चौकीदार

Submitted by DJ. on 19 March, 2019 - 05:38

चौकीदार

आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.

इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्‍यात लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्‍या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"

सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"

एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्‍या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्‍या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"

त्यानंतर होणार्‍या चोर्‍यांवर आणि पडणार्‍या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्‍या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्‍या-मार्‍या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्‍या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्‍या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्‍या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्‍या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.

उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्‍यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.

आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्‍यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!

असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हेमामालिनींना झालेल्या अपघाताची बातमी तेव्हाही वाचली होती. आता ती पुन्हा वाचून हेमामालिनींबद्दलचा आदर दुणावला.

"गेल्या आठवड्यात दौसा येथे हेमा मालिनी यांची मर्सिडीज व ऑल्टो कारची धडक होऊन ऑल्टोतील चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर इतर जखमींना तिथेच सोडून हेमा मालिनी एकट्याच जयपूरच्या हॉस्पिटलात दाखल झाल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका झाली होती. हेमा ४ जुलै रोजी चार्टर्ड विमानातून मुंबईला आल्या. यानंतर त्यांनी यांनी ट्विटची मालिकाच सुरू केली. त्यांनी चाहत्यांचे आभार मानले, मीडिया तसंच इतर काही लोकांवर आपली प्रतिमा मलिन केल्याचे आरोपही केले आणि अपघाताबद्दल मुलीच्या पित्यालाच जबाबदार धरले.

मात्र, ताशी शंभर किमीपेक्षा जास्त वेगाने मी कार चालवत होतो की हेमा मालिनींचा ड्रायव्हर? असा सवाल करत, ‘मी कोणता नियम मोडला ते त्यांनी माझ्यापुढे येऊन सांगावे’, असे आव्हान मुलीचे पिता हनुमान महाजन यांनी हेमा मालिनींना दिले."

पोलिसांनी हेमामालिनींच्या ड्रायव्हरला अटक केली हे दुर्दैवीच म्हणायला हवे.

त्यांनी त्यांच्या मतदारसंघात केलेल्या कामाबद्दलची ही एक चांगली मुलाखत
https://twitter.com/ndtv/status/1110238191108263936

Submitted by भरत. on 3 April, 2019 - 09:46

बातमीचं सिलेक्टेड रीडिंग केल्याबद्दल अभिनंदन. बातमीतून वगळलेला भाग -

‘चार वर्षांच्या मुलीचा जीव गेल्याचे मला तीव्र दु:ख आहे; पण, त्या मुलीच्या वडिलांनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर हा अपघात झालाच नसता,’ असे ट्विट हेमा मालिनी यांनी केले.

अपघातानंतर इतर जखमींना तिथेच सोडून हेमा मालिनी एकट्याच जयपूरच्या हॉस्पिटलात दाखल झाल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका झाली होती.

pic.jpg

बातमीत हे छायाचित्र स्पष्टपणे दिसत असतानाही सत्तरीची ही महिला इतरांना सोडून एकटीच स्वतः इस्पीतळात दाखल झाली असली हलकट दर्जाची टीका करणारे असंवेदनशील मुर्दाड लोक हे काँग्रेस भूक्तांशिवाय दुसरे कोण असणार?

आता हे छायाचित्र त्या अपघातातले नसून हेमाजींच्या एखाद्या चित्रपटातलेच आहे असेही विधान हे प्प्पूछाप लोक करतील म्हणा.

त्या सत्तरीत आहेत हे इतकं महत्त्वाचं आहे, तर त्यांना दगदग कशाला द्या?
ईशा किंवा आहनाला द्यायचं वृंदावनचं तिकीट.
सन्नी किंवा बॉबीला बिकानेरमधून.

आता हे छायाचित्र त्या अपघातातले नसून हेमाजींच्या एखाद्या चित्रपटातलेच आहे असेही विधान हे प्प्पूछाप लोक करतील म्हणा.
नवीन Submitted by बिपीन चन्द्र हर... on 3 April, 2019 - 10:32
<<
सहमत !

का? स्वतः फिजिकली कष्ट उपसणाराच लोकप्रतिनिधी हवा का? डोकं वापरुन इतरांकडून काम करुन घेतलं तर चालतंय की.. तसंही ७५+ नंतर निवृत्ती आहेच...

धन्यवाद अनिरुद्ध. छायाचित्रात इतका रक्ताने माखलेला चेहरा आणि हातातला रुमाल दिसत असतानाही हेमा मालिनी यांच्यावर टीका करण्यासाठीचा निगरगट्टपणा या मंडळींकडे कुठून बरे येत असावा?

