हे घडेल का महाराष्ट्रात ?
(माणिक मुंढे नावाच्या व्यक्तीचा लेख असलेली एक पिडीएफ फाईल मेल मधे आली होती, ती टंकत आहे येथे. मुंढे यांना संपर्क करू शकलो नाहीये, पण त्यांचा काही आक्षेप असेल असे वाटत नाही. त्यामुळे कृपया कोणत्याही कुरापती काढू नयेत ही विनंती).
झोप झालेली नसते त्यावेळेस अहमदाबाद येतं. सकाळ काहीशी निळसर वाटते. थांबल्यासारखी. दिवस उजाडण्यापुर्वी भरून राहिलेलं एक नि:शब्द जग. अहमदाबादला उतरतो, घ्यायला गाडी आलेली असते. मला गांधीनगरला जायच असतं. गाडीत बसतो. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. काही जण अजुनही झोपेतच असतात. पण गाडी गांधीनगर रस्त्याला लागली की शहर भर्र्कन संपल्यासारखं वाटतं. शहरात कुठेही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या होर्डिंग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम.
अहमदाबाद कुठे संपतं आणि कुठे गांधीनगर सुरू होतं हे लक्षात येत नाही. पण गाडी चकाचक रस्त्यांना लागली, ट्रॅफिकचे साईन बोर्ड सगळे जिथल्या तिथे दिसले, थोडीशी झाडी दिसायला लागली, स्वच्छ चौपदरी रस्ता लागला की आपण गांधीनगरमधे असल्याचं ओळखायचं. माझी आणखी एक खूण, गाडीने नर्मदेचा पाण्याने भरलेला कॅनॉल ओलांडला की गांधीनगरमधे पोहोचल्याची पक्की खूण पटते.मला ही जास्त जवळची वाटते, कारण हे शांतपणे वाहणारे पाणी सातपुड्याच्या डोंगरात पडलेले असेल ज्याने गुजरात समृद्ध होतोय.
गांधीनगर हे राजधानीचे शहर, पण गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबादच. सगळे बाजार, व्यवहार अहमदाबादमधेच. काही मोठी खरेदी करायची झाली तरी गांधीनगरहून अहमदाबादला आलेलंच बरं. २० कि.मी. पाऊणतासाचा रस्ता. अहमदाबाद-गांधीनगर म्हणजे दोन जुळी शहरे. सिकंदराबाद-हैद्राबाद, पुणे-पिंपरी चिंचवडसारखी.
जसे अहमदाबादमधे कुठल्या पक्षाचे पोस्टर्स दिसत नाहीत तसे गांधीनगरमधेही नाहीत. ना काँग्रेस, ना भाजपा, ना नरेंद्र मोदी. गेल्या तिन एक महिन्यांपासुन माझी कधी महिन्याला तर कधी पंधरा दिवसाला मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर अशी फेरी असते, होत राहतील, आमचे एक घर सद्ध्या गांधीनगरला आहे.
गांधीनगरला होणार्या चकरांनी माझ्यात सर्वात मोठा बदल कोणता झाला असेल तर मला वाटते मोदींबाबत माझे मत पुर्णपणे बदलले. मत बनविण्याची माझी एक पद्धत आहे. कोणी कितीही सांगितले तरी इतरांच्या सांगण्यावरून माझे अमुक अमुक म्हणुन मत बनत नाही. एक तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो किंवा मग सारासार विचाराची फूटपट्टी लावतो. मोदींबाबतही तसेच.
मोदींबाबत पाच सहा वर्षांपासुन उलटसुलट बरच काही ऐकून झालय. त्यामुळे नैसर्गिकरित्या एक प्रतिमा डोक्यात तयार झाली. गुजरात दंगे घडवणारे मोदी. ते वास्तव आहेच. ते मोदीही नाकारणार नाहीत. पण तरीही मी मोदींच्या नेतृत्वाने भारावलोय.
गुजरातमधे सद्ध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरू आहे. हे पाचवे जागतिक संमेलन. जवळपास ८० देशातुन उद्योगपती गांधीनगरला तीन दिवसांसाठी एकत्र आलेत. गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरू केलेले हे संमेलन दरवर्षी भरते. एका व्यासपीठावर येण्याचे टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजुला बसलेले दिसतायत. एवढेच नाही तर टाटा, गोदरेज, महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबर देशोदेशीचे उद्योगपती गुजरातच्या गुंतवणुकीवर चर्चा करतायत. मोदींना हे जे जमलय ते केंद्राला तरी जमेल ?
