मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>नंतर समजलं, तिला फक्त "लू" हाच शब्द समजला होता<<

नशीब सवार लू गाणं होतं....पी लूsss ! पी लूsss....तेरे नयनो से...(OUTIM) हे गाण्म नाही ऐकलं तिनी Lol Lol

आणखी एक -

"संकष्टी ..संकष्टी ..संकष्टी "

असं म्हणून नाचणारी मुलगी meant to say

"सिंग इज किंग सिंग इज किंग सिंग इज किंग"

गोष्टीगावचे, धाग्याने २००० प्रतिसाद कधीच पार केले आहेत त्यामुळे लवकर धाग्याचा दुसरा भाग काढा. अ‍ॅडमीन टाळे लावण्या आधी.

ए, हा विषयच कसला भारी आहे...
”मला एकू आलेली चुकीची गाणी...”
आणि तोही किती तरी वर्ष आधीच इथे ’माबो’ वर मांडला आहे.
खरंच आहे,
अशी चुकीची गाणी मलाच ऐकायला येतात की काय, असं मला सारखं वाटत होतं, पण इथे तर २००८ पासूनच यावर चर्चा चाललेली दिसतेय.
विषय लई भारी आहे, आणि त्यावरचे प्रतिसाद तर त्याहून भारी आहेत...
मला ते, गुलजारांचे, ’माचिस’ मधील चप्पा चप्पा चरखा चले...मधील आनी बानी बोरिया तेरी बोनी बोनी बेरिये तले...
हे गाणं अजुनही, अर्थ आणि शब्दासकट कळलेले नाहीये.
हे गाणं ऐकलं तेव्हा, आपली श्रीदेवी, बोनी कपूरच्या प्रेमात पडलेली होती.
तेव्हा ती त्याला बोनी बोनी बेरिये तले म्हणत असेल का असे वाटायचे.
त्यातलं ते, यारा पेग यारा पेग... असं अजुनही ऐकू येतं...
तर ते खरंच कोणी मित्र कोणाला तरी ’पेग’ मागतोय का असं (घाबरत घाबरत) विचारावंसं वाटतंय...
आणि तसंच, (परत एकदा) गुलजारांचं, आजा आजा, दिल निचोडे च्या ऐवजी आम्ही, ”आजा आजा दिल्ली छोडे...असंच अजुनही म्हणतो.

पल्लवी ताई,
नमस्कार...
चप्पा चप्पा चरखा चले मधील तुम्हाला न कळलेली ओळ आहे...
औनी बौनी यारीया तेरी...
बौनी बौनी बेरीया तले...
यारा बे यारा बे....
होsss आ नी आ परदेसीया !!

म्हणजे माझ्या मित्रा..माझ्या प्रमाणेच तुझी मैत्री, तुझे प्रेम आणि तुमच्या गप्पा-टप्पा हे सारे काही छोट्या बोरांच्या शेतात बहरले होते..[यारा बे यारा बे....होsss आ नी आ परदेसीया !! ह्या ओळींना शब्दशः काही अर्थ नाहीये...]
मुळात माचीस हा एक अत्यंत intense movie होता. पंजाब च्या आतंकवादावर आधारीत त्याची कथा होती, सहाजिकच त्या मधील डायलॉग, गाणी ह्या मधे गुलजार साहेबांनी पंजाबी आणि थोडेबहुत हिंदुस्थानी चा वापर मुक्तपणे केला आहे. मागे एका वेबसाईट वर वाचले होते ह्या बाबतीतले विश्लेशण, स्वातंत्र्य पूर्व काळात एका थोर माणसाच्या नुसत्या चरख्यानी क्रांती घडविली, आणि लाखो युवक एकत्र आलेत आप्ल्या हक्कांसाठी लढायला तसाच चरखा ह्या गाण्यात ही आहे...पण हा चरखा फिरु लागल्यावर जमलेल्या मित्रांना आपले जुने दिवस आठवताहेत, आपली प्रेयसी आठवते आहे, बायको आठवते आहे....तर कुणाला हरविलेले अक्खे कुटुंब आठवते आहे....