सत्तरीच्या सोनिया उपचार घ्यायला जातात , तेंव्हाही टीका होतीच ,

निंदकाचे घर असावे शेजारी .... संत तुकाराम

म्हणूनच काँग्रेसवाले कधीही भाजपामुक्त भारत वगैरे विचार करत नाहीत.

चार वर्षांच्या मुलीचा जीव गेल्याचे मला तीव्र दु:ख आहे; पण, त्या मुलीच्या वडिलांनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर हा अपघात झालाच नसता,’ असे ट्विट हेमा मालिनी यांनी केले.

अशीच कमेंट मुलीच्या पित्यानेही केली आहे,

पोलिसांनी अटक मुलीच्या पित्याला केली की हेमामालिनीच्या द्रायव्हरला ?

केंद्रात कॉंग्रेस सरकार सत्तेत आल्यास काश्मिर मधे लागू असलेला, 'आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अ‍ॅक्ट' रद्द करुन, भारतीय सैन्याने गेल्या पाच वर्षात काश्मिरमधे दगडफेक करणार्‍या दहशतवाद्यांवर केलेल्या अत्याचाराबद्दल त्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा कॉंग्रेसने त्यांच्या घोषणापत्रात केली आहे.

या शिवाय जे बाग्लांदेशी मुसलमान व रोहिंग्या मुसलमान भारतात अनाधिकृतपणे राहात आहेत त्यांना भारताचे कायमस्वरुपी नागरिकत्व व सरकारी नोकर्‍या देखील देण्याची घोषणा केली आहे. यावरुन कॉंग्रेस किती देशभक्त आहे हे समजून येते.

पप्पू गांधीने ७२००० रु. वर्षाला देण्याचे जे आश्वासन दिले आहे ते याच घुसखोर बांग्लादेशी व रोहिंग्या गरिब मुसलमांनासाठी आहे.

शिवाय गेल्या पाच वर्षात हिंदूस्थानी सैन्याने काश्मिरमधे ज्या हिरव्या दहशतवाद्यांना ठार केले त्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ करोड रु. नुकसान भरपाई देण्याची घोषणा देखील कॉंग्रेसने केली आहे.

चौकिदाराचे गुण सांगण्याऐवजी परत काँग्रेसच कसे वाईट हे सांगणे सुरु आहे का? भाजप समर्थकांकडे काँग्रेस सोडून दुसरे मुद्देच नाहीत का? ४४वर आलेली काँग्रेस संपली असे म्हणणारे तिचा जाहिरनामा इतका का सिरियसली घेत आहेत? भाजपच्या तंबूत आग लाग्ली आहे की काय?

<< बातमीचं सिलेक्टेड रीडिंग केल्याबद्दल अभिनंदन. बातमीतून वगळलेला भाग -

‘चार वर्षांच्या मुलीचा जीव गेल्याचे मला तीव्र दु:ख आहे; पण, त्या मुलीच्या वडिलांनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर हा अपघात झालाच नसता,’ असे ट्विट हेमा मालिनी यांनी केले. >>
------- तुम्ही पण एका बाजूचेच म्हणजे सिलेक्टेड स्टेटमेंट दिले आहे. त्या मुलीच्या वडिलांचे काय म्हणणे होते ?

<< बातमीत हे छायाचित्र स्पष्टपणे दिसत असतानाही सत्तरीची ही महिला इतरांना सोडून एकटीच स्वतः इस्पीतळात दाखल झाली असली हलकट दर्जाची टीका करणारे असंवेदनशील मुर्दाड लोक हे काँग्रेस भूक्तांशिवाय दुसरे कोण असणार? >>
------- २०१९ मधे सत्तर वर्षांची...
२०१५ मधे अपघात झाला आणि इस्पीतळात दाखल झाल्या.. त्यावेळी सत्तर वर्षांची...

<< आता हे छायाचित्र त्या अपघातातले नसून हेमाजींच्या एखाद्या चित्रपटातलेच आहे असेही विधान हे प्प्पूछाप लोक करतील म्हणा. >>
------- दुधाने तोंड पोळल्यावर ताक पण फुंकावे लागते. इकडचे तिकडचे ढापणारे आणि स्वत:चे म्हणुन डकवणारे, फोटोशॉप करणारे फेकू भक्त आस-पास असल्यावर अशी शंका येणे आणि घेणे अगदी योग्य आहे.

https://www.maayboli.com/node/69256
खोटेपणा उघडकीला आल्यावर फेकू भक्त चार दिवस गायब रहातात मग पुन्हा खोटेपणा सुरु...

