माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रमा Lol
मला ते वर्‍हाड मधलं आठवलं 'हिच्यामुळं हरभरा टरारून वर" Rofl

आधी जे बालीश चाळे करून ती शन्याला त्रास द्यायची तसेच चाळे करून गुरूला पीडणार, पुढील भागात मध्ये दाखवलं. >>> मग ती स्मार्ट, mod होणार होती त्याच काय झाल? Uhoh

कालच्या भागातला इशा-समिधाचा सव्वाद फनी होता.

आणि किती ती माफेची जाहिरात सिरियलमध्ये?

राधिकाची सासू बन्द खोलीत असूनसुद्दा इतक्या जोराने का बोलत होती फोनवर, पब्लिक फोन बूथवर बोलल्यासारखी?

बादवे, गुरुनाथचे आई- वडिल झालेले कलाकार नेमक्या त्याच वेळेला सहयाद्री वाहिनीवरच्या मालिकेत दिसले मला. आधी मला वाटल, मानबा सहयाद्री वर पण लागते कि काय? पण ती दुसरी सिरियल होती सन्जीवनी नावाची.

पण त्या टूरवरच्या बायकांनाही ती सगळं सांगते आणि त्यांची सहानूभुती मिळवते. एवढ्या खाजगी गोष्टी चार दिवसांसाठी भेटलेल्या माणसांबरोबर शेअर करणे म्हणजे.. >>>> अगदी अगदी. उगाच नाही गुरु तिला म्हणत असतो की तु सतत सहानूभुती मिळवण्याचा प्रयत्न करत असते म्हणून.

आता ती सुप्रिया निमकर तिला या कामात काही मदत करेल का?>>> माधवी निमकर

हो सह्याद्रीवरपण ते दोघं एकाच मालिकेत आहेत, पण ती मालिका बरीच जुनी आहे वाटतं. असंही सह्याद्रीवर नव्याण्णव टक्के मालिका जुन्याच असतात. कलाकारांनाही आठवत नसतील त्या मालिका. मराठी मालिका डब करून डीडीवर आणि वाईस वर्सा चाललेलं असतं. किरण जुनेजाचा मुलाखतींचा छान कार्यक्रम डीडीवर असतो आणि सेम तसाच कार्यक्रम सह्याद्रीवर विक्रम गोखले घेतात दुसरी बाजू नावाचा. आनंद अभ्यंकरही दिसतात एका मालिकेत, फार वाईट वाटतं.

रेवती आणि राधिकाच्या भेटीचा प्रसंग खुप सुंदर घेतला, बर्याच दिवसानी जरा काही लॉजिकल आणि जेन्युईन वाटलं.. अभिनय छान केला दोघींनीही

दाढीवले बाबा ( गुरु ) काय सुधरनां. आजच्या भागात राधिकाच्या हातुन त्याच्या अंगावर चहा सांडतो व तो राधिकाला म्हणतो की तुला काहीच धड येत नाही/ जमत नाही, म्हणूनच तुला सिंगापूरला नेल नाही. तर ती म्हणते की तरी मी आले होते. मग बाबाजींचा चेहेरा पहाणेबल होतो. दुसर्‍या प्रसंगात बाबाजींना शन्याचा फोन येतो आणी तिची काहीतरी वस्तु तिला मध्यरात्रीच हवी असते. हे येडं डोक्याला हात लावत तर राधिका म्हणते डोकं दुखतयं का? बाम लावते मी असे म्हणून त्याच्या चेहेर्‍यावर भसकम चोपडते. बघु आता खरी मालिका रंगतदार होईल.

काल रेवतीला ती भेटली तेव्हा फार जेन्यूईन वाटली. आधी खरं सांगायचं टाळणं, मग तिच्या गळ्यात पडून खूप खूप रडणं, आणि विश्वासघात झालाय या जाणिवेने संतापणं, कोसळून जाणं आणि गुरूला धडा शिकवायच्या विचाराशी ठाम रहाणं. त्यात आधीच शेजारपाजारचे खरं काय ते सांगत असून आपल्याच अतिविश्वासामुळे ते दुखावले गेले याची खंत, आपण सतत खोट्या ठरत राहिलो आणि ते आपल्याला समजलंही नाही... आईबाबांचा गुरूवरचा विश्वास, निरागस अथर्व... थोडक्यात पण खूप फोकस्ड वाटलं सगळं.

रेवती आणि राधिकाच्या भेटीचा प्रसंग खुप सुंदर घेतला, बर्याच दिवसानी जरा काही लॉजिकल आणि जेन्युईन वाटलं.. > हो खरच. पण लगेच बाम लावणे प्रकारात लक्षात आल की फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही

हो खरच. पण लगेच बाम लावणे प्रकारात लक्षात आल की फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही >>> अगदी अगदी. अशा वागण्याने का तो स्वतःच्या नजरेतून उतरणार आहे ?

दाढीवले बाबा ( गुरु ) काय सुधरनां. आजच्या भागात राधिकाच्या हातुन त्याच्या अंगावर चहा सांडतो व तो राधिकाला म्हणतो की तुला काहीच धड येत नाही/ जमत नाही, म्हणूनच तुला सिंगापूरला नेल नाही. तर ती म्हणते की तरी मी आले होते. मग बाबाजींचा चेहेरा पहाणेबल होतो. दुसर्‍या प्रसंगात बाबाजींना शन्याचा फोन येतो आणी तिची काहीतरी वस्तु तिला मध्यरात्रीच हवी असते. हे येडं डोक्याला हात लावत तर राधिका म्हणते डोकं दुखतयं का? बाम लावते मी असे म्हणून त्याच्या चेहेर्‍यावर भसकम चोपडते. बघु आता खरी मालिका रंगतदार होईल.>>>>> हे कधी झाल....कालचा भाग तर रेवती क डेच सम्पला ना?

