माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. त्याचा सल्लेदार त्याला सांगतो कि अथर्व हा राधिकाचा विक पॉईंट (मराठी शब्द?) आहे. तर तू त्याच्या नावाने घरात शिरु शकतोस.

त्या जाब विचारायच्या सीन मध्ये बाकी सगळे ठीक आहेत , पण त्या सिन्गापूर माफेले वाल्या बाई पण होत्या का? त्या कशाला ? त्यांचा काय संबंध ?

लोकसत्तेच्या कुठल्या तरी पुरवणीत की मुंबई वृत्तान्तात तो राणा, लागिरंचा हीरो आणि नवर्‍याची पहिली बायको साकारणार्‍या अभिनेत्यांची मनोगते होते. तिघांनीही आपण करत असलेल्या भूमिकांमुळे समाजात बदल घडत असल्याचं सांगितलं.
१. तालमी, आखाडे परत सुरू झाले. पैलवानाशी लग्न करायला मुली तयार नसत, त्या तयार होऊ लागल्या.
२. तरुणांचा सैन्यभरतीकडे ओढा वाढला. सैनिकांशी लग्नाला मुली तयार होऊ लागल्या.
३. दुसरी बायको करणार्‍या नवर्‍यांना पहिल्या बायका ठणकाऊन सांगू लागल्या. त्यांच्यात आत्मविश्वास आला.

पहिल्या दोन मालिकांबद्दल काहीच माहीत नाही. पण तिसरीबद्दल इथे वाचून बरंच कळलं. त्यातल्या शनाया आणि गुरूपासून प्रेरणा घेणारे लोक नसतीलच कशावरून?

पण त्या सिन्गापूर माफेले वाल्या बाई पण होत्या का? त्या कशाला ? त्यांचा काय संबंध ?>> साक्षिदार म्हणून. त्यांच्याकडे या दोघांचे छायाचित्रे आहेत.

गुरूने नेहमीप्रमाणे राधिकाला खोटे ठरवायला सुरूवात केली, तो मी नव्हतोच, माझ्यासारखा दिसणारा कुणीतरी असेल वगैरे, म्हणून राधिका त्या माफेलेला बोलावते. तिने गॅनायाला बघितलेलं असतं आणि त्यांचे फोटोही काढलेले असतात. मी वाचली ती पुरवणी, असं काही असेल तर चांगलंच आहे. सगळे कसे मेहेनत घेतात भुमिकेसाठी तेही होतं, त्यात राधिका म्हणे घरी, सेटवर सगळीकडे नागपूरी बोलत होती, ईतकं करूनही मला तीची भाषा सफाईदार वाटत नाही, ओढूनताणूनच वाटते. शनाया आणि गुरूपासून प्रेरणा Rofl

त्यातल्या शनाया आणि गुरूपासून प्रेरणा घेणारे लोक नसतीलच कशावरून?>> होना, आणि ते थोडीच लोकसत्तात सांगणार आहेत तसे

शनायाला दिड लाखाचे घड्याळ भेट!!! गुरू अतिशय श्रीमंत आहे असे काही दिसत नाही. तसेच हा माणूस ऑफिसमध्ये कधी काम करताना दिसत नाही. केलेच तर शनायाला तिचे काम पूर्ण करुन देतो. काहिही दाखवतात!!!

शनाया भुलली का त्याला परत, लोभी आहे ती.

गुरुला टेबल पुसायला लावले राधिकाने तर लिहा इथे, मग मी बघेन ozee वर. मला बघायचं आहे त्याला ते करताना Wink

अजून एक वर्ष तरी वाट बघावी लागेल अन्जू तुम्हाला. गॅरी किती कोडगा आहे, अजूनही काही घडलंच नाही असा वागतो.

खरंच...गॅरी अतिशय निर्लज्ज आहे. म्हणे की , " छान भेट दिलीत ना मला दिवाळीची..? सगळ्यांसमोर माझा असा अपमान करुन..? ' काहीही....! याला कोणती भेट अपेक्षित होती? आणि शनाया ला दिड लाखाचे घड्याळ...? Happy
केडी मस्त मजा घेतोय त्याची....
आणि रेवती व सुबोध चा काय मधे मधे टाईम पास लावलाय? तो शनायाचा एक्स बॉय फ्रेंड कसला टॉप दिसत होता काल!

शनायाचा एक्स बॉय फ्रेंड कसला टॉप दिसत होता काल!>> हा म्हणजे तोच का ज्याला शनायाने पैसे दिले होते वगैरे तो.

कुठल्यातरी मराठी फिल्ममध्ये तो नि शनाया कपल म्हणून दिसले होते. जोडी छान दिसते त्यांची. Happy

येस, निधी. जोडी छान दिसतेच त्यांची !! गुरु- शनाया सारखी विजोड नाही दिसत! :रागः
आणि मेन म्हणजे गुरु- राधिका तर त्याहूनही विजोड दिसतात. राधिका पक्कीच त्याची ताई शोभते ! रेवती किती गोड दिसत होती लालेलाल साडीत काल गुप्ते भाऊंनी आणलेल्या! Happy

राधिका पक्कीच त्याची ताई शोभते>> तसंही ती प्रत्यक्षात त्याच्याहून ६-७ वर्षांनी मोठीच आहे. Happy

काल काहीही दाखवलं. तो गॅरी अंगावर दारू शिंपडून पिल्याचं नाटक करतो आणि राधिकेला माझ्याशी पूर्वीसारखं वाग असं ब्लॅकमेल करतो.

ह्या सिरीयलच्या जागी नवी सिरीयल जेव्हा येईल, ते प्रोमोज जेव्हा दाखवतील तेव्हाच सिरीयल बहुतेक मागच्या पानावरून पुढे सरकेल तो पर्यंत घुटमळत राहील एकाच ठिकाणी किंवा मागेही जाईल, असं वाटतं इथल्या कमेंटस वाचून.

भाउबीजेचा भाग बघितला .
रेवती नेहमी प्रमाणे मस्त दिसत होती . अथर्व फारच गोड वाटला .
ओवाळून झाल्यावर , नेहा उठली आणि पायघोळ फ्रॉक जसा झटकला ... एक्दम नॅचरलं . छानच वाटलं .

बाकी एकंदरच कथानकाबद्दल धन्यवाद !! हात जोडले. पुढे काय होणार आहे काय माहित.
ती राधिका , रेवतीकडे येउन रडायला लागली की रेवती कानाखाली एक सणसणीत आवाज का काढत नाही ???

२००१ वा प्रतिसाद..
नवीन धागा काढावा का?
Submitted by पियू on 29 October, 2017 - 15:27

कदाचित नक्कीच त्याची गरज भासेल!!! Proud Proud Proud

अजून किती लांबणार आहे माहित नाही. . जात्यावर बसल्यासारखं दळण दळताहेत .
फिरून एक वेढा झाला कि त्याच ठिकाणी Happy

Pages