हे घडेल का महाराष्ट्रात ?
(माणिक मुंढे नावाच्या व्यक्तीचा लेख असलेली एक पिडीएफ फाईल मेल मधे आली होती, ती टंकत आहे येथे. मुंढे यांना संपर्क करू शकलो नाहीये, पण त्यांचा काही आक्षेप असेल असे वाटत नाही. त्यामुळे कृपया कोणत्याही कुरापती काढू नयेत ही विनंती).
झोप झालेली नसते त्यावेळेस अहमदाबाद येतं. सकाळ काहीशी निळसर वाटते. थांबल्यासारखी. दिवस उजाडण्यापुर्वी भरून राहिलेलं एक नि:शब्द जग. अहमदाबादला उतरतो, घ्यायला गाडी आलेली असते. मला गांधीनगरला जायच असतं. गाडीत बसतो. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. काही जण अजुनही झोपेतच असतात. पण गाडी गांधीनगर रस्त्याला लागली की शहर भर्र्कन संपल्यासारखं वाटतं. शहरात कुठेही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या होर्डिंग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम.
अहमदाबाद कुठे संपतं आणि कुठे गांधीनगर सुरू होतं हे लक्षात येत नाही. पण गाडी चकाचक रस्त्यांना लागली, ट्रॅफिकचे साईन बोर्ड सगळे जिथल्या तिथे दिसले, थोडीशी झाडी दिसायला लागली, स्वच्छ चौपदरी रस्ता लागला की आपण गांधीनगरमधे असल्याचं ओळखायचं. माझी आणखी एक खूण, गाडीने नर्मदेचा पाण्याने भरलेला कॅनॉल ओलांडला की गांधीनगरमधे पोहोचल्याची पक्की खूण पटते.मला ही जास्त जवळची वाटते, कारण हे शांतपणे वाहणारे पाणी सातपुड्याच्या डोंगरात पडलेले असेल ज्याने गुजरात समृद्ध होतोय.
गांधीनगर हे राजधानीचे शहर, पण गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबादच. सगळे बाजार, व्यवहार अहमदाबादमधेच. काही मोठी खरेदी करायची झाली तरी गांधीनगरहून अहमदाबादला आलेलंच बरं. २० कि.मी. पाऊणतासाचा रस्ता. अहमदाबाद-गांधीनगर म्हणजे दोन जुळी शहरे. सिकंदराबाद-हैद्राबाद, पुणे-पिंपरी चिंचवडसारखी.
जसे अहमदाबादमधे कुठल्या पक्षाचे पोस्टर्स दिसत नाहीत तसे गांधीनगरमधेही नाहीत. ना काँग्रेस, ना भाजपा, ना नरेंद्र मोदी. गेल्या तिन एक महिन्यांपासुन माझी कधी महिन्याला तर कधी पंधरा दिवसाला मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर अशी फेरी असते, होत राहतील, आमचे एक घर सद्ध्या गांधीनगरला आहे.
गांधीनगरला होणार्या चकरांनी माझ्यात सर्वात मोठा बदल कोणता झाला असेल तर मला वाटते मोदींबाबत माझे मत पुर्णपणे बदलले. मत बनविण्याची माझी एक पद्धत आहे. कोणी कितीही सांगितले तरी इतरांच्या सांगण्यावरून माझे अमुक अमुक म्हणुन मत बनत नाही. एक तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो किंवा मग सारासार विचाराची फूटपट्टी लावतो. मोदींबाबतही तसेच.
मोदींबाबत पाच सहा वर्षांपासुन उलटसुलट बरच काही ऐकून झालय. त्यामुळे नैसर्गिकरित्या एक प्रतिमा डोक्यात तयार झाली. गुजरात दंगे घडवणारे मोदी. ते वास्तव आहेच. ते मोदीही नाकारणार नाहीत. पण तरीही मी मोदींच्या नेतृत्वाने भारावलोय.
