चौकीदार

Submitted by DJ. on 19 March, 2019 - 05:38

चौकीदार

आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.

इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्‍यात लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्‍या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"

सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"

एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्‍या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्‍या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"

त्यानंतर होणार्‍या चोर्‍यांवर आणि पडणार्‍या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्‍या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्‍या-मार्‍या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्‍या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्‍या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्‍या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्‍या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.

उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्‍यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.

आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्‍यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!

असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

लोकशाही आल्याने पेशवाई परत मिळाली नाही म्हणून खूप लोकांची तडफड होते ते कळतेच. पण आता रमणा सुरु झालाय ना महिना पाच कि सहा हजार रूपे... तेही नुसते एक आंदोलन नाममात्र करून सगळ्या मागण्या मान्य... वा.. अशी पाहिजे लोकशाही.

हेला तुम्ही नेहमी चुकीचे पोस्ट करताय .
लोकशाही परिपक्व असावी .
असे सर्व मत व्यक्त करत आहेत आणि तुम्ही भलत्याच रस्त्यावर गाडी पळवत आहात .
भूतकाळ आणि भविष्य काळाचा विचार करा इतिहास फक्त शाहणपन येण्यासाठी वापरावा .
भविष्य घडवण्यासाठी इतिहास वापरायचा नसतो

पेशवाई ची काही लोकांनी इतकी धास्ती का घेतली आहे? मोदी सरकारने आर्थिक परिस्थितीवर आधारित आरक्षण आणण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे काही मंडळींना भाजपची काविळ झाली आहे. जात आधारित आरक्षण जातंय की काय याने हवालदिल झाले आहेत. असे झाले तर कॉंग्रेसचे असलेले मतदार दुरावतील हे लक्षात येऊन नेते मंडळींच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

जातीचे राजकारण कोण्ही केले आसेल तर ते फक्त काँग्रेस आणि तिसरी आघाडी ह्या लोकांनी .. BJP नी कधीच जातीय राजकारण केले नाही आणि ठाकरे नी सुधा नाही

राजेशाहि असति तर मोदी पन्तपरधान कसा झाला असता? राहुल गाण्धी नसता का झाला?

राजेश जी रमणा वगैरे वाईट वाटुन घेऊ नका. त्या काळात सोशल कंडिशनिंग नुसार गोष्टी घडत गेल्या. सर्वांना शिक्षण उपलब्ध झाले, चुकीच्या प्रथा आपोआप बंद झाल्या.
ब्राह्मणद्वेषाची काविळ झाली असणारे भुतकाळातून सहजासहजी वर्तमानात कसे येणार. पुरोहित वर्गाची मक्तेदारी आता राहिली नाही. ज्या समाजात पुरोहितांचे वर्चस्व आहे ते अद्याप अनेक अर्थांनी मागास आहेत. जात आधारित आरक्षण हटवून आर्थिक बेसवर आरक्षण आले तर फोडा व राज्य करा हे चालणार नाही.

मला क्ष यांच्या भाषेवरून त्यांची बौद्धिक, नैतिक पातळी कळली आहे. हा माझा येथील शेवटचा प्रतिसाद. कदाचित प्रतिसाद मिळवण्यासाठी उकसवले जात असावे अशी शंका.

आताच्या chya स्पर्धेच्या युगात पैस्यामुळे कोण्ही पाठी राहू नये हीच सर्वांची इच्या आहे अतिशय हुशार मुलगा पैसे नाहीत म्हणून डॉक्टर , engineer ,ips,ias होवू शकत नसेल तर मदत करा
आणि सर्व मागास जातींस आर्थिक मदत करा

कोण्ही ias जिल्हाधिकारी त्याचा जातीच भलं करेल की जो पैसे देईल त्याच भल करेल हे मूर्ख
आरक्षण जातीवर हवे असे मागतात त्यांना समजत नाही ।
त्या पेक्ष्या योग्य व्यक्ती जिल्हा अधिकारी असेल तो पूर्ण जिल्हा प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल

yawn.png

राजेश आजोबांना आरक्षणाच्या धाग्यांवर घेऊन जा रे पोरानो. हळू हळू न्या... नाही तर तुमच्या धसमुसळेपणात त्यांची चष्मा फुटायचा चुकून... आधीच दूरचे काही दिसेना त्यांना..

