चौकीदार
आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.
इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्यात लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"
सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"
एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"
त्यानंतर होणार्या चोर्यांवर आणि पडणार्या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्या-मार्या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.
उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.
आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!
असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!
ह्याच राष्ट्रीय सुरक्षा
ह्याच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या अध्यक्षाना विचारा कि आपल्या शास्रज्ञानांना कोणी मारले
https://www.ndtv.com/india-news/11-indian-nuclear-scientists-died-unnatu...
सुप्रसिद्ध सायंटिस्ट नंबी नारायण ह्यांना का काँग्रेस सरकारने का खोट्या केस मध्ये अडकवले , का त्या वेळेस च्या केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने आपल्या शास्रज्ञानांना थर्ड डिग्री ने छळ केला ..
https://www.business-standard.com/article/current-affairs/here-s-the-rea...
<< <<त्यांनी परवानगी मागितलीच
<< <<त्यांनी परवानगी मागितलीच नव्हती असं तेव्हाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणताहेत>>
ह्याच्या २ शक्यता होत आहेत मग , एक तर हे कि तेव्हाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खोटे बोलत आहेत नाही तर ह्या सरकारच्या काळात आपण हे तंत्रज्ञान अवगत करू शकलो, त्यावेळेस तेवढं काम झाला नव्हत ह्या संदर्भात , आता बोला नक्की कोण खरं बोलतंय >>
------ हे तंत्रज्ञान आधीपासुन आपल्याला माहित होते... आता त्या सरकारांनी निर्णय का नाही घेतला... तर ते सरकार विचारी होते आणि त्या क्षेत्रातल्या तज्ञांच्या मताला किंमत देणारे होते. स्पेस डेब्री बद्दल थोडी माहिती घ्या.
आपण तयार केलेली घाण पुढच्या पिढीला साफ करावी लागणार आहे. एखादा उपग्रह वापरुन निकामी होणे वेगळे, किंवा अपघाताने निकामी होणे आणि केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेवत, पक्षिय स्वार्थासाठी एखादा उपग्रह उद्वस्त करणे यात फरक आहे. आज त्याचे हजारो/ लाखो भाग इतस्तत : विखरुन भविष्यातल्या मोहिमांना आव्हान ठरणार आहेत.
नोटबंदीचा निर्णयात जेव्हढा अविचार होता त्यापेक्षा जास्त अविचार या निर्णयात आहे आणि त्याचे दुरगामी परिणाम मानवजाती वर होणार आहेत.
अर्थात नैराश्याने ग्रासलेल्यांना कॅमेर्यासमोर येण्यासाठी निमीत्त हवे असते. या अघोरी निर्णयामुळे देशातली बेरोजगारी कमी होणार नाही किंवा शेतकर्यांच्या आत्महत्या कमी होणार नाहीत किंवा देशाबाहेर गेलेलेला काळा पैसाही परत येणार नाही. देशासमोर ज्वलंत प्रश्न आहेत आणि यांना लोकांचे लक्ष वेगळीकडेच वळवायचे आहे.
<<ह्या सरकारच्या काळात आपण हे
<<ह्या सरकारच्या काळात आपण हे तंत्रज्ञान अवगत करू शकलो, त्यावेळेस तेवढं काम झाला नव्हत ह्या संदर्भात>>
------- या सरकारच्या काळात बिनदिक्कत खोटे बोलण्याचे तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. ७० वर्षात प्रथमच असे विकसीत झालेले तंत्रज्ञान देशाने अनुभवले आहे. जनसामान्यांना पाच वर्षात त्याचे किती चटके बसले आहेत हे लवकरच समजेल.
<< सुप्रसिद्ध सायंटिस्ट नंबी
<< सुप्रसिद्ध सायंटिस्ट नंबी नारायण ह्यांना का काँग्रेस सरकारने का खोट्या केस मध्ये अडकवले >>
------- आधीच्या सरकारांनी अनेक अयोग्य गोष्टी, मोठा भ्रष्टाचार केला आहे. पण मग २०१४ नंतर पैकी काही तरी घटनांवर प्रकाश टाकायला नको ? त्या घटनांचा पाठपुरावा व्हायला नको. २०१४ नंतरच्या काळात असे काही झाल्याचे दिसले नाही. हो निवडणूका समोर दिसायला लागल्यावरच CBI चे विरोधकांना नामोहरम करायचे धाडसत्र सुरु झाले.
<<आपण आपल्याच पायावर धोंडा
<<आपण आपल्याच पायावर धोंडा पाडत नाही ना? उपग्रह नष्ट करण्याचे तंत्रज्ञान सिद्ध करण्याच्या आटापिटात आपण किती स्पेक स्पेस जंक निर्माण केला असेल हा प्रश्न अस्थानी आहे. >> आपण जो स्पेस जंक निर्माण केला आहे म्हणताय तोच अमेरिकेने उठवलेला प्रश्न आहे, लिंक समजली , कारण ज्यांनी हे तंत्रज्ञान आधीच अवगत केले आहे त्यांना कोण विचारणार की नक्की तुम्ही किती कचरा केला ..
https://www.space.com/india-anti-satellite-weapon-test-debris.html
मुळात कोणी रोज उठून हे करणार नाही , त्याला बरीच वर्ष जातात , पण त्यामुळे मिळणारे फायदे हे नक्कीच देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती साठी गरजेचे आहेत ,
अणू ऊर्जेची ची चाचणी केल्यानेही थोड्या प्रमाणात तरी किरणोत्सव होतोच, पण त्याच तंत्रज्ञानाच वापर करून वीज निर्मिती केली जात आहे हे हि तितकेच खरे ..