गुजरातमधे सद्ध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरू आहे. हे पाचवे जागतिक संमेलन. जवळपास ८० देशातुन उद्योगपती गांधीनगरला तीन दिवसांसाठी एकत्र आलेत. गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरू केलेले हे संमेलन दरवर्षी भरते. एका व्यासपीठावर येण्याचे टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजुला बसलेले दिसतायत. एवढेच नाही तर टाटा, गोदरेज, महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबर देशोदेशीचे उद्योगपती गुजरातच्या गुंतवणुकीवर चर्चा करतायत. मोदींना हे जे जमलय ते केंद्राला तरी जमेल ?
गुजरात हे उद्योगी लोकांचे राज्य आहे. इथले लोक रेल्वेत टक्क्यांच्याच गप्पा मारतात हा माझा अनुभव. पण मोदींनी फक्त व्यापार्यांचेच हित सांभाळले का ? नाही. मोदींनी गेल्या काही काळात राबवलेल्या काही भन्नाट आयडीया त्याचा पुरावा. काही आठवड्यांपुर्वी गेलो होतो त्यावेळेस तिथे मोदींच्या 'स्वागतम'ची चर्चा सुरू होती. मी थोडीशी माहिती घेतली आणि अवाक झालो.
स्वागतमची आयडिया अशी. समजा तुमचे एखादे काम भूमी अभिलेख कार्यालयात आहे आणि तिथला अधिकारी ते करत नसेल तर ते काम घेऊन तुम्ही तालुका 'स्वागतम'मधे जायचे. तहसिलदार दर्जाचा किंवा वरिष्ठाकडे तक्रार द्यायची. समजा त्यानेही काम नाही केले तर 'जिल्हा स्वागतम'मधे जिल्हाधिकार्यांकडे जायचे. तिथेही तक्रारीची दखल घेतली नाही तर मोदींकडे जायचे. मोदी 'स्वागतम'मधे आलेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात. संबंधित अधिकार्यांसह राज्यभरातले जिल्हाधिकारी, एसपी मोदींसमोर लाईव्ह असतात. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दर काही महिन्यांनी सीएम स्वागतम असतेच.
तक्रारदाराला मोदी बाजुच्या खुर्चीवर बसवतात आणि संबंधित अधिकार्याला जाब विचारतात, का रे बाबा या व्यक्तीचे काम का नाही झाले ? अधिकार्याने जर सांगितले की तक्रारदाराने आवश्यक असलेले कागदपत्रे पुरवली नाहीत तर मोदी तक्रारदाराला विचारतात. समजा चूक अधिकार्याची असेल तर मोदी तिथेच आदेश जारी करतात. आणि समजा तक्रारदाराने आवश्यक बाबींची पुर्तता केली नसेल तर त्याला तसे सांगतात, पण मोदी निर्णय देतात हे नक्की. विशेष म्हणजे हिरोगिरी करत नाहीत. म्हणजे उगीचच अधिकार्यांना झापत नाहीत. किंवा तक्रारदार सरळ मोदींकडेच आला असेल तर त्याला अगोदर संबंधित पहिल्या अधिकार्याकडे पाठवतात. तालुका स्वागतम मधे हे विशेष.
स्वागतम मधे जाऊन आलेल्या एका पोलिस अधिकार्याने सांगितलेला अनुभव अधिक बोलका आहे. एकजण मोदी स्वागतम मधे एका अनधिकृत बिल्डिंगची तक्रार घेऊन गेला. बिल्डिंग तर अनधिकृत आहेच पण सोसायटीतले लोक त्रास देतायत अशी तक्रार. मोदींनी संबंधित शहराच्या जिल्हाधिकारी आणि संबंधित पालिकेच्या अधिकार्यांना विचारले की तक्रारीत किती तथ्य आहे ? अधिकार्याला स्पष्ट उत्तर देता येईना. त्याची तारांबळ उडाली. मोदींनी एक साधा प्रश्न विचारला की बिल्डिंग अनधिकृत आहे की नाही ? अधिकार्याने अखेर सांगितले हो --- अनधिकृत आहे --- मग पाडली का गेली नाही ? मोदींचा पुढचा प्रश्न. कारण बिल्डिंगमधे सगळे दादा लोक राहतात. अधिकार्याचे उत्तर --- मोदींनी फॅक्सवरून बिल्डिंगचे सगळे कागदपत्रं लगेचच मागवून घेतली. वरिष्ठ अधिकार्यांनी ती तिथेच तपासली आणि अनधिकृत असल्याचे सांगितले. मोदींनी आदेश दिला की ही बिल्डिंग उद्या संध्याकाळपर्यंत पडली पाहिजे मग ती कुणाचीही असो आणि तसा रिपोर्ट सादर करा --- मोदींचा झटपट निर्णय.