<< जीपला बांधलेल्या त्या माणसाला मोदींनी 10 लाख नुकसान भरपाई दिली म्हणे >>
----- दगड फेकणार्‍याला १० लाख ? कशासाठी दिले आहेत हे पैसे ?

hemamalini.jpg

ज्या बाईला स्वतःच्या स्वार्थासाठी दुसर्‍या बाईचा संसार उधळावासा वाटला आणि तिने तो उधळुनही दाखवला शिवाय बेफाम गाडी चालवुन एका निरागस भारतीय मुलीचा जीव घेतला त्या बाईसाठी वंशपरंपरागत तैलबुद्धीचे खवट पापुद्रे टोकरुन बोटांच्या पेरांना वात येईपर्यंत वकीली करण्याचे कसब खरेच वाखाणण्याजोगे आहे.

७० वर्षांची खासदार स्वत: च्या गाडीची सिट मागे घेण्यास असमर्थ आहे, 'अलिशान जिप गाडी' शिवाय प्रवास करत नाही, वर कुणीतरी म्हटले होते अपघातानंतर त्यांच्या हालचालींवर मर्यादा आलेल्या आहेत. पण शेतामधे चारा गोळा करुन वहाण्याचे सामर्थ्य त्यांच्या दणकट मनगटात आहे. सेवाभावी वृत्तीला नमस्कार.

जनतेचा कळवळा हा आतुन असायला हवा असतो. अपघातास यांच्या गाडीचा वेग (१५० कि मी / तास ?) कारण होते. अपघाता नंतर मानवतावादी दृष्टीकोनातुन अपघात ग्रस्तांना मदत केली असती आणि पाच वर्षे जनतेसाठी कामे केली असती तर अशी नाटके करण्याची गरज पडली नसती.

गाडीची सीट मागे घेण्यास असमर्थ आहेत पण आपली खादारकीची सीट काही सोडत नाहीयेत

फुगा फुटला.

नोटाबंदी च्या यशाचे ढोल पिटणाऱ्या खोट्याचा फुगा फुटला.

नोटाबंदी च्या अभूतपूर्व यशामध्ये करदात्यांची संख्या वाढली म्हणून जेटली आणि भक्त मंडळी टाळ्या पिटत होती.

नेमक वास्तव काय आहे ?

एप्रिल २०१६ मध्ये करदाता म्हणजे नेमका कोण ह्याची व्याख्या सरकारने बदलून टाकली.

ज्या व्यक्तीच्या नावाने TDS कापलेला असेल त्यालाही आयकर विभागाने करदाता म्हटलेलं होत.

नोटाबंदी नंतर हे करदाते वाढल्याचे दावे केले गेले त्यामध्ये नेमक तथ्य काय आहे ?

हे फक्त TDS भरणारे करदाते २०१६-१७ ह्या आर्थिक वर्षात तब्बल ३३ लाखांनी घटले.

म्हणजे ज्या लोकांच्या उत्पन्नावर TDS लागत होता त्यांच्या उत्पन्नावर TDS लागू होईल एवढ त्यांच उत्पन्न राहील नाही किंवा तेवढ्या लोकांना रोजगार किंवा काम न मिळाल्याने त्यांच्या नावाने TDS भरण्याचा प्रश्नच आला नाही.

आता मूळ करदाते वाढले तो दावा तरी कितपत खरा होता ?

२०१६-१७ मध्ये १.६ कोटी करदाते वाढले असा सरकारने दावा केलेला.हे प्रमाण मागच्या वर्षीपेक्षा २५ टक्के जास्त होत.

मात्र प्रत्यक्षात रिटर्न्स दाखल करणाऱ्या करदात्यांची संख्या ८८.०४ लाख एवढी घटली आहे. म्हणजे एवढ्या लोकांनी मागच्या वर्षी ( २०१५-१६ आर्थिक वर्षात ) रिटर्न्स दाखल केलेले होते मात्र २०१६-१७ मध्ये त्यांनी रिटर्न्स दाखल केले नाहीत.

हे रिटर्न्स दाखल न करण्याच प्रमाण २०१५-१६ च्या तुलनेत दहा पट जास्त आहे.

२०१५-१६ मध्ये रिटर्न्स दाखल न करणारे ८.५६ लाख लोक होते ते २०१६-१७ मध्ये थेट ८८ लाख झालेत.

