काही दिवसांपूर्वी सिंहगडवर गेलो होतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा तिथे परिस्थिती वेगळी होती. आता खूप सकारात्मक बदल झाले आहेत. स्वच्छता, डागडुजी, रस्ते वगैरे. बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याचबरोबर एका गोष्टीचे कोडे उलगडले नाही. गडावर पूर्वी मांसाहारी जेवण मिळायचे ते आता बंद केले आहे. मद्यपान बंदी एकवेळ समजू शकतो. आपल्याकडे बरेचसे पब्लिक दारू पिली कि आरडाओरडा, शिवीगाळी, बाटल्या फोडणे तसेच अन्य घृणास्पद कृत्ये करतात ज्याचा इतर पर्यटकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष त्रास होऊ शकतो.
पण मांसाहाराने काय घोडे मारले आहे? त्यावर बंदी कशासाठी? कचरा म्हणावा तर तो अन्य खाण्यापिण्याने पण होतोच आहे गडावर. मांसाहाराने थोडा अधिक होईल इतकेच. तिथे मी विचारणा केली असता "गडाचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून" वगैरे उत्तरे मिळाली. अरे म्हणजे इतिहासातील ज्या वीर पुरुष व पराक्रमी योद्धा असलेल्या महान विभूतींमुळे हा गड पवित्र स्थान बनले आहे ते लोक मांसाहार करत नव्हते शाकाहारी होते असे म्हणावयाचे आहे का? नरवीर तानाजी मालुसरे असोत वा खुद्द शिवछत्रपती असोत. पराक्रमी योद्धे होते. मांसाहार तर करतच होते. मग तिथे येणाऱ्यानी मांसाहार केला तर पावित्र्य बिघडण्याचे काय कारण? थोडीतरी तर्कसंगती आहे का ह्या बंदीला? नक्की कोण आहेत या बंदिमागे?
थोडा मागोवा घेतला तेंव्हा लक्षात आले एक "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" म्हणून आहे (जसे काय गड किल्ले म्हणजे सरकारची नव्हे तर यांचीच मक्तेदारी) त्यांनी हि बंदीची मागणी व नंतर अंमलबजावणी केली आहे. काही बातम्यांमधून लक्षात आले कि सरकारी यंत्रणा नव्हे तर या संघटनेचे लोकच गुंडगिरी करून मांसाहार करू देत नाहीत. अजून थोडे खोलात जाऊन पाहिले असता लक्षात आले कि हि संघटना म्हणजे देशातील कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे पिल्ले आहे हे जाणवले (त्यांच्या फेसबुक पेज व इतर माहितीवरून). गड किल्ल्यांची निगा राखण्यासाठी खरे तर सरकारी यंत्रणा आहे. गड किल्ले कोणाची खाजगी मालमत्ता नव्हे. तरीदेखील गडांवर या खाजगी संघटनेचे वर्चस्व आहे!
काही जण मांसाहार बंदीसाठी वनखात्याच्या नियमाचा आधार घेताना दिसतात. म्हणे वनक्षेत्रात मांसाहार वर्ज्य आहे. अरे पण तसे असेल तर मग इतकी वर्षे वनखात्याने हे सुरु ठेवूच कसे दिले असते?
आणि मग सगळी मेख लक्षात आली.
मांसाहाराचे वावडे ना राजाला होते ना मावळ्यांना. मांसाहार न करणारे आहेत ठराविक हिंदुत्ववादी. त्यांना आवडत नाही म्हणून त्यांनी तो "अपवित्र" ठरवून त्यास गडांवर बंदी घातली असे समजायला बक्कळ वाव आहे. म्हणजे सरळ सरळ धार्मिक दहशत. बाकी काही नाही. (शिवाय याचा साईड इफेक्ट म्हणून "राजांना मांसाहार वर्ज्य होता म्हणूनच आजही गडांवर मांसाहारास बंदी आहे" असे अजून पाच पन्नास वर्षांनी कोणतरी एखादा भुक्कड कवी/शाहीर लिहून जाऊ शकतो हा भाग वेगळाच).
