संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

राजमान्य राजश्री लोकांना धीर देण्याऐवजी आपलीच पुंगी वाजवत आहेत. संघ द्वेष भाजपद्वेष इथे आणण्याचे कारण काय?
Some people are just happy to be part of problem and not part of solution.

रिपोर्ट दिला आहे, तुमच्या डॉक्टरशी बोला" हे उत्तर द्यायचे तुमचे काम आहे.
हे आपल्याला कुणी सांगितले? कोणत्या पुस्तकात लिहिलेले आहे.
उगाच आपलेच खरे म्हणण्यासाठी?
मी काय करावे हे सांगण्याचा तुम्हाला बिलकुल अधिकार नाही.

असो ही चर्चा मला या धाग्यावर करायची नाही.

परंतु बेफाट आणि अधिकार नसताना वक्तव्ये केलीत तर ती सहन केली जाणार नाहीत.

कर्करोग आहे हे रुग्णाला हळुवारपणे समजून सांगतो.
तुमचे डॉक्टर सांगतील म्हणून शेपूट घालत नाही
<<
भाऊ ती शेपूट घालणे आपले काम नव्हे, हेच तर सांगतो आहे मी कपाळ बडवून मघाचपासून. मिपाच्या भाषेत, चड्डीत र्‍हा की भौ.

तुमचं नशीबच फुटकं म्हणून तुम्हाला असे रेडिओलॉजिस्ट मिळतात
Anyway you seem to be just part of problem.

Try to be part of solution.
सर्जन असून अणुबॉम्बच्या नुसत्या धमकीला घाबरला?MAD
जाणून घ्या

च्यामारी, हे सगळे आरारा फिरारा एव्हढे दिवस कुठल्या बिळात लपले होते काय माहित!
आज अचानक सगळेच मोदी द्वेष्टे जागे झालेले दिसतात...

तुम्हाला आधीच लॉक डाऊन हवा होत तर तेव्हाच कोरसमध्ये बोंब मारायची..तेव्हा एकटा रावल्या काहीतरी हवेत बोंबलत राहिला आणि बाकीचे सगळे काँग्रेसी चुपचाप बसले (कदाचित मप्र सरकार गेल्याच्या दुःखात असावेत). भलेही तो फक्त काहीतरी बोलायचं म्हणून बोलला असेल, पण आता एव्हढ्या उशिरा त्याची थुंकी पढतमूर्ख (त्यातले एक महाशय डॉकटर असून दुसर्यांना पढतमूर्ख वगैरे म्हणतात ) झेलायला लागलेत हे पाहून काँग्रेसिंची कीव येतेय. लवकर बरे व्हा एवढंच म्हणेन.

सरकार मोदींचं आहे नी लोकांनी निवडून दिलेले आहे. काम करू द्या की राव गुमान त्यांना...आणखी 21 दिवसांनी काही फरक पडला तर मात्र स्तुती करायला हात आखडता घेऊ नका..

बऱ्याच रुग्ण लोकांना श्री मोदी ना एवढं श्रेय मिळतंय म्हणून पोटदुखी होते आहे.त्यामुळे हे असं होतंय.

आरारा हे डोक्यावर पडले आहेत हे वाचलं होतं एका धाग्यात, विश्र्वास ठेवला नव्हता पण आज हे खरं आहे असे वाटते.

शिखण्डी सारखे लपून ?

शिखण्डी पुढेच होता, अर्जुन त्याच्या मागे लपला होता

रस्त्यात प्रेते बघायची वेळ कोणावरच येऊ नये म्हणून
आज भारतात पूर्ण देशात कर्फ्यु असताना, कारखाने बंद असताना सरकारला काय करता येईल हे वरचे कोणी सांगेल का??

वर डॉक्टर असलेल्या लोकांनी एकमेकांचा पाणउतारा करणारे प्रतिसाद देऊन स्वतःला आत्मिक समाधान मिळवले… पण त्यापासून मायबोलीला काय फायदा झाला?? बाकीच्या वाचकांना त्यातल्या प्रत्येकाची राजकीय विचारसरणी माहीत आहेच. त्यात नवे काहीच नाही.

या विचारसरणीला बाजूला ठेऊन आज लोकांनी काय करावे हे कोणी सांगेल का? जर त्याचे उत्तर -'आपापल्या घरात गप्प बसावे' हेच असेल तर इथे मायबोलीवर धुळवड खेळून काय मिळणार आहे?? जुने स्कोअर सेटल करणे इतकेच? ह्या स्कोअर सेटलींगच्या बाहेरही बरेच काही असू शकेल. जग एका भयाण महामारीच्या गर्तेत भोवंडत असताना आपण हे स्कोअर सेटलींग बाजूला ठेऊन दुसरे काही चांगले केले, ज्यामुळे फक्त आपणच नाही तर बाकीचेही काही क्षण आनंदी घालवतील, तर खूप काही नुकसान होणार आहे का???

असो. सगळेच सुज्ञ आहेत, त्यांना विवेकही सुचावा ही विनंती.

सुनिधी, तुमच्यामुळे इथे पुन्हा लिहायला लागतंय - समजावं म्हणून स्टेप बाय स्टेप लिहितोय.