गुजरात हे उद्योगी लोकांचे राज्य आहे. इथले लोक रेल्वेत टक्क्यांच्याच गप्पा मारतात हा माझा अनुभव. पण मोदींनी फक्त व्यापार्यांचेच हित सांभाळले का ? नाही. मोदींनी गेल्या काही काळात राबवलेल्या काही भन्नाट आयडीया त्याचा पुरावा. काही आठवड्यांपुर्वी गेलो होतो त्यावेळेस तिथे मोदींच्या 'स्वागतम'ची चर्चा सुरू होती. मी थोडीशी माहिती घेतली आणि अवाक झालो.
स्वागतमची आयडिया अशी. समजा तुमचे एखादे काम भूमी अभिलेख कार्यालयात आहे आणि तिथला अधिकारी ते करत नसेल तर ते काम घेऊन तुम्ही तालुका 'स्वागतम'मधे जायचे. तहसिलदार दर्जाचा किंवा वरिष्ठाकडे तक्रार द्यायची. समजा त्यानेही काम नाही केले तर 'जिल्हा स्वागतम'मधे जिल्हाधिकार्यांकडे जायचे. तिथेही तक्रारीची दखल घेतली नाही तर मोदींकडे जायचे. मोदी 'स्वागतम'मधे आलेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात. संबंधित अधिकार्यांसह राज्यभरातले जिल्हाधिकारी, एसपी मोदींसमोर लाईव्ह असतात. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दर काही महिन्यांनी सीएम स्वागतम असतेच.
तक्रारदाराला मोदी बाजुच्या खुर्चीवर बसवतात आणि संबंधित अधिकार्याला जाब विचारतात, का रे बाबा या व्यक्तीचे काम का नाही झाले ? अधिकार्याने जर सांगितले की तक्रारदाराने आवश्यक असलेले कागदपत्रे पुरवली नाहीत तर मोदी तक्रारदाराला विचारतात. समजा चूक अधिकार्याची असेल तर मोदी तिथेच आदेश जारी करतात. आणि समजा तक्रारदाराने आवश्यक बाबींची पुर्तता केली नसेल तर त्याला तसे सांगतात, पण मोदी निर्णय देतात हे नक्की. विशेष म्हणजे हिरोगिरी करत नाहीत. म्हणजे उगीचच अधिकार्यांना झापत नाहीत. किंवा तक्रारदार सरळ मोदींकडेच आला असेल तर त्याला अगोदर संबंधित पहिल्या अधिकार्याकडे पाठवतात. तालुका स्वागतम मधे हे विशेष.
स्वागतम मधे जाऊन आलेल्या एका पोलिस अधिकार्याने सांगितलेला अनुभव अधिक बोलका आहे. एकजण मोदी स्वागतम मधे एका अनधिकृत बिल्डिंगची तक्रार घेऊन गेला. बिल्डिंग तर अनधिकृत आहेच पण सोसायटीतले लोक त्रास देतायत अशी तक्रार. मोदींनी संबंधित शहराच्या जिल्हाधिकारी आणि संबंधित पालिकेच्या अधिकार्यांना विचारले की तक्रारीत किती तथ्य आहे ? अधिकार्याला स्पष्ट उत्तर देता येईना. त्याची तारांबळ उडाली. मोदींनी एक साधा प्रश्न विचारला की बिल्डिंग अनधिकृत आहे की नाही ? अधिकार्याने अखेर सांगितले हो --- अनधिकृत आहे --- मग पाडली का गेली नाही ? मोदींचा पुढचा प्रश्न. कारण बिल्डिंगमधे सगळे दादा लोक राहतात. अधिकार्याचे उत्तर --- मोदींनी फॅक्सवरून बिल्डिंगचे सगळे कागदपत्रं लगेचच मागवून घेतली. वरिष्ठ अधिकार्यांनी ती तिथेच तपासली आणि अनधिकृत असल्याचे सांगितले. मोदींनी आदेश दिला की ही बिल्डिंग उद्या संध्याकाळपर्यंत पडली पाहिजे मग ती कुणाचीही असो आणि तसा रिपोर्ट सादर करा --- मोदींचा झटपट निर्णय.
