बायकोला बर्थडे गिफ्ट काय द्यावे?

Submitted by पाथफाईंडर on 16 January, 2018 - 12:39

मायबाप माबोकरांनो, पहीले वहीले लिखाण आहे. चुका मोठ्या मनाने पदरात/ओढणीत /स्टोलात/रूमालात (भगीनी वर्गासाठी ) आणि पोटात (बंधूवर्गासाठी) घालून घ्या.
तर झालेय असे. परवाच संक्रांत झाली अन त्या दिवसभर गोड बोलणारी बायको पुढचे दोन दिवसही गोडच बोलतेय. मी उगाचच जाऊन चेक करून आलो की राणीसरकारांच्या मधुमेहाच्या गोळ्या चुकून संपल्या तर नाहीत. पण भानगड काही समजेना.
काय सांगू, डोळ्याला डोळा लागत नव्हता , डोक्यात एकच विचार के ये माजरा क्या है? अखेर ट्युब पेटली की हे सर्व फक्त आणि फक्त येत्या महीन्यात येणाऱ्या तिच्या वाढदिवसामुळे आहे. (सुज्ञास अधिक न सांगणे लागो.)

फेब्रुवारी हा फार घातक महीना असतो हो. HR वाले प्रुफ देऊनही भलामोठा TDS कापून पगार देतात. अन दरवर्षी प्रमाणे बायकोचा वाढदिवस मग लेकीचा वाढदिवस अन पाठोपाठ १४ फेब्रुवारी येतो. दोघींनाही बर्थडेप्रमाणे व्हॅलेंटाइन गिफ्टही हवे असते अन तेही सरप्राईज?

आता तुम्हीच सुचवा

(ताजे )ताक: @ वेमा, असा धागा न सापडल्याने नवीन धागा काढला आहे. धाग्यात काही त्रुटी असल्यास कृपया मार्गदर्शन करावे.

Group content visibility: 
Use group defaults

स्ट लव्ह लेटर्स फ्रॉम फेमस पीपल असे बुक आहे त्यातली लव्ह लेटर्स हिरो लिहून बायकोला देतो.--- सेक्स अँड the सिटी movie Happy
त्या letters मधलं इंग्लिश लय भारी आहे, dictionary /google लागतं Proud

"अजून एक वहिनींच्या माहेरच्यांना बोलावून सर्प्राइज गटग प्लॅन करा."

सरप्राइझ गेट टुगेदर हा उपाय कधीकधी बॅकफायर होऊ शकतो.

@अतरंगी तुमचे स्वस्तातले उपाय छान आहेत. पण ५ नंबर अंगाशी येईल. बायकोच्या मैत्रिणींना परस्पर फोन? नाही तसा मेडीक्लेम आहे माझा पण विषाची परीक्षा का घ्या? (आयडीया वाईट नाहीये तुम्हाला विचारतोच आहे क्या हर्ज है त्यांना विचारले तर. पण एखादी भोचकभवानी निघाली तर लेने के देने पड जायेंगे.)
बायको मोबाईल चेक करते म्हणून "त्या मैत्रीणींचे (फोन)" नंबर मित्रांचे म्हणून सेव्ह केलेत. (कुणाला सांगू नका)

स्वस्तातली गिफ्ट आयडिया: बायकोला सांगा, अगं तुला इतके प्रेम देतो ना, त्याची सर गिफ्टने येणार आहे का? Proud
Submitted by उपाशी बोका on 18 January, 2018 - 02:18

@उपाशी बोका
अहो बायको म्हणेल "मी तुला प्रेम देते. त्यानेच पोट भर" का गरीबाची चेष्टा करताय.