कुणाची काय काय मते आहेत यावर?
मद्यपान बंदी एकवेळ समजू शकतो.
मद्यपान बंदी एकवेळ समजू शकतो.
<<
इनामदार, पब्लिक प्लेसमधे दारू प्यायला आपल्याकडे बंदी इतिहासपूर्व काळापासून आहे. (आय मीण २०१४ ला हिंदूस्थान भाजपाने मोठ्या युद्धानंतर जिंकून घेतला त्याच्या फारच पुर्वीपासून)
सिंहगडावर परमिटरूमसाठी आधी कुणी़ परवाना दिलेला नव्हता ही छाती ठोक माहिती आहे. फडणवीस सरकारने दिला असेल तर ठाऊक नाही.
पब्लिक प्लेसमधे स्वतःची आणून प्याला तरी खडी फोडायला पाठवायची सोय आहे. सिंहगडाच्या रस्त्यात ब्रिदलायझर घेऊन २ खाकीधारक ठेवता येतील. हवेच तर जाता जाता आयएटीच्या गेटपाशी असल्या दारूड्यांना मिल्ट्रीचा सत्कार देण्याचीही सोय करता येईल.
तेव्हा "समजू शकायचा" संबंधच नाही! नो दारू.
पण खातो काय, त्याच्याशी या टिनपॉट हिंदूबंधू म्हणवणार्या जैन मारवाड्यांचा अन मूर्ख हिंदुत्ववाद्यांचा काय संबंध?
>>राज, तीनचारशे
>>राज, तीनचारशे वर्षांपूर्वीचे प्रत्येक स्मारक हे एक पर्यटनस्थळच असते.<<
कबुल, पण त्या स्थळाचं रुपांतर एखाद्या धाब्यात झालेलं तुम्हाला चालेल का? माझा मुद्दा परत एकदा क्लियर करतो. सिंहगडावर मांसाहार करण्याला विरोध नाहि, तर सिंहगडावर मांसाहार चांगला मिळतो म्हणुन तिथे जाउया (मालुसरेंच्या पराक्रमाच्या खाणाखुणा यात काय बघायचं आहे एव्हढं?) या भावनेवर आहे. माझ्या वरच्या प्रतिसादातलं तुमचं कोट केलेलं वाक्य तीच भावना प्रमोट करते, म्हणुन हा पोस्टप्रपंच...
ऐतिहासीक स्थळांचं बाजारीकरण का होतंय, हा विषय "चिंतनीय" आहे असं मला वाटतं. तुमचे विचार वेगळे असु शकतात याची मला कल्पना आहे...
आरारा - आय बिलिव, सायलेंस इज
आरारा - आय बिलिव, सायलेंस इज दि बेस्ट रिस्पांस टु ए फूल...
"इनामदार, पब्लिक प्लेसमधे
"इनामदार, पब्लिक प्लेसमधे दारू प्यायला आपल्याकडे बंदी इतिहासपूर्व काळापासून आहे."
--> एखादी गोष्ट अनेक वर्षांपासून चालत आली म्हणून ती योग्य असेलच असे नाही. समस्या "इतरांना त्रास होऊ शकतो" हि आहे. म्हणून पब्लिक प्लेसमध्ये दारू पिण्यावर बंदी आणली. इतरांना त्रास देणाऱ्याला (दारू पिऊन अगर न पिऊन) जरूर शिक्षा द्या. पण जे शांतपणे त्यांच्या त्यांच्या जागी बसून (किंवा उभारून) पीत असतील आणि प्यायल्यानंतर कोणाला त्रास देत नसतील, अयोग्य वर्तन करत नसतील तर त्यांच्या पिण्यावर नाहक बंदी कशासाठी? असा मुद्दा आहे.
पण आपल्याकडे *बहुतांश* पब्लिक दारू पिली कि आरडाओरडा, शिवीगाळी, बाटल्या फोडणे तसेच अन्य घृणास्पद कृत्ये करतात. म्हणूनच म्हटले सरसकट पिण्यावर बंदी आणली हे समजू शकतो (जरी ते तत्त्वतः चुकीचे असले तरी)
सायलेंस इज दि बेस्ट रिस्पांस
सायलेंस इज दि बेस्ट रिस्पांस टु ए फूल...