या स्वागतमचा परिणाम असा आहे की कुठलाच अधिकारी एखाद्या व्यक्तीला भेटायचे टाळू शकत नाही. कारण भेट टाळली तर तो तक्रार मोदींकडे घेऊन जाईल अशी भीती. त्यातुन अधिकार्यांना फक्त भेट घ्यायचीय असे नाही तर तक्रारीचे निवारणही करायचेय म्हणजेच काहीही करून कामातुन सुटका नाही. आपल्याकडे हे कधी होईल ? आमदार, मंत्र्यांचा दरबार भरवला तर त्यात तेच गायब असतात आणि अधिकारी तिकडे फिरकत नाहीत.
मोदींनी इतर राबवलेल्या काही कल्पनांनी तर अवाक व्हायला होते. गुजरातला वाचते करायचे तर काय करावे ? मोदींनी सांगितले, ' वाँच्छे गुजरात '. म्हणजे राज्यातल्या सामान्य लोकांसह सगळे अधिकारी मग तो कारकून असो की सुपर क्लास वन. सगळ्यांनी कुठल्याही वाचनालयात जाऊन तासभर वाचायचे. काहीही वाचा पण वाचा. त्याची सुरूवात खुद्द मोदींनी केली. मोदीच गेले म्हटल्यावर मंत्री गेले, आख्खे मंत्रीमंडळ गेले म्हणजे अधिकारीही गेलेच, जावेच लागणार तसा अधिकृत आदेश असतो. अन्यथा कारवाई त्यामुळे दांडीला संधी कमी. वाचनाचा अहवाल अधिकार्यांना सादर करावा लागतो, त्यावर चर्चा होते. आपल्याकडे जसे ज्ञानेश्वरीचे पारायण होते तसे गुजरातमधे वाँछे गुजरातची पारायणे लागली. आख्खे गुजरात वाचत राहिले. एका कल्पनेने आख्खा गुजरात जोडला गेला. करिश्मा तयार होणार नाही तर काय ?
पुढच्या दोन आयडिया ऐकल्यानंतर तर तुम्हीही मोदींना दाद द्याल. मोदींनी ' गुणोत्सव ' नावाचा कार्यक्रम राबवला. म्हणजे राज्यातल्या सगळ्या अधिकार्यांनी मग तो क्लास वन असो की सुपर क्लास वन, प्रत्येक दिवशी पाच असे तीन दिवस १५ शाळांमधे जाऊन शिकवायचे. तीन दिवसांसाठी ही त्यांची अधिकृत ड्युटी. राज्याच्या मुख्य सचिवाचीही सुटका नाही. काय शिकवले त्याचा अहवाल सादर करायचा. कुठल्या अधिकार्याने कुठल्या शाळेत शिकवायचे याची अधिकृत लिस्ट दिली जाते. कुणीही उठून कुठेही जायचे नाही आणि पाट्या टाकून यायचे नाही. गावात गेल्यानंतर अधिकार्यांनी गावकर्यांशी बोलायचे. पुस्तके, गणवेषाचा प्रश्न असेल तर तो तिथेच सोडवायचा. परिणाम असा की राज्याच्या मुख्य सचिवालाही शाळेची काय स्थिती आहे हे कळते आणि लोकांनाही सरकार आपल्या शाळेत येते याचे समाधान वाटते. परिणाम गुजरातमधल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. मतदानाची टक्केवारी होती ९२ टक्के. सत्ता अर्थातच भाजपाचीच म्हणजेच मोदींचीच.