या स्वागतमचा परिणाम असा आहे की कुठलाच अधिकारी एखाद्या व्यक्तीला भेटायचे टाळू शकत नाही. कारण भेट टाळली तर तो तक्रार मोदींकडे घेऊन जाईल अशी भीती. त्यातुन अधिकार्यांना फक्त भेट घ्यायचीय असे नाही तर तक्रारीचे निवारणही करायचेय म्हणजेच काहीही करून कामातुन सुटका नाही. आपल्याकडे हे कधी होईल ? आमदार, मंत्र्यांचा दरबार भरवला तर त्यात तेच गायब असतात आणि अधिकारी तिकडे फिरकत नाहीत.
मोदींनी इतर राबवलेल्या काही कल्पनांनी तर अवाक व्हायला होते. गुजरातला वाचते करायचे तर काय करावे ? मोदींनी सांगितले, ' वाँच्छे गुजरात '. म्हणजे राज्यातल्या सामान्य लोकांसह सगळे अधिकारी मग तो कारकून असो की सुपर क्लास वन. सगळ्यांनी कुठल्याही वाचनालयात जाऊन तासभर वाचायचे. काहीही वाचा पण वाचा. त्याची सुरूवात खुद्द मोदींनी केली. मोदीच गेले म्हटल्यावर मंत्री गेले, आख्खे मंत्रीमंडळ गेले म्हणजे अधिकारीही गेलेच, जावेच लागणार तसा अधिकृत आदेश असतो. अन्यथा कारवाई त्यामुळे दांडीला संधी कमी. वाचनाचा अहवाल अधिकार्यांना सादर करावा लागतो, त्यावर चर्चा होते. आपल्याकडे जसे ज्ञानेश्वरीचे पारायण होते तसे गुजरातमधे वाँछे गुजरातची पारायणे लागली. आख्खे गुजरात वाचत राहिले. एका कल्पनेने आख्खा गुजरात जोडला गेला. करिश्मा तयार होणार नाही तर काय ?
पुढच्या दोन आयडिया ऐकल्यानंतर तर तुम्हीही मोदींना दाद द्याल. मोदींनी ' गुणोत्सव ' नावाचा कार्यक्रम राबवला. म्हणजे राज्यातल्या सगळ्या अधिकार्यांनी मग तो क्लास वन असो की सुपर क्लास वन, प्रत्येक दिवशी पाच असे तीन दिवस १५ शाळांमधे जाऊन शिकवायचे. तीन दिवसांसाठी ही त्यांची अधिकृत ड्युटी. राज्याच्या मुख्य सचिवाचीही सुटका नाही. काय शिकवले त्याचा अहवाल सादर करायचा. कुठल्या अधिकार्याने कुठल्या शाळेत शिकवायचे याची अधिकृत लिस्ट दिली जाते. कुणीही उठून कुठेही जायचे नाही आणि पाट्या टाकून यायचे नाही. गावात गेल्यानंतर अधिकार्यांनी गावकर्यांशी बोलायचे. पुस्तके, गणवेषाचा प्रश्न असेल तर तो तिथेच सोडवायचा. परिणाम असा की राज्याच्या मुख्य सचिवालाही शाळेची काय स्थिती आहे हे कळते आणि लोकांनाही सरकार आपल्या शाळेत येते याचे समाधान वाटते. परिणाम गुजरातमधल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. मतदानाची टक्केवारी होती ९२ टक्के. सत्ता अर्थातच भाजपाचीच म्हणजेच मोदींचीच.
