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की जे रोगी या आजारातून बरे झाले आहेत त्यांना परत होण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांना बैद्यकीय चमू मध्ये सामील करून घ्यावे.परंतु यात सर्व तज्ज्ञांत एकवाक्यता नाही आणि बरेच तज्ज्ञ असा धोका स्वीकारण्यास तयार नाहीत. .
सध्या तरी या रोगावर नक्की असे औषध नाही आणि 95 टक्के लोक स्वतःहूनच बरे होतात. उरलेले 5 % याना काही गुंतागुंती होतात म्हणजे न्यूमोनिया किंवा श्वास घ्यायला त्रास किंवा हृदयाचे काम अनियमित होणे.
हे बहुधा अशा लोकांना होते ज्यांचे वय 70 पेक्षा जास्त आहे मधुमेह रक्तदाब किंवा हृदय विकार असे आजार आहेत किंवा सिगरेट पिणारे आहेत.
अशा लोकांना कृत्रिम श्वासोच्छवासाची गरज पडू शकते.
जर भारतभरात 60 कोटी लोकांना या गुंतागुंती एकत्र झाल्या तर आपल्याकडे 3 कोटी लोकांना एकत्र कृत्रिम श्वासोच्छवास देणें शक्य होणार नाही आणि यातील अगदी 30-33 टक्के लोक बाहेर आले नाहीत तरी आपल्याकडे 1 कोटी लोकांचा मृत्यू होईल.
याच ऐवजी आपण या आजाराचा वेगाने होणारा प्रसार थांबवला तर एप्रिल मे मधील गरमी मुळे हा आजार बराच कमी होईल असा तज्ञांचा अंदाज आहे.
हा विषाणू वातावरणातून पूर्ण नाहीसा होणार नाही म्हणजे हा आजार उरलेल्या लोकांना पुढच्या काही महिन्यात किंवा वर्षात होईलच.
पण तेंव्हा त्यांना गुंतागुंत झालीच तर कृत्रिम श्वासोच्छवास देणें शक्य होईल आणि त्यातील बऱ्याच माणसांना वाचवणे शक्य होईल.
किंवा तोपर्यंत प्रभावी लस निर्माण करता आली तर अशा जास्त धोका असलेल्या /वृद्ध रुग्णांना लसीकरणाने या रोगापासून वाचवता येऊ शकेल.
आपल्याला शिक्षणासाठी दिलेले कर्ज किंवा उद्योगांना दिलेले कर्ज कसे काही वर्षे नंतर फेडण्यास कालावधी (MORATORIUM) दिला जातो तसाच अधिक कालावधी मिळवणे हा सामाजिक विलगीकरणाचा हेतू आहे लक्षात घ्या .
नवीन Submitted by सुबोध खरे
नवीन Submitted by सुबोध खरे on 26 March, 2020 - 12:25
>>>
छान माहिती.
२१ दिवसानंतर काय हा प्रश्न छळतच आहे.
हा काळ वाढवावा लागेल का? वाढवतील का? किंवा काही दिवस शिथिल करून अंदाज घेऊन पुन्हा लादावा लागेल का?
२१ दिवसात HYDROXYCHLOROQUINE
२१ दिवसात HYDROXYCHLOROQUINE आणि AZITHROMYCIN ने रुग्ण बरे होतात का ते समजून येईल.
विषाणूंची लस कोणत्या स्थितीत आहे ते समजेल. इतर कोणती औषधे गंभीर रुग्णांना लागू पडतात ते लक्षात येईल.
किती लोक बरे झाले आणि ते कसे बरे झाले? किती लोक मृत्यूमुखी पडले आणि ते का पडले आणि त्यांना वाचवता कसे येईल हि माहिती उपलब्ध होईल.
लक्षात ठेवा बहुसंख्य रुग्ण COVID -१९ ने मरत नाहीत तर त्यातून होणाऱ्या गुंतागुंतीमुळे ते होते.
गरोदर बायकांना किंवा ९ वर्षाखालील बालकांना हा रोग एवढा गंभीर होत नाही. याचे कारण त्यांचे शरीर या रोगाविरुद्ध अतिशय जास्त (IMMUNOLOGICAL STORM)अशी प्रतिक्रिया देत नाही. हि अतिशयोक्त प्रतिक्रिया( IMMUNOLOGICAL STORM) कसे कमी करता येईल याचे संशोधन चालू आहे.
