" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.
"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."
पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.
निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)
(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)
फुलाफूलांचे टीशर्ट देखील
फुलाफूलांचे टीशर्ट देखील घालून पाहीले मॉर्नींगवॉकच्या वेळी. >>>
उद्या थोडे साखरेचे पाणी शिंपडा शर्टावर, गुलाबपाणी शिंपडतो तसे.
फुलाफूलांचे टीशर्ट देखील
फुलाफूलांचे टीशर्ट देखील घालून पाहीले मॉर्नींगवॉकच्या वेळी. >>> उगा डोळ्यांसमोर चित्र आले.
उद्या थोडे साखरेचे पाणी शिंपडा शर्टावर, गुलाबपाणी शिंपडतो तसे.>>>>
मला वाटले खरे सांगतेय
मला वाटले खरे सांगतेय साधनाताई. साखरेच्या पाण्या ऐवजी मी मधाचा विचार करत होतो. कशाला कंजुषपणा करा म्हणून.
अहो, खरेच सांगितले.
अहो, खरेच सांगितले.
बर्डींगसाठी camouflage
बर्डींगसाठी camouflage tshirts वापरले तर फरक पडतो हे खरं आहे.
>>>>साखरेच्या पाण्या ऐवजी मी
>>>>साखरेच्या पाण्या ऐवजी मी मधाचा विचार करत होतो. <<<
अस्वलं नाहीत ना आजूबाजूला...?
बादवे.. धन्स.. मोबाईलवरुन जमलं..
मला फक्त लॅपटॉप वरुनच फोटो अपलोड करता यायचे.. पण तो घरी फक्त शनिवारी, रविवारी आणायचो..
आणि मोबाईलवरुन मायबोलीच्या सर्व्हरवरचे.. (पण त्यात Image Quality) ची वाट लागायची.
हे बरं झालं.. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद...
अस्वलं नाहीत ना आजूबाजूला...?
अस्वलं नाहीत ना आजूबाजूला...?
(No subject)
imgur वरुन फोटो टाकता येतो का ते पाहीेले. मला तर फोटो दिसतो आहे. अजिबात किचकट नाही. इमेजच्या शेजारीच HTML Code आहे. तोही अगदी एका ओळीचा. कॉपीचे बटन क्लिक केले की झाले. आता ही इमेज दिसतेय का सांगा. म्हणजे गुगल फोटो वापरण्यापेक्षा imgur वापरता येईल.
(No subject)
आजपुरते खुप झाले. चार दिवस या
आजपुरते खुप झाले. चार दिवस या फोटोच्या प्रॉब्लेमने फार हैराण केले होते. मला वाटते imgur हे यावरचा उत्तम उपाय आहे असे वाटते. (कुणाला फोटो दिसला नाही की मग मात्र पुनश्च हरि ओम करावे लागणार)
दिसला दिसला.... डोळे जबरदस्त
दिसला दिसला....
डोळे जबरदस्त
(No subject)
https://photos.google.com
https://photos.google.com/share/AF1QipOpyiR7IimnWI8Rfs2K1frm3W-Tlf_tHLzX...'
https://photos.app.goo.gl
https://photos.app.goo.gl/L9ZdAS4K59K112cc9
आज नवा प्रयोग आणि प्रयत्न
मला जमलाय का?
आता imgur चा वापर.
आता imgur चा वापर https://m.imgur.com/gallery/ijnJYHl
जागूताई फोटो दिसत नाहीए.
जागूताई फोटो दिसत नाहीए.
रेणु तुमचाही फोटो दिसत नाही.
तुम्हां सर्वांचे सुंदर सुंदर
तुम्हां सर्वांचे सुंदर सुंदर फोटो पहावे आणि गप गुमान रहावे
निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत
निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आहे. ही लहानशी गवताची काडी.
मी किती वेळा ठरवलं की
मी किती वेळा ठरवलं की संकासुरांच्या फुलांचा गुच्छ करुन पाहू पण जमले नाही. आता संकासुराच्या झाडानेच गुच्छ करायला सुरवात केली आहे. एका लहानशा काडीवर हा गुच्छ असतो. रोज या गुच्छांमधे वाढ होतेय. हा काही प्रॉब्लेम आहे का ते माहित नाही पण दिसतात छान.
निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत
निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आहे. ही लहानशी गवताची काडी. >>> अप्रतिम फोटो.
संकासुर >>> फार सुरेख रंग, नजाकत.
जागूताई फोटो दिसत नाहीए.
रेणु तुमचाही फोटो दिसत नाही. >>> मलाही नाही दिसत.
शाली तुमचे सर्व फोटो दिसत
शाली तुमचे सर्व फोटो दिसत आहेत.
रेणूताई, जागू तुमचे फोटो न दिसता लिंक्स कॉपी पेस्ट झाल्या आहेत फक्त.
ट्रायल
शाली, तुम्ही सुचवलेल्या CTRLQ द्वारे ट्रायल फोटो. Thanks, its easy!
White browed wagtail female @Kamshet
Canon powershot SX60hs
दोन साळुंक्यांच्या फोटोंच्या
दोन साळुंक्यांच्या फोटोंच्या मधल्या फोटोतला पक्षी गोड आहे एकदम. कुठला पक्षी आहे?
Red Pierrot @ओवळेकर वाडी ठाणे
Red Pierrot @ओवळेकर वाडी ठाणे
दोन साळुंक्यांच्या फोटोंच्या
दोन साळुंक्यांच्या फोटोंच्या मधल्या फोटोतला पक्षी गोड आहे एकदम. कुठला पक्षी आहे? >>> माझंही तिकडेच लक्ष गेलं, गोंडस आहे.
वर्षा फोटो पूर्ण दिसत नाहीये. मगाशी किंचित दिसला, पाने दिसली पण आता अजिबात नाही दिसत.
दिसला दिसला, छान किती दिसते फुलपाखरू.
फोटो दिसत आहेत. फुलपाखरू
फोटो दिसत आहेत. फुलपाखरू सुंदरच आहे.
कामशेतच्या फोटोची रंगसंगती किती छान जुळून आली आहे. मस्तच.
वर्षा, अन्जू तो चिरक आहे.
वर्षा, अन्जू तो चिरक आहे. इंडीयन रॉबीन. खुप स्लिम पक्षी आहे पण खुपदा वाऱ्याकडे छाती करुन पिसे फुलवून बसतो.
.
हीला भांगपाडी मैना नाव कुणी
हीला भांगपाडी मैना नाव कुणी दिले असेल? भांग पाड गं मैना असं नाव हवं. नेहमी डोक्यात राख घालून असते.
हीला ब्राम्हणी मैना असं नाव देखील आहे. ते शोभते. कारण हीच्या डोक्यावर छान संजाब असून मानेवर शेंडी सोडलेली असते.
आहे की नाही संजाब आणि रुळणारी शेंडी?
Img dev="'https://photos
अप्पा, धन्यवाद, फोटो द्यायला जमले. गुरुग्राम इथे भेटलेली दुरंगी बाभूळ.
आता फोटो देता येताहेतच तर हात धुवून घेतेच
तिथे बहरलेली मधूमालती
घरचे चिनी गुलाब
आंबोलीत भेटलेला पान किडा. Microcentrum Retinerve.
त्याचा चुलत भाऊ.
दुरंगी बाभूळ मस्तच.
दुरंगी बाभूळ मस्तच.
Pages