मायबाप माबोकरांनो, पहीले वहीले लिखाण आहे. चुका मोठ्या मनाने पदरात/ओढणीत /स्टोलात/रूमालात (भगीनी वर्गासाठी ) आणि पोटात (बंधूवर्गासाठी) घालून घ्या.
तर झालेय असे. परवाच संक्रांत झाली अन त्या दिवसभर गोड बोलणारी बायको पुढचे दोन दिवसही गोडच बोलतेय. मी उगाचच जाऊन चेक करून आलो की राणीसरकारांच्या मधुमेहाच्या गोळ्या चुकून संपल्या तर नाहीत. पण भानगड काही समजेना.
काय सांगू, डोळ्याला डोळा लागत नव्हता , डोक्यात एकच विचार के ये माजरा क्या है? अखेर ट्युब पेटली की हे सर्व फक्त आणि फक्त येत्या महीन्यात येणाऱ्या तिच्या वाढदिवसामुळे आहे. (सुज्ञास अधिक न सांगणे लागो.)
फेब्रुवारी हा फार घातक महीना असतो हो. HR वाले प्रुफ देऊनही भलामोठा TDS कापून पगार देतात. अन दरवर्षी प्रमाणे बायकोचा वाढदिवस मग लेकीचा वाढदिवस अन पाठोपाठ १४ फेब्रुवारी येतो. दोघींनाही बर्थडेप्रमाणे व्हॅलेंटाइन गिफ्टही हवे असते अन तेही सरप्राईज?
आता तुम्हीच सुचवा
(ताजे )ताक: @ वेमा, असा धागा न सापडल्याने नवीन धागा काढला आहे. धाग्यात काही त्रुटी असल्यास कृपया मार्गदर्शन करावे.
कपड्यापैकी काही (साडी, पंजाबी
कपड्यापैकी काही (साडी, पंजाबी ड्रेस, स्कार्फ वगैरे), नवीन फोन, पर्स, परफ्युम, इलेक्ट्रॉनिक्स (ई-बुक रीडर वगैरे), एखादे पेंटिंग किंवा वॉल हँगिंग वगैरे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
१. स्वयंपाकघरासाठी काहीही घेऊ नका.
२. तुम्हाला जे हवे आहे, ते बायकोला गिफ्ट देऊ नका. उदा. टॅबलेट, बोसचे हेडफोन वगैरे. नाही तर आयुष्यभर ऐकावे लागेल की तुला पाहिजे ती गिफ्ट घेतोस नेहमी. म्हणून मी फोन पण गुलाबी रंगाचा घेतला होता.
३. बायकोला काय हवे आहे त्याचा अंदाज घ्या. बहुतेक वेळा हिंट मिळतेच.
४. स्पष्ट विचारले तर बायको बहुधा नाहीच म्हणेल (लग्नाला किती वर्ष झाली यावर अवलंबून आहे.) पण ती नाही म्हणाली तरीही एखादी गिफ्ट आणाच. Buying peace is more important.
५. अगदिच काही सुचले नाही तर मी करतो ते करा, म्हणजे एखादा दागिना आणा (सोने किंवा डायमंडचा, सेफ बेट), सोबत गुलाबाचा गुच्छ आणि चॉकलेट. आणि रात्री डिनरला जायचे.
मुळात मी वाढदिवसासाठी वाट बघतच नाही, मनात आले की बायकोला कधीही गिफ्ट देतो. बर्याचदा फुले आणतो, उगीचच चॉकलेट/स्पेशल्टी आइस क्रीम आणतो. या सरप्राईजची मजा जास्त असते, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
शुभेच्छा.
अरे नका देऊ काहीही...
अरे नका देऊ काहीही...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्हा नवरेमंडळींचे हे वाढते फॅड उद्या आम्हा गरीबांनाही झेलावे लागणार आहे..
कुठेतरी हे थांबायला हवे...
कमॉन माबो गाईज तुम्ही तरी नका देऊ यांना आयडीया.. बाकी येथील माबो बायका तुम्हाला छान आयड्या देतील याची शक्यता कमीच. कारण जे आपला नवरा आपल्याला देत नाही ते प्रेमाचे गिफ्ट दुसर्या कुठल्या बाईला तिच्या नवर्याने द्यावे हे कोणत्याही स्त्रीला सहजी पचनी पडत नाही........ हे मी माझ्या गर्लफ्रेंडच्या मोडक्यातोडक्या अनुभवावरून सांगतो
येनीवेज, आता द्यायचेच ठरवले असेल, तर जे काही द्याल ते त्यांना फेसबूकवर मिरवायला आवडेल का, वा तिथे शायनिंग मारायला किती मजा येईल याचा विचार करून द्या.
शेवटी काय, तर तुमच्या गिफ्टवर तुमची बायको नाही तर तिच्या मैत्रीणी खुश झाल्या पाहिजेत. त्यांनी वाहवा केले तर बायको खुश. त्यामुळे बायकोच्या मैत्रीणींची आवड लक्षात घ्या. झाल्यास त्या मैत्रीणींचे फेसबूक चाळून त्यांच्या आवडीचा काही अंदाज लागतोय का बघा..