<<
You responded to me, ergo by ur logic i am not fool.
But you remind me not to respond to you. I know. And I don't most of the times.
But that response is for others who read your right wing putrescent messages.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
"सिंहगडावर मांसाहार करण्याला
"सिंहगडावर मांसाहार करण्याला विरोध नाहि, तर सिंहगडावर मांसाहार चांगला मिळतो म्हणुन तिथे जाउया (मालुसरेंच्या पराक्रमाच्या खाणाखुणा यात काय बघायचं आहे एव्हढं?) या भावनेवर आहे."
--> मान्य आहे. पण सिंहगडावर गरमागरम खेकडाभजी पिठले मिळते म्हणून जाऊया हे सुद्धा घडत आहे. पण म्हणून काय गडावरील सर्वच खाण्यापिण्यावर बंदी घालावी का? कि पर्यटकांना फार आवड निर्माण होणार नाही अशाच खाण्याला परवानगी द्यावी? दोन्हीलाही अर्थ नाही. आणि त्याचबरोबर सगळ्या सिंहगडभर खानावळी आणि खादाडीच असावी असेही नव्हे. दोन्हीचाही अतिरेक अयोग्यच.
कोणत्याच गाद किल्ल्यावर, अगदी
कोणत्याच गड किल्ल्यावर, अगदी शनिवार वाड्यातही एकही बिल्डिंग नीट उभी का नाही? इंग्रजांनी या किल्ल्यांची वाताहत कशी केली याबद्दल एका तरी भाजपाप्याचे संशोधन वाचायचे आहे मला
साला सगळा इतिहास कम्युनिस्टांनी लिहिलाय. आम्ही फक्त पुराणे अन बखरी लिहितो..
अन अफजल खान फक्त देवळे तोडत होता म्हणून बोंब मारतो. ही इतिहासाची देवळे कुणी फोडली याबद्दल अवाक्षर?
<< तर सिंहगडावर मांसाहार
<< तर सिंहगडावर मांसाहार चांगला मिळतो म्हणुन तिथे जाउया (मालुसरेंच्या पराक्रमाच्या खाणाखुणा यात काय बघायचं आहे एव्हढं?) या भावनेवर आहे. >>
-------- मोठा प्रेक्षक वर्ग गोळा होतो आहे हे चान्गले लक्षण आहे, त्यान्ना तानाजी मालुसरेन्च्या पराक्रमाचे पोवाडे सान्गा. आपण स्वच्छता अभियान करतोच ना ? गडान्ची डागडुजी होत नाही या बाबत सरकारवर दबाव आणताना हाच नवशि़क्षित (पण मान्साहारी) वर्ग आवाज करेल. मालुसरेन्चा पराक्रम शाकाहारी तसेच मान्साहारी दोघान्नाही समान प्रेरणा देणारा असेल.
लोकान्नी कुठे काय खायला हवे, नको हे सान्गण्याचा अधिकार कुणालाही नाही. आहारावर अशी बन्दी सुचवणे हे घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारान्चे सरसकट उल्लन्घन आहे. आहानुरुप लोकान्ना विभागणे मला मान्य नाही. problems (स्वच्छता...) असतील पण त्याचे हे solution नक्कीच नाही आहे.
एक दिवस नाही खाल्ले तर चालते... असा विचार आपण जेव्हा करतो त्यावेळी आपल्याला ना गडा बद्दल आदर असतो, ना इतिहासाबद्दल.... जर समोरच्या व्यक्तीचा आहार समजण्यात आपण कमी ठरतो तर मी जात पाळत नाही हे कशाच्या आधारावर आपण म्हणतो ? मी जात पाळत नाही या पोकळ शब्दान्ना कृतीचा आधार असणे आत्यन्तिक गरजेचे आहे...
भारतात फक्त १५% शाकाहारी आहेत
नुकत्याच झालेल्या एक सर्व्हेनुसार भारतात फक्त १५% शाकाहारी आहेत.