कालच एक माजी भाजप समर्थकाने केलेली कमेंट!

"७० साल मे, ७० साल मे ये नाही हुवा, वो नही हुवा, अरे बाबा ७० वर्षात जेवढं काँग्रेसला वाटोळं करता आलं नाही तेवढं तू पाच वर्षातच केलं"

५१ % घेऊन पेमेंट सीट घेतात , त्याला कुणी बोलत नाही. जातीय आरक्षण आले की लगेच बडबड सुरू.

के पैसा बोलता है !

"७० साल मे, ७० साल मे ये नाही हुवा, वो नही हुवा, अरे बाबा ७० वर्षात जेवढं काँग्रेसला वाटोळं करता आलं नाही तेवढं तू पाच वर्षातच केलं"
जरा सविस्तर समजावून सांगा

कला अकादमीचे शुध्दीकरण....
सकाळची वेळ. कला अकादमीमध्ये एका कार्यक्रमाला गेले असता होमकुंड पेटलेला दिसला. पुढे भटजीबुवांचा आवाजही ऐकू आला. या वेळी कला अकादमीमध्ये कसली पुजा? जरा आश्चर्य वाटलं. राजूने चौकशी केली तर अकादमीच्या कर्मचार्‍यांच्या वतीने अकादमीच्या वास्तूंचे शुध्दीकरण-शांत करणं सुरू होतं.

मनोहर पर्रीकरांचे पार्थिव शरीर कला अकादमीमध्ये ठेवलं होतं म्हणून संपूर्ण अकादमीचे शुध्दीकरण करत होते. सरकारी वास्तूंचे शुध्दीकरण करायला लागले तर कसं होईल. सरकारी वास्तूंमध्ये असले कार्यक्रम करायला नको. मग मिरामार बीचचं पण शुध्दीकरण करणार का? उगाचंच चुकीचे पायंडे कशाला पाडायचे. मुळात पर्रीकरांचे या पार्थिवाचे कला अकादमी अशुद्ध झाली होती का म्हणून भटजींना बोलवून शुध्दीकरण केलं. सगळ्या बुध्दीला न पटणार्‍या गोष्टी आहेत.
- मनस्विनी प्रभुणे-नायक

मला क्ष यांच्या भाषेवरून त्यांची बौद्धिक, नैतिक पातळी कळली आहे. हा माझा येथील शेवटचा प्रतिसाद. कदाचित प्रतिसाद मिळवण्यासाठी उकसवले जात असावे अशी शंका. >>

नाही भाउ त्या क्ष चा केमिकल लोचा आहे.

कोण्ही ias जिल्हाधिकारी त्याचा जातीच भलं करेल की जो पैसे देईल त्याच भल करेल हे मूर्ख

मोदी सरकार आले तरी जिल्हाधिकारी पैसे मागतो का ? मग मोदी काय करताहेत ?

मग ओपनवाला कुणाचे भले करतो , जातीचे की पैसेवाल्याचे ?

काशीराम, जेव्हा भाजपे नैतिकतेच्या गप्पा मारतात तेव्हा लांडगा 'शाकाहार उत्तम आहार' वाले प्रवचन देतोय, असे वाटते हो....

जातीचे कोण्ही भले करत नाही जो पैसा देईल त्याचे भले होतें मग मागास ऑफिसर असू नाहीतर ओपन
त्या मुळे आरक्षण नको प्रामाणिक व्यक्ती हवा कोणत्या ही जाती धर्माचा

मायबोलीवर एकही चौकीदार नाही... Sad

पंतप्रधानपदावर असतांना त्यांच्या नजरेसमोर अनेक भ्रष्टाचारी देश सोडुन पळाले... नंतर शोधाशोध... मग वृत्तपत्रातल्या बातमी वरुन जनतेला कळते निरव मोदी मस्त आरामात UK मधे आहे. पोलिस, CBI, रॉ कुणालाच थांगपत्ता नसतो. टेलिग्राफने वृत्त दिले नसते तर... आपल्याला कळालेही नसते.

वर कुणी म्हटले या गोष्टी जनतेला माहित नसतील पण रॉ ला माहित होत्या... पण वृत्तपत्राला बातम्या लिक झाल्या. हास्यास्पद युक्तीवाद आहे.