लोक आणि प्रशासन यांच्यातले अंतर मिटवायचे ? काय करावे ? मोदींनी सांगितले ' खेलोत्सव ' म्हणजे अख्ख्या गुजरातने खेळायचे. कल्पना चांगली आहे पण वाटते तितकी सोपी नाही. पैसा, व्यवस्था राबवावी लागते. पण ती हिट झाली. खेलोत्सवमधे अगोदर गाव पातळीवर लोक, स्थानिक नेते, अधिकार्यांनी खेळायचे. खेळ कुठलाही असो. खेळायचे. नंतर तालुक्यावर खेळायचे त्यानंतर जिल्ह्यावर नंतर विभागावर आणि नंतर फायनल राज्यपातळीवर. इथेही सगळे अधिकृत... खेळासाठी मोदी सरकार पैसे उपलब्ध करते. खेळणार्या अधिकार्यांच्या ड्युट्या तशा लावल्या जातात. गाव, तालुका, जिल्हा, विभाग सगळीकडे खेळ होतायत म्हणजेच आपोआपच मैदाने तयार झाली, असलेली सुधारली, नविन खेळाडू मिळाले. अधिकार्यांसोबत दोन हात करायची संधी लोकांना मिळाली. लोकांचा आणि अधिकार्यांचा उत्साह ओसंडून वाहणारा. काही अधिकारी त्यांच्या टीमची चर्चा करतायत हे दृश्यच मला सुखावणारं होतं. मोदी द ग्रेट.
आणखी एक गोष्ट सांगण्याचा मोह आवरत नाही. आता ज्या ठिकाणी व्हायब्रंट गुजरात समिट होतेय तिथेच मोदींनी महात्मा मंदिर उभारलंय. मंदिर म्हणजे गांधीजींचे मंदिर नाही तर त्यांच्या नावावर एक मोठी वास्तू उभी केली आहे, ज्यात समिट होत आहे. महात्मा मंदिराची उभारणीही भन्नाट झाली. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस ठरवला. त्या दिवशी प्रत्येक गावच्या सरपंचाला गावची माती आणि पाणी घेऊन गांधीनगरला बोलावले. खुद्द मोदींनी प्रत्येक सरपंचाकडून माती-पाणी स्विकारले आणि त्यातून पायाभरणी झाली. प्रत्येक जोडप्याची व्यवस्थित आणून सोय केली. बोलावले आणि वार्यावर सोडले असे नाही. मोदींच्या एका कल्पनेने दूर गावत असलेला गावकरी आणि समिटमधे बसून चर्चा करणारा उदयोगपती जोडला गेला. चर्चा करणारे कुठल्या तरी दुसर्या जगातले लोक आहेत ही भावना त्या गावकर्यांच्या मनात येण्याऐवजी तो आपसूकच उद्योगपतींशी जोडला जातो. म्हणजे भारत आणि इंडिया मोदींनी एका कल्पनेने जोडण्याचा प्रयत्न केलाय.
गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही जुळी भावंडे. दोन्ही सुवर्णमहोत्सव साजरा करतायत. मला महाराष्ट्रात त्याचा फील आला नाही. गुजरातमधे त्याचा विसर पडत नाही. मी इथे एकही प्रश्न उपस्थित करणार नाही, कारण हे वाचल्यानंतर जे तुमच्या मनात येईल तेच माझ्या मनात आहे.
पुढची निवडणूक ज्यावेळेस येईल त्यावेळेस जर राहुल गांधींना मतदान द्यायचे की पंतप्रधानपदासाठी मोदींना तर मी मोदींची निवड करण्याचे निश्चित केलय. कारण दंगली कोण घडवत नाही ? पण एखादा तरी सुपर क्लास वन अधिकारी मग तो आयएएस असो की आयपीएस मला माझ्या गावात येताना पहायचय जे सद्ध्या अशक्य वाटते.
दलितांनी घाऊक धर्मांतर करावे,
दलितांनी घाऊक धर्मांतर करावे, गझवा इ हिंद लौकर होईल!!
दलित इथलेच आहेत , युरेशियाचे
दलित इथलेच आहेत , युरेशियाचे नाहीत
<कॉंग्रेसींनी त्यांना आपल्या
<कॉंग्रेसींनी त्यांना आपल्या देशाला म्हणजे इटलीला किंवा पाकिस्तानला पाठवावे.<
धन्यवाद. भाजपेयींना दलितांबद्दल किती कळवळा आहे ते दिसले.
युरेशियाच्या उचक्या कौं
युरेशियाच्या उचक्या कौं लागल्या?
we are not considered
we are not considered citizens of India… so let our family members’ citizenship be cancelled and deported to a country where we are treated as citizens and as citizens there, we don’t have to face discrimination
यांचे बोलविते धनी कोण आहेत ते पाहून घ्या.