उत्तम साडी, ड्रेस, दागिना, बायकोच्या माहेरच्या मन्डळी बरोबर किवा कॅन्डल लाईट जेवण... बाकी मॅमो बिमो मरु दे तिकडे.
Submitted by प्राजक्ता on 18 January, 2018 - 07:08

खरे खरे सांगू? मला या उत्तम साडीची व्याख्या अजूनपर्यंत कळाली नाही. आणि त्याची प्राईस रेंजही.
खरेदी वेळी तीचा मूड, नेसणार कोण? आणि माझ्या खिशाची बिनचूक माहिती हे असे फॅक्टर मॅटर करतात उत्तम या शब्दाची व्याप्ती ठरवायला.

बायकोच्या माहेरच्यांसोबत जेवण:
तीला ३ काका २आत्या ३ मावश्या आणी २ मामा आहेत. सोबत एकुलते एक आईवडील २बहीणी अन एक भाऊ असे छोटूसे कुटुंब आहे. आत्ते मामे भावंड त्यांच्या बायका पोरे पकडून "गावजेवणाचा " आकडा ४७ जातो.

@ स्मिता
नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे दे अशी तंबी दिली आहे तीने. म्हणून हा लेखनप्रपंच. आणि खरच छान प्रतिसादही मिळतोय. एकजण तर फूल्ल सुटल्या होत्या काल आयडिया द्यायला. (@ अनु जी मला आठवत नाहीये कोण होते ते काल, प्लीज आठवले तर इथे लिहाल? Rofl )

@अमा आणि राजसी
ते लव्ह लेटर वगैरे खरच जड जाईल तिलाही अन मलाही. आम्ही दोघेही शुध्द मराठी मिडीयम वाले न पासींग पुरते गुण मिळवणारे.
तसेही मायच्या भाषेची गोडी दुसर्या कशालाही नाही. Happy

पाफा.. माझे मत शक्यतो पर्सनलाईझ्ड गिफ्ट द्या.
म्हणजे जे फक्त आणि फक्त त्यांना वापरता येईल.. मिरवता येईल.

त्यांचे नाव / फोटो असलेले मोबाईल कव्हर/ मग / किचेन / लॅम्पशेड / घड्याळ / बॉटल किंवा काहीही. किंवा त्यांचे आवडते कोट असलेला एखादा टीशर्ट / दोघांचा किंवा तिघांचा फोटो असलेली पिलो / तुमचे दोघांचे फोटो आणि लव्ह मेसेज असलेला एक्सप्लोजन बॉक्स इत्यादी इत्यादी..

अजून एक गिफ्ट द्या ज्या त्या आयुष्यभर स्वतःच्या मनात जपतील ते म्हणजे स्वतःच्या हातानी लिहिलेले एक सुरेखसे मराठी पत्र. हजार गिफ्ट्स एकीकडे नी असे एक पत्र एकीकडे. पत्र लिहायला मदत हवी असेल तर तीही करू शकू. पण मनापासून इच्छा असेल तरच लिहा.. उगा मनात नसताना काहीतरी ओढून ताणून खरडलं तर ते कधीच तितकं अपील होणार नाही. सो टेक युअर कॉल.

आजकाल आपण सगळेच आपल्याला आवडणाऱ्या वस्तू पटापट घेऊन टाकतो.. त्याला ना सण लागतो ना कुठला प्रसंग.. काय घ्यायचे राहते ते म्हणजे अश्या पर्सनलाईझ्ड गिफ्ट्स.. ज्या खरे तर स्वस्त सुद्धा असतात कित्येकदा (यातल्या कित्येक गोष्टी तुम्हाला 500/- रुपयांच्या आत मिळतील).. पण आपण स्वतःच स्वतः साठी घेत नाही. आणि लाईफ पार्टनरने मनापासून लिहिलेले असे एखादे प्रेमळ पत्र.. जे करोडो रुपये फेकूनसुद्धा विकत घेता येत नाही.

त्या लेखांचे तिने एक छानसे पुस्तक बनवून मला दिले. सोबत दर दोन लेखानंतर एक आमच्या फोटोचे पान घातले.
>> हे कुठे बनवून मिळेल? साधारण किती खर्च येतो? जेन्युईनली विचारतेय.. कोणीही सांगितले तरी चालेल.. विपु केलीत तरी चालेल.