एक पटकन सुचणारे, वर्षातून एकदा फिरायल जात असाल तर बर्थडेला जोडूनच जात जावा.. बर्थडे सेलिब्रेशन अॅट अमुकतमुक टाकायला लयं भारी... तिथे एक्स्ट्रा केकचा काय तो खर्चा!
कुणाची बायको आहे त्यावर
कुणाची बायको आहे त्यावर अवलंबून आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
..
..
..
..
म्हणजे अम्बानीची असली तर विमान आणि माझ्यासारख्याची असली तर फुले पण चालतील..
देसाई हे म्हणजे फारच झाले. ते
देसाई हे म्हणजे फारच झाले. ते पाथ फाईंडर स्वतःच्या बायकोला गिफ्ट देताना हुकलेत नि तुम्ही त्यांना अम्बानी नि देसाई च्या बायड्यांना गिफ्ट सुचवताय ?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
सुरवात तर चांगली झालीये.
@उपाशी बोका
मुळात मी वाढदिवसासाठी वाट बघतच नाही, मनात आले की बायकोला कधीही गिफ्ट देतो. बर्याचदा फुले आणतो, उगीचच चॉकलेट/स्पेशल्टी आइस क्रीम आणतो.
>>>>>>अहो हे मी पण करतो त्यामुळे होते असे की तिच्या अपेक्षा वाढून जातात. आणि वाढदिवसाचे गिफ्ट त्या प्रमाणे "वजनदार" लागते.
@ऋ, भाऊ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
"तुम्हा नवरेमंडळींचे हे वाढते फॅड उद्या आम्हा गरीबांनाही झेलावे लागणार आहे..
कुठेतरी हे थांबायला हवे...">>>
बात तो फतेफ की कर रहे हो पण एकदा पाण्यात पडले की पोहावे हे लागतेच हे तूझ्या मोडक्या तोडक्या अनुभवावरून कळले असेलच
@परदेसाईजी तुमची ट्युशन्स लावायला पाहीजे, बायको फुलांवर पटते म्हणजे जादू आहे.![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
@असामी अहो एक बायकोला गिफ्ट देता देता नाकी नऊ येतात, अंबानीच्या बायकोला गिफ्ट द्यायला गेलो (नक्कीच आवडेल :डोमा:) तर तर माझे दिवाळे आणि बायको कडून पाॅटब्लास्ट (पक्षी घटस्फोट ) दोघांसाठी कोर्टात जावे लागेल. का गरीबाची चेष्टा करताय.
असो घोडामैदान जवळच आहे, नवीन कल्पनांच्या प्रतीक्षेत.
धन्यवाद
1) Spa कुपन
1) Spa कुपन
2) वय 40 च्या आसपास असेल तर मॅमोग्राफी, बोन डेन्सीटी टेस्ट सकट एखादे health टेस्ट पॅकेज.
3)बायकोच्या आवडीची गाणी स्वतः कम्पाईल करून बनवलेली Cd ( मान्य आहे , ही एक्दम गरीबोनवाली कल्पना आहे)
4) गरिबोनवाली आयडिया 2- कोलाज फोटोफ्रेम्स मिळतात त्यात तुमचे दोघांचे फोटो घालून.
6) exotic परफ्युम/कॉस्मेटिक ब्रँड चे बास्केट (पण हा ब्रँड हटके असला पाहिजे जसे फॉरेस्ट एस्सेनशील, किंवा काही मॉल मध्ये मिळतात तसे हॅण्डमेड साबण/ कॉस्मेटिकस.
7) बायकोला एखाद्या छंदात गती असेल तर त्याच्याशी रिलेटेड गिफ्ट ( त्या छंदाबद्दल पुस्तक, त्यासाठी लागणारी साधने etc)
वय 40 च्या आसपास असेल तर
वय 40 च्या आसपास असेल तर मॅमोग्राफी, बोन डेन्सीटी टेस्ट सकट एखादे health टेस्ट पॅकेज.---- खरंच!?
१. हिरा है सदा के लिये
१. हिरा है सदा के लिये (बायकोचे नाव हिरा आणि तुमचे सदा नाही ना?). चांगल्या डिसेंट हिर्याच्या(किंवा हिर्या सारख्या नाजूक कानातल्याला) दागिन्याला (नुसते कानातले, पेंडंट ऑप्शनल.कानातले हमखास वापरले जातात.गळ्यातले वापरायला 'लांब मंगळसूत्र लागेल्/साबा समोर डिनर ला विदाऊट मंगळसूत्र घालता येणार नाही/पंजाबी ड्रेस बरोबर जात नाही, वन पीस घेऊन दे' वाले व्हेरिएबल्स अॅड होऊ शकतील. )कोणीही बायको नाही म्हणणार नाही.
२. बॉन ऑरगॅनिक चे कपल टिशर्ट (म्हणजे थोडे कमी विअर्ड मेसेज वाले, कपल ने आणी एककट्याने घालता येतील असे.) ही स्टँड अलोन गिफ्ट नाही.कश्याच्या तरी बरोबर.