असा कोणता देश आहे जिथे त्यांना समानतेची वागणूक देतील?त्याना फुरोगाम्यांनी असा देश शोधून द्यावा
दलितांवर अत्याचार होत आहेत हि अत्यंत दुर्दैवाची घटना आहे पण त्यांच्या दुर्दैवावर आपली पोळी भाजून घेणारे अत्यंत नालायक लोक या देशात आहेत.
दुसऱ्या कोणत्या देशात त्यांना समान वागणूक देणार आहेत. जिथे अख्या आशियातील सगळेच्या सगळे मुस्लिम देश रोहिंग्यांना आपले म्हणायला आणि सामावून घ्यायला तयार नाहीत तिथे भारतीय हिन्दु माणसांना कोण विचारतो?मग ते अगदी मुसलमान व्हायला तयार असले तरी.
अर्थात येथे मायबोलीवर पण त्याचे राजकारण करणारे आहेतच. सत्तर वर्षात जो प्रश्न सुटला नाही त्याचे खापर मोदींच्या किंवा भाजपच्या डोक्यावर सोयीस्कर रित्या फोडून आपली उच्च मनोवृत्ती दाखवून दिली आहे.
आता यावर ते मोठा आरडा ओरडा करणार आहेतच. करू द्या
सध्या एवढंच
>>> दलितांवर अत्याचार होत
>>> दलितांवर अत्याचार होत आहेत हि अत्यंत दुर्दैवाची घटना आहे पण त्यांच्या दुर्दैवावर आपली पोळी भाजून घेणारे अत्यंत नालायक लोक या देशात आहेत. >>>
निधर्मी आणि पुरोगामी म्हणजे दलितांच्या मृतदेहाच्या टाळूवरचे लोणी ओरपणारे नराधम.
<दलितांनी घाऊक धर्मांतर करावे
<दलितांनी घाऊक धर्मांतर करावे, गझवा इ हिंद लौकर होईल!!>
मुस्लिमांनंतर दलितांचा नंबर आहे, हे स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद.
मोदींनी मला सांगितलंय की
मोदींनी मला सांगितलंय की माझ्या स्वागताला विमानतळापासून कार्यक्रमस्थळापर्यंत ७० लाख लोक् येणार आहेत. ते जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम असेल. - इति ट्रंप
https://twitter.com/ANI/status/1229965972452167680
किती तो जळफळाट !!
किती तो जळफळाट !!
७० लाख लोकं भिंतीच्या अल्याड
७० लाख लोकं भिंतीच्या अल्याड की पल्याड ??
Fact Check: Is the wall in
Fact Check: Is the wall in Ahmedabad being built to hide 'poverty' from US President Donald Trump? - https%3A%2F%2Fwww.indiatvnews.com%2Fnews%2Findia%2Ffact-check-us-president-donald-trum...
चार फुटाच्या भिंतीने काय
चार फुटाच्या भिंतीने काय लपणार आहे?
पण इथली टमरेल गॅंग लगेच सरसावली!
तुमची लिंक चालत नाही
तुमची लिंक चालत नाही
भींत लपवायला नसते , मग भिंतिवर बसून उड़नार आहेत का
https://www.google.com/amp/s
https://www.google.com/amp/s/www.indiatvnews.com/amp/news/india/fact-che...
>>> भींत लपवायला नसते , मग
>>> भींत लपवायला नसते , मग भिंतिवर बसून उड़नार आहेत का >>>
तू भिंतीच्या आड टमरेल घेऊन बसतोस की. तेव्हा काय लपवत असतोस?
(No subject)
>>> तुमची लिंक चालत नाही >>>
>>> तुमची लिंक चालत नाही >>>
लिंक व्यवस्थित चालत आहे.
After an investigation by India TV, it was revealed that it is not true that the wall is being built with an aim to hide slums from the view. It was being reported in the media a 7-feet high wall was being built. But this has come out to be incorrect as well. The wall is 4-feet high.
India TV learnt that Sarani Awas, the area where the wall is being built has seen unauthorised encroachment for past 50-60 years. Unauthorised constructions have seen a spike in last 2-3 years and it was to limit this, the wall is being built.
