अंदाज किती घ्यावा?

Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51

बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात रूबी हॉलच्या बाहेर चौकात(खरं तर तिठ्यावर) सकाळी एक ब्रेकफास्ट गाडी उभी असते. तो हीरो पोह्यात सांबार घालून देतो.
भ यं क र त्रास होतो मला ते पाहून.

कडधान्यांची पाभा >>
मला एकीने सांगितले होते की अख्खे हिरवे मूग गाळ शिजवून घ्यायचे, हटायचे आणि भाजीत घालायचे. त्याने चव चांगली लागते म्हणे.
मी त्यावेळी अगदीच नवशिकी असल्यामुळे बरेच प्रयोग करायचे. पण मूग घालून केलेली पावभाजी फारच भयंकर झाली होती.
पावभाजीत कुठलीही कडधान्य बिग नो नो!

पोहे सांबार हे भयंकर कॉम्बिनेशन पुण्यात पाहायला मिळतं.पोहे कोरडे पडतात घश्याला म्हणून काढलेला तोडगा असावा.मी कधीच खाल्लं नाही.आमचा कॅन्टीनवाला पोह्यांवर चटणी घालून देतो.

आला का हा धागा परत वर? Rofl

दोडक्याची ही भाजी खाल्ली की झाली ना पाव भाजी.>>>>>> नाही त्याला भाजी-पाव म्हणावा... Proud

नाही त्याला भाजी-पाव म्हणावा.>>>>>>करेक्ट

पोहे हे पोहे असतात. कांदे पोहे, बटाटे पोहे खावेत. त्यात कोब्या, फ्लावरी, मश्रुम, वांगे का घालावे?
आणि वर इडली डोस्याच्या चटण्या-सांबार Uhoh

प्रतिसाद पाहता धाग्याचं नाव बदलायला सांगावं का?

पोहे सांबार हे भयंकर कॉम्बिनेशन पुण्यात पाहायला मिळतं. >>
हाय कम्बख्त तुने खाये ही नही.... ( दिवे घ्या हो..)
मृत्यंजयेश्वर च्या समोर स्वीकार मद्धे फक्त पोहे सांबार खायलाच जाते मी....
एकदा खाउन बघाच....

मसाला म्हणजे मसाला.छोल्यात चाट मसाला किंवा पंजाबी मसाला असावा ही आपली कल्पना आहे.योग्य अर्थ पंजाब प्रांतात प्रकर्षाने तिथे घराघरात वापरले जाणारे मसाले वापरून तिथल्या हवेला सूट होणारी छोले हा मुख्य घटक असलेली भाजी इतकाच आहे.त्यामुळे चेन्नईमध्ये छोले बनवल्यास त्यात सांबार मसाला घालण्याचा नैतिक हक्क प्राप्त होतो.(हेच पास्ता या डिश च्या व्याख्येत मुख्य घटक चीज/व्हाइट सॉस असल्याने मोहरी कडीपत्ता फोडणी देऊन झणझणीत सांबर मसाला चिंच कोळ घालून पास्ता बनवणे मात्र नैतिक दृष्ट्या अन्यायकारक असेल ☺️☺️☺️☺️)
सिमला इथे चांगल्या हॉटेलात पंजाबी (मला आवडतात तश्या पुण्यात बनतात तश्या नारिंगी ग्रेव्ही, भरपूर पाप आणि काजू/मलई वगैरे वाली) भाज्या मिळतील हा माझा समज तिथले लोकल मसाले वापरून चविष्ठ आणि घट्ट बनलेल्या फ्लॉवर च्या भाजीने हणून पाडला होता.सेम विथ चंदिगढ.(पंजाबी खावे तर पुण्यातच बै. नॉर्थ ला खाण्यात पॉईंट नै ☺️☺️☺️)

(मला आवडतात तश्या पुण्यात बनतात तश्या नारिंगी ग्रेव्ही, भरपूर पाप आणि काजू/मलई वगैरे वाली) >> आं ! हे कसे काय जमवतात ब्वा पुण्यनगरीत Proud

