Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि काल ते महाजनी काका का
आणि काल ते महाजनी काका का कुणितरी तिला सांगत होतं की तु गुरूला डिव्होर्स देऊन टाक, तर ती म्हणते म्हणजे त्यांना रान मोकळं? रान मोकळं?
त्याला रान मोकळं मिळू नये म्हणून ही रोज आपलं आयुष्य वेचणार त्या फालतू माणसासाठी? Uhoh
कसली ही विचारसरणी? >>> मला तरी पटले ते, धडा शिकवल्याशिवाय सोडुच नये त्यांना.
हे असले उंदरा मांजरासारखे
हे असले उंदरा मांजरासारखे खेळ करून नक्की काय पदरात पडेल?
गुरू पुन्हा राधिकावर प्रेम करायला लागेल का?
मला तरी पटले ते, धडा
मला तरी पटले ते, धडा शिकवल्याशिवाय सोडुच नये त्यांना. >> पण त्यात स्वतःचा वेळ नाही का वाया जात?
डिव्होर्स प्रोसेस करावा आणि कोर्टात तंगवावं ना.. ते निदान कायदेशिर तरी झालं असतं.
हे कसले बालिश चाळे चहा सांडून तिला पुसायला लावायचे वगैरे.
आणि मॉड लूक मध्ये राधिका काही फार ग्रेट नाही वाटली मला
हे असले उंदरा मांजरासारखे खेळ
हे असले उंदरा मांजरासारखे खेळ करून नक्की काय पदरात पडेल? >> होना . परत परत तो शनाया कडे ओढला जातोय . अशा परिस्थितीत मारून मुटकून त्याला बांधून ठेवायचा का ? का ? कशाला ? आयुष्यभर ती शनायाला धडा शिकवत राहणार का ? तिला दुसरे उद्योग नाहीत का ? बर त्याच मुलावर पण काडीच प्रेम नाहीये
ते निदान कायदेशिर तरी झालं
ते निदान कायदेशिर तरी झालं असतं.
हे कसले बालिश चाळे Uhoh चहा सांडून तिला पुसायला लावायचे वगैरे.
आणि मॉड लूक मध्ये राधिका काही फार ग्रेट नाही वाटली मला Sad >>>> हो हे पटले
तसेही ते दोघे (गॅनाया) एकत्र तिच्या समोरच रहात होते तरी तीने त्याला अॅक्सेप्ट केले तेच पटले नव्हते. पुरुषांना चालेल का कशी दुसर्या सोबत राहुन आलेली बायको.
अन ईतके होऊनही सुधारणा नाही.
माझ्या मामाने एक गम्मत
माझ्या मामाने एक गम्मत सांगितली , आमच्या गावी एक रिक्षावाला आहे त्याच नाव गुरुनाथ त्याला तिथले लोक गॅरी म्हणतात .......
डोक्याला हात लावलेली हताश बाहुली
अरेरे बच्चा!!
दक्षिणाच्या वरच्या सगळ्या
दक्षिणाच्या वरच्या सगळ्या पोस्ट्सना मम
मला तर आता शन्यापेक्षा गॅरीच
मला तर आता शन्यापेक्षा गॅरीच बच्चा वाटायला लागलाय. ऑफिसात काय करतो हा देव जाणे. सारखा आपला बच्च्याकडे वाकुन पहातो नाहीतर तिला फोन लावतो. ते नाही झाल तर त्या केडी बिडीला फोन लावुन सल्ले मागतो, उरलेल्या वेळात लुच्च्या बच्च्या बरोबर कॅफेत नाहीतर शॉपिंगला जातो, मग त्यातुनही उरलेल्या वेळात कार चालवतो, आणी त्यातुन परत उरलेल्या वेळात घरात फेर्या मारतो. कधीही हा बाबा घरगुती ड्रेस मध्ये नसतो, कायम आपला शर्ट-पँट-जॅकेट मध्ये रेडी टु इट.
माझ्या मामाने एक गम्मत
माझ्या मामाने एक गम्मत सांगितली , आमच्या गावी एक रिक्षावाला आहे त्याच नाव गुरुनाथ त्याला तिथले लोक गॅरी म्हणतात .......
डोक्याला हात लावलेली हताश बाहुली>>>>
सर्वात महत्वाचं म्हणजे
सर्वात महत्वाचं म्हणजे सिरियल्स मध्ये हे सगळे उंदरा मांजराचे खेळ दाखवा काही हरकत नाही. पण जनता ते फक्त मनोरंजन म्हणून घेत नाही, त्यातून काही ना काही शिकत असते आणि नकळतपणे आपल्या वैयक्तिक आयुष्यात इम्प्लिमेन्ट करत असते. त्यातून लग्न, सासू सून असे संवेदनशिल विषयच हे टिव्हिवाले निवडतात.
घरात कारस्थानं कशी करावी... इ. इ.
अगं दक्षिणा हे झी मराठी खूप
अगं दक्षिणा हे झी मराठी खूप बरे आहे. ते कलर्स उर्फ पूर्वीची ई मराठी आहे ना त्या वरच्या सरस्वती, घाटगेंची सून असल्या मालिका जर तू चूकुन पाहिल्यास तर घरातला टिव्ही फोडशील इतक्या दळभद्री कल्पनादारिद्र्य असलेल्या सिरीयल आहेत या.
दक्षिणाच्या वरच्या सगळ्या
दक्षिणाच्या वरच्या सगळ्या पोस्ट्सना मम>>>हो माझं पण सगळ्या पोस्ट्सना मम्... >>>कसली ही विचारसरणी?>> हो ना...मी धडा शिकवणार आणि याव आणि त्याव... एक घाव आणि दोन तुकडे करून अथर्ववर मेहनत घे म्हणावं..अजून त्याच बोलणं कळत नाही...जाऊ दे... काय बोलायचं आता...गुंडाळा म्हणावं आता... बास झालं..
बरंय रश्मे मी नाही बघत तेच _
बरंय रश्मे मी नाही बघत तेच __/\__
सर्वात महत्वाचं म्हणजे
सर्वात महत्वाचं म्हणजे सिरियल्स मध्ये हे सगळे उंदरा मांजराचे खेळ दाखवा काही हरकत नाही. पण जनता ते फक्त मनोरंजन म्हणून घेत नाही, त्यातून काही ना काही शिकत असते आणि नकळतपणे आपल्या वैयक्तिक आयुष्यात इम्प्लिमेन्ट करत असते. त्यातून लग्न, सासू सून असे संवेदनशिल विषयच हे टिव्हिवाले निवडतात. Sad
घरात कारस्थानं कशी करावी... इ. इ. Sad>>>>>> +१०० अगदी हेच.
ती धडा शिकवून divorce देणार
ती धडा शिकवून divorce देणार आहे असं वाटलं तिच्या डायलॉग वरून ozee वर बघितली. पण धडा काहीतरी sensible शिकव, बालिशपणा नको.
ती म्हणते एकदा केली की चुक, पुन्हा केला की गुन्हा. अग बायो लग्न केलेलं असताना लफडं करणे हा गुन्हाच आहे कायद्याच्या दृष्टीने, चुक नाही.
सरळ आत टाकू शकते की त्याला मग नोकरी आपोआप जाईल, बच्चा साथ देणार नाही. मग divorce दे. पण हे असं थोडीच दाखवणार सिरीयलवाले.
रश्मीला मम सरस्वती आणि
रश्मीला मम सरस्वती आणि सुनेसाठी. प