मित्रानो... इथे २००० पेक्षा जास्त पोस्टी असल्याने नवीन धागा केव्हाच चालू केला आहे..
हा धागा फक्त वाचण्यासाठी आणि नवीन धागा लिहिण्यासाठी वापरावा....

या बाफचा नवीन धागा http://www.maayboli.com/node/52599 इथे आहे...

आजच 'कलर्स मराठी' वाहिनीवर वैशाली माडे ने गायलेलं गाणं ऐकलं आणि जुनी आठवण जागी झाली...

मराठी चित्रपट पिंजरा, गाणं/लावणी दिसला गं बाई दिसला, मला बघून गालात हसला, गं बाई हसला...
साधारण पणे १९७४-७५ ची गोष्ट. हे गाणं बरेचदा रेडिओ वरून किंवा गावात कुठलाही समारंभ असला की 'लाऊड-स्पीकर' वरुन ऐकायला मिळायचं. गाण्याच्या सुरुवातीच्या ओळीतली एक ओळ मला -
दाजीबा उडं, किर-किर-किरं ... अशी ऐकायला यायची. मला नेहमी शंका यायची - दाजीबा उडून किर-कीर कशाला करतो?...

काही वर्षांपूर्वी खरे शब्द कळले - काजवा उडं, किर-किर-किरं, तालात सुरात गाती...
Happy

>>> ऋणानुबंधाच्या... चुकून पडल्या गाठी, भेटीत दुष्टता मोठी' असे म्हणत असे!<<<
हे अगदी असच मला किती वर्षे वाटायचं जेव्हा जेव्हा मी रेडिओ वर एकायचे. त्यात रेडिओ इतका खरखर करायचा. आजी आजोबांना भांडताना सुद्धा म्हणायचे , आपली गाठ चुकुनच पडली. त्यामुळे कॉम्प्युटर काळ नसताना आणि अर्थात गूगल नसताना, लहानपणी खरेच वाटायचे.

कुमार गंधर्वांचा आवाज ( माफी मागून सांगते) तसाहे मला बोबडाच वाटायचा.

पुंबा,
ते 'भेटीत रुष्टता मोठी' आहे का? अरेरे, म्हणजे मी उगाच 'तुष्टता' हे योग्य समजत आलो आत्तापर्यंत!

झंपी.....!! Happy
सहमत! फक्त हे सांगायचं धाडस नव्हतं!.

एका फेसबूक फ्रेंडच्या वॉलवरून साभार ...

उमा कुलकर्णींच्या संवादु अनुवादु पुस्तकातल्या एका परिच्छेदाचा फोटो आहे. त्यात उमा कुलकर्णींनी विरुपाक्ष कुलकर्णींना चुकीच्या ऐकू आलेल्या गाण्याबद्दल लिहिलंय - `पर्वताच्या पायथ्याशी त्याचा गळा दाबला'

मूळ गाणं - `परवशता पाशदैवे....' Biggrin Biggrin

मी बेक्कार हसते आहे याला Rofl

>> पर्वताच्या पायथ्याशी त्याचा गळा दाबला
हो हे विडम्बन मी खूप लहानपणी ऐकले होते Happy (विशेषतः "जोशी अभ्यंकर" प्रकरण अद्याप चर्चेत असण्याच्या काळातच ते कुणीतरी केले असावे)

मला रेडिओ वर गाणी ऐकून हे कोडं पडायचं की भेटीत दुष्टता मोठी असं अभिमानाने आळवून आळवून का सांगतायत Happy

पण ते काय आहे मग, अनू? धृष्टता...? म्हणजे काय?
प्रेमगीतात एव्हढे अवघड शब्द कशाला म्हणत्ये मी! म्हणजे प्रेम राहिलं बाजूल आधी अरथ शोधत बसा तो काय म्हणतोय त्याचा!

Pages