अहो आकाशपाळणा तत्वावर फ्रेम लटकावल्या आहेत. उंची फक्त दोन फूट आहे.
>> अरे वा ऋ.. तुझ्या (किंवा गफ्रेच्या) घरी गफ्रे आणि तुझे एकत्र फोटो लटकवलेले चालतात वाटतं भिंतीवर? तू उगाच इथे म्हणत असतोस की घरचे मान्य होणार नाहीत नी ऑल? इथे कित्येकांना लग्न होईपर्यंत आपल्या गफ्रे बॉफ्रेचा फोटो मोबाईल मध्ये डीपी म्हणून ठेवलेला पण चालत नाही घरच्यांना.

बायकोच्या माहेरच्यांसोबत >> immediate family मेबर अर्थात ! गावजेवण नाही काही.
उत्तम साडी म्हणजे डिझायनर, पैठणी, तिला खुप दिवसापासुन घ्यायचाय असा एखादा प्रकार
सध्या आद्या ज्वेलरी पुण्यात फॉर्मात आहे बाकी तिला आवडेल का? हे गिफ्ट दिल्यावर कळेलच! इतक्या शन्का मनात ठेवौन काही करायच नसत हो
जे द्यायच आहे ते मनापासुन द्या दिखावुगिरी साठी नको.

वाचनाची आवड आहे का? एखादे छानसे पुस्तक द्या. सायकलिंगची आवड आहे का? मग एखादी सायकल घ्या. पेंटिंगची आवड असेल तर त्याचे साहित्य द्या ( जे तसेही महाग असते.) एखादे घड्याळ किंवा कॉस्मेटिक्स घ्या, जे रोज वापरले जाईल.

>>> नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे दे अशी तंबी दिली आहे तीने. <<<
आपण दोघे मिळून एखाद्या अनाथालयाला बजेटप्रमाणे देणगी देऊ या का? असे सुचवून बघा. म्हणजे शाळेत वह्या,पुस्तके,दप्तरे देणे किंवा एकवेळेचा नाश्ता/जेवण स्पॉन्सर करणे वगैरे. (मी हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या अनाथालयातील ३ मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च करतो, पण ते सध्याच्या बजेटच्या बाहेर आहे, म्हणून सुचवले नाही.)

जे द्यायच आहे ते मनापासुन द्या दिखावुगिरी साठी नको. >>> या अभिप्रायाबद्दल प्राजक्ता यांना टाळ्या

जे द्यायच आहे ते मनापासुन द्या दिखावुगिरी साठी नको. >>> या अभिप्रायाबद्दल प्राजक्ता यांना टाळ्या>>>>> अगदी अगदी!

@पियू
छान कल्पना आहे आपल्या भावना पोचवायचा अन जतन करायला पत्रासारखे दुसरे साधन नाही. _/\_

@प्राजक्ता आणि देवकी
खर्या प्रेमात दिखाऊपणाला जागा नसते. हा माझापण स्टॅन्ड आहे.
माझ्या मते "बायको ही क्षणाची पत्नी आणी अनंतकाळाची गफ्रे असते"

पहील्या संक्रांतीला (लग्नाचा पहीला महीना होता Lol ) इंप्रेशन मारायला मीच तिला चंद्रकळा (काळी पैठणी ) देईन असे कबूल केले होते. नंतर तिच नाही म्हणाली वापरली जाणार नाही म्हणून. आता या नोटवर सिरियसली विचार करेन. धन्यवाद

@उपाशी बोका
धन्यवाद तुम्ही सातत्याने मला नवनवीन कल्पना सुचवत आहात.
आजची कल्पना पण उत्तम आहे अन विचाराधीन ही.