लोक आणि प्रशासन यांच्यातले अंतर मिटवायचे ? काय करावे ? मोदींनी सांगितले ' खेलोत्सव ' म्हणजे अख्ख्या गुजरातने खेळायचे. कल्पना चांगली आहे पण वाटते तितकी सोपी नाही. पैसा, व्यवस्था राबवावी लागते. पण ती हिट झाली. खेलोत्सवमधे अगोदर गाव पातळीवर लोक, स्थानिक नेते, अधिकार्यांनी खेळायचे. खेळ कुठलाही असो. खेळायचे. नंतर तालुक्यावर खेळायचे त्यानंतर जिल्ह्यावर नंतर विभागावर आणि नंतर फायनल राज्यपातळीवर. इथेही सगळे अधिकृत... खेळासाठी मोदी सरकार पैसे उपलब्ध करते. खेळणार्या अधिकार्यांच्या ड्युट्या तशा लावल्या जातात. गाव, तालुका, जिल्हा, विभाग सगळीकडे खेळ होतायत म्हणजेच आपोआपच मैदाने तयार झाली, असलेली सुधारली, नविन खेळाडू मिळाले. अधिकार्यांसोबत दोन हात करायची संधी लोकांना मिळाली. लोकांचा आणि अधिकार्यांचा उत्साह ओसंडून वाहणारा. काही अधिकारी त्यांच्या टीमची चर्चा करतायत हे दृश्यच मला सुखावणारं होतं. मोदी द ग्रेट.
आणखी एक गोष्ट सांगण्याचा मोह आवरत नाही. आता ज्या ठिकाणी व्हायब्रंट गुजरात समिट होतेय तिथेच मोदींनी महात्मा मंदिर उभारलंय. मंदिर म्हणजे गांधीजींचे मंदिर नाही तर त्यांच्या नावावर एक मोठी वास्तू उभी केली आहे, ज्यात समिट होत आहे. महात्मा मंदिराची उभारणीही भन्नाट झाली. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस ठरवला. त्या दिवशी प्रत्येक गावच्या सरपंचाला गावची माती आणि पाणी घेऊन गांधीनगरला बोलावले. खुद्द मोदींनी प्रत्येक सरपंचाकडून माती-पाणी स्विकारले आणि त्यातून पायाभरणी झाली. प्रत्येक जोडप्याची व्यवस्थित आणून सोय केली. बोलावले आणि वार्यावर सोडले असे नाही. मोदींच्या एका कल्पनेने दूर गावत असलेला गावकरी आणि समिटमधे बसून चर्चा करणारा उदयोगपती जोडला गेला. चर्चा करणारे कुठल्या तरी दुसर्या जगातले लोक आहेत ही भावना त्या गावकर्यांच्या मनात येण्याऐवजी तो आपसूकच उद्योगपतींशी जोडला जातो. म्हणजे भारत आणि इंडिया मोदींनी एका कल्पनेने जोडण्याचा प्रयत्न केलाय.
गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही जुळी भावंडे. दोन्ही सुवर्णमहोत्सव साजरा करतायत. मला महाराष्ट्रात त्याचा फील आला नाही. गुजरातमधे त्याचा विसर पडत नाही. मी इथे एकही प्रश्न उपस्थित करणार नाही, कारण हे वाचल्यानंतर जे तुमच्या मनात येईल तेच माझ्या मनात आहे.
पुढची निवडणूक ज्यावेळेस येईल त्यावेळेस जर राहुल गांधींना मतदान द्यायचे की पंतप्रधानपदासाठी मोदींना तर मी मोदींची निवड करण्याचे निश्चित केलय. कारण दंगली कोण घडवत नाही ? पण एखादा तरी सुपर क्लास वन अधिकारी मग तो आयएएस असो की आयपीएस मला माझ्या गावात येताना पहायचय जे सद्ध्या अशक्य वाटते.
