Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुष्टता असावे, संतुष्टता,
तुष्टता असावे, संतुष्टता, आनंद असे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जुन्या मायबोलीवर कोणीतरी भेटीत उष्णता मोठी असेही व्हेरिएशन केलेय
परवाची गोष्ट .
परवाची गोष्ट .
चिरंजीव एक्दम रंगात येउन जोरजोरात गाणं गात होते " चिकन कनैया रे ओSS चिकन कनैया रे ! "
चिरंजीवांच्या पिताश्रीनी ऐकलं आणि माझ्या कडे बघून "काय पोरगं आहे !" टाईप्स लूक्स दिले.
पिताश्री : "अरे , काय म्हणतोयसं हे ?? "
चिरंजीव : (परत तेच , अधिक आत्मविश्वासाने ) " चिकन कनैया रे ओSS चिकन कनैया रे ! "
पिताश्री : "असं आहे का ते गाण ? काहीही गातोयसं"
चिरंजीव : (सरळ दुर्लक्ष , अधिक जोशात ) " चिकन कनैया रे ओSS चिकन कनैया रे ! "
पिताश्री: (समजावणीच्या सूरात , अति-आत्म्विश्वासाने) "किशन कन्हैया रे ओ मेरे किशन कन्हैया रे असं आहे ते "
माता : (केविलवाण्या चेहर्याने दोघांकडे बघत) दोन्ही रत्न माझ्याच पदरात का?? ( अर्थात मनात)
माता : (केविलवाण्या चेहर्याने
माता : (केविलवाण्या चेहर्याने दोघांकडे बघत) दोन्ही रत्न माझ्याच पदरात का?? ( अर्थात मनात) >>>>
हसून हसून पडले खुर्चीतून मी .. आई गं आई !!
>>>किशन कन्हैया रे ओ मेरे
>>>किशन कन्हैया रे ओ मेरे किशन कन्हैया रे असं आहे ते "<<<
नक्की काय गाणं आहे मग?
Chittiyaan kalaiyaan ve
Chittiyaan kalaiyaan ve
Oh baby meri chittiyan kalaiyan ve
हे असावं ते गाणं
चिकन कनैया रे ओSS चिकन कनैया
चिकन कनैया रे ओSS चिकन कनैया रे ! "![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
पिताश्री: (समजावणीच्या सूरात , अति-आत्म्विश्वासाने) "किशन कन्हैया रे ओ मेरे किशन कन्हैया रे असं आहे ते " >>>>>> मी ही पडले खुर्चीतुन...
<<भेटीत उष्णता मोठी असेही एक
<<भेटीत उष्णता मोठी असेही एक मायबोली व्हेरिएशन आहे Happy<<
ऋणानुबन्धाच्या, फारच फ्येमस झालय. इथे वाचुन ही गाणी परत अनवनधानाने ऐकायला मिळाली तर ही चर्चा आठवते आणि हहपुवा व्हायल होत.
अरारा... उष्णता !!
मी तर इथवर ऐकलय,
"ऋणानुबन्धाच्या तुटुन पडल्या गाठी
हे गीत पुत्रकामेष्टी.... !!
पुत्रकामेष्टी वरून उगीच
पुत्रकामेष्टी वरून उगीच दोघांच्या कपड्यांचे नाव ऋणानुबंध आहे आणि त्यांच्या गाठी तुटल्या असा अति आचरट विनोद करावासा वाटला ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
बैरुत की रंगरलिया, ये फूलोंकी
बैरुत की रंगरलिया, ये फूलोंकी गलियां रो पडी
(पॅरिस, स्वित्झर्लंडसारखे बैरुतलासुद्धा लोक हिरॉईनला घेऊन नाचायला जात असतील, असं तेव्हाच्या बालमनाला वाटलं होतं)
बैरुत की रंगरलिया >>>
बैरुत की रंगरलिया >>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
नमस्कार.
माता : (केविलवाण्या चेहर्याने
माता : (केविलवाण्या चेहर्याने दोघांकडे बघत) दोन्ही रत्न माझ्याच पदरात का?? ( अर्थात मनात) >>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हे गीत पुत्रकामेष्टी Lol
हे गीत पुत्रकामेष्टी >>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
माता : (केविलवाण्या चेहर्याने
माता : (केविलवाण्या चेहर्याने दोघांकडे बघत) दोन्ही रत्न माझ्याच पदरात का?? ( अर्थात मनात) >>>>>Lol
जरा उशीरच झालाय...पण
जरा उशीरच झालाय...पण अजूनसुद्धा असंच ऐकू येतं..
"भुईला या मेघुटाचा दाना...चहूकडं बहरला राना..."
आधी वाटलं राणा आहे म्हणून तसं असेल....
सूचना: २००० पेक्षा जास्त
सूचना: २००० पेक्षा जास्त पोष्टी झाल्याने हा धागा बंद केलेला आहे. पुढिल चर्चा याठिकाणी चालू आहे...
https://www.maayboli.com/node/52599
“नभ आले भरुनी” आहे की “स्वर
“नभ आले भरुनी” आहे की “स्वर आले दुरुनी” आहे की “ढग आले दुरुनी” आहे हे मला कधीच पटकन सांगता येत नाही
सध्याचे धुमाकुळ वाले गाणे
सध्याचे धुमाकुळ वाले गाणे तरीफां मधे मला असं ऐकू येतं
डाएटींग पे है तो क्यूं खाती पाव![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ते तसंच आहे अंजली
ते तसंच आहे अंजली
“स्वर आले दुरुनी” असे आहे ते.
“स्वर आले दुरुनी” असे आहे ते. अजून एक "तोच चन्द्रमा नभात" गाणे खरखरणाऱ्या रेडिओवर "तूच चंद्र मानवात" असे ऐकायला यायचे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असो. २००० पेक्षा जास्त पोष्टी झाल्याने हा धागा बंद केलेला आहे. पुढिल चर्चा याठिकाणी चालू आहे...
https://www.maayboli.com/node/52599
मला "रिक्षावाला हिरो तो माझा
मला "रिक्षावाला हिरो तो माझा , तोच आहे माझ्या दिलाचा राजा" हे "रिक्षावला दिर तो माझा, तोच आहे माझ्या दिलाचा राजा" असा वाटायचं. मी विचार करायचे अस कस लिहिलंय गाणं. लाज कशी नाही वाटत असा लिहायला.
ते तसंच आहे अंजली>>> लिरिक्स
ते तसंच आहे अंजली>>> लिरिक्स गुगलून पाहिले...क्यूं खाती भाव? असं दिसतेय आणि नवर्याला पण ते भाव असंच ऐकू येतं... म्हटलं अरे डाएटींग आणि पाव चा लॉजिकली अर्थ तरी लागतोय... भाव काय खायचाय डाएट करते तर![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
लिरिक्स गुगलून पाहिले...क्यूं
लिरिक्स गुगलून पाहिले...क्यूं खाती भाव? असं दिसतेय >>> हायलां !!म्हणजे मलाही चुकीचे ऐकु येत होत तर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डाएटींग आणि पाव चा लॉजिकली अर्थ तरी लागतोय... भाव काय खायचाय डाएट करते तर >>>> एक्झाक्टली . म्हणून मीही पावच बरोबर म्हटलं .
डायट-पाव-भाव कुठलं गाणं आहे
डायट-पाव-भाव
कुठलं गाणं आहे हे?
सस्मित हे घ्या
सस्मित
हे घ्या
https://www.youtube.com/watch?v=3SWc5G8Gx7E
इथे लिहू नका असे सांगूनही लोक
इथे लिहू नका असे सांगूनही लोक इथेच लिहू लागलेत... अॅडमिन टाळे लावा...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सूचना: २००० पेक्षा जास्त पोष्टी झाल्याने हा धागा बंद केलेला आहे. पुढिल चर्चा याठिकाणी चालू आहे...
https://www.maayboli.com/node/52599
परदेसाई, जमल्यास वरच्या मूळ
परदेसाई, जमल्यास वरच्या मूळ पोस्टमध्ये तशी सूचना लिहाल का? नवीन किंवा क्वचित भेट देणारे मेंबर्स अश्या अलिखित नियमांपासून अनभिज्ञ असतात. सर्व जण अगदी सर्वच प्रतिसाद वाचत असतील असंही नाही.
डायट-पाव-भाव >>Lol
डायट-पाव-भाव
>>Lol
अंजली थँक्स. पण कसलं भयंकर
अंजली थँक्स. पण कसलं भयंकर आहे ते गाणं![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
लिंक चं पुनरुज्जीवन आवश्यक
लिंक चं पुनरुज्जीवन आवश्यक आहे.
स्ट्रेस बस्टर.
की आजकाल सगळ्यांना सर्व गाणी कळू लागलियात?
Pages