हे कुठे बनवून मिळेल? साधारण किती खर्च येतो? जेन्युईनली विचारतेय.. कोणीही सांगितले तरी चालेल.. विपु केलीत तरी चालेल.
>>>>>
पियू, खर्च गर्लफ्रेंड सांगत नाही. पण छानश्या कागदावर प्रिंट घेतलेल्या. बहुधा ते प्रोजेक्टचे बॉन्ड पेपर असतात ते आहेत. आणि फोटोच देखील अश्याच पानांवर फोटो स्टुडिओवाल्याकडून मारून घेतलेले. त्यांचे मग बाईंडींग केलेले. मुखपृष्ठ जाडजूड प्लास्टीक पेपरचे आणि त्यावरही आमचे फोटो Happy
एकूणात नीटनेटके सुबक प्रकरण होते.

>>
अरे वा ऋ.. तुझ्या (किंवा गफ्रेच्या) घरी गफ्रे आणि तुझे एकत्र फोटो लटकवलेले चालतात वाटतं भिंतीवर? तू उगाच इथे म्हणत असतोस की घरचे मान्य होणार नाहीत नी ऑल?
>>>
अहो भिंतीवर कुठे, आकाश पाळण्यावर., आणि तो आकाशपाळणा मिरवून झाल्यावर फोटो लंपास करून माळ्यावर Happy

@देवकी
बड्डे उद्या आहे. चार ड्रेस पैकी १ अॅमेझोन (माझी पसंती ) वरून ३ पॅन्टॅलून. त्याला मॅचिंग २ पर्स ६ नेलपेंट २ लिपस्टिक २ डिओ. (रुपये ७२८४मात्र)
आणि तीला मी मॅचिंग दिसावे म्हणुन फोटोपुरता मला एक टीशर्ट (@४०% डिस्काउंट रू ३५० ) Proud
आता फ्रीजमध्ये चाॅकलेट ट्रफल केक आहे. १२ ची वाट बघत मला जागे ठेवते आहे ती.

येथे प्रतीसाद दिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि तुमच्या सर्वांच्या येणाऱ्या शुभेच्छांसहीत हा धागा तीला शेअर करणार आहे.

Rofl _/\_

आधी केक ने तोंड करा..
मग एकेक करत गिफ्ट द्या...
जेव्हा पुरेसे समाधान चेहर्‍यावर दिसेल तेव्हा थांबा ...
उरलेल्यातील एखादे उद्या संध्याकाळी तुम्ही कँडल लाईट डिनरला जाल तेव्हा द्या..
आणि बाकी जे उरेल ते जपून ठेवा... संत वॅलेंटांईन जयंती जवळच आहे Happy

अरे हो, आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

@विक्षिप्त मुलगा
पाफा काकूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
Submitted by विक्षिप्त_मुलगा on 5 February, 2018 - 00:20
>>>>
बायकांचे खरे वय माहिती असेल तरी ते सांगायचे नसते. निदान वाढदिवसाच्या वेळी तर नाहीच नाही. (टाळ्या ऽऽऽऽ)
का दिवस खराब करता राव.

मला असं 'अहो-जाओ' नको रे करूस, आपल्यात फक्त १-२ वर्षांचच अंतर असेल!
अवांतराबद्द्ल क्षमस्व!!!
Submitted by विक्षिप्त_मुलगा on 3 February, 2018 - 23:06
>>>> हे ऋ च्या धाग्यावरील येथे लागू होईल.

>>>> हे ऋ च्या धाग्यावरील येथे लागू होईल.>>>>
आपल्याला ७ वर्षांची मुलगी आहे, आम्ही अजून अविवाहित आहोत!
पण असो,
पाफा 'वहिनींना' वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला ७ वर्षांची मुलगी आहे, आम्ही अजून अविवाहित आहोत!>>>>
7 वर्षाची मुलगी असल्याने त्यांचे वय वाढत नाही, आणि तुम्ही अविवाहित असल्याने तुमचे वय कमी होत नाही Wink

धागा वर काढतोय.
मागील वर्षी जवळपास ८हजाराचा फटका पडला होता. यावेळी खिसा इतकी परवानगी देत नाही आहे.
लो बजेट सुचवाल का?

