खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हलवा ठीक आहे. कधी तरी बरा लागतो. सुरमई अग्रक्रमी. मग रावस, तळलेले बोंबिल, तळलेली चुरचुरीत मांदेली.
कोलंबीला यात मोजू नका. ती तर पाहिजेच>>>> +१००

शीतल मस्त रंग आलाय. साबुदाणाखिचडी मऊ झाली असणार असं दिसतंय.
धागा माश्यावरून साबुदाणा खिचडीवर आला एकदम Happy

शीतल, फोटो पाहून डोळे निवले बघ!

धागा माश्यावरून साबुदाणा खिचडीवर आला एकदम >>>>> परत मासे चालू करते.पापलेट माझ्या आवडीचे!
हलवा,सुरमई वगैरे वासवाले मासे.रच्याकने यात कोणी,करलीचा उल्लेख कसा केला नाही?

कोणी,करलीचा उल्लेख कसा केला नाही?>>>

कर्ली खाणारे पाहिजे जातीचे, येरागाबाळ्याचे काम नाही.

जे एकदा कर्ली खातील, त्यांना दुसरे तितकेच प्रिय मासे खातानाही कर्लीच्या आठवणींचे कढ येतील... Happy Happy

उपास नसेल तर खिचडीवर शेव टाकून खातो आम्ही.
तसेच एकदा कांदा घालून खिचडी करायचे मनात आहे खूप वर्षांपासून.

करली मला आवडते. खाता पण येते.
करली कोळीण तिरकीतिरकी कापुन देते. त्याने काटे नीट काढता येतात तळल्यावर खाताना.

आज संकष्टी आहे लक्षातच नाही. संध्याकाळी वडे मटण बेत आहे.
+ ७८६
माझीही आई विसरली. मटण केले. आता मी एकटाच खाणार.
तसेही दुपारी ऑफिसला चिकन थाळी खाऊन झालीय.

सोमवारी मी मासे तळलेले. नंतर वेळ मिळाल्यास फोटो अपलोड करतो

IMG20200212212803.jpgIMG20200212213141.jpgIMG20200212213004.jpgIMG20200212213047 (1)_0.jpg
चतुर्थी sepcial menu, आलू धनिया पराठा, पुदीना कोथिंबीर चटणी, गाजर हलवा, डाळ वांगं
IMG_20200212_225223.jpg

मीही विसरले होते. पण सकाळी whatsapp वर संकष्टीच्या शुभेच्छा बघून अंडाकरीचा बेत रद्द केला.
सगळे फोटो मस्त!!

@ पशुपत

माझी आई करायची नाश्त्याला कांदा घालून खिचडी ...हळद ,हिंग प्रॉपर फोडणी देऊन..त्याला पचडी म्हणायचो आम्ही....मस्त लागते .

IMG-20200213-WA0005.jpg

सात्विक आणि healthy mode on:

नाचणीचे पौष्टिक धिरडे,दही, दह्यात कालवलेली सुक्या खोबऱ्याची चटणी हे बाजेवर मस्तपैकी बसून खाण्यातली मजा काही औरच!
( Plate presentation वर जाऊ नये.. एकदम सात्विक आणि tasty पदार्थ आहे)

किल्ली, कचोरीच्या पाकृची किल्ली आम्हाला पण दे ना. Proud सॉलिड्ड दिसतेय. टम्म आणी खुसखुशीत.

शीतल , साबु खिचडी मस्त दिसतेय. ताटात ती भाजी कसली आहे? रेसेपी प्लीज !

ममोने पण सिक्सर मारलाय. मी व्हेज असल्याने नॉन व्हेजला पास. Proud

शितल मस्त मेनू आणि फोटो.
किल्ली कचोरी तोंपासू. रेसिपी आने दो. बारीक शेव नी कोथिंबीर नाही का घालत तू?

सगळे फोटो तोंपासू!
किल्ली, कचोरी मस्त दिसतेय. रेसीपी पण लिहा योग्य जागी. मला तुमची छोट्या परातीसारखी धिरड्याची थाळी आवडली. आजोळी अशा छोट्या पितळी थाळ्या असत त्याची आठवण झाली.

Ashwini999 , अरे वा !
मला मात्र तुपातली जिर्याच्या फोडणीची पण कांदा परतून त्यात केलेली खिचडी अपेक्षित आहे.

Pages