चौकीदार
आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.
इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्यात लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"
सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"
एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"
त्यानंतर होणार्या चोर्यांवर आणि पडणार्या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्या-मार्या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.
उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.
आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!
असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!
चाचणीस परवागनी दिलि नव्हती
चाचणीस परवागनी दिलि नव्हती म्हणून बोंबलणारा संघाचा हस्तक आहे. तोच २०१२ ला चाचणीची काही गरज नाही असे स्वतः म्हणाला होता. आज पढवल्यासारखे बोलत आहे.....>>>>>>>>>>> हेच का ते
हाच तो चोर
हाच तो चोर
https://www.indiatoday.in
https://www.indiatoday.in/india/story/agni-v-drdo-chief-dr-vijay-kumar-s...
Does DRDO have the capability of destroying satellites in space?
VKS: Today, India has all the building blocks for an anti-satellite system in place.
We don't want to weaponise space but the building blocks should be in place. Because you may come to a time when you may need it. Today, I can say that all the building blocks (for an ASAT weapon) are in place. A little fine tuning may be required but we will do that electronically. We will not do a physical test (actual destruction of a satellite) because of the risk of space debris affecting other satellites.
“They (China) should not have
“They (China) should not have done that. It’s against international convention…. we are not supposed to weaponise outer space… by killing a satellite, you create much more debris. Today about 8,000 objects are there in orbit. By blasting one satellite, you create another few hundred (objects). I don’t know why they did that.”
Madhavan Nair, Former ISRO Chairperson
२०१२ ला गरज नव्हती अस कोणी
२०१२ ला गरज नव्हती अस कोणी म्हणाला आणि तुम्ही ते ऐकलं , तुम्ही राज्यकर्ते म्हणून काही निर्णय घेत नव्हते का कि दुसऱ्यांचाच ऐकून करायचे सगळे .
~ असे कोणी लल्लुपंजू म्हणाला नाही, हा कोणी तोच शास्त्रज्ञ आहे जो आज म्हणतोय कि युपीए ने परवानगी दिली नव्हती. ह्याला आता निती आयोगाच्या मांडीवर बसवून खोटीनाटी चिवचिव करायला कुठून हवा भरली जात आहे ते काय गुपित आहे क?
आता इस्रो स्वत:च म्हणत असेल कि चाचणीची गरज नाही तरी मुद्दाम चाचणी घ्यायला तेव्हाच्या राज्यकर्त्यांना आजच्या राज्यकर्त्यांसारखे वेड लागलेले नव्हते हो. तुमचे कुजबुज संघी खोटेनाटे चालून जायचे दिवस संपलेत. आता प्रत्येक बातमी व्यवस्थित कम्पाइल केलेली असते आणि लोकांना पटकन खरेखोटे करता येते. ह्या बोटाची थुंकी त्या बोटावर करणाराची सगळी बोटे उघडी पडतात.
< तुम्ही राज्यकर्ते म्हणून
< तुम्ही राज्यकर्ते म्हणून काही निर्णय घेत नव्हते का कि दुसऱ्यांचाच ऐकून करायचे सगळे .>
दुसर्याने सांगि तलेलं धुडकावून घेतलेला निर्णय म्हणजे नोटाबंदी.
दुसरा - रिझर्व बँक. फक्त रघुराम राजन नव्हे, ते गेल्यावर सुद्धा बोर्ड मेंबर्स हेच म्हणालेले.
घ्या! खोटारडा पडला तोंडावर
घ्या! खोटारडा पडला तोंडावर धप्पकन! हा सारस्वत एक नंबर संघी भामटा आहे.
New Delhi: Refuting reports that the Manmohan Singh government refused to allow the Defence and Research Development Organisation (DRDO) to conduct a test of its anti-satellite capabilities, former national security adviser Shivshankar Menon told The Wire, “This is the first I have ever heard of it. Saraswat never asked me for permission for an ASAT test.”
https://thewire.in/security/former-nsa-shivshankar-menon-says-drdo-head-...
रणजित चितळे यान्चे लेख
रणजित चितळे यान्चे लेख वाचुनसुद्धा अनेकाना रफालचे कन्त्राट समजलेले दिसत नाही. असो.