प्रतिसाद परत वाचा सुरुवातीपासून, भरपुरायडिया दिलेल्या आहेत.

5000 चं अमेझॉन गिफ्ट कार्ड द्या.चांगलं क्रेडिट कार्ड सारखं दिसणारं मिळतं त्यावर कोड असतो.तिला ठरवू दे…टप्प्यात वापरायचं का एकदम.

बायकोला गिफ्ट देताना बजेट निश्चित करणे आवडले नाही. अहो, लग्नाची बायको असेल तर ईएमआयच्या जमान्यात लिमिट कशाला ?
नो लिमिट खेळा. विबासं असेल तर बजेट ठीक आहे. कारण मग दोन नोक-या करताना जीव जाऊ शकतो.

खालीलपैकी काय आवडते ते निश्चित करा. इच्छा तेथे मार्ग !

१. बायकोला सुट्टी मिळावी. नेहमीपेक्षा थोडासा चेंज व्हावा यासाठी गुंतवणूक करायला हरकत नाही.

२. नवलाखा हे प्रकरण तर सिनेमातून गाजत आलेले आहे. ही गिफ्ट आवडणार नाही असे होणारच नाही.

३. एखादा छानसा ड्रेस घेऊन द्यावा.

किंमतीकडे पाहू नये.

त्यांचं नाव योगी आदीत्यनाथांना सांगून जिरे ठेवूयात.

Submitted by मेरीच गिनो on 19 January, 2019 - 08:24 >>>> तुमच्या अनिव्हर्सरीजना आता पर्यंत तुम्ही यातलं काय काय दिलं ? Wink लकी आहे तुमची घरवाली की तुम्हाला एवढ्या क्लासी गिफ्ट्स द्यायचं सुचतं आहे. Happy

हा प्रश्न विद्वतजनांपैकी कुणी न कुणी विचारेल याची पूर्ण कल्पना होती. महानुभाव, इथे चर्चा मी काय गिफ्ट द्यायची यायची चालू नसून धागाकर्त्याला जाय सूचना करायची याची चाललेली आहे याची मी आपणास आठवण करून देत आहे.

महानुभाव, इथे चर्चा मी काय गिफ्ट द्यायची यायची चालू नसून धागाकर्त्याला जाय सूचना करायची याची चाललेली आहे याची मी आपणास आठवण करून देत आहे. >>>>> पण महाजन, अशा कल्पना शक्यतो स्वानुभवातून येतात असं वाटत होतं. Happy

बायकोला गिफ्ट देणं इतक कम्पलसरीच आहेच का?
म्हणजे द्यायलाच पाहिजे नैतर काय खरं नाही अशा टाईप काही असतंय का?
असं असेल तर मग मी खुपच अल्पसंतुष्ट (रीडः गुणी) बायको आहे असं म्हणावं लागेल. Happy
५-८ हजाराचे गिफ्ट जे नवर्याने परस्पर स्वतःच्या मनाने नैतर माबोसारख्या साईटवर सल्ले मागुन आणलेलं मला तरी पटणार नाही.
त्यापेक्षा मला आता काय हवंय किंवा बरेच दिवसापासुन एखादी वस्तु घ्यायची होती ती दिली तर आवडेल. मग ती ५०० ची असली तरी चालेल.
आम्ही नेहमी असंच करतो.
तु म्हणत होतास ना ते रनिंग शुज घ्यायचे आहेत. चल मी देते घेउन तुझं बड्डे गिफ्ट म्हणुन Wink
किंवा नवरा म्हणतो तु काय ते बघत होतीस त्यादिवशी ज्वेल्लर्स कडे / मॉलमधे / बाटामधे / कपड्यांच्या शोरुममधे / किंवा तुला लाल साडी घ्यायची म्हणत होतीस ना चल घेउ.
सोबत मोठ्ठं चॉकलेट, जे मुलंच जास्त संपवतात ते असतंच आणि संध्याकाळी मुलांसोबर हॉटेलिंग Happy

Pages