चौकीदार
आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.
इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्यात लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"
सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"
एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"
त्यानंतर होणार्या चोर्यांवर आणि पडणार्या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्या-मार्या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.
उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.
आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!
असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!
खिक,
खिक,
चौकीदार बदलायचं घाटतयं , असे
चौकीदार बदलायचं घाटतयं , असे कळल्या बरोबर सोसायटी सोडून आजूबाजूच्या उच्चभ्रू सोसायत्यात राहायला गेलेले लोक सुद्धा दाढीवाला चौकीदार कसा चांगला आहे हे रस्त्यात भेटले तरी सांगू लागले,
बाबा, तुझा या सोसायतीशी संबंध नाही, इकडे काय करायचे ते सोसायटी मेम्बर ना ठरऊ दे , असे स्पष्टपणे सांगून पण त्यांना कळेना,
उगा उपदेशाचे डोस द्यायला लागले
चौकीदार बदलायचं घाटतयं , असे
चौकीदार बदलायचं घाटतयं , असे कळल्या बरोबर सोसायटी सोडून आजूबाजूच्या उच्चभ्रू सोसायत्यात राहायला गेलेले लोक सुद्धा दाढीवाला चौकीदार कसा चांगला आहे हे रस्त्यात भेटले तरी सांगू लागले,>> उच्चभ्रु वगैरे म्हटल्यावर उगीच मूठभर मांस चढल्यासारखं वाटेल काही जणांना.
अवघड आहे॥
अवघड आहे॥
चौकीदार पुन्हा निवडायच घाटतयं
चौकीदार पुन्हा निवडायच घाटतयं , असे कळल्या बरोबर सोसायटी सोडून आजूबाजूच्या उच्चभ्रू सोसायत्यात राहायला गेलेले लोक सुद्धा दाढीवाला चौकीदार कसा वाईट आहे नी त्यांच्या मनात भरलेला नवीन मतिमंद माणूस चौकीदार म्हणून कसा चांगला आहे हे रस्त्यात/ ऑनलाईन भेटले तर सांगू लागले.
बाबा, तुझा या सोसायतीशी संबंध नाही, इकडे काय करायचे ते सोसायटी मेम्बर ना ठरऊ दे , असे स्पष्टपणे सांगून पण त्यांना कळेना, उगा उपदेशाचे डोस द्यायला लागले.
चला... गोळ्यो एकदम वर्मावर
चला... गोळ्यो एकदम वर्मावर बसतंले..!!
गेले काही दिवस निघणारे धागे,
गेले काही दिवस निघणारे धागे, वृत्तपत्रांतले लेख इत्यांदींच्या संख्येकडे लक्ष दिलं तर एक गोष्ट लक्षात येईल. "मोदी कसे वाईट" याभोवतीच ते लेख फिरत असतात. मोदींना काहीही करून घालावायचेच आणि त्यासाठी वाटेल ते बरळायचं किंवा लिहायचं याची स्पर्धाच जणू मोदीविरोधकांमध्ये लागलीय. क्वचित एखादा लेख "विरोधकांत एखादा कसा चांगला" हे सांगणारे असतात. या सर्व लेखकांना लोकांची विचार करण्याची पद्धत ठाऊक नसल्याचे हे द्योतक आहे.
तुम्ही जे काही लिहिताय त्याला "निगेटिव्ह पब्लिसिटी" म्हणतात. त्यात मोदींचं नाव "केंद्रस्थानी" असतं. थोडक्यात सगळं राजकारण सध्या "मोदी" या अक्षाभोवती फिरतंय. मोदीसमर्थकांना काय करायचं असतं? त्यांना फक्त दोन पातळ्यांवर विरोध करायचा असतो. पहिली पातळी म्हणजे लेखक खुद्द कुठल्या संघटनेशी संलग्न आहे किंवा लेखकाने यापूर्वी काँग्रेसच्या काळातील वाईट गोष्टींबद्धल काही लिहिलंय का हे पाहणे? दुसरी म्हणजे लेखातील मोदींवरच्या आरोपातून हे ओळखणे लेखक कुठल्या विरोधकांच्या कंपूतील आहे. विशेषकरून काँग्रेसने गेल्या ७० वर्षांत एव्हढी वाईट माया जमवलीय नि राफूल गांधींनी काम करण्याऐवजी एव्हढा टाईमपास केलाय कि पुढील किमान १५ वर्षे त्या गोष्टी कुठलाही काँग्रेसविरोधाक वापरू शकेल. अशा प्रकारे पाहिल्याना लेखक आणि मग विरोधक दोन्ही एक्सपोज झाले कि लेखाला कचऱ्याच्या डब्यात टाकण्याचे कामच बाकी उरते.