पाच वर्षे संधी मिळाल्यावर
पाच वर्षे संधी मिळाल्यावर जनतेसाठी काही ठोस असे काम केलेले नाही. गोरक्षा, गोमांस, अनेक विरोधकांच्या गुढ हत्या, हल्ले...
करता येणे शक्य आहे तेव्हढी विकासाच्या आकड्यांची फेर-फार केली. बिनदिक्कत खोटे बोलण्याच्या बाबतीत मोदी सरकार सर्वप्रथम येतात.
देशाबाहेर गेलेला अमाप काळा पैसा काही परत आणता आलेला नाही... सुरक्षेच्या बाबत बोंबच आहे. उरी, पठाणकोट, पुलवामा... लष्करी तळांवर हल्ले, लष्करी ताफ्यांवर हल्ले झालेत. पोलिस ठाण्यांवर आणि पोलिस अधिकार्यावर सुद्धा प्राणघातक हल्ले झाले आहेत.
शेतकर्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत... आणि नोटबंदी सारखे कुठलाही पुढचा मागचा पुढचा विचार न करता केलेले अघोरी उपाय.
या सर्व गोष्टींचे मार्क्स मिळणार नाहीत हे एव्हाना भाजपा नेतृत्वाला जाणवले आहे. बालकोट निष्प्रभ झाल्यावर काही तरी जोरदार करायला हवे... मग हे उपग्रह नष्ट करण्याचे तंत्रज्ञान. हे सर्व ऑपरेशन डेसपरेशनचा भाग आहेत अशी संका येते आहे.
निवडणूक आचारसंहिता लागू झालेली असतांना अशी काय आणीबाणीची परिस्थिती होती कि स्वत: पंतप्रधानांना ऑपरेशन शक्ती (डेस्परेशन) "यशस्वी" झाले हे सांगायची गरज पडली. पक्षिय स्वार्थासाठी ISRO/ DRDO यांचा"सुद्धा" अगदी पद्धतशीरपणे वापर होतो आहे. काहीतरी टोलेजंग घोषणा करावी जेणे करुन मतदार आकृष्ट होतील हा लहरीपणा धोकादायक (स्पेस डेब्री कुठे जाणार - तिथेच राहिल का पृथ्वीवर अलगद येणार , येताना नष्ट होणार) आहे. पुढे यांना पुन्हा संधी मिळाली तर झालेल्या चुकांमधुन शिकतील आणि अशा कसरती करण्यापेक्षा जनतेसाठी काही ठोस कामे करतील अशी अपेक्षा ठेवतो.
ज्या लोकशाही मार्गाने तुम्ही सत्तेवर आलात त्या लोकशाही मधे निवडणूक आचारसंहिता खुप महत्वाची आहे आणि त्याचे पावित्र्य जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आचारसंहितेचा भंग पहिल्यांदाच झालेला नाही, किंवा पुढे होणारच नाही असेही नाही. मला आचारसंहितेशी काही घेणे देणे नाही असे शिकलेल्या लोकांनी म्हणणे म्हणजे असंस्कृतपणा, निव्वळ गुंडगिरी आणि लोकशाही मुल्यांप्रती अनास्था आहे.
एक छान लेख वाचण्यात आला,
https://www.deccanherald.com/opinion/first-edit/desperation-is-showing-m...
भारताने अवकाशातील एक सॅटेलाईट
भारताने अवकाशातील एक सॅटेलाईट पाडल्याला ४८ तास होऊन गेले तरी, "सबुत मांगो गॅंगच्या" एकाही सदस्याने त्या पाडलेल्या सॅटेलाईट बाबत एकही पुरावा अजूनही मागितला नाही. आश्चर्यच आहे !
--
बाकी मोदी सरकारने राजकिय, सैनिकी किंव्हा वैज्ञानिक क्षेत्रात कोणती ही नविन कामगिरी केली कि अश्या प्रकारची कामगिरी आम्ही आमच्या सत्ताकाळात देखील केली होती मात्र आम्ही ती गुप्त ठेवली होती. असा भंपक दावा करण्याची मानसिकता कॉंंग्रेसी उपटसुंभ कधी सोडणार आहेत हे देवजाणे !
former national security
former national security adviser Shivshankar Menon told The Wire,
--
Oh. Let us check what
Oh. Let us check what bbcnewshub has to say about this.