>>> सांबर मसाला चिंच कोळ घालून पास्ता बनवणे मात्र नैतिक दृष्ट्या अन्यायकारक असेल
शेझवान चकली खाल्ली नाही का कधी? बरं, पनीर टिक्का पिझ्झातरी? Proud

त्यावरून आठवलं, 'अमेरिकन चॉपसुई' नावाचा पदार्थ अमेरिकनही नसतो आणि चायनीजतर त्याहून नसतो हा शोध मला अमेरिकेत आल्यावर लागला होता. Proud

अनु, अशीच चर्चा काल मी घरी करत होते जॅमवरून.
किसानचा मँगो जॅम आणलाय घरी. कॉस्टकोचा अतिशय जबरी जॅम ,ऑर्गॅनिक फ्रुट्स, ऑर्गॅनिक शुगर वापरून केलेला , त्यापुढे तुच्छ वाटु लागलाय. किसानच्या प्रचंड साखर घातलेल्या जॅमची लहानपणापासून सवय झालेली बहुदा.
तेच वॅनिला/व्हनिला/व्हेनिला फ्लेव्हर बाबतीत. अगदी त्या शेंगेतून बीया काढून (ह्यापेक्षा अ‍ॅथेंटीक काय असणार खर तर) केलेल्या आईसक्रीम पेक्षा , कोल्हापुरातल्या सोळंकीवाल्याने फेक इसेन्स वापरून (जो फ्लेव्हर जरासुद्धा ऑथेंटीक च्या जवळपास नाही) तोच अजुनही चांगला लागतो.

>>>>त्यामुळे चेन्नईमध्ये छोले बनवल्यास त्यात सांबार मसाला घालण्याचा नैतिक हक्क प्राप्त होतो.(<<<<<<
पण मग मेनु कार्ड्वर , चेन्नई छोले लिहा.

मग ह्याच हिशोबाने, पास्ता सांबार घालून( लाल सॉस म्हणून) कोणी दिला तर ते नैतिक्दॄष्ट्या चुकीचे? वा. तुम करे सो कायदा? खायचे तुम्हाला नसेल तर तुम्हाला काय करायचीत नैतिकता ठरवणे वगैरे.... Wink

> २५ ते ३० वयाची ५ मुली आणि ९ मुलगे असे एकूण १४ जण
> रात्रीच्या जेवणासाठी

• व्हिस्की (२ बाटल्या पुरेल का?)

• मुग/चणाडाळ/मसाला शेंगा/वेफर्स
• मोनॅको+चीज
• उकडलेली अंडी (प्रत्येकी २)
• चिकन टिक्का (प्रत्येकी ३ येतील एवढे)
• पनीर टिक्का (प्रत्येकी ३ येतील एवढे)

• चिकन बिर्याणी (किती लागेल? १किलोची पुरेल का?)

• केक

दारू आणि स्टार्टर्सवरच भर असणार आहे. मेनू आणि अंदाज ठिकय का?

अ‍ॅमी, हे तुम्ही "दारू कशी पिता" अशा काहीशा नावाच्या धाग्यावर विचारलंत तर उत्तरं मिळायची शक्यता जास्त आहे.

ऍमी, माझ्याकडे होणाऱ्या पार्टीजच्या अनुभवावरून प्रतिसाद देते आहे.

• व्हिस्की (२ बाटल्या पुरेल का?) - एज ग्रुप पहाता ही पार्टी पहाटेपर्यंत चालेल, त्यामुळे 2 बोटल्स पुरणार नाहीत. शिवाय फक्त व्हिस्की असं आपण ठरवून चालत नाही. व्होडका, रम, ब्रिजर / बिरा असे ऑप्शन आणून ठेवावे लागतील. किंवा मग इन्व्हाईट देताना ब्रँड आणि टाईप विचारावा लागतो. या बरोबर सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा / टॉनिक वॉटर, फ्रेश ज्यूस आणि खूप सारे आईस क्यूब्ज तयार ठेवायचं लक्षात ठेव.