प्राथमिक चाचण्यांत HYDROXYCHLOROQUINE आणि AZITHROMYCIN हि औषधे हि अतिशयोक्त प्रतिक्रिया कमी करतात असे आढळले आहे.
एक कल्पनाविलास -- समजा औषध क्ष हे हि प्रतिक्रिया कमी करते किंवा थेट विषाणूंचे पुनरुत्पादन कमी करते असे आढळले तर आपण बंदी उठवू शकतो. ज्यांचा आजार किरकोळ आहे ते रुग्ण त्यातून फारसे काही न करता बरे होतील
पण ज्या रुग्णांचा आजार वाढत चालला आहे त्यांना अशी औषधे चालू करून त्यांचा जीव वाचवू शकतो.
भरत, मुद्दा पटला. मोदींनी
भरत, मुद्दा पटला. मोदींनी जीवनावश्यक सेवा आणि वस्तूंचा पुरवठा चालू राहील. कोणीही पॅनिक शॉपिंग करायला बाहेर पडू नये असे स्पष्ट सांगायला हवे होते. मात्र त्याचवेळी तसे सांगितले असते तर जनतेने गर्दी केली नसती हे मला खात्रीशीरपणे सांगता येत नाही. मोदींनी सांगितलेले सर्व जनता ऐकते हा भ्रम आहे. त्यांनी तीन तास दिले तर इतकी गर्दी झाली. अख्ख्या दिवस दिला असता तर दिवसभर लोकांनी गर्दी करून घालवला असता याची मला खात्री आहे.
असो, आता मागे जाऊन काहीच बदलणे शक्य नाही. निदान पुढील काळात तरी अधिकाधिक जागरूकता निर्माण झाली तरी पुष्कळ आहे. The current situation has no solution. We have to make the best possible trade offs at all levels. जान बची लाखों पाये.
नेगेटिव्ह असलेल्या माणसाची
नेगेटिव्ह असलेल्या माणसाची पॉझिटीव्ह येणार का हे पाहण्यासाठी आणि पॉसिटीव्ह असल्याची नेगेटिव्ह होईपर्यंत.>>>
आज वाकोला भागातील एका रुग्णाबद्दल वाचले. तो दुबई की कुठून परतला. त्याच्या पहिल्या 2 टेस्टस निगेटिव्ह आल्या, नंतरची पॉझिटिव्ह. म्हणजे जिथे होणारच अशी आशंका आहे तिथे जास्त वेळा टेस्ट करताहेत. पण जिथे अशी शंका नाही तिथे किती वेळा टेस्ट करणार?? यासाठी किती इन्फ्रास्ट्रक्चर हवे..
बातमी यासाठी आली की तो पोसिटीव्ह झाला हे कळताच झोपदपट्टीत त्याच्या कुटुंबावर बहिष्कार घालण्यात आला.
डॉ. खरे, एक विनंती आहे -
डॉ. खरे, एक विनंती आहे - तुमच्या सर्व पोस्ट्स मधे sources च्या लिंक्स आणि डिस्क्लेमर देता येईल का? या रोगावरचे सर्व उपचार अजून संशोधनाच्या टप्प्यात असल्याने माहिती लिहीताना अतिशय काळजीपूर्वक लिहिणे आवश्यक आहे. शिवाय माबोच्या नियमानुसार चार तासांनंतर तुम्हाला स्वतःला देखिल ही माहिती अद्ययावत करता येणार नाही. तेव्हा लिंक आणि डिस्क्लेमर देणे श्रेयस्कर ठरेल.
इकाॅनाॅमीवर परिणाम लाॅकडाऊन
इकाॅनाॅमीवर लाॅकडाऊन केल तरीही त्यामुळे परिणाम होणार आहे..
नाही केलं तरी रोगप्रसारामुळे होणारच आहे..