३. आवडत असल्यास स्पा+हेअर कट/वॉश्/मसाज ३-४ तासांचे चे पॅकेज.(त्या दिवशी घरातल्या कामांची काळजी तुम्ही घेतल्यास अती उत्तम. 'कामं नंतर कर, सध्या मजा कर' हा अप्रोच वर्क होत नाही, कारण मजा करुन आल्यावर नंतर कामं करायची आहेत या विचाराने मजेतला मूड कमी होतो.)
४. वय जितके तितक्या छोट्या छोट्या पण उपयोगी वस्तू.या घरात लपवून ठेवून क्लूज ठेवता येतील
५. रात्री १२ ला फर्न अँड पेटल किंवा इतर डीलीव्हरी कडून सुंदर केक आणि चॉकलेट बुके (हे स्टँड अलोन गिफ्ट नाही.गिफ्ट वेगळे द्यावे लागेल)
६. तुमच्याकडे भरपूर रोमँटिक आठवणी आणि फोटो असल्यास १२ महिन्याचे सुंदर फोटो कॅलेंडर.(चांगल्या क्वालिटीचे, वर्ष संपल्यावर रद्दीत न देता फोटो फ्रेम मध्ये वा इतरत्र वापरता येतील असे.)
७. १०००० रुपये खर्चायची तयारी असल्यास आर सिटी मॉल मध्ये (आणि पुण्यात अन्य ठिकाणी) फोटो वरुन ३डी प्रिंटींग केलेल्या कपल डॉल मिळतात.(अर्थात स्वतः आणि बायकोला लहान स्वरुपात टिव्हीवर ठेवलेले बघणे दोघांपैकी कोणालाही हॉरर शो किंवा ब्लॅक मॅजिक वाटत नसेल तरच.)
८. बायको कॉर्पोरेट असेल, वाईन रोझेस दागिने जास्त आवडत नसतील तर व्हिस्टाप्रिंट चे पॅकेज. स्वतःचे नाव एन्ग्रेव्ह्ड चांगली लेदर किचेन, पासपोर्ट कव्हर, हँड बॅग.
९. १२००० रुपये खर्च चालत असल्यास लोणावळा वर बलून राईड.
यापैकी काहीही मी आणि नवर्याने केलेले नाहीय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
)
पण त्याने मला पहिल्या भेटीत खूप भूक लागलेली असताना सुभद्रा मध्ये इडली खाऊ घातली होती.आणि मी वापरत असलेला ५० रुपयाचा ड्रायव्हिंग गॉगल फेकायला लावून रेबॅन घेऊन दिला होता.
सध्या आम्ही बड्डे ना पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करतो आणि 'आवडीचे काहीही ऑनलाईन शॉपिंग कर' सांगतो. (सुदैवाने अजून पेमेंट व्हाऊचर सबमिट करायला सांगून साईन्ड फॉर्म घेऊन रिएम्बर्स करत नाही
खरंच!?>>>>
खरंच!?>>>>
व्हाय नॉट?
It's a way to show , "i care"
गिफ्ट केवळ रोमॅंटिकच अडले पाहिजे असे नाहीये ना?
चाळीशी नंतर अशी हेल्थ पॅकेजेस गिफ्ट मिळणे पुरुषांसाठी तरी खूप नॉर्मल गोष्ट आहे. (अर्थात त्यामागे, तू घरचा कर्ता पुरुष, तुझे आरोग्य चांगले राहावे , वगैरे बायस असतात)
नोकरी करणाऱ्या स्त्रिया थोडेतरी आरोग्या बाबत जागरूक असतात, नोकरी बदलणे वगैरे कारणांनी अधेमधे का होईना पण काही बेसिक गोष्टी टेस्ट होत असतात, पण गृहिणीं बेसिक चाचण्यासुद्धा करून घेत नाहीत.
अगदी कमावत्या स्त्रिया अजूनही "असेच" म्हणून मॅमो चाचणी किंवा BMD करून घेत नाहीत (80% हुन जास्त स्त्री पुरुषांमध्ये बोन डेन्सीटी कमी भरते, जी वेळीच कळली तर उपाय करता येतात)
असो... पसंत आपली आपली.
वय 40 च्या आसपास असेल तर
वय 40 च्या आसपास असेल तर मॅमोग्राफी, बोन डेन्सीटी टेस्ट सकट एखादे health टेस्ट पॅकेज>>>काहीही
म्हणजे आईडिया मस्तच आहे नो डाउट पण बड्डे ला म्हणजे जरा
असो जरा बजेट पण संगितलेत तर बरे पडेल
वाढदिवसाला सुट्टी घ्यायची,
वाढदिवसाला सुट्टी घ्यायची,
तुमच्या (बायकोच्या नाही) स्मार्टफोनला / टीव्ही ला सुट्टी द्यायची,
सकाळपासून तिच्या दिमतीला हजर राहायचे
ती उठायच्या आधी उठून, आंघोळ इ.करुन, नवे कपडे घालून उठल्या-उठल्या तिला फुलं, ड्रेस (नक्की कोणत्या ब्रँड चा कोणता साईज छान बसतो हे माहीत असेल तरच) द्यायची.
