Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हलवा ठीक आहे. कधी तरी बरा
हलवा ठीक आहे. कधी तरी बरा लागतो. सुरमई अग्रक्रमी. मग रावस, तळलेले बोंबिल, तळलेली चुरचुरीत मांदेली.
कोलंबीला यात मोजू नका. ती तर पाहिजेच>>>> +१००
Today's special.. चतुर्थी
Today's special.. चतुर्थी निमित्त..
(No subject)
शीतल मस्त रंग आलाय.
शीतल मस्त रंग आलाय. साबुदाणाखिचडी मऊ झाली असणार असं दिसतंय.
धागा माश्यावरून साबुदाणा खिचडीवर आला एकदम
शीतल, फोटो पाहून डोळे निवले
शीतल, फोटो पाहून डोळे निवले बघ!
धागा माश्यावरून साबुदाणा खिचडीवर आला एकदम >>>>> परत मासे चालू करते.पापलेट माझ्या आवडीचे!
हलवा,सुरमई वगैरे वासवाले मासे.रच्याकने यात कोणी,करलीचा उल्लेख कसा केला नाही?
आज संकष्टी आहे लक्षातच नाही.
आज संकष्टी आहे लक्षातच नाही. संध्याकाळी वडे मटण बेत आहे.
सोडे फ्राय
सोडे फ्राय
कोणी,करलीचा उल्लेख कसा केला
कोणी,करलीचा उल्लेख कसा केला नाही?>>>
कर्ली खाणारे पाहिजे जातीचे, येरागाबाळ्याचे काम नाही.
जे एकदा कर्ली खातील, त्यांना दुसरे तितकेच प्रिय मासे खातानाही कर्लीच्या आठवणींचे कढ येतील...
उपास नसेल तर खिचडीवर शेव
उपास नसेल तर खिचडीवर शेव टाकून खातो आम्ही.
तसेच एकदा कांदा घालून खिचडी करायचे मनात आहे खूप वर्षांपासून.
करली मला आवडते. खाता पण येते.
करली मला आवडते. खाता पण येते.
करली कोळीण तिरकीतिरकी कापुन देते. त्याने काटे नीट काढता येतात तळल्यावर खाताना.
आज संकष्टी आहे लक्षातच नाही.
आज संकष्टी आहे लक्षातच नाही. संध्याकाळी वडे मटण बेत आहे.
+ ७८६
माझीही आई विसरली. मटण केले. आता मी एकटाच खाणार.
तसेही दुपारी ऑफिसला चिकन थाळी खाऊन झालीय.
सोमवारी मी मासे तळलेले. नंतर वेळ मिळाल्यास फोटो अपलोड करतो
मटण वडे
मटण वडे
(No subject)
चतुर्थी sepcial menu, आलू धनिया पराठा, पुदीना कोथिंबीर चटणी, गाजर हलवा, डाळ वांगं
जेव्हा तुमची आई विसरते आज
जेव्हा तुमची आई विसरते आज संकष्टी आहे ......
VvvvV
मीही विसरले होते. पण सकाळी
मीही विसरले होते. पण सकाळी whatsapp वर संकष्टीच्या शुभेच्छा बघून अंडाकरीचा बेत रद्द केला.
सगळे फोटो मस्त!!
हा धागा म्हणजे डोक्याला शॉट
हा धागा म्हणजे डोक्याला शॉट आहे राव
बोकलत, मटण वड्याचं ताट कातिल
बोकलत, मटण वड्याचं ताट कातिल दिसतंय. रोज नॉनवेज खाता का?
सोमवार गुरुवार आणि शनिवार
सोमवार गुरुवार आणि शनिवार सोडून इतर दिवशी बहुतेक नॉनव्हेज असतं.
@ पशुपत
@ पशुपत
माझी आई करायची नाश्त्याला कांदा घालून खिचडी ...हळद ,हिंग प्रॉपर फोडणी देऊन..त्याला पचडी म्हणायचो आम्ही....मस्त लागते .
सात्विक आणि healthy mode on:
सात्विक आणि healthy mode on:
नाचणीचे पौष्टिक धिरडे,दही, दह्यात कालवलेली सुक्या खोबऱ्याची चटणी हे बाजेवर मस्तपैकी बसून खाण्यातली मजा काही औरच!
( Plate presentation वर जाऊ नये.. एकदम सात्विक आणि tasty पदार्थ आहे)
मागच्या आठवड्यातला फोटो, घरी
मागच्या आठवड्यातला फोटो, घरी बनवलेली कचोरी
किल्ली, कचोरीच्या पाकृची
किल्ली, कचोरीच्या पाकृची किल्ली आम्हाला पण दे ना. सॉलिड्ड दिसतेय. टम्म आणी खुसखुशीत.
शीतल , साबु खिचडी मस्त दिसतेय. ताटात ती भाजी कसली आहे? रेसेपी प्लीज !
ममोने पण सिक्सर मारलाय. मी व्हेज असल्याने नॉन व्हेजला पास.
किल्ली, कचोरी एकदम कातील आहे.
किल्ली, कचोरी एकदम कातील आहे.
शितल मस्त मेनू आणि फोटो.
शितल मस्त मेनू आणि फोटो.
किल्ली कचोरी तोंपासू. रेसिपी आने दो. बारीक शेव नी कोथिंबीर नाही का घालत तू?
सगळे फोटो तोंपासू!
सगळे फोटो तोंपासू!
किल्ली, कचोरी मस्त दिसतेय. रेसीपी पण लिहा योग्य जागी. मला तुमची छोट्या परातीसारखी धिरड्याची थाळी आवडली. आजोळी अशा छोट्या पितळी थाळ्या असत त्याची आठवण झाली.
वेळ मिळाला की post करते
वेळ मिळाला की post करते रेसिपी..
धन्यवाद
ऋचा, देवकी, रश्मी, किट्टु
ऋचा, देवकी, रश्मी, किट्टु धन्यवाद.
ताटातील भाजी डाळ वांगं. ताजा गोडा मसाला घालून केलेलं.
Ashwini999 , अरे वा !
Ashwini999 , अरे वा !
मला मात्र तुपातली जिर्याच्या फोडणीची पण कांदा परतून त्यात केलेली खिचडी अपेक्षित आहे.
माझी आई करते हल्ले तशी. मी
माझी आई करते हल्ली तशी. मी अजुन खाल्ली नाहीये पण.
300 व्या प्रतिसादानिमित्त
300 व्या प्रतिसादानिमित्त तुमच्यासाठी खास
Pages