पण आपलं बरंचसं कुशल, अकुशल मनुष्यबळ, Administrative आणि Management Force बळी पडल्यावर म्हणा किंवा आजारपणामुळे काही कालावधीकरता काम करण्यास लायक न राहिल्यामुळे जी हानी होईल..
शिवाय सर्वत्र जी Shock बसल्याची मनस्थिती किंवा दुःखद मनस्थिती असेल त्यामुळे इकाॅनाॅमी जागेवर यायला जास्त वेळ लागेल..
त्यामुळे सर्व प्रकारचं मनुष्यबळ आणि मुख्यतः सकारात्मक मनस्थिती शाबूत रहावी यासाठी हा लाॅकडाऊन गरजेचा आहे..
या कालावधीत गेल्या काही वर्षात आपल्या आयुष्याला जो प्रचंड वेग आलेला होता/आहे त्याबाबत विचार करणं, सिंहावलोकन करणं....
आपल्या जुन्या कला जोपासणं, एखादी घरच्या घरी करू शकणारी नवीन गोष्ट शिकायचा/करायचा प्रयत्न करणं यामुळे खूप चांगली उर्जा मिळू शकेल..
WFH करणाऱ्यांना मात्र हे प्रकार जमणं वेळेअभावी कठीण जाईल..
२१ दिवसांनंतर ही समस्या
२१ दिवसांनंतर ही समस्या पूर्णपणे संपेल असं नाही. पण आताच्या केसेस मध्ये जरूर घट होईल. शिवाय लॉक डाऊन काय असते हे लोकांनी अनुभवल्या मुळे लोक जबाबदारीने वागतील...
WFH करणाऱ्यांना मात्र हे
WFH करणाऱ्यांना मात्र हे प्रकार जमणं वेळेअभावी कठीण जाईल..
>>
सध्या खूप अस्थिर झालेय सगळे. आमच्यावर कामाचे डोंगर कोसळलेत पण ते पुढच्या आठवड्यापर्यंत कमी होणार कारण नवा बिझिनेस सुरू होणार नाही किंवा gst स्पेसिफिक बदल जसे इ इनवोईस व टीसीएस ऑन कस्टमर पुढे ढकलले आहेत. त्यामुळे कामाचा प्रेशर कमी होणार.
पण ह्या अस्थिरतेमध्ये पुढे काय हा प्रश्न आहेच.
<<<सध्या तरी या रोगावर नक्की
<<<सध्या तरी या रोगावर नक्की असे औषध नाही आणि 95 टक्के लोक स्वतःहूनच बरे होतात. उरलेले 5 % याना काही गुंतागुंती होतात म्हणजे न्यूमोनिया किंवा श्वास घ्यायला त्रास किंवा हृदयाचे काम अनियमित होणे.>>> डॉ खरे, हे नक्की खरे का? आपल्या कडे असे बरेच महाभाग आहेत ज्यांना हे खरे वाटले अन त्यांनी होऊ आपोआप बरे म्हणून दुर्लक्ष केले तर? तर तो फक्त त्यांच्या जीवाशी नाही तर त्यांच्या घरचे लोक, लहान मुले, ज्ये ना अन इतर जे संपर्कात येतील त्यांच्याही जिवाशी खेळ होईल.
म्हणून प्लिज असे काही लिहिण्या अगोदर योग्य त्या लिंक द्या अन खात्री असेल की त्यातले सगळे खरे आहे तरच द्या.
म्हणून प्लिज असे काही
म्हणून प्लिज असे काही लिहिण्या अगोदर योग्य त्या लिंक द्या अन खात्री असेल की त्यातले सगळे खरे आहे तरच द्या.>>>
सहमत. मी व्हात्साप वरचे काही वाचत नाही. पण मेन स्ट्रीम मीडियात भारतीय उन्हाळ्याचा काहीही परिणाम होणार नाही असे वाचलंय. विषाणू किती म्युटेट झालाय हेही सांगता येणार नाही असे वाचलंय. सगळ्याचा एकत्रित विचार केला की खूप भीती वाटते.