आज घरातला गॅस संपला तर
आज घरातला गॅस संपला तर बायकोने चक्क लॅपटॉप घेतला आणि मायबोली साईट ओपन करून स्क्रीनवर पोळ्या भाजल्या. आता दुपार झाले पण डब्यातल्या पोळ्या अजूनही तशाच गरमा गरम आहेत. मी लाभार्थी ही माझी मायबोली.
चौकीदार!!!
चौकीदार!!!
https://www.loksatta.com/mumbai-news/son-of-farmers-who-commit-suicide-i...
सर्वानी पहिले हे सांगा देशाचे
सर्वानी पहिले हे सांगा देशाचे भले झाले पहिजे की ठराविक राजकीय पक्षाचे .
देश म्हणजे भाजप किंवा मोदी
देश म्हणजे भाजप किंवा मोदी इतकीच मर्यादित समज असलेल्या लोकांनी असे प्रश्न विचारु नये.
.एकून २२० करोड चं फंडींग झालं
.एकून २२० करोड चं फंडींग झालं पोलिटीकल पार्टीज ना त्यातला एकट्या भाजपाला २०५ करोड होतं!!
(No subject)
.
जिंकणाऱ्या घोड्यावर पैसे
जिंकणाऱ्या घोड्यावर पैसे लावले जातात साधं उत्तर आहे
चला म्हणजे मोदी हा फक्त सध्या
चला म्हणजे मोदी हा फक्त सध्या जिंकणारा घोडा एव्हढीच किंमत आहे तर
(No subject)
वाड्रा नही आनंदीबेन की बेटी
वाड्रा नही आनंदीबेन की बेटी निकली चोर !
बाजार मुल्य से 92% कम दामों में 422 एकड़ ज़मीन हथिया ली।
अब बोलो!
चौकीदार काम्म कर्तो तो आहे,
चौकीदार काम्म कर्तो तो आहे, फक्त मध्यम वर्ग विरुद्ध याच्या पॉलिसी आहेत, आज याच्या वागण्यामुळे समाजातील प्रत्येक वर्ग दुखावला गेला आहे, याचे सरकार फक्त काही जाती साठी काम करते, काही जातींसाठी त्यांच्या मतांसाठी बाकी सर्वांवर निर्लज्जपणे याने अनेक अन्याय केले आहेत, अगदी शाळांतील मुले पण याच्या विरुद्ध आहेत cbse मधील मुलांनी पेपर फुटल्यामुळे पुन्हा परीक्षा घानीबद्दल चौकीदार विरुद्ध आंदोलने केली होती, अर्थात चौकीदार
१०वी चे पेपर पण फुटण्यापासून
१०वी चे पेपर पण फुटण्यापासून वाचवू शकला नाही, याने जातीं जतिनमध्ये भांडणे लावली आहेत, बरे याचा कारभार तर असा की आजही स्कॉलरशिप चे पैसे अगदी आधार जोडून पण गेल्या ५ वर्षात कधीच मिळाले नाहीत हा अनुभव माझ्या मुलाला आला तेव्हा डायरेक्ट बेनेफित ही चौकडातीची फक्त आणखी एक घोषणा आहे हा अनुभव आहे...
BJP
BJP
Verified account @BJP4India
जब अभिनन्दन की घटना घटी तो देश के सभी दलों को कहना चाहिए था कि हमें देश की सेना पर गर्व है की उसने F16 मार गिराया।
उसकी बजाय ये अभिनन्दन वापस कब आएगा, इसपर चल पड़े: प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी #ModiSpeaksToBharat
8:50 AM - 29 Mar 2019
BJP
Verified account @BJP4India
9h9 hours ago
उस दिन रात को विपक्ष ने कैंडल लाइट मार्च निकलने और पुलवामा हमले को मुद्दा बनाने का षड्यंत्र तैयार कर लिया था। वो तो शाम को 4-5 बजे तक पाकिस्तान के प्रधानमंत्री ने अभिनन्दन की रिहाई की घोषणा कर दी। जिससे इनकी योजना धरी की धरी रह गयी: प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी #ModiSpeaksToBharat
बघा एका फायटर पायलटचं मोल किती आहे.