• मुग/चणाडाळ/मसाला शेंगा/वेफर्स - सगळे कोरडे आणि तेलकट पदार्थ आहेत. हिरवे मूग मोड आणून त्याच चाट बनवलं तर हेल्दी आणि पोटभरीचा होतं. मग याबरोबर चिप्स किंवा मसाला शेंगदाणे चालतील.
• मोनॅको+चीज - मस्त ( मी माझ्या पुढच्या पार्टीसाठी चीज बरोबर मोनॅको ठेवायचं लक्षात ठेवते)

उकडलेली अंडी (प्रत्येकी २) - खूप झाली

• चिकन टिक्का (प्रत्येकी ३ येतील एवढे) - हे लोक चिकन संपलं तर पनीर खाणार त्यामुळे पुरतील, पण रात्रभर पार्टी करणाऱ्यांना अजून चालतील
• पनीर टिक्का (प्रत्येकी ३ येतील एवढे) - प्युअर व्हेजचा काऊंट जास्त असेल तर प्रत्येकी 3 कमी पडतील कारण चिकनवाले दोन्हीकडे हात घालणार Happy

• चिकन बिर्याणी (किती लागेल? १किलोची पुरेल का?) - 1 किलोमध्ये 7-9 adults खातात. स्टार्टरचा काऊंट पण बेतशीर आहे त्यामुळे दीड किलो लागेल. पण मग यात व्हेज खाणारे नाहीत का?

• केक - आमचा ग्रुप 12 जणांचा आहे. आम्हाला 1kg लागतो. कधी थोडा उरतोसुद्धा

दारू आणि स्टार्टर्सवरच भर असणार आहे. - मग बुझची क्वांतीती आणि व्हरायटी वाढवावी लागेल

भरत, ओके तो धागा शोधून तिकडेपण विचारते Lol
===

मीरा,

• व्हिस्की सगळेजण पितात. त्याखेरीज शक्यतो जीन. व्होडका, बिअर वगैरेवालं नाहीय कोणी. पण तरी ब्रँड आणि टाईप एकदा कन्फर्म करून घेते. आणि ३ किंवा ४ बाटल्या आणते.
फक्त पाणी आणि आईसक्युब्जचाच माझा विचार होता. पण सोडा, टॉनिक वॉटरबद्दल विचारते.
• मुग/चणाडाळ/मसाला शेंगा/वेफर्स - यापैकी एकच काहीतरी असणार होतं पण 'हिरवे मूग मोड आणून त्याच चाट बनवलं तर हेल्दी आणि पोटभरीच' हेदेखील चांगलं वाटतंय.
Lol
• ओके २० अंडी?
• ओके. मग चिकन टिक्का प्रत्येकी ५ करते
• फक्त शाकाहारी एकच आहे. त्यामुळे पनीर टिक्का प्रत्येकी ३च ठेवते
• चिकन बिर्याणी दीड किलो. एका शाकाहारीसाठी एक प्लेट वेज बिर्याणी Lol
• केक १ किलो पुरेल बहुतेक.

खूप आभार Lol

२५ ते ३० वयाची ५ मुली आणि ९ मुलगे असे एकूण १४ जण
> रात्रीच्या जेवणासाठी

• व्हिस्की (२ बाटल्या पुरेल का?)

>>>

१००% नाही पुरणार.

शिवाय स्टार्टर्स आणि ड्रिन्क्स असल्यामुळे जेवण कमी खाल्लं जातं (असा माझा अनुभव आहे) म्हणून या २ गोष्टी जास्त हव्यात

> शिवाय स्टार्टर्स आणि ड्रिन्क्स असल्यामुळे जेवण कमी खाल्लं जातं (असा माझा अनुभव आहे) > हो त्यामुळेच मेन कोर्समधे फक्त बिर्याणी ठेवलीय.

आभार रिया Lol बाटल्या दुप्पट करते!

Pages