चांगला चहा करता येत असेल तर तिला करून घ्यायचा नाहीतर chai point madhun order, same goes for breakfast, lunch and dinner, hi-tea.
हात-पाय चेपून द्यायचे
तिची दिवसभर तू कशी ग्रेट अशी येता-जाता genuine स्तुती, कौतुक करायची. जेनेरिक नाही एकेक प्रसंग आठवून.
अजून आठवेल तसं add करीन
बाय द वे मॅमो चा विषय निघाला
बाय द वे मॅमो चा विषय निघाला म्हणून फुकट चे ग्यान
मॅमो जरी ऑफिस पॅकेज मध्ये असली/फ्री असली/तुमच्या हेल्थ पॅकेज मध्ये इन्क्लुजिव्ह असली तरी ४५-५० च्या आधी करु नका.ब्रेस्ट युएसजी करा
कारणे
१. मॅमो मध्ये फॅट डेन्सिटि मुळे ४० च्या वयात/लहान वयात नीट रिझल्ट दिसत नाहीत.मॅमो मध्ये दिसायच्या योग्यते ला एखादी गाठ असली तर डीसीज अलरेडी पुढे गेलेला असतो.
२. मॅमो पेनफुल असते, जर प्रायमरी निदान यु एस जी ने होत असेल तर मॅमो नॉट वर्थ. यु एस जी मध्ये संशय आल्यास्/इतर सिम्प्टम असल्यास खात्री व्हायला मॅमो करण्याचा सल्ला देतात. बरेचदा गाठ ही पेनलेस मुव्हेबल असेल तर बेनाईन फायब्रॉईड असते.ई व्हिटामिन डोस ने कमी होते/न झाल्यास ऑपरेशन होते.
३. यु एस जी न करता डायरेक्ट मॅमो फक्त इमिजिएट रिलेटिव्ह मध्ये ब्रेस्ट कॅन्सर हिस्टरी असेल तरच सांगतात.
४. म्हणजे डेन्सिटि मुळे नीट निदान नाही/यु एस जी ने होऊ शकले असते/मॅमो मधल्या रेज चे एक्स्पोझिशन यामुळे मॅमो जपून वापरा
(मी डॉक्टर नाही.पण हेल्थ पॅकेज मध्ये आहे म्हणून ४० च्या आधी मॅमो करताना मॅमो च्या इथल्या लेडी डॉक ने दिलेली ही माहिती.)
ए क दिवस तुमचा सर्व वेळ द्या
ए क दिवस तुमचा सर्व वेळ द्या. घरातली त्या करतात ती सर्व कामे उत्साहाने व नीट करून टाका. स्वयंपाक पण करा सर्व व्हीडीओ यूटयूब वर उपलब्ध आहेत. त्याम्च्या आव्डीचा स्वयंपाक करून गप्पा मारत जेवु घाला ती सवाष्ण.
सायली राजाध्यक्ष साडी डिझाइन करतात त्या बघून एखादी साडी घ्या.
मी ग्लास बीड ज्वेलरी करते कस्ट्म डिझाइन. त्याम्चे आव्डते रंग माहीत असतील तर मला सांगा मी एक नेकलेस व
कानातले बनवून देइन.
बेसिकली मेक हर फील लव्ह्ड पँपर्ड अॅन्ड व्हॅल्युड.
सध्या आम्ही बड्डे ना पैसे
सध्या आम्ही बड्डे ना पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करतो आणि 'आवडीचे काहीही ऑनलाईन शॉपिंग कर' सांगतो. >> मलातरी हेच बेष्ट वाटतं!
जलसृष्टी/हिल्टन शिळीम/डेला
जलसृष्टी/हिल्टन शिळीम/डेला लोणावळा ला बड्डे चा दिवस स्टे.(आणि एक चिंटू (मुलगा नव्हे) गिफ्ट, मग/कानातले/छान पर्स वगैरे)
बायकोचा बड्डे लक्षात आहे
बायकोचा बड्डे लक्षात आहे तुमच्या, ह्यासाठी मी अभिनंदन करते तुमचं![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
{चांगला चहा करता येत असेल तर
{चांगला चहा करता येत असेल तर तिला करून घ्यायचा नाहीतर chai point madhun order, same goes for breakfast, lunch and dinner, hi-tea.
हात-पाय चेपून द्यायचे
तिची दिवसभर तू कशी ग्रेट अशी येता-जाता genuine स्तुती, कौतुक करायची. जेनेरिक नाही एकेक प्रसंग आठवून.}
फक्त वाढदिवसाला? मग दुसऱ्या दिवसापासून ये रे माझ्या मागल्या.?
वाढदिवस आहे.की पोळा किंवा शिक्षकदिन?
हे काय चंद्रतारे आणण्याइतकं कठीण आहे का?
अनू.... खूपच मनावर घेतलेलं
अनू....
खूपच मनावर घेतलेलं दिसतंय... त्यांच्या पेक्षा तूच!!
क्षचंद्रतारे म्हणजे?
मस्त धागा आहे.
मस्त धागा आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि कपडे ट्राय पण करता येतात फिटींग्जसाठी.