काँग्रेसमधील सर्व नेत्यांमध्ये ज्यांना एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि सर्वात जास्त क्रेडिबिलिटी आहे त्या अमरिंदर सिंगांच्या मते मोदी काय आहेत?
स्वच्छ राज्यकारभारासाठी जे जाणले जातात त्या नितीश कुमार व नवीन पटनाईक यांचे मोदींचीषयी मत काय आहे? त्यांनी मोदींवर कुठले आरोप केलेत?
निगेटिव्ह पब्लिसिटी करण्यापेक्षा गप्प बसण्यातच हशील आहे हे मोदीविरोधक जोपर्यंत समजून घेत नाहीत तोपर्यंत मोदी काय त्या जागचे हटत नाहीत.
गेले काही दिवस निघणारे धागे,
Deleted the duplicate comment
गेले काही दिवस निघणारे धागे,
Deleted the duplicate comment
<हिली पातळी म्हणजे लेखक खुद्द
<हिली पातळी म्हणजे लेखक खुद्द कुठल्या संघटनेशी संलग्न आहे किंवा लेखकाने यापूर्वी काँग्रेसच्या काळातील वाईट गोष्टींबद्धल काही लिहिलंय का हे पाहणे? दुसरी म्हणजे लेखातील मोदींवरच्या आरोपातून हे ओळखणे लेखक कुठल्या विरोधकांच्या कंपूतील आहे>
हीच मोडस ऑपरेंडी ठरलेली असेल, तर वाचकांना हेही कळेल की मांडलेल्या मुद्द्यांना खोडता येत नाहीए म्हणून लिहिणार्याला लेबल लावून डिस्क्रेडिट करायचा प्रयत्न होतोय. ही सेम मोडस ऑपरेंडी मोदी समर्थकांच्या लेखनालाही लागू पडते.
काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत काय केलंय आणि काय नाही, हेही लोकांना माहीत असतं. लोक तुम्ही समजता ति तके दूधखुळे नसतात.
वृत्तपत्रांत ( मी लोकस्त्तेबद्दल बोलतोय कारण अन्य मराठी वृत्तपत्र वाचत नाही) येणार्या लेखांवर येणार्या प्रतिक्रिया . विशेषतः वाचक पत्रे वाचत चला. भाजप समर्थकांच्या पत्रांत मुद्द्यांचा सं पूर्ण पढवलेल्या गोष्टी दिसतील, तर भाजप विरोधकांची पत्रे व्यवस्थित मुद्देसूद असतात.
लोकसत्तेत गेले वर्षभर विनय सहस्रबुद्धे लिहिताहेत. वेळोवेळी अन्य भाजप पदाधिकारी , समर्थकही.
धन्यवाद भरत, अपेक्शित
धन्यवाद भरत, अपेक्शित प्रतिसाद दिलात.
बाय द वे , मी श्री राफूल गांधी व प्रियांका वद्रा यांचे कर्तृत्व, पायाभूत सुविधा, मतदारसंघ , राज्य वा देशाचा विकास यामधील योगदान सांगणारा एकही लेख अजुन शोधु शकलो नाही. एखादी लिंक असेल तर डकवा.
ShashankP - एक नंबर
ShashankP - एक नंबर
निवडणुका जवळ येत आहेत..
निवडणुका जवळ येत आहेत..
.
दररोज दोन्ही बाजूने पोस्ट सुरू होणार. पण एक लक्षात ठेवा,
संकटात फक्त मित्रच साथ देतात कुठलेही नेते नाही..
तेव्हा क्षुल्लक राजकारणावरुन ग्रुपमध्ये हायपर होऊन मैत्री तोडु नका..संयम ठेवा..
.
.
आणखी एक गोष्ट
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*कितीबी बोंबला येणार परत मोदीच..!!*
नीरव कि ललित ?
नीरव कि ललित ?
किरणुद्दीन >>> तुमचा पप्पू
किरणुद्दीन >>> तुमचा पप्पू आला तर अजून बरेच येतील ....
पुर्ण लेखात कुठेही कुठल्याही
पुर्ण लेखात कुठेही कुठल्याही पक्षाचे/नेत्याचे नाव घेतले नाही तरिही इतकी आदळआपट..??
किती चिडतात !!
किती चिडतात !!
झेपत नसेल तर टिंगल टवाळी करू नये माणसाने.
खरं सांगतो, गेले काही महीने
खरं सांगतो, गेले काही महीने संपूर्ण देशात ऐकतोय चौकीदार चोर है. मला समजेना कोण हा/हे चोरटा/टे चौकीदार ? मी सगळ्यांना विचारत होतो.