त्याच्या पायावर मुद्दाम चहा सांडविणे, बाम भसकन डोळ्यांवर चोपडणे वगैरे बालीश कृती न करता त्याला खडसावून जाब कधी विचारणार ही?
काल तिची साडी छान होती.... रेवती कडे आली असतानाची . गुरुने मात्र साळसूद पणाचा अभिनय मस्त केलाय.

त्याच्या पायावर मुद्दाम चहा सांडविणे, बाम भसकन डोळ्यांवर चोपडणे वगैरे बालीश कृती न करता त्याला खडसावून जाब कधी विचारणार ही?>>> ती त्याचे जीने(जगणे) मुश्किल करणार असे म्हणाली होती. बहुतेक असे प्रकार करुन त्याचे जगणे मुश्किल झाल्यावर विचारणार असे दिसते.

गुरुबाळ तसेही कर्जबाजारी झालेच असेल शन्यामुळे. अजून किती काळ तो पैसा पुरवु शकेल तिला? आणी त्याच्याकडे आता पैसे नाही म्हणल्यावर शन्या पण गुरुला सोडेलच की. बहुतेक अशी काहीतरी गोची करण्याचा राधिका विचार करेल. कारण शन्याला नोकरीवरुन काढणे तिच्या हातात आहे. पण लेखक/ लेखिका जे कोण असतील त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाल्याने ते राधिकाकडुन असले बालिश चाळे करुन घेत असतील. उरले-सुरले बालिश चाळे शन्या करतच असते मधून मधून.

हो ना! इथे एक बायको ( समजा ती नोकरी करत नसेल तर ) आणी एक किंवा दोन मुले यांच्या करताच आणी बाकी गरजांसाठीच ४० ते ७० हजार लागतात. मग हे बाळ दोन बायका कसे सांभाळतं? शन्याचा पगार कुठे जातो? मध्यंतरी शन्याला बुटीक उघडायला ३ लाख दिले बाळाने. ते पण उडवले तिने. वरती शिंगणापूरला जाण्याचा रहाण्याचा खर्च होताच. पण गुरुबाळाने तो ऑफिस मधून उचलला असेल. आता राधिकाने ऑफिसमध्ये चौकशी करायला हरकत नाही. बरेच लिहीण्यासारखे आहे.

अरे हो की. आता मग राधिकाने चांगले उट्टे फेडले पाहीजे याचे. तिला साधी टु व्हीलर घेऊन दिली नाही त्याने आणी या शन्यावर मात्र लाखो उधळत होता. आता बघु मुलाकरता काय घेतले याने शिंगणापूर दौर्‍यात. बहुतेक हेच राधिकाने पाहीले असणार आणी याचा तिला राग येऊन तिने चहा सांडणे, बाम चोपडणे वगैरे उद्योग केले असणार.

अग बायो आता तरी केस कर गुरुवर आणि आत टाक त्याला. सुधारून संसार वगैरे खरं अशक्य गोष्ट आहे गुरूबाबत. दणका देऊन सोड त्याला.

क्रिएटिव्ह टीम खरंच धन्य आहे आणि trp मिळवून देणारेही.

केस कर, आत टाक, सोडून दे असल्याला हे मी कधीच फेसबुकवर लिहून आले त्यांच्या, सिरीयल सुरु झाल्यानंतर त्या track वेळीच.

मालिका ख-या अर्थाने आता सुरू होईल असे वाटतेय. राधिकाचा आतल्याआत धुमसणारा राग अनिताने उत्तम दाखवलाय. आज तिने हातातला कप फोडला तो सीन छान होता. गुरूच्या आईनेही मुलावरचं आंधळं प्रेम आणि वडिलांनी डोळस प्रेम छान दाखवलय. आता राधिकाने फार बालिश चाळे न करता लवकर योग्य तो निर्णय घ्यावा ही अपेक्षा.

हो झाला आज. दोनशे डाॅलरची काॅम्पॅक रा बकुळाला देऊन टाकते. गुरूचा तडफडा होतो पण तो काहीच करू शकत नाही. आणि बरंच काही गीफ्ट वगैरे देणं होतं आजच्या भागात.

इथे वाचून मी ओझीवर बघितला भाग. राधिका आता confident वाटतेय मात्र आणि शनाया मूर्ख. बाम सीन मला बघायला आवडला, मी enjoy केला actually. अर्थात शिक्षा म्हणून असलं काही फालतू आहे पण तो अंधारात शोधत होता शनाया गिफ्ट आणि खोटं बोलला, डोकं दुखतंय का असं तिने विचारल्यावर हो म्हणाला म्हणून त्याचे डोळे बामने झोंबले हे मी enjoy केलं. अथर्वला गिफ्ट आणले नाही, जाम राग आलाय. त्याला फक्त शनाया मध्ये इंटरेस्ट आहे आणि एक बाप म्हणूनही काही वाटत नाहीये. मेक अप बॉक्स शेवटी कामाला येणाऱ्या मावशीना देते तो सीन पण सॉलिड झाला. गुरूची बोलती बंद झाली. अर्थात आता एक घाव दोन तुकडे करण्याची वेळ आलीय पण सध्या असेल असं वाटत नाही. नवीन सिरीयल प्रोमो आला ह्यावेळी की बघायला हवी.

राधिका म्हणाली काल की लवकरच या सगळ्याचा निकाल लागेल. किती लवकर ते तिलाच माहिती. गुरू घेणार असतो काहीतरी पण शनाया त्याला घेऊ देत नाही. तो बाम असतो की दुसरं काही कारण बामची बाटली वेगळी असते आणि राधिका ती ऊचलत नाही.

Pages