ट्रंपना भिंती आवडतात. म्हणून
ट्रंपना भिंती आवडतात. म्हणून त्यांच्यासाठी भिंत . वा वा.
>>> ट्रंपना गुजरात भेटीत
>>> ट्रंपना गुजरात भेटीत भलतंसलतं काही दिसू नये म्हणून आपला राजा भिंती बांधतोय. >>>
इंदिरा गांधींच्या व राजीव गांधीच्या काळातही परदेशी पाहुण्यांच्या भेटीत दिल्लीतील झोपडपट्ट्या लपवल्या जायच्या.
एकाच्या मते काँग्रेसच्या
एकाच्या मते काँग्रेसच्या काळात एड मिळवण्यासाठी देशातील गरिबीचं प्रदर्शन करायचे. दुसर्याच्या मते तेही दि ल्लीतल्या झोपडपट्ट्या लपवायचे.
पण गुजरात हे देशातलं सर्वाधिक प्रगत, संपन्न, आदर्श इ.इ. राज्य. साक्षात महान नेता नरेंद्र मोदी यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. ज्याच्या प्रगतीचे वर्णन करताना रसना सुकल्या, शायांच्या नद्या आटल्या. त्या गुजरात राज्यात अजूनही लपवण्यासारख्या झोपडपट्ट्या आहेत?
काय तो आटा पिटा ?
काय तो आटा पिटा ?
१५ वर्षांच्या कारकिर्दीत एका राज्याचा अमुलाग्र विकास करुन दाखवायचा !
पण ह्यांच्या लाडक्या काँग्रेस सरकारला ४०-५० वर्षात सतत "गरीबी हटाव " ची घोषणा देउन संपुर्ण भारताची तर सोडाच पण अमेठी, रायबरेली, सारख्या लहान शहराची गरीबी दुर करता आलेली नाही. गरीबी सोडाच ह्या शहरांचा मूलभुत विकास सुद्धा केलेला नाही. ह्याच शहरातुन गेली ५०-६० वर्षे कॉंग्रेसचे सम्राट, सम्राज्ञी निवडुन येत आहेत !
जिथुन गेली ५०-६० वर्षे कॉंग्रेसचे सम्राट, सम्राज्ञी निवडुन येत तिथल्या माणसांचा, त्यांच्या चांगूलपणाचा चांगलाच फायदा उचललेला आहे !!
ओके. म्हणजे गुजरात सगळ्यात
ओके. म्हणजे गुजरात सगळ्यात प्रगतबिगत आदर्श राज्य आहे, हा फक्त प्रचारच आहे तर. धन्यवाद.
>>> ओके. म्हणजे गुजरात
>>> ओके. म्हणजे गुजरात सगळ्यात प्रगतबिगत आदर्श राज्य आहे, हा फक्त प्रचारच आहे तर. धन्यवाद. >>>
काहीही समजा. स्वत:ला जे अजिबात जमलं नाही, ते दुसऱ्याने सहज करून दाखविल्यामुळे पार्श्वभागाची जळजळ कशी होते ते दृग्गोचर होतंय.
बघा एक म्हणतोय, मोदींना कसं
बघा एक म्हणतोय, मोदींना कसं जमणार. दुसरा म्हणतोय जमलं.
इंदिरा गांधींच्या व राजीव
इंदिरा गांधींच्या व राजीव गांधीच्या काळातही परदेशी पाहुण्यांच्या भेटीत दिल्लीतील झोपडपट्ट्या लपवल्या जायच्या. >> म्हणजे मोदी भगवे काँग्रेसी आहेत तर
मायला इकडं मुंबई पुण्यात
मायला इकडं मुंबई पुण्यात सगळीकडं झोपड्याच झोपड्या दिसतात, तिथले लोक गुजराततेल्या झोपड्यांवर चारवीत चर्वण करू रहायले!!
मुश्किल हाय.