Moreover, the construction of this wall had begun even before US President Donald Trump was scheduled to visit Ahmedabad. Hence the assertion that the wall was being built keeping in mind Trump's visit is false.
It was commissioner of Ahmedabad Municipal Corporation, under whose orders work to build the wall had commenced.
Vijay Nehra, Commissioner of Ahmedabad Municipal Corporation, told India TV that a local newspaper had printed an incorrect report about the wall. Nehra added that this particular news report was picked up by other news outlets including national ones. He further said that the decision to build the wall was taken much before Trump's tour to India was finalised and it was just a coincidence that the actual work started when Donald Trump's India visit was finalised.
अहमदाबादच्या भींतीमुळे रब्बीश
अहमदाबादच्या भींतीमुळे रब्बीश कुमारचे मानसीक संतुलन हरवले आहे.
फेक न्युज वर पुर्ण प्राईम टाईम चालवला ह्या अर्बन नक्षली पत्रकाराने !
https://youtu.be/9eMvBF1p3N0
२० वर्षे भाजपाचे सरकार होते
२० वर्षे भाजपाचे सरकार होते तरी अहमदाबादेत भिंत उभारावी लागावी यातच गुजराथ मॉडेलचा विकास लपलेला आहे.
<< चार फुटाच्या भिंतीने काय
<< चार फुटाच्या भिंतीने काय लपणार आहे?
पण इथली टमरेल गॅंग लगेच सरसावली! >>
----- मग कशाला लगबगीने बांधायला घेतली ?
त्याच विटा-माती साधनांचा उपयोग गरिबांची घरे बांधण्यासाठी केला असता त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडला असता, त्यांचे आशीर्वाद मिळाले असते.
यापेक्षा केजरीवाल यांच्या सारखा विकास करुन दाखवा.... म्हणजे खोटा विकास झाकण्याची नामुष्की येत नाही.
आपण नीट वाचताच नाही का?
आपण नीट वाचतच नाही का?
>>> आपण नीट वाचतच नाही का? >>
>>> आपण नीट वाचतच नाही का? >>>
कॉंग्रेसी फक्त सोयिस्कर वाक्ये वाचतात. म्हणूनच वारंवार जोडे खातात.
<< आपण नीट वाचतच नाही का? >>
<< आपण नीट वाचतच नाही का? >>
----- अगदी माझ्या मनातले लिहीले आहे....
<< >>> आपण नीट वाचतच नाही का?
<< >>> आपण नीट वाचतच नाही का? >>>
कॉंग्रेसी फक्त सोयिस्कर वाक्ये वाचतात. म्हणूनच वारंवार जोडे खातात. >>
---- तुम्हाला जोडे खाण्याचा चांगलाच अनुभच दिसतो आहे.
>>> तुम्हाला जोडे खाण्याचा
>>> तुम्हाला जोडे खाण्याचा चांगलाच अनुभच दिसतो आहे. >>>
नाही. ढोंगी पुरोगाम्यांना जोडे मारण्याचा मला चांगला अनुभव आहे.
भींत काहीतरी झाकायलाच असते
भींत काहीतरी झाकायलाच असते
रे मूर्ख ! तू पुरोगामी , कोंग्रेसी , तुला इतकेच माहित असणार ,
मोदीजिनी 18 तास गुहेत तपश्चर्या केली आहे , ते व ट्रंप भिंतिवर बसून ती चालवणार आहेत.
भिंत चालवली तर टमरेल गॅंगला
भिंत चालवली तर टमरेल गॅंगला उघड्यावर बसावे लागेल ना। ))--((
<< >>> तुम्हाला जोडे खाण्याचा
<< >>> तुम्हाला जोडे खाण्याचा चांगलाच अनुभच दिसतो आहे. >>>
नाही. ढोंगी पुरोगाम्यांना जोडे मारण्याचा मला चांगला अनुभव आहे.
>>
------ आज बरेच जोडे खाल्ले... आता झोपा.
<< भिंत चालवली तर टमरेल
<< भिंत चालवली तर टमरेल गॅंगला उघड्यावर बसावे लागेल ना। ))--(( >>
------- तुम्ही उघड्यावर बसता, नवलच आहे.
@उदय केविलवाणा प्रतिसाद
@उदय
केविलवाणा प्रतिसाद
Pages