बायकोला बर्थडे गिफ्ट काय द्यावे?

Submitted by पाथफाईंडर on 16 January, 2018 - 12:39

मायबाप माबोकरांनो, पहीले वहीले लिखाण आहे. चुका मोठ्या मनाने पदरात/ओढणीत /स्टोलात/रूमालात (भगीनी वर्गासाठी ) आणि पोटात (बंधूवर्गासाठी) घालून घ्या.
तर झालेय असे. परवाच संक्रांत झाली अन त्या दिवसभर गोड बोलणारी बायको पुढचे दोन दिवसही गोडच बोलतेय. मी उगाचच जाऊन चेक करून आलो की राणीसरकारांच्या मधुमेहाच्या गोळ्या चुकून संपल्या तर नाहीत. पण भानगड काही समजेना.
काय सांगू, डोळ्याला डोळा लागत नव्हता , डोक्यात एकच विचार के ये माजरा क्या है? अखेर ट्युब पेटली की हे सर्व फक्त आणि फक्त येत्या महीन्यात येणाऱ्या तिच्या वाढदिवसामुळे आहे. (सुज्ञास अधिक न सांगणे लागो.)

फेब्रुवारी हा फार घातक महीना असतो हो. HR वाले प्रुफ देऊनही भलामोठा TDS कापून पगार देतात. अन दरवर्षी प्रमाणे बायकोचा वाढदिवस मग लेकीचा वाढदिवस अन पाठोपाठ १४ फेब्रुवारी येतो. दोघींनाही बर्थडेप्रमाणे व्हॅलेंटाइन गिफ्टही हवे असते अन तेही सरप्राईज?

आता तुम्हीच सुचवा

(ताजे )ताक: @ वेमा, असा धागा न सापडल्याने नवीन धागा काढला आहे. धाग्यात काही त्रुटी असल्यास कृपया मार्गदर्शन करावे.

Group content visibility: 
Use group defaults

२०२२ मध्ये काय दिले?
दरवर्षी आगाऊ चौकशा करणार च संघटनेचे कार्यकर्ते विचारत आहेत.
मला ह्यावेळी boat चे rockerz pro मिळाले
कानातले Lol

Pages