"नाविक " साठी भारतने फक्त ७-८ उपग्रह सोडले आहेत पण GPS साठी अमेरिकेने एकूण ७३ सोडले आहेत त्यामधले फक्त ३१ चालू आहेत आणि जवळपास ३० चे आयुर्मान संपले आहे ..
<<नोटबंदीचा निर्णयात जेव्हढा
<<नोटबंदीचा निर्णयात जेव्हढा अविचार होता त्यापेक्षा जास्त अविचार या निर्णयात आहे आणि त्याचे दुरगामी परिणाम मानवजाती वर होणार आहेत.>> मानवजाती साठीच चाललंय सगळं नाही तर गरज काय होती , बादवे नोटबंदी चे बरेच परिणाम सोसलेत वाटत , सगळं रोखीचे व्यवहार करणारे मग हे होणारच ..जाऊद्या सवय करून घ्या आता ते पण मानवजातीच्या कल्याणासाठी उपयोगी पडेल..सरकाराला कळेल कि किती खरा इनकम आहे लोकांचा आणि किती टॅक्स देतात हे , कारण ज्या देशात नोटबंदी नंतर अचानक टॅक्स देणाऱ्यांची संख्या ८५% ने वाढली म्हणजे काय हे लोक अचानक श्रीमंत नाही झाले , त्यांना घोषित करावा लागलं ..
तुम्ही वाचत नाही, आपलेच खोटे
तुम्ही वाचत नाही, आपलेच खोटे घोडे पुढे पुढे हाणत राहाताय... तुमचे खोटे पकडले कि लगेच शब्दांचे खेळ करून गोलपोस्ट बदलतात. 2012 चे सारस्वत चे विधान त्याच्याच आजच्या विधानाच्या अगदी उलट आहे. ते गुपचूप कॉर्नर करून अमेरिका तमुक धमुक सुरुय... लैच कसरत करता?
अररारा बेछूट गोळीबार सुरुय.
अररारा बेछूट गोळीबार सुरुय. गोळ्या फुसक्या आहेत, फक्त आवाज करू शकतात.
सारस्वत आणग मिधवन नायर दोघेही
सारस्वत आणग मिधवन नायर दोघेही २०१२ मध्ये काय म्हणाले, त्याच्या बातम्या डकवल्यात.््तरी यांचा खोटारडेपणा चालूच आहे.
मोदींसारखे त्यांचे समर्थकही खोटारडे खणि आक्रस्ताळे.
माधवन नायर भाजपत आलेत आणि सारस्वत नीति आयोगात. त्यामुळे तेही खोटारड्यांच्या पंथात सामील झाले हे वेगळं सांगायला नको.
अशा फुसक्या गोळ्या मारल्यावर
अशा फुसक्या गोळ्या मारल्यावर हे साहेब पण गेलाबाजार थुकरटवाडीच्या एखाद्या समितीवर बसतील!
कॉंग्रेसी भाटानो तुमचा पप्पू
कॉंग्रेसी भाटानो तुमचा पप्पू गांधी कोणती "सस्ती नशा" करतो हे आधी सांगा पाहू ?
भाजपच्या भमट्यानी आधी मोदी
भाजपच्या भमट्यानी आधी मोदी कोणती नशा करतो त्याची खबर काढावी
भ्रष्टाचाराची प्रकरणे
भ्रष्टाचाराची प्रकरणे पेपरातून वाचायला मिळत नाहीत, बरोबर आहे. छापलीच नाहीत तर वाचायला कशी मिळतील्ल...
https://www.facebook.com/savemaharashtrafrmBJP/videos/818526745166781/
मोदी कंची सराब पिहितो?
मोदी कंची सराब पिहितो?
त्याग व संतपद ह्याची नशा
त्याग व संतपद ह्याची नशा
दारूपेक्षा भयानक
त्याग व संतपद ह्याची नशा
त्याग व संतपद ह्याची नशा
दारूपेक्षा भयानक
पोस्ट वाचून अस बोलावंसं
पोस्ट वाचून अस बोलावंसं वाटतंय धन्य तो भारत धन्य ती भारतीय जनता useless आणि hopeless
अंबाणीचा चौकीदार हा त्याचेच
अंबाणीचा चौकीदार हा त्याचेच भले करणार.
कुत्रा हा प्रामाणिक असतो पण त्याची प्रामाणिकता हि मालकाशीच असते तसेच हा चौकीदार त्याच्या मालकाशीच प्रामाणिक असणार.हा चौकीदार भारताचे भले करणार नाही तर अंबानी अदाणीचेच भले करणार.