अमुक तमुक बाधित हे स्टॅटिस्टिकस वाचायला काहीही वाटत नाही पण उद्या आपल्या ओळखीचे/प्रियजन त्या स्टॅटिस्टिकस मध्ये आले तर काय ही भीती थरकाप उडवणारी आहे. असले विचार डोक्यात येऊ न देणे हाच उपाय आहे.
https://www.ncbi.nlm.nih.gov
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7068984/
http://weekly.chinacdc.cn/en/article/id/e53946e2-c6c4-41e9-9a9b-fea8db1a...
https://weather.com/en-IN/india/science/news/2020-03-04-weather-the-real...
Virus gets deactivated at 35 degrees.
https://www.fwdeveryone.com/t/puzmZFQGRTiiquwLa6tT-g/conference-call-cor
.
https://www.google.com/imgres?imgurl=https://www.ft.com/__origami/servic...
खात्री असेल की त्यातले सगळे
खात्री असेल की त्यातले सगळे खरे आहे तरच द्या.
ठीक आहे लिहिणंच बंद करतो.
कारण जसे जसे संशोधन होत आहे तसे तसे जुन्या गोष्टी चूक असल्याचे पण आढळते आहे. उदा जागतिक आरोग्य संघटनेने अगोदर सांगितले होते की विमान सेवा बंद करायची आवश्यकता नाही नंतर ही सेवा बंद करा सांगितले.
अगोदर सांगितले की हवेतुन संसर्ग होणार नाही तेंव्हा सर्वांनी मुखवटा वापरायची गरज नाही.
आता म्हणत आहेत की हवेतून संसर्ग होतो आहे.
कुणाची खात्री द्यायची
असो
{{{ खात्री असेल की त्यातले
{{{ खात्री असेल की त्यातले सगळे खरे आहे तरच द्या. }}}
हाच निकष लावायचा झाला तर नॉन फिक्षन कॅटेगरीत फक्त वर्ड डिक्षनरी आणि टेलिफोन डिरेक्टरीच छापता येतील. १०० टक्के छातीठोक अंतिम सत्य तर ब्रह्मदेवाच्या बापालाही सांगता येणार नाही.
खात्री असेल की त्यातले सगळे
खात्री असेल की त्यातले सगळे खरे आहे तरच द्या.
ठीक आहे लिहिणंच बंद करतो.
>>>>
प्लीज देत राहा माहीती तुम्ही. जे ते आपल्या जबाबदारीवर वाचतील खरे खोटे करतील
आता म्हणत आहेत की हवेतून
आता म्हणत आहेत की हवेतून संसर्ग होतो आहे>>>
अजून माहिती द्याल का??
हवेतून म्हणजे बाधित व्यक्ती शिंकल्यावर त्यातून समोरच्यावर जे उडेल तितकाच हवेतून संसर्ग की असे उडालेले विषाणू हवेत दीर्घकाळ धुळीसारखे तरंगत राहू शकतील??
ठीक आहे लिहिणंच बंद करतो. >>
ठीक आहे लिहिणंच बंद करतो. >> that is a good strategy. The other strategy is to give legitimate references (and no, financial times is not considered a legit source for scientific research) and put in a good disclaimer (I have already suggested it to you).
Fools rush in where angels fear to tread.
Jidnyasa plus one. There is
Jidnyasa plus one. There is already information overload. All updates of this evolving situation are readily available.
ज्याचे करावं भलं.. सुबोध सर
ज्याचे करावं भलं.. सुबोध सर माबोकर दोन तोंडानं बोलतात बरं. तुम्ही लोकांना शहाणं करायला जाल तर लोक तुम्हाला वेडं करतील. कसलीही माहिती द्यायची आवश्यकता नाही. सगळ्यांना टिव्ही, व्हाटसाप, गुगलबाबा माहिती पुरवित आहे. वरुन कृतज्ञता हा प्रकार माहित नाही इकडे काही लोकांना.
त्यांनीच गुग्गळून गुटी दिले
त्यांनीच गुग्गळून गुटी दिले पाहिजे असं काही नाही, आम्हालाही गुग्गळता येते.
खरेंना "गूगल भूषण" पुरस्कार
खरेंना "गूगल भूषण" पुरस्कार देण्यात यावा.
दिलिप जोशी म्हणजे जेठालाल काय
दिलिप जोशी म्हणजे जेठालाल काय?
Pages