>>> मायला इकडं मुंबई पुण्यात
>>> मायला इकडं मुंबई पुण्यात सगळीकडं झोपड्याच झोपड्या दिसतात, तिथले लोक गुजराततेल्या झोपड्यांवर चारवीत चर्वण करू रहायले!! >>>
आम्ही ७२ वर्षे मनसोक्त पैसे खाल्ले, देशात जातीयवादी आगी लावल्या, जातीजातीत भांडणे लावली, देशाचे तुकडे पाडून चीन, पाकिस्तानला आंदण दिले, अर्थव्यवस्थेची पूर्ण वाट लावली, देशाच्या शत्रूंना सर्वतोपरी मदत केली.
पण तुम्ही १ दिवसात सुधारणा केल्या नाहीत तर तुम्ही नालायक, अशी कॉंग्रेसी चाटुंची विचारसरणी आहे.
15 varshe jhali
15 varshe jhali
पटेल, मोदी,रूपानी यांची बावीस
पटेल, मोदी,रूपानी यांची बावीस वर्षं म्हणजे एक दिवस.?
पण मग चर्या गुजरातच्या प्रगतीच्या गप्पा कशाला मारत होता?
चीनमधल्या शहरांचे फोटो गुजरातचे म्हणून फिरवतो म्हणजे विकास होय?
>>> पटेल, मोदी,रूपानी यांची
>>> पटेल, मोदी,रूपानी यांची बावीस वर्षं म्हणजे एक दिवस.?
पण मग चर्या गुजरातच्या प्रगतीच्या गप्पा कशाला मारत होता? >>>
देशद्रोही ५१ वर्षे सत्तेत होते. ५१ वर्षांत ज्यांना पैसे खाण्यापलिकडे आणि देश विकण्यापलिकडे काहीही करता आले नाही, ते इतरांना जाब विचारत बसलेत.
देश कोण विकतोय ते दिसतंय
देश कोण विकतोय ते दिसतंय स्पष्ट.
चोराच्या उलट्या बोंबा.
>>> देश कोण विकतोय ते दिसतंय
>>> देश कोण विकतोय ते दिसतंय स्पष्ट.
चोराच्या उलट्या बोंबा. >>>
कॉंग्रेसच देश विकतंय हे स्पष्ट दिसतंय. भुरट्यांच्या उलट्या बोंबा.
गुजरातच्या प्रगतीच्या गप्पा
गुजरातच्या प्रगतीच्या गप्पा कशाला मारत होता?
>>
आहे प्रगत म्हणून मारल्या गफ्फा! पॉट का दुखते? आम्ही हितली प्रगती अन झोपडपट्टी दोघांवरबी गफ्फा हणतो.
भिंत बांधून प्रगती लपवत आहेत
भिंत बांधून प्रगती लपवत आहेत होय?
त्यापेक्षा गांधारीगत पट्टी
त्यापेक्षा गांधारीगत पट्टी लावून फिरवायचे होते, 20 रुपयात भागले असते.
अनारकलीला भिंतीत ढकललेला अकबरही लाजला असेल
"I am (going to India). He
"I am (going to India). He (PM Modi) said we will have millions and millions of people. He thinks we will have 5-7 million people just from the airport to the new stadium," said Donald Trump.
मिलियन म्हणजे किती क्विंटल?
अमेरिका तर सॅटे लाईट ने
अमेरिका तर सॅटे लाईट ने बाल्कनीत वाळत घातलेली चड्डीपण बघू शकते, मग भिंत बांधून काय करणार ?
आणि अमेरिका इथे येऊन तेल अन वायू पुरवण्याचे काम घेणार आहे म्हणे, मग ते डॉलरचा खर्च वाचवायला लोकल करन्सीत व्यवहार करणार होते, त्याचे काय होणार ?
कॉंग्रेसी चाटुंच्या
कॉंग्रेसी चाटुंच्या जळफळाटामुळे सर्वत्र जळका वास पसरलाय.