) नवर्याला बर्थडे गिफ्ट काय द्यावे? असा धागा काढेल. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनु काय एकेक आयड्या दिल्यास. मान गये.
आम्ही पण आता एकेमेकांना पैसे देउन किंवा सोबत जाउन तुझं तु काय ते हवं असलेलं आवडीचं घे असं करतो
हा एखाद्या वेळी अचानक दिलेलं गिफ्ट आवडतं. पण मला आणि नवर्यालाही काय घेउ? कस्सं घेउ? कसलं घेउ? आवडेल का? असे शंभर प्रश्न असतात.
आता एवढ्या वर्षानंत्यर आवड माहित नाही असं म्हणतील लोक पण समहाउ सोबत जाउन घेणं बरं पडतं.
आणि कपडे असतील तर सरप्राइज नो वे.
सोबत जाउन तुझ्यापेक्षा माझीच चॉइस कशी चांगली आहे हे पण दाखव्ता येतं
आता कुणीतरी (ऋ
फक्त वाढदिवसाला --- हो, तेवढं
फक्त वाढदिवसाला --- हो, तेवढं केलं तरी खूप!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वाढदिवस आहे.की पोळा किंवा शिक्षकदिन?--- पोळा तर पोळा. भाषण द्या नाही सांगत!
मी diamond jewellery चे पैसे ट्रान्स्फर करुन घेतले. अजून jewellery पेंडिंग आहे! ती पुढच्या वर्षी मागीन
@ सिम्बा खरच छान कल्पना आहे.
@ सिम्बा खरच छान कल्पना आहे. असे गिफ्ट खरचं द्यायला आवडेल मला अन तिला घ्यायला. पण ज्या वयाला या चाचण्या सांगितल्या आहेत ते वय ( खरे अन सांगायचे
) अजुन लांब आहे.
बाकी ४ ;६ रिलेट होतील तुमच्या प्रतीसादात ५ नंबर दिसत नाहीये. काही वियर्ड कल्पना होती का?
सिम्बा ते २ नंबर चे गिफ्ट
सिम्बा
ते २ नंबर चे गिफ्ट रिस्की आहे खरंच. तुम्ही केअर करता आणि ते दाखवताय वगैरे ठीके पण बड्डे साठी टू मच प्रॅक्टिकल आहे की हो! बघा बॉ बायकोची अपेक्षा असायची काहीतरी प्रिटी आणि रोम्यान्टिक गिफ्ट आणि हातात पडायचे मॅमो चे फॉर्म्स. लय लय रिस्क आहे. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@अनु
@अनु![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तुमचे प्रतिसाद वाचून तुमच्या "दिल की ख्वाईशे जुबां पे आ गयी" अशी फिलींग येतेय मला. खरच सुटला होतात.
तुमचा जोडीदार खरचं खुप लकी दिसतोय.
१ ,७ आणि ९ क्रमांक बजेट बाहेर आहे. आमच्याकडे जुळ्याचे दुखणे असते. माझी मोठी मुलगी (वय वर्षे फक्त ३२ पक्षी बायको ) आणि धाकटी मुलगी (वय वर्षे ७) एकमेकींवर नजर ठेवून असतात. एकीचे दुसरीला हवे असते.
३ क्रमांक सतत चालूच असतो.
६ क्रमांक खरच चांगला आहे. विचार करतो.
@ राजसी आणि अमा
@ राजसी आणि अमा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अहो मला चहाही बनवता येत नाही. तर स्वयंपाक बनवून हाॅस्पीटलची वारी घडवायची अजीबात इच्छा नाही. चुकून काही जमलेच बनवायला तर चवीवरून अख्खे आयुष्यभर टोमणे ऐकावे लागतील.
बेसिकली मेक हर फील लव्ह्ड
बेसिकली मेक हर फील लव्ह्ड पँपर्ड अॅन्ड व्हॅल्युड.
Submitted by अमा on 17 January, 2018 - 10:20
>>>
अगदी अचुक कुठल्याही स्त्रीच्या मनातली गोष्ट सांगितलीत. वय कुठलेही असो प्रत्येकीच्या मनात याच भावना अन ईच्छा असते. हॅट्स ऑफ टू यू.
सध्या आम्ही बड्डे ना पैसे
सध्या आम्ही बड्डे ना पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करतो आणि 'आवडीचे काहीही ऑनलाईन शॉपिंग कर' सांगतो. >>> हे खुपच प्रॅक्टिकल होते
वय वाढते तसे जोडीदाराच्या अवडीनिवडी माहिती असतात अशावेळी हे योग्य नाही.
बायकोचा बड्डे लक्षात आहे
बायकोचा बड्डे लक्षात आहे तुमच्या, ह्यासाठी मी अभिनंदन करते तुमचं Lol
Submitted by अन्जू on 17 January, 2018 - 12:25
धन्यवाद अन्जू
वाढदिवस लक्षात असतोच पण महिनाभर आधीपासूनच मला बड्डेला काय देणार असा धोशा सुरू होतो. ![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
@ सस्मित
@ सस्मित
आता एवढ्या वर्षानंत्यर आवड माहित नाही असं म्हणतील लोक पण समहाउ सोबत जाउन घेणं बरं पडतं.