ह्याचा सरळ अर्थ आहे ८८ लाख लोकांचा एकतर रोजगारच गेलाय किंवा त्यांच उत्पन्न करपात्र नाहीये.म्हणजेच मागच्या वर्षीपेक्षा त्यांच उत्पन्न ह्या वर्षी घटलेल आहे.

हे मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी रिटर्न्स दाखल न करण्याच प्रमाण २००० सालानंतर गेल्या वीस वर्षातल सगळ्यात जास्त आहे.

८८ लाख लोकांनी रिटर्न्स दाखल केलेले नाहीत.
ह्या लोकांच उत्पन्न घटल किंवा रोजगार गेलाय.

मित्रानो, हे समजून घ्या हे रीतसर सरकार दरबारी नोंदलेले करदाते आहेत जे नियमित कर भरत होते.

मग ह्यांची संख्या ८८ लाख असेल तर नोटाबंदी मुळे रोजगार गमवलेल्या असंघटीत क्षेत्रातल्या लोकांची संख्या किती प्रचंड असेल ? ज्यांची कुठेही नोंद नाही मात्र त्यांच अस्तित्व नाकारता येत नाही.

असा तुघलकी निर्णय घेणाऱ्या सरकारला अजूनही त्याबद्दल खंत वाटत नाही हे जास्त वाईट.

#लोकसभा_२०१९
#नोटाबंदी

भाजप समर्थकांकडे काँग्रेस सोडून दुसरे मुद्देच नाहीत का? >> प्रचारमंत्र्याला प्रधानमंत्री केल्यावर अजून काय होइल? गेल्या ५ वर्षात काय केलं आणि पुढं काय करू हे सांगता येत नसल्यानं जणू काही मागच्या ५ वर्षात पण काँग्रेसच सत्तेवर असल्यासारखं हे फक्त काँग्रेसवर टीकाच करत आहेत भाषणांमधून. कर्तुत्व नसलं की स्वतःला मोठं करण्यासाठी दुसर्‍याबद्दल खोटंनाटं बोलून लहान करायचा प्रयत्न करणं एवढंच जमतं यांना.. ना व्हिजन ना कर्तुत्व..

मध्य प्रदेशातले भाजप नेते संजय यादव यांच्याकडे १७ गावठी बॉम्ब, १३ पिस्तुल, ११६ काडतूस सापडलीत

घटनात्मक पदावर असताना राज्यपाल कल्याणसिंग " मोदींना निवडून द्या " म्हणतात, हा आचारसंहितेचा भंग आहे अस मान्य करून निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींना कळवलेल आहे.

नालासोपारामधला वैभव राउत, भाजपचे धनंजय कुलकर्णी आठवत असतील.

सरकारी परवानग्या, प्रसारण मंत्रालयाकडून आवश्यक असलेले लायसन्स न घेता " नमो वाहिनी " नावाची वाहिनी निवडणूक काळात अचानक सुरु झालीय ज्यावर फक्त मोदीनामाचा गजर चालू आहे.

राफेल वरच्या पुस्तकाला प्रकाशित करायला आधी परवानगी नाकारली मग दिली.

मात्र मोदिजींच्या आयुष्यावर येणारा सिनेमा प्रदर्शित करायला परवानगी नाकारावी अशी लोक विनंती करत असताना मात्र आयोग निवांत आहे.

साक्षी महाराज जे बोललाय ते उगाच नाही ," २०१९ च्या निवडणुका शेवटच्या , त्यानंतर निवडणुका होणार नाहीत "

आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तर कोरियामध्ये निवडणुका होतात मात्र तिथे किम जोंग हा एकटाच उमेदवार असतो ज्याला सगळी लोक मतदान करतात.उत्तर कोरियामध्ये लोकशाहीचा विनोद आहे. हॉंगकॉंग मध्ये उमेदवारी दाखल करण्यापूर्वी सरकारची परवानगी घ्यावी लागते ह्यावरून प्रचंड गदारोळ झालेला काही वर्षापूर्वी.

भारतातली निवडणूक प्रक्रिया अशीच नामधारी करण्याचा डाव हाणून पाडायला मतदान करणे आणि हुकुमशाही आणू पाहणारे सरकार पराभूत करणे गरजेचे आहे.

खलिस्तान चा प्रश्न आणी कश्मीर प्रश्न कॉंग्रेस नि निर्माण केला आणी डोईजड होईपर्यत पोसला सुधा हे सत्य च आहे

Pages