हे दोघे काळं मांजर अन भरत इथं
हे दोघे काळं मांजर अन भरत इथं येवढं काय करत असतात? त्यापेक्षा पूर्णवेळ कोणत्याही खाजप विरोधी पक्षात जाऊन कार्य करावं. न पेक्षा 8 10 मत भाजप विरोधी गेलीत त बरं व्हायचं. उगा वांझोट्या चर्चा!
धागा वर आला बघाव तर ह्या बावळटांच्या द्राविडी चर्चा!
भिकारखाना बनत चाललाय धागा तुमच्या मूळ.
(No subject)
चर्या. हे वाचल्यावर तुमच्या
हे वाचल्यावर तुमच्या जिवाला थंड थंड वाटेल
https://indianexpress.com/article/cities/ahmedabad/una-dalit-victim-writ...
Despite being Hindus, we are not considered as Hindus and we have been through torture/harassment (atyachar)… we are not considered citizens of India… so let our family members’ citizenship be cancelled and deported to a country where we are treated as citizens and as citizens there, we don’t have to face discrimination… the victims be granted permission for ichcha mrityu (euthanasia) as, if we cannot be considered as citizens and have to face torture despite being a Hindu and a native of India, then we feel, our lives in this country, is meaningless
हे वाचल्यावर तुमच्या जिवाला
हे वाचल्यावर तुमच्या जिवाला थंड थंड वाटेल
७० वर्षे राज्य करुन ही हे बघताना तुमच्या जिवाला थंड थंड वाटत ?
अरे तुमच्या महात्म्या व लाडक्या चाचा जान ने "हरिजन" म्हणुन संबोधल होत ना त्यांना ? मग हरीजन लोकांच्या समस्या कडे तरी लक्ष द्यायला ७० वर्षांत वेळ मिळाला नै ?
कसा मिळणार म्हणा , देशाला ४०-५० वर्षे गरीबी हटावची घुट्टी पाजली , हिंदु समाजाला बीसी, ओबिसी, सर्व सामान्य म्हणुन विभागल, वंचिताना रिझर्वेशन देण्याच नाटक केल पण प्रत्यक्षात ह्यांची एकही स्किम लोकां पर्यंत पोहोचलीच नाही. ७०% भारताच्या जनतेकडे तर २०१४ पर्यंत बँक खात सुद्धा नव्हत !!
तुम्ही 10000 वर्षे त्यांना
तुम्ही 10000 वर्षे त्यांना ढकलले ना ?
आता आरक्षण 10000 वर्षे ठेवले की जातील वर
>>>
>>>
Despite being Hindus, we are not considered as Hindus and we have been through torture/harassment (atyachar)… we are not considered citizens of India… so let our family members’ citizenship be cancelled and deported to a country where we are treated as citizens and as citizens there, we don’t have to face discrimination… the victims be granted permission for ichcha mrityu (euthanasia) as, if we cannot be considered as citizens and have to face torture despite being a Hindu and a native of India, then we feel, our lives in this country, is meaningless. >>>
जे झालं तो गुन्हाच होता व ते करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे. या गुन्ह्यामुळे ज्यांच्यावर अत्याचार झाले त्या सर्वांना प्रत्येकी १२ लाख रूपये नुकसानभरपाई मिळाली होती.
खापरपजोबांचं गणित परत चुकलं.
खापरपजोबांचं गणित परत चुकलं.
भाजप वाले म्हणतात CAA ला
भाजप वाले म्हणतात CAA ला विरोध करणारे दलित विरोधी
https://indianexpress.com/article/india/those-opposing-caa-are-anti-dali...
इथे यांच्या लाडक्या गुजरातेतले दलित म्हणतात आम्हांला देशाबाहेर पाठवा नाहीतर मरू द्या.
>>> इथे यांच्या लाडक्या
>>> इथे यांच्या लाडक्या गुजरातेतले दलित म्हणतात आम्हांला देशाबाहेर पाठवा नाहीतर मरू द्या. >>>
कॉंग्रेसींनी त्यांना आपल्या देशाला म्हणजे इटलीला किंवा पाकिस्तानला पाठवावे.
Pages