आणि कपडे असतील तर सरप्राइज नो वे.
सोबत जाउन तुझ्यापेक्षा माझीच चॉइस कशी चांगली आहे हे पण दाखव्ता येतं Happy आणि कपडे ट्राय पण करता येतात फिटींग्जसाठी
.>>> आमच्याकडेही सेम. कपड्यांच्या साईझ सेम असो पण ब्रॅड वाईझ फिटींग बदलते त्यामुळे नो चान्स.
मी diamond jewellery चे पैसे
मी diamond jewellery चे पैसे ट्रान्स्फर करुन घेतले. अजून jewellery पेंडिंग आहे! ती पुढच्या वर्षी मागीन Proud![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Submitted by राजसी on 17 January, 2018 - 12:53
>>
@राजसी मी पण असाच गंडतो बायकोचा निरागस (???) चेहरा बघून . दर महीन्यात किमान एकदातरी असा प्रसंग घडतो.
कळतं आपण मामा बनतोय पण वळत नाही कारण ...... ती म्हणजे तीच. उसकी जगह कोई और नही ले सकता
@आदू
@आदू
असो जरा बजेट पण संगितलेत तर बरे पडेल>>>>
वट्ट ५००० रूपये
मंडळी धन्यवाद
मंडळी धन्यवाद
)
महीला मंडळाने दिवसभर छान कल्पना दिल्यात. त्याही वेळात वेळ काढून. (वर्किंग वूमन असल्यास कामातून वेळ काढून
माझ्या गृहपाठाला सुरवात करून दिल्याबद्दल धन्यवाद आणि अजुन नवकल्पनांचे स्वागत. वाढदिवसाला अजून १५ दिवस आहेत वेळोवेळी अपडेट देईन.
माझया मते "स्वतःच्या" बायकोला
माझया मते "स्वतःच्या" बायकोला असल काही गिफ्ट देण्याच्या भानगडीत पडू नका. त्या गिफ्टचा प्रभाव जास्तीतजास्त 1-3 दिवस असतो. त्यानंतर तुम्ही परत "नवरा" या अतिसामान्य कॅटेगरी याल..
त्यापेक्षा वाढदिवसाच्या दिवशी 2 dumbels, 1 ओढायची स्प्रिंग, आणि दोरीच्या उड्या मारण्याची रस्सी इतके साहित्य विकत आणा ( भंगाराच्या दुकानातून dumbels घ्या फार स्वस्तात पडतात सगळा खर्च 1000च्या आत) आणि वाढदिवशाला तिला बोला "बघ आता पुढच्या वाढदिवसा पर्यंत तुला शोभेल असा हिरोसारखा बनून दाखवतो." बस मग बघा पुढे काय होते.
पहिला एक आठवडा जरा सिरियसली व्यायाम करायचे नाटक करा मग नंतर तिला आठवेल तसे आठवड्यातून 2-3 वेळा, मग 15 दिवसातून 2 वेळा असे व्यायाम करून दाखवा. मग महिन्यातून 1-3 वेळा असे करत करत वर्ष काढायचा प्रयत्न करा.
)
नवरा या कॅटेगरी मधून "प्रियकर" या कॅटेगरी मध्ये किमान 3 ते 6 महिने (तुमच्या अभिनयावर अवलंबून) तुम्ही असाल याची गॅरंटी मी लिहून देतो. ( हे काय इथे लिहिले आहेच म्हणा
तळतीप:- बोल्ड केल्या अक्षरांवर बोलताना जास्त भर देऊन बोलवा जेणेकरून त्या शब्दाचे महत्व बायकोसमोर अधोरेखित झाले पाहिजे.
हेल्थ चेक अपची आयडीया छान आहे
हेल्थ चेक अपची आयडीया छान आहे.
मंदिराबाहेर जमलेल्या गरजूंना अन्न प्रसाद वा आता थंडी आहे तर चादरी घोंगड्या वाटू शकता.
बायकोला तुमचा अभिमान वाटेल.
अर्थात या कल्पनेची टिंगल उडवणारेही लोकं भेटतीलच.. रिस्क तुमच्यावर आहे.
माझ्या गर्लफ्रेंडने माझ्या बर्थडेला अमुकतमुक रक्कम एका अनाथाश्रमात दान करून पावती माझ्या हातात दिली होती. मला तरी छान वाटलेले.
अनू यांनी सांगितलेली फोटो कॅलेंडरची आयड्याही छान आहे.
माझ्या गर्लफ्रेंडने माझ्यावर वापरलेली.
आम्ही दर शनिवारी ऑफिसला जातोय असे सांगून घरातून बाहेर पडतो आणि कुठेतरी फिरायला जातो. अश्या शनिवारी दर ट्रिपला ती आम्हा दोघांचा एक खास सेलफी घ्यायची. मग माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तिने अश्या ८ फोटोंचे कलेक्शन एका आकाशपाळण्यात घालून मला गिफ्ट दिले.