खाण्यापिण्याच्या बाबतीत
खाण्यापिण्याच्या बाबतीत भेदभाव, उच्चनीचता आणि तुच्छता बाळगायचा मूठभर लोकांचा कडवेपणा इतका वाढू लागलाय की कधी कधी ब्रिगेडसारख्या एखाद्या जहाल संघटनेने यात लक्ष घालावे असे वाटून जाते. एक छोट्याशा गटाची मते हिंदुत्वाच्या नावाखाली इतरांवर लादण्याचा आणि खाण्यावरून न्यूनगंड निर्माण करवण्याचा हा प्रकार शक्य तितक्या लवकर थांबावा एव्हढेच.
सिंहगड निव्वळ ऐतिहासिक पर्यटन
सिंहगड निव्वळ ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे का? रायगड तसं असावं, असं वाटतं.
सिंहगडावर किंवा इतर गडांवर
सिंहगडावर किंवा इतर गडांवर मांसाहार बंदी आहे ह्याचे कारण त्या निमित्ताने तेथे पार्ट्या झोडल्या जातात हेच आहे. शिवाजी महाराज किंवा इतर मराठे योद्धे मांसाहार करत होते म्हणून गडावर मांसाहार करायला बंदी नसावी हे लॉजिक आज तीन, चार शतकांनी लागू करता येत नाही. आज मुघलांचे हल्ले होत असते आणि मावळ्यांना लढावे लागत असते तर आज ह्या गोष्टींवर कोणीही वेळ घालवला नसता. पण आता पार्ट्या झोडण्यासाठी गडावर जाणारेच अधिक असतात.
तसेच, कोणी काय खावे हे ज्याचे त्याला ठरवूदेत हे अगदी बरोबर आहे. परंतु त्या खाण्याबरोबर जो मद्यपानातून आलेला उन्माद सोबत येऊ शकतो तो इतर पर्यटकांसाठी व श्रद्धास्थानासाठी हानिकारक ठरु शकतो. कवी शाम ह्यांची शिवजयंतीवरची कविता वाचली तर वास्तव चांगले लक्षात येईल. मद्यपान शाकाहारासोबतही करता येतेच हेही खरे असले तरी त्याचे प्रमाण कमी असते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. केवळ अर्ग्युमेन्टसाठी हे मुद्दे वापरण्यात काही हशील नाही.
लोहगडावर मद्यपींनी दोन मुलींना जो भयानक त्रास दिला होता तो ह्या गोष्टींचे भयानक उदाहरण आहे.
<< सिंहगडावर किंवा इतर गडांवर
<< सिंहगडावर किंवा इतर गडांवर मांसाहार बंदी आहे ह्याचे कारण त्या निमित्ताने तेथे पार्ट्या झोडल्या जातात हेच आहे. शिवाजी महाराज किंवा इतर मराठे योद्धे मांसाहार करत होते म्हणून गडावर मांसाहार करायला बंदी नसावी हे लॉजिक आज तीन, चार शतकांनी लागू करता येत नाही. >>
------ पार्ट्या होत आहे म्हणुन बन्दी तर पार्ट्या का नको व्हायला? लोक गडाचा आनन्द घेत असतील तर हे तालीबानी नियम का थोपवता आहात त्यान्च्यावर? उद्या त्यान्चा पेहेराव काय असावा यावर पण फतवे निघतील.
<< परंतु त्या खाण्याबरोबर जो मद्यपानातून आलेला उन्माद सोबत येऊ शकतो तो >>
-------- खाण्याबरोबर जो मद्यपानातुन आलेला उन्माद... हे लॉजिकच पान्गळे आहे. प्रश्न मद्यपानाचा असेल तर त्याच्या वर आहे ना बन्दी ? नसेल तर घाला ना बन्दी.
पार्ट्या होत आहे म्हणुन बन्दी
पार्ट्या होत आहे म्हणुन बन्दी तर पार्ट्या का नको व्हायला? लोक गडाचा आनन्द घेत असतील तर हे तालीबानी नियम का थोपवता आहात त्यान्च्यावर?<<<<
इथल्या काही संघटनांना हे विचार ऐकवून बघा.
