बायकोला बर्थडे गिफ्ट काय द्यावे?
मायबाप माबोकरांनो, पहीले वहीले लिखाण आहे. चुका मोठ्या मनाने पदरात/ओढणीत /स्टोलात/रूमालात (भगीनी वर्गासाठी ) आणि पोटात (बंधूवर्गासाठी) घालून घ्या.
तर झालेय असे. परवाच संक्रांत झाली अन त्या दिवसभर गोड बोलणारी बायको पुढचे दोन दिवसही गोडच बोलतेय. मी उगाचच जाऊन चेक करून आलो की राणीसरकारांच्या मधुमेहाच्या गोळ्या चुकून संपल्या तर नाहीत. पण भानगड काही समजेना.
काय सांगू, डोळ्याला डोळा लागत नव्हता , डोक्यात एकच विचार के ये माजरा क्या है? अखेर ट्युब पेटली की हे सर्व फक्त आणि फक्त येत्या महीन्यात येणाऱ्या तिच्या वाढदिवसामुळे आहे. (सुज्ञास अधिक न सांगणे लागो.)