अजून एक तिने मला दिलेली धक्कादायक गिफ्ट म्हणजे मी ईथे तिथे काही फुटकळ लिहित असतो. त्या लेखांचे तिने एक छानसे पुस्तक बनवून मला दिले. सोबत दर दोन लेखानंतर एक आमच्या फोटोचे पान घातले.
मला आपले फोटो काढून घ्यायची आणि ते बघायची आवड आहे हे तिने अचूक ओळखले. आणि मला खुश करणारे गिफ्ट दिले.
शेवटी हे सर्वात जास्त महत्वाचे... काय केल्यावर तुमचा जोडीदार खुश होतो हे तुम्हाला माहीत असायलाच हवे...
अनू.... Happy खूपच मनावर
अनू.... Happy खूपच मनावर घेतलेलं दिसतंय... त्यांच्या पेक्षा तूच!!>>>+१. पण आवडलं.
पाथफाईंडर,
लखनवी ड्रेस द्या. किंवा नुसते लखनवी टॉप्सपण मिळतात.ते ट्राय करा.बुकेवाल्याला (फ्लॉरिस्टला) सकाळी बुके,होम डिलिव्हरी करायला सांगा.त्यादिवशी सी.एल टाका किंवा लवकर घरी या.रात्री हॉटेलमधे जेवायला जा.
"(नवर्यांनी) बायकोला काय
"(नवर्यांनी) बायकोला काय गिफ्ट द्यावे" या प्रश्नाचा प्रवास "बायकोने काय गिफ्ट मागावे" या छुप्या प्रश्नाकडे झालेला आहे, असं मला वाटलं...
:भागो:
Birthday la mammogram package
Birthday la mammogram package lol!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Mag bayko apalya birthdayla prostate exam che package gift deil!
@ प्रदिपके
@ प्रदिपके
माझया मते "स्वतःच्या" बायकोला असल काही गिफ्ट देण्याच्या भानगडीत पडू नका. त्या गिफ्टचा प्रभाव जास्तीतजास्त 1-3 दिवस असतो. त्यानंतर तुम्ही परत "नवरा" या अतिसामान्य कॅटेगरी याल..
>>>
अहो दुसर्याच्या बायकोला गिफ्ट देण्याचा विचार जरी केला तरी तीला सुगावा लागेल. नका असे जिवघेणे विचार माझ्या मनात भरवू. बाकी प्रभावाचे म्हणाल तर आय अॅग्री विथ यू.
व्यायामाचे विचाराल तर ते कदापी शक्य नाही. मी पडलो पाप्याचे पितर. ती चांगली ओळखून आहे मला. दुसऱ्याच दिवशी १००० चे साहित्य त्याच विक्रेत्याला २००० ला विकेल. एक वेळ मोदी स्विस बॅकेतून काळेधन परत आणू शकतील पण त्या २००० तले २ रूपये मला दिसणार नाहीत. परत मी होते म्हणून कसे पैसे मिळाले .....लेक्चर.
(No subject)
@ऋ
@ऋ![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
. मग माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तिने अश्या ८ फोटोंचे कलेक्शन एका आकाशपाळण्यात घालून मला गिफ्ट दिले. >>
भाऊ मग आकाशपाळणा ३पैकी कोणत्या घरी ठेवलाय? का भाड्याने दिलाय?
@देवकी गुड आयडिया.
@देवकी गुड आयडिया.
आमच्या घासफूसच्या घरात या एकमेव चिकनला (लखनवी वर्क) जागा आहे.
@देवकी गुड आयडिया.
"(नवर्यांनी) बायकोला काय गिफ्ट द्यावे" या प्रश्नाचा प्रवास "बायकोने काय गिफ्ट मागावे" या छुप्या प्रश्नाकडे झालेला आहे, असं मला वाटलं... Wink :भागो:
Submitted by राज on 17 January, 2018 - 21:52
>>>>>
ये तो बस शुरवात है आगे आगे देखो होता है क्या.
Keep going ladies
भाऊ मग आकाशपाळणा ३पैकी
भाऊ मग आकाशपाळणा ३पैकी कोणत्या घरी ठेवलाय? का भाड्याने दिलाय? Rofl >> अहो आकाशपाळणा तत्वावर फ्रेम लटकावल्या आहेत. उंची फक्त दोन फूट आहे.
स्वस्तात मस्त माझ्या आयडिया..
स्वस्तात मस्त माझ्या आयडिया....
1. बायकोचा एखादा छान फोटो घ्या तो मोबाईल कव्हर म्हणून चांगला दिसेल असा ( सिल्हाऊट, texure वापरून ) एडिट करा त्याचे मोबाईल कव्हर छापून घ्या. किंवा मग एखादा रोमँटिक सीन त्याच्यावर एखादा सेंटी रोमॅंटिक फिल्मी शेर/चारोळी छापून घ्या.
2. भेटल्यापासून जितके चान्गले फोटो आहेत ते एकत्र करा त्या प्रत्येक खाली एक एक कॅप्शन टाकून WhatsApp स्टेट्स ठेवा किंवा बायकोच्या fb वॉल वर टाका
3. इंटरनेट वरून बारा पंधरा रोमँटिक, तू कशी छान छान, तुझ्या मुळे माझे आयुष्य कसे छान छान अशा अर्थाच्या कविता शोधून काढा. आर्चिज मधून एक लेटरपॅड घ्या त्यावर त्या सर्व लिहून एक एक पान छान रिबनने बांधा. किचन बेडरूम हॉल मध्ये बायकोला दिवसभर सापडत राहतील अशा पद्धतीने लपवून ठेवा.