भेळपुरीच्या पार्ट्या चालतील
भेळपुरीच्या पार्ट्या चालतील का?
उन्माद धर्मपानातूनच जास्त येताना दिसतो आजकाल.
मद्यपानातून उन्माद आणि त्यातून इतरांना त्रास होईल असं वर्णन हे फक्त गडापुरतं नाही, तर कुठेही निषिद्ध आहे. शिवाय त्यावर उपाय म्हणून डायरेक्ट मद्यपानालाच बंदी घालायची. माळशेजसासारख्या ठिकाणी मद्यपींचा असाच त्रास होतो म्हणून पोलिस तिथे जाणार्या गाड्या तपासतात असे वाचले.
वर इनामदारांनी स्वच्छ लिहिलंय - "गडाचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून" असं उत्तर त्यांना मिळालं. याकडे दुर्लक्ष करून मद्यपानाच्या वाटेवर भरकटण्याचे कारण?
<< लोहगडावर मद्यपींनी दोन
<< लोहगडावर मद्यपींनी दोन मुलींना जो भयानक त्रास दिला होता तो ह्या गोष्टींचे भयानक उदाहरण आहे. >>
------- देशात दर-रोज हजारो-लाखो मुलीन्ना त्रास दिला जातो.... हे त्रास देणारे बस-रेल्वे स्थानक, घर, चित्रपट गृह... कार्यालय... प्रत्येक ठिकाणी असतात. अनेक घटनात त्रास देणारी व्यक्ती घरातलीच/ परिचयाची व्यक्ती असते. मद्यपानाचा रोल किती असेल ?
मद्यपानामुळे त्रास देण्याचा प्रकार होतो हे लॉजिक... मग मद्यपानाला आळा बसवण्यासाठी मान्साहारावर बन्दी... सारान्श मान्साहारावर बन्दी मुळे सिहगडावर महिला जास्त सुरक्षित रहातील. लजबाब लॉजिक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथे आता सिलेक्टिव्ह रीडिंग
इथे आता सिलेक्टिव्ह रीडिंग करून अर्गुमेन्ट जिंकण्याच्या हातघाईवर लोकं आलेली आहेत.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शिवराय, श्रद्धा, गडावर मद्यपान, मद्यपानाला आळा बसण्याच्या अनेक मार्गांपैकी एक मार्ग म्हणून मांसाहार बंदी वगैरे वगैरे सगळे एकदम मनात ठसवले की वर येतायत तसे प्रतिसाद देता येणार नाहीत. त्यामुळे आता देशात हजारो मुलींना रोज त्रास दिला जातो वगैरे एखादाच मुद्दा घेऊन त्यावर लिहिले जात आहे.
<<इथे आता सिलेक्टिव्ह रीडिंग
<<इथे आता सिलेक्टिव्ह रीडिंग करून अर्गुमेन्ट जिंकण्याच्या हातघाईवर लोकं आलेली आहेत. Proud
शिवराय, श्रद्धा, गडावर मद्यपान, मद्यपानाला आळा बसण्याच्या अनेक मार्गांपैकी एक मार्ग म्हणून मांसाहार बंदी वगैरे वगैरे सगळे एकदम मनात ठसवले की वर येतायत तसे प्रतिसाद देता येणार नाहीत. त्यामुळे आता देशात हजारो मुलींना रोज त्रास दिला जातो वगैरे एखादाच मुद्दा घेऊन त्यावर लिहिले जात आहे. >>
------- सिलेक्टिव तुम्हाला वाटणे सहाजिक आहे.... लोहगडावर मद्यपीनी दोन मुलीन्ना त्रास दिला हा मुद्दा तुम्ही आणला. मद्यपानाला आळा घालण्यासाठी मान्साहार बन्दी हे तुम्ही आणले.... तुमचे हे प्रत्येक लॉजिक पान्गळे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.
मद्यपान हेच कारण आहे, तर
मद्यपान हेच कारण आहे, तर डायरेक्ट मद्यपानाला बंदी घालायला नक्की काय प्रॉब्लेम आहे? असा द्राविडी प्राणायाम का?