<<आता इस्रो स्वत:च म्हणत असेल
<<आता इस्रो स्वत:च म्हणत असेल कि चाचणीची गरज नाही तरी मुद्दाम चाचणी घ्यायला तेव्हाच्या राज्यकर्त्यांना आजच्या राज्यकर्त्यांसारखे वेड लागलेले नव्हते हो.>> कुठल्या शहाण्याने तुमहाला सांगितलं कि चाचणीची गरज नाही म्हणून , एक तरी बातमी दाखवा कि जेंव्हा ISRO ने सांगितलं कि आम्ही सरकारच्या दबावाखाली चाचणी केली , देशाला ह्या तंत्रज्ञाची गरज नाही , नाही तर मान्य करा कि आम्ही निर्णय घ्यायला सक्षम नव्हतो.
<<वाड्रा नही आनंदीबेन की बेटी
<<वाड्रा नही आनंदीबेन की बेटी निकली चोर !
बाजार मुल्य से 92% कम दामों में 422 एकड़ ज़मीन हथिया ली।>>
अहो निदान एकादी वायर, स्क्रोल, ndtv फारच नाही तर लोकसत्ता, लोकमत च्या बातम्या ची लिंक देत जा म्हणजे डिटेल समजतील नाही का , जसा गिजरत मध्ये काँग्रेस च्या तिकिटावर उभे राहणारे बेरोजगार हार्दिक पटेल ह्यांना म्हणे त्यांच्या वर असलेल्या गंभीर गुन्हांमुळे उभा राहता येणार नाही..
https://www.ndtv.com/india-news/hardik-patel-cant-contest-polls-as-plea-...
{एक तरी बातमी दाखवा कि
{एक तरी बातमी दाखवा कि जेंव्हा ISRO ने सांगितलं कि आम्ही सरकारच्या दबावाखाली चाचणी केली}
केली या बोटाची थुंकी त्या बोटावर.
जे दोघे आता भाजपच्या वळचणीला इल्यावर, आधीच्या सरकारने परवानगी दिली नाही, त्यांचीच २०१२ मधली वक्तव्य दिलीत चाचणीच्या विरोधातली. तेही राजकीय नव्हे, तर तांत्रिक / वैज्ञानिक कारण देणारी.
त्यांनी परवानगी मागितलीच नव्हती असं तेव्हाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणताहेत.
तरी यांचं तेच.
<<त्यांनी परवानगी मागितलीच
<<त्यांनी परवानगी मागितलीच नव्हती असं तेव्हाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणताहेत>>
ह्याच्या २ शक्यता होत आहेत मग , एक तर हे कि तेव्हाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खोटे बोलत आहेत नाही तर ह्या सरकारच्या काळात आपण हे तंत्रज्ञान अवगत करू शकलो, त्यावेळेस तेवढं काम झाला नव्हत ह्या संदर्भात , आता बोला नक्की कोण खरं बोलतंय
आपण आपल्याच पायावर धोंडा पाडत
आपण आपल्याच पायावर धोंडा पाडत नाही ना? उपग्रह नष्ट करण्याचे तंत्रज्ञान सिद्ध करण्याच्या आटापिटात आपण किती स्पेक स्पेस जंक निर्माण केला असेल हा प्रश्न अस्थानी आहे. आज पाठवलेले उपग्रह काही काळानंतर / वर्षानंतर निकामी होतात, ते सर्व स्पेस जंक मधे मोडते. पण असे कृत्रिम रित्या नष्ट केलेले उपग्रहांचे हजारो/ लाखो छोटे भाग तयार होतात. भविष्यातल्या मोहिमांसाठी हे अडचणीचे ठरतील.
नोटबंदीचा निर्णय खुप खोलवर विचार करुन घेतला गेला होता... खुप आधी पासुन तयारी केली होती... पण अगदी साध्या खाचा खळगा पण लक्षात नाही घेतल्या हे सत्य आहे. ATM मशीन नव्या नोटांच्या आकाराला जुमानत नव्हते, ते तयारच नव्हते. या व अशा बाळबोध चुका नंतर लक्षात आल्या.
त्याच धर्तीवर स्पेस जंक चा विचार केला गेला असेल असे म्हणणे धाडसी पणाचे ठरेल. आली लहर आणि केला कहर अशातला प्रकार आहे. निवडणूकीच्या हंगामात असे प्रश्न विचारणे योग्य नाही. स्पेस जंक/ स्पेस डेब्री बद्दल छोटी माहिती,
http://www.esa.int/spaceinvideos/Videos/2017/04/Dealing_with_space_debris
Pages