बाकी
रिलायन्स ला मोदी सरकारचा मोठा झटका, 500 रुपये(अक्षरी--पाचशे रुपये फक्त) चा जबर दस्त दंड झाला होता.
प्रधानमंत्र्याच फोटो जिओ च्या जाहिरातीत वापरल्यामुळे कारवाई रिलायन्स स्वयंसेवक संघ प्रणित सरकार ने केली होती.
http://www.jansatta.com/national/for-using-pm-modi-pic-in-ad-jio-could-f...
उद्या PSLV C45 चे श्रेय
उद्या PSLV C45 चे श्रेय घेणार मिस्टर चमको.
लोकसभा निवडणुकीत अमेठीतून
लोकसभा निवडणुकीत अमेठीतून पराभव होणार याची पक्की खात्री, कॉंग्रेसी पप्पूला होताच त्याने अमेठीबरोबरच दूसर्या जागेवर लढण्यासाठी थेट दक्षिणेत पळ काढला आहे.
ह्या मंदबुद्धी पप्पूला स्वत:च्या पारंपारिक मतदार संघातून निवडुन यायची खात्री नाही आणि चाललाय पंतप्रधान बनायला. आता ह्याला निवडणुन आणायची जबाबदारी केरळातल्या रक्तवर्णी मर्कटांवर टाकली तर कॉंग्रेसने !
मर्कट म्हणजे माकड. रक्तवर्णी
मर्कट म्हणजे माकड. रक्तवर्णी म्हणजे लाल. लाल माकडे म्हणजे कम्युनिस्ट. संघ स्वयंसेवकांना त्याच अर्थाने भगवी माकडे म्हणत असतील अनिरुद्ध सनातनी.
मर्कट म्हणजे माकड. रक्तवर्णी
मर्कट म्हणजे माकड. रक्तवर्णी म्हणजे लाल. लाल माकडे म्हणजे कम्युनिस्ट.
<<
काय पण लॉजिक आहे.
2014 लोकसभा निवडणूकीत वडोदरा
2014 लोकसभा निवडणूकीत वडोदरा आणि वाराणसीतून कोण आणि का उभे होते?
केरळातल्या रक्तवर्णी मर्कटां
केरळातल्या रक्तवर्णी मर्कटां ---- म्हणजे काय मग?
लॉजिक सारखे शब्द भाजप्यानी
लॉजिक सारखे शब्द भाजप्यानी उच्चारणे भारीच आहे बाकी...
वदोडरेतून वाराणसी
वदोडरेतून वाराणसी
माँ गँगा ने बुलाया
स्मृती इराणी ह्यांनी २०१४ ला
स्मृती इराणी ह्यांनी २०१४ ला जेव्हा उमेदवारीचा अर्ज भरला तेव्हा त्यांची शैक्षणिक अर्हता होती पदवीधर. आता २०१९ च्या उमेदवारीसाठी अर्ज भरला त्यात आहे १२ वी पास. ह्या बाईनी आपण येल विद्यापीठाच्या पदवीधर आहोत असेही सांगितले होते म्हणे. काय झाले? डिग्री हरवली कि बाद झाली?
खोटे आणि भाजप समानार्थी शब्द आहेत. स्मृती इराणीला कशाच्या जीवावर उमेदवारी आणि सरकारात मोठी मंत्रिपदे मिळत आहेत त्याची चौकशी भाजपे करत नाहीत मात्र राहुल प्रियांका बद्दल दिवसरात्र घाण ओकत असतात.
एल विद्यापीठाची डिग्री 3
एल विद्यापीठाची डिग्री 3 दिवसाच्या सेमिनार नन्तर मिळाली , असेही बोलल्याचे पुसटसे आठवते
तीन नाही , सहा दिवसhttps://m
तीन नाही , सहा दिवस
https://m.timesofindia.com/india/I-have-a-degree-from-Yale-University-HR...
सहा दिवसात एक डिग्री
MBBS च्या साडेचार वर्षात आम्हाला किती दिगर्या यायला हव्यात ?
<<तुम्ही वाचत नाही, आपलेच
<<तुम्ही वाचत नाही, आपलेच खोटे घोडे पुढे पुढे हाणत राहाताय... तुमचे खोटे पकडले कि लगेच शब्दांचे खेळ करून गोलपोस्ट बदलतात. 2012 चे सारस्वत चे विधान त्याच्याच आजच्या विधानाच्या अगदी उलट आहे. >>
कदाचित तुम्ही च वाचल नाही अस दिसतंय , अमेरिकेच्या बाबतीतला विधान हे space डेब्रिस बद्दल आहे , तुमच्याकडे काही प्रश्नाची उत्तर नसली कि पुढे तेच चालू ठेवता , सारस्वत गरज नाही असे बोलले आणि ते काँग्रेस सरकारने ऐकले असा तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही किती चुकीचे आहेत ते कळलं .
बाकी पप्पू दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..चालू राहूद्या ..
Pages