कदाचित माझी ही अवस्था काही सहृदय लोकांना पाहवली नाही आणि त्यांनी आपल्या नावाच्या मागे चौकीदार लिहायला सुरूवात केली. मग मै भी चौकीदार चा नारा आला आणि मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली.
नीरव कि ललित ? >>
नीरव कि ललित ? >>
किती हे अज्ञान ?
निरव मोदी व ललित मोदी हे भारताचे गुन्हेगार असून ते भारतीय लोकसभा निवडणुकीला उभे नाहीत हे या व्यक्तीला माहीत नसल्याचे आश्चर्य वाटते..
किती हे अज्ञान ?
किती हे अज्ञान ?
निरव मोदी व ललित मोदी हे भारताचे गुन्हेगार असून ते भारतीय लोकसभा निवडणुकीला उभे नाहीत हे या व्यक्तीला माहीत नसल्याचे आश्चर्य वाटते..>> आधी नीट वाचायला शिकले की मग लिहायला पण सोपे जाते आणि उगीच आश्चर्य वगैरे पण वाटत नाही.. लिहिणार्याने तरी कुठे लिहिलंय निवडुन कोण येणार..??
.
*कितीबी बोंबला येणार परत मोदीच..!!*
Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol
Submitted by उनाडटप्पू on 19 March, 2019 - 09:46
नीट वाचा बरे..!
>>बाय द वे , मी श्री राफूल
>>बाय द वे , मी श्री राफूल गांधी व प्रियांका वद्रा यांचे कर्तृत्व, पायाभूत सुविधा, मतदारसंघ , राज्य वा देशाचा विकास यामधील योगदान सांगणारा एकही लेख अजुन शोधु शकलो नाही. एखादी लिंक असेल तर डकवा.
एक ऊगवत्या आहेत, तर दुसरे अकलेचे तारे तोडण्यात सतत (म्हणजे गेले दशक!) मग्न आहेत. अजून काही योगदान अपेक्षित आहेत का?
एक चवताळेश्वर आयडी दान केला
एक चवताळेश्वर आयडी दान केला की झाले..
(No subject)
राहुलजी गांधींमुळे तरी
राहुलजी गांधींमुळे तरी कितीजणांना रोजगार मिळाला असा प्रश्न एका संघी भाजप्या भक्ताने मला विचारला
या धाग्याची लिंक देणार होतो पण इतक्या मोठ्या प्रमाणावर आधीच रोजगार मिळालेले आहेत हे पुढे आले तर त्यांच्या प्रचारातली हवा जाईल म्हणून गप्प बसलो.
*कितीबी बोंबला येणार परत
*कितीबी बोंबला येणार परत मोदीच..!!* समझदार को इशारा काफी है !
>>पुढे आले तर त्यांच्या
>>पुढे आले तर त्यांच्या प्रचारातली हवा जाईल म्हणून गप्प बसलो.
भारी बॅटींग सुरू आहे..! अर्थात रागा हा मुळातच नो बॉल असल्याने प्रत्येक वेळी फ्री हीट मिळतोच नाही का.
*कितीबी बोंबला येणार परत
*कितीबी बोंबला येणार परत मोदीच..!!* समझदार को इशारा काफी है !>> इशारे, कुजबुज यात मास्टरी असणार्यांना तर अर्थाचा अनर्थ पण काढता येतो
शिशुवर्ग भरला. मी निघालो.
शिशुवर्ग भरला. मी निघालो.
वरच्या प्रतिसादावरही
वरच्या प्रतिसादावरही उच्चकोटीचे (शिशुवर्गातल्या) प्रतिसाद येतीलच.
बालके स्वसमाधानार्थ भो पसरून राह्यलीत समजून त्यांना खेळू द्यावे.
या धाग्याची लिंक देणार होतो
या धाग्याची लिंक देणार होतो पण इतक्या मोठ्या प्रमाणावर आधीच रोजगार मिळालेले आहेत हे पुढे आले तर त्यांच्या प्रचारातली हवा जाईल म्हणून गप्प बसलो.
<<
तुमच्या सारख्य आयटी ट्रोल्सना ४० पैसे प्रति ट्वीट मिळू लागले, हा रोजगार नाही?
तुमच्या मोदीला पंतखासदारकी, तडीपार शहाला खासदारकी हे रोजगार नाहीत?
मोदीने तुम्हाला दिलेले बोलाचे पकोडे म्हणजे रोजगार हे मनापासून पटत असेल तर इथे लिहिणे बंद करा अन जावा पकोडे तळायला. तेवढंच भाजपाचं तळपट व्हायला मदत.
Pages