पाकला पाक दिनाच्या शुभेच्छाचे प्रेम पत्र मोदी यांनी दिले. छान केले. पण असे पत्र देताना दहशतवादाचा मुद्दा किंवा मसुद अझर, जैश, हाफिज सईद.... मोठी लिस्ट आहे यांच्याबद्दल काही पुसटसा मुद्दा उपस्थित केला होता का?

हा मिळमिळीत पणा काही नवा नाही आहे. या आधी पण शरिफ साहेबांसमोर जवळचे संबंध प्रस्थापित केले होते. मिठाई काय, शरिफांच्या आईसाठी शाली - परतीच्या आहेरात आईसाठी साडी... अचानक अचंबित करणारी लग्नाला हजेरी, मोदींच्या आवडीचे जेवण... अशा भेटींसाठी खुप मोठी पुर्वतयारी लागत असते. पण मग कुठेतरी मसुद अझर, हाफिज, सलालुद्दीन, दाऊद... मुद्दे उपस्थित केले होते काय ? केले असल्यास पुढे काय प्रगती झाली ?

पुलवामा हल्ल्यानंतर अचानक युनो मधे पाक विरुद्ध दंड थोपटायचे युद्धपातळीवर प्रयत्न करायचे आणि चीनने आपले सर्व प्रयत्न सलग चौथ्यांदा हाणुन पाडायचे. आपणच गंभिर नसल्यावर चीनला काय दोष द्यायचा?

येथे लिहिणार्या कॉन्ग्रेसी भक्ताना असे वाटते आहे की भारतात काही झाले तर त्याची जबाब्दारी सर्वस्वी मोदी यान्ची आहे. इतर काम करणारे त्यान्च्या वर असलेल्या जबाबदरीप्रमाणे का वागत नाहीत आणि ते तसे वागले नाही व भ्रष्टाचार करत असतील तर या लोकान्च्या मते ती सुद्धा मोदीन्चीच चूक असते. धन्य हे लोक.

येथे लिहिणार्या कॉन्ग्रेसी भक्ताना असे वाटते आहे की भारतात काही झाले तर त्याची जबाब्दारी सर्वस्वी मोदी यान्ची आहे. इतर काम करणारे त्यान्च्या वर असलेल्या जबाबदरीप्रमाणे का वागत नाहीत आणि ते तसे वागले नाही व भ्रष्टाचार करत असतील तर या लोकान्च्या मते ती सुद्धा मोदीन्चीच चूक असते. धन्य हे लोक:>> अहो ७० वर्षांपुरवीच्या चौकिदाराला तुमचा सद्ध्याचा चौकीदार सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार धरतो त्याकडे तुम्ही कोणत्या चष्म्यातुन बघता?

<< येथे लिहिणार्या कॉन्ग्रेसी भक्ताना असे वाटते आहे की भारतात काही झाले तर त्याची जबाब्दारी सर्वस्वी मोदी यान्ची आहे. >>
------- काँग्रेस मुक्त देश चा नारा होता ना? अजुनही आहेच का काँग्रेस आणि भक्त?
ज्या न्यायाने देशाला भेडसावत असणार्‍या प्रत्येक प्रश्नाला ५५ वर्षांपुर्वी ज्यांचे निधन झाले ते जवाहरलाल नेहरू जबाबदार असतील त्याच न्यायाने मोदींना जब जबाबदार धरायला नको ?

<<इतर काम करणारे त्यान्च्या वर असलेल्या जबाबदरीप्रमाणे का वागत नाहीत आणि ते तसे वागले नाही व भ्रष्टाचार करत असतील तर या लोकान्च्या मते ती सुद्धा मोदीन्चीच चूक असते. धन्य हे लोक. >>
-------- पंतप्रधान हे जबाबदारीचे पद आहे. लोकांना त्या पदाबद्दल एक विश्वास आणि आदर असतो. इतरांवर जबाबदारी ढकलल्याने तुम्ही तुमची जबाबदारी टाळू शकत नाही.

पाकच्या नावाने विरोधकांना दिवस-रात्र झोडपायचे. देशात सामान्य नागरिकांना एक सांगायचे आणि तिकडे इम्रानखानला शुभेच्छांचे पत्र... लस कशाचा कशाला ताळमेळ नाही. शुभेच्छा दिल्याचे भारताच्या बाजूने जाहिर झालेच नाही आणि इथे पण पहिली बाजी पाकच्या इम्रानखान यांनीच मारली.

Pages