१. तुम्ही आधीच सामान स्टॉक , रादर होर्ड करून ठेवण्याचं समर्थन करताय ? यामुळेच देशात टंचाई / टंचाई सदृश स्थिती निर्माण होते. पॅनिक निर्माण होते. न्युझीलंडच्या पंतप्रधानांच्या भाषणातलं एक वाक्य तुमच्यासाठी लिहितोय. तुम्हाला कळेल अशी आशा आहे.
there will be enough for everyone if we shop normally.
२. मुद्दा लॉकडाउनमुळे गैरसोय होण्याचा नाहीए. ते सगळेच लोक समजून घेतात. त्याबद्दल कोणीही तक्रार करत नाहीए. पॅनिक आणि गोंधळ होऊ न देण्याचा आहे. (हे जिज्ञासा यांच्यासाठी)
३. महाराष्ट्रात सोमवारी सकाळपासूनच लॉकडाउन सुरू झाला होता. त्याची घोषणा करताना उद्धव ठाकरेंनी सगळ्या जीवनावश्यक वस्तू आणि सेवा चालू राहणार आहेत. त्या मिळवायला तुम्ही बाहेर पडू शकता. बाहेर पडताना काय काळजी घ्यायची , काय नियम आहेत हे सांगितलं होतं. त्यामुळे अनावश्यक पॅनिक निर्माण झाली नाही.
४. तेच मोदीं चे भाषण संपताच दुकानांवर झुंबड उडाली. का? मोदींनी सांगितलं, आज मध्यरात्रीपासून २१ दिवस घराबाहेर पाऊ ल टाकायचं नाही. लक्ष्मणरेषेचे उदाहरण दिले.
५. ही झुंबड उडाल्याने काय झाले? तुलनेने सुरळीत चालू असलेली व्यवस्था कोलमडली. पण त्याहूनही महत्त्वाचे - ज्या उद्देशांसाठी हा लॉकडाउन घोषित केला - लोकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये पडलेच तर एकमेकांपासून अंतर राखावे ज्यायोगे रोगाच्या प्रसाराला आळा घालता येईल त्या उद्धेशांवर बोळा फिरला. त्या दोन तीन तासांतल्या गर्दीत रोगाचा प्रसार किती आणि कसा झाला असेल याची कल्पना तुम्हांला करता येते का?
६. तुम्हाला तटस्थपणे विचार करता येत असेल तर एकदा नरेंद्र मोदी, जेसिंडा अर्डेर्न आणि उद्धव ठाकरे यांची लॉकडाउनची घोषणा करणारी भाषणं पहा.
देशाच्या पंतप्रधानाकडून जबाबदार विधानं करण्याची किमान अपेक्षा बाळगणे हा अपराध आहे का? जगभरातले (सुज्ञ ) नेते पॅनिक होऊ नका, असे सांगत असताना पॅनिक निर्माण करणार्‍याला काय म्हणावं?

भरत, तुमचे विचार फारच उत्तम आहेत. तुम्ही पंतप्रधान होण्याचं जमवाच नक्की म्हणजे देश एका समर्थ नेतृत्वाच्या हाती गेल्यामुळे आम्ही निश्चिंत राहू.

उत्तम. ही सवय पंतप्रधान झाल्यावर खूप उपयोगी पडेल कारण काहीही निर्णय घेतला तरी तुम्हाला दोषच दिला जाईल. लगे रहो. Happy

पुन्हा लोल. माझा वरचा प्रतिसाद व्यवस्थित मुद्देसूद आहे. त्यात कसलीही पर्सनल कमेंट नाही, हे समजण्यासाठी तुम्हांला शुभेच्छा.
बाय.

भरत
काय आश्चर्य आज कसे काय उपस्थित झाले.
NRC विरोधक दंगल माजवत होते तेव्हा कुठे गायब झाले होते

डोभाल यांच्या सारखे सल्लागार की जे आपात्कालीन रोगराई, पूर यावर सल्ला देतील असे पद निर्माण करुन माननीय भरत यांची तिकडे आमरण नेमणूक करावी. पंप्रनी भाषण कसं, किती वाजता करावं इथपासून पर्त्येक राज्यानं कसं नियोजन करावे हे सल्ला देण्याचे काम भरत या मनुष्यावर सोपवावे. संधी मिळाली तर अडगळीत पडलेला हा मनुष्य मोठं देशहीत साधणार ह्यात मुळीच शंका नाही. शूबेच्चा.

भरत +१

ना ही बीघडलं सल्ला देणं कामच आहे. सुरु ठेवा. जोधा, प्रिन्सेस यांची काळजी घ्या. इंद्रियांची काळजी घ्या. करोना धर्म जात पहात नाही. पुस्तकात उपाय आहे का?

अग्गो बै

परसु , अरे क़ाय हे , इन्द्रिय बदलले ?

धर्म, इंद्रीयं देवानं दिली असतात. आपण बदलून नरकात पडतो. माझा संबंध जोडून काय मिळतं झम्पू भावजी?

कुरानात साथी च्या रोगा बद्दल छापले आहे , इकडचे इकडे थांबा, तिकडचे तिकडेच

म्हणून विमानबन्दी , प्रवासबन्दी , क्वार्ण्टाइन वगैरे करा,

images.jpeg

गृह मंत्री चाणक्यजीनी कुराण फारच मनावर घेतले आहे , तिकडे होते तर तिकडेच कुठेतरी गेलेत , समोर येत नाहीत,

भरत +१

What WHO is saying ' do more test' . After looking at numbers I don't think we have done enough . That's going to be dangerous ,once we lift the ban. As dormant carriers will continue to roam around and again there will be surge in cases.

WHO चा चीफ 3 फेब्रुवारीला म्हणत होता की ट्रॅव्हल बंद करण्याची काहीच गरज नाही.

GENEVA (Reuters) - World Health Organization chief Tedros Adhanom Ghebreyesus said on Monday there was no need for measures that "unnecessarily interfere with international travel and trade" in trying to halt the spread of a coronavirus that has killed 361 people in China.
https://www.google.com/amp/s/mobile.reuters.com/article/amp/idUSKBN1ZX1H3

Pages