4. बायको साठी केक बनवा. अनेक सोप्पे सोप्पे केक बनवता येण्यासारखे असतात.
5. बायकोच्या सगळ्या जवळच्या मैत्रिणींना परस्पर फोन करून एका त्यांच्या जुन्या अड्ड्यावर किंवा कॉलेज जवळ बोलावा. बायकोला तिथे नेऊन सरप्राईज द्या. हॉटेल च्या बिल साठी वगैरे स्वतःचे क्रेडिट कार्ड पण उदार मनाने देऊन टाका. पण जाताना अरे इथेच कुठेतरी तुम्ही पाणीपुरी/ सामोसा/ कोल्डकॉफी छान मिळते असे सांगायचा वगैरे काडी टाकायला विसरू नका.
महागडे पर्याय
1. मुंबई ला वगैरे असाल तर एक yatch बुक करा तासाच्या भाड्याने मिळते दहा हजार कि काहीतरी. त्यातून सूर्यास्त पाहायला जा. तिकडेच शॅम्पेन आणि जेवण नाहीतर परत येऊन ताज मध्ये जेवा.
2. बायकोला आणि तिच्या मैत्रिणींना एक इंनोव्हा दिवसभर बुक करून द्या. जवळचा एकदा टुरिस्ट स्पॉट किंवा किल्ला बघून यायला, किंवा नुसता एका मैत्रिणीकडून तिला घेऊन दुसर्या मैत्रिणीला भेटायला जात दिवसभर भटकायला.
मुलीला दिवसभर स्वतःच्या सोबत ठेवा नाहीतर आजोळी सोडा .
एकंदरीत मी फारच सिरियसली
Mag bayko apalya birthdayla prostate exam che package gift deil! >>> ROFL![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
एकंदरीत मी फारच सिरियसली प्रतिसाद दिला असं वाटतंय आता.
>>> चुकून काही जमलेच बनवायला तर चवीवरून अख्खे आयुष्यभर टोमणे ऐकावे लागतील. Proud <<<
आणि चुकून चांगले बनलेच तर...तर...तर.. आयुष्यभर गळ्यात पडेल ना.
स्वस्तातली गिफ्ट आयडिया: बायकोला सांगा, अगं तुला इतके प्रेम देतो ना, त्याची सर गिफ्टने येणार आहे का?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
उत्तम साडी, ड्रेस, दागिना,
उत्तम साडी, ड्रेस, दागिना, बायकोच्या माहेरच्या मन्डळी बरोबर किवा कॅन्डल लाईट जेवण... बाकी मॅमो बिमो मरु दे तिकडे.
बापरे किती त्या आयडीया....
बापरे किती त्या आयडीया....![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
नवर्याला प्रिंट आउट काढुन देते
@पाथफाईंडर, तुमचा हा धागा बायकोला दाखवा. तिच्या गिफ्ट साठी तुम्ही किती मेहेनत घेताय हे तिला कळेल आणि मग दुसर्या गिफ्ट ची गरजच वाटणार नाही.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
@पाथफाईंडर, तुमचा हा धागा
@पाथफाईंडर, तुमचा हा धागा बायकोला दाखवा. तिच्या गिफ्ट साठी तुम्ही किती मेहेनत घेताय हे तिला कळेल आणि मग दुसर्या गिफ्ट ची गरजच वाटणार नाही. Wink>>>>>
संपले म्हणजे पाफाची काही खैर नाही 'साधे एक गिफ्ट घ्यायचे म्हटले मला तर सार्या माबोवर डांगोरा पिटविला त्याचा!' असले काही तरी वाक्य ऐकावे लागेल बिच्यार्या पाफांना! एवढ्या वर्षात एवढेसाधे ओळखू शकले नाही!!! वैगेरे वैगेरे!!
ही माझी कल्पना नाही. एका
ही माझी कल्पना नाही. एका चित्रपटात आहे. बेस्ट लव्ह लेटर्स फ्रॉम फेमस पीपल असे बुक आहे त्यातली लव्ह लेटर्स हिरो लिहून बायकोला देतो.
अजून एक वहिनींच्या माहेरच्यांना बोलावून सर्प्राइज गटग प्लॅन करा. तिच्या शाळेतल्या मैत्रीणी, मित्र, गल्लीतले लोयू
त्यांच्याकडून त्यांना काय खायला आव्डते गाणी कोणती गात असत हे सर्व जाणून तसे एक विविध गुण दर्शन कार्यक्रम करवा. शी विल लव्ह यू ऑल हर लाइफ
मस्त आयडिया एकेक..
मस्त आयडिया एकेक..
त्याम्च्या आव्डीचा स्वयंपाक करून गप्पा मारत जेवु घाला ती सवाष्ण. >>>> हे वाक्य मध्ये अगदीच बळच
Pages