उद्या तिथे कोणी खारे शेंगदाणे, काजू, फर्साण इत्यादीसोबत मद्यपान केले तर चालेल का?
दुसरा प्रश्न पुन्हा एकदा : सार्वजनिक जागी मद्यपान करून किंवा न करताही धुमाकूळ घालणं वैध आहे का? मग इथे वेगळ्या नियमाची गरज काय?
तिसरा प्रश्न १. मद्यपींमध्ये मांसाहार्यांचं प्रमाण जास्त असतं (शाकाहार्यांचं नसतं)
२. मांसाहार्यांमध्ये मद्यपींचं प्रमाण जास्त असतं (मांसाहार करणारे आणि मद्यपान न करणारे विरळा कॉम्बिनेशन आहे)
३ यांच्या गोंधळ्/राड्याच्या प्रमाणातले व्हेरिएशन
असं सिद्ध करणारे काही सर्व्हे झाले आहेत का?
आणि देशात आणि राज्यात एक सक्षम सरकार जागेवर असताना अशा कोणत्याही संघटनांना अमुक जागी तमुक बंदीचे आदेश द्यायचे हक्क मिळावेत का? (अर्थात यात नवीन काही नाही. व्हॅलेंटाइन डे, प्रेमी युगुले, मद्यपी स्त्रिया, यांना स्वतःच नीतिमत्तेचे धडे देणे रामराज्याच्या संकल्पनेत बसतेच. ही यादी अयावत केली, तर धागा भलतीकचे जाईल, म्हणून अर्धीच सोडलीय).
पहिला प्रश्न पुन्हा : डायरेक्ट मद्यपानावर बंदी घालण्यात नेमकी कोणती अडचण आहे?
बेफिकिर. तुमचा मुद्दा कमकुवत
बेफिकिर. तुमचा मुद्दा कमकुवत आहे. बाकीच्यांचा दमदार. तुम्ही अर्गुमेंट हरत आहात. म्हणून असे प्रतिसाद लिहित आहात का?
आज मांसाहाराला बंदी. उद्या मुलंमुली सोबत फिरु नये म्हणून बंदी येईल. मोठ्या शहरातली हायफाय मुलंमुली तोकड्या कपड्यात गडावर येतात म्हणुन 'पावित्र्य' बाधित होइल. ते हातात हात घालून दंगामस्ती करतील तर महाराष्ट्राच्या शूर ऐतिहासिक परंपरेला धक्का पोचेल. हे सगळे तालिबानीच आहे.
तिथल्या संघटनांना हे ऐकवून बघा - ही एक धमकी आहे. या तुमच्या विधानाने हे सिद्धच होत आहे की हे सगळं वर्तन तालिबानी आहे.
>>>>इथल्या संघटनांना हे ऐकवून
>>>>इथल्या संघटनांना हे ऐकवून बघा>>>>
म्हणजेच,
आता मला हा मुद्दा डिफेड करता येत नाहीये, खरंतर तुमची बाजू पटते आहे, पण सुरवातीलाच फार फर्म स्टॅन्ड घेतल्याने मला हे सांगता येत नाहीये,
सो मी संघटनांना साद घालतो, एकदा का इकडे भावनिक मुद्द्यांवर शिवीगाळ /धमक्या सुरू झाल्या की मी मोरल हाय ग्राउंड घेऊन चर्चा सोडून देईन.
<< तिथल्या संघटनांना हे ऐकवून
<< तिथल्या संघटनांना हे ऐकवून बघा - ही एक धमकी आहे. या तुमच्या विधानाने हे सिद्धच होत आहे की हे सगळं वर्तन तालिबानी आहे. >>
------- या सन्घटणा कुठल्या आहेत? त्या देशाचा कायदा मानतात का?
बेफिकीर तुम्ही विनोदी लिहिताय
बेफिकीर तुम्ही विनोदी लिहिताय. थांबा आता.
सिंहगडावर मांसाहाराला बंदी,
सिंहगडावर मांसाहाराला बंदी, मद्यपानाला बंदी हा शुद्ध मूर्खपणा आहे. राजांना किंवा हिंदू धर्माला पूर्वी कधी निषिद्ध नव्हते, आताही नाही.
जगामधे अशी लाखो पर्यटन स्थळे आहेत की जिथे मांसाहार व मद्य बंदी नसतानासुद्धा कायदा, सुव्यवस्था वा स्वच्छता यापैकी कुठल्याच बाबतीत प्रश्न निर्माण होत नाहीत. याचाच अर्थ असा की मांसाहार वा मद्य या गोष्टींना जबाबदार नाही.
परदेशी अनेक फालतू पर्यटन स्थळे केवळ चांगल्या प्रकारे केलेल्या योजनांमुळे, सुव्यवस्थेमुळे व प्रसिद्धिमुळे लाखो पर्यटक खेचतात. पैसे मिळवतात. स्थानिक रोजगार तयार होतो. व ती स्थळे आकर्षक बनतात ते वेगळेच.
सुंदर आणि स्वच्छ किल्ले आपल्याला आवडतील की ढासणारे बुरूज, अस्ताव्यस्त वाढलेली खुरटी झुडपे आणि सर्वत्र पडलेली घाण घेउन दरिद्री दिसणारे सांगणारे गडकोट ?. दैदिप्यमान इतिहासाचे वारसे असेच असावेत का?.
आमच्याकडे परदेशी पाहुणे आले तर प्रेक्षणिय स्थळे दाखवायला कुठ न्यायच हा प्रश्न पडतो. बाहेर नाही अस काय आहे आपल्याकडे?. सिंहगड आहे. त्याला इतिहास आहे . पण सोयी काय आहेत?. विचार करा.
वनखाते आणि पुराणवस्तु खाते या दोघांकडून सर्व किल्ले वा ऐतिहासिक स्थळे काढून घ्यावीत, त्यांचा अत्यंत चांगला उपयोग खाजगी क्षेत्रातर्फे विकास करून पर्यटनासाठी व त्याबरोबर येणार्या रोजगारासाठी करता येईल.
आपल्याला धर्म, जात, फालतू दुराभिमान यातून वेळ मिळाला तर ना.
http://abpmajha.abplive.in
http://abpmajha.abplive.in/maharashtra/boy-dies-at-pratapgad-fort-in-sat...
बेफिकीर तुम्ही विनोदी लिहिताय
बेफिकीर तुम्ही विनोदी लिहिताय. थांबा आता.
नवीन Submitted by अमितव on 4 June, 2018 - 10:40 <<<<
धागा विनोदी असल्यामुळे होत असेल तसे! गडावर मांसाहार सुरू केला तर आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण होईल अशा थाटातला धागा आणि प्रतिसाद आहेत.
<< धागा विनोदी असल्यामुळे होत
<< धागा विनोदी असल्यामुळे होत असेल तसे! गडावर मांसाहार सुरू केला तर आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण होईल अशा थाटातला धागा आणि प्रतिसाद आहेत. >>
--------- आम्ही जिथे जिन्कतो तिथे घडतात त्या चर्चा.... आम्ही जिथे अडचणीत येतो तो धागा विनोदी... छान लॉजिक.
{तुम्ही विनोदी लिहिताय}
{तुम्ही विनोदी लिहिताय}
हास्यास्पद म्हणायचंय का?
गडावर मांसाहार सुरू केला तर -
गडावर मांसाहार सुरू केला तर --- माझ्यामते हा मुद्दा नाही आहे.
गडावर मांसाहारास हरकत घेणारे कोण आहेत व त्यांना काय अधिकार आहे हा मुद्दा आहे धाग्याचा. बेमालूमपणे विषय भलतीकडे नेण्याची मजबुरी काय असावी पण?
संघटना म्हणजे त्या ज्यांनी
संघटना म्हणजे त्या ज्यांनी शिवरायांना देवत्व बहाल करून आजच्या युगात स्वतःच्या जगण्यास अर्थ आणण्यासाठी हुकुमाचा एक्का बनवले आहे
थोड्या वेळात श्यामची कविता पोस्ट करतो
Pages