निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सनबर्ड भारी दिसतोय.
त्यांच्या चोचीमुळे आणि डोळ्यांमु भांडखोर आणि उग्र दिसत असावेत. मी त्यांना सदैव एकटे एकटेच पाहीले आहे. हा एक त्याचा क्लोजप.
80648AD1-FE31-4B2A-B282-BD9E41612D13.jpeg

ऋतूराज आज मी फ्रॉग हॉपरला त्याच्या थुंकीतून बाहेर काढले शेवटी. नेटवर वेगळेच फोटो होते याचे, मला वेगळाच दिसला. मी दोन तिन जणांना बाहेर काढले पण तसेच होते.
59921FF0-1CFD-45F9-9204-F3ADAEB85E33.jpeg

देवकी ताई,
समई, Pagoda flower
Clerodendrum paniculatum

IMG_20190821_212537.jpg लवासा तील काही दृश्ये IMG_20190821_212651.jpg

Pagoda flower...... धन्यवाद!
मागे एका निगकर्णीने सांगितले होते खरे.

सनबर्ड भारी दिसतोय.
त्यांच्या चोचीमुळे आणि डोळ्यांमु भांडखोर आणि उग्र दिसत असावेत. >>> हो. मला डोळे उग्र दिसतायेत. चोच आवडली अणकुचीदार आहे. मारली आपल्याला तर मात्र रक्त येईल Lol

बाकी फोटोही मस्त.

सुप्रभात
ह्या पर्पल सनबर्ड ची मादी सतत दिसते बाल्कनीत, Ruellia आणि Jamaican spike च्या इवल्याश्या फुलातील मधुरस घेताना. पण नरोबा कधीच दिसले नाहीत अजून.

हे अर्धे फुल मला अलिबागच्या समुद्रकिनारी दिसले होते. गुगल व्यतिरिक्त काहीच पर्याय नाही का इथे फोटो टाकायला?

जागूताईने विचारले होते की येथे मोबाईलवरुन गुगल फोटोमधला फोटो शेअर करता येईल का? मी प्रयत्न केला आहे. फोटो दिसतोय की नाही ते सांगा.

गुगल फोटो ॲपमधील फोटो ओपन करा. शेअरचे बटन दाबा. आलेल्या अॉप्शनमधून क्रिएट लिंक निवडा. लिंक कॉपी झालेली असेल. ही लिंक खाली दिलेल्या साईटवर पेस्ट करा. HTML Code मिळेल. तो मायबोलीवर प्रतिसादात पेस्ट करा. खालील साईट बुकमार्क करुन ठेवली तर अडचण येत नाही. अजुन सोपी पध्दत सापडली की येथे डकवेन.
CTRLQ

आता वरील फोटो दिसला नाही तर मला हसू नका. Wink

यात एक Direct Link मिळेल व एक Image embed code मिळेल. यातला कोड कॉपी करायचा आहे. ही साईट गुगलचीच असावी.

वा शालीदा, भारी फोटो
आता तुमचा हा जो फोटो आहे चतुराच्या डोक्याचा (मॅक्रो स्टाइल ना?) तो तुम्ही तुमच्या निकॉनने काढलाय की कॅननने?

लय भारी फोटो शाली, सर्व दिसतायेत.

चतुर क्लोज अप बाब्बो, घाबरले ना मी.

ऋतुराज अर्धफुल फोटो सॉलिड.

वर्षा ते सिक्रेट आहे माझे. Lol

Nikon Coolpix P900 ने काढला आहे फोटो. क्रॉप करुन Snapseed ॲपवर ट्युन केला आहे.
Programmed मोडवर फोटो काढला आहे. ॲटो फोकस मॅक्रोवर ठेवला होता.
तुमच्यासारखे फुलपाखरांचे फोटो काढणे काही जमत नाही मला. खुप प्रयत्न केला. Sad
फुलाफूलांचे टीशर्ट देखील घालून पाहीले मॉर्नींगवॉकच्या वेळी. Lol

थॅंक्यू अन्जू! मला चतूर गालात हसतोय असेच वाटते नेहमी. फार सुंदर रंग असतात त्यांचे.

शिर्षासन. Wink

ऊप्स मी सिक्रेट विचारलं होय! Lol धन्यवाद शेअर केल्याबद्दल
कारण फारच सुरेख फोटो असतात ते अगदी बारीकसारीक डीटेल्सही दिसतात. मला नाही जमलेले अद्याप ते.

>>Programmed मोडवर फोटो काढला आहे. ॲटो फोकस मॅक्रोवर ठेवला होता.

हेच पाहिलं पाहि़जे एकदा कसं करायचं ते. मी प्रोग्रॅम्ड मोड कधीच वापरला नाहीये.

फोकस मॅक्रोवर ठेवा. Noice Reduction कमी ठेवा. (फोटो क्लिन येण्यासाठी कॅमेरा फोटो किंचीत ब्लर करतो व डिटेल्स जातात मॅक्रोमधले.) आणि ट्रायपॉड वापरला तर VR अॉफ करायला विसरु नका. मीही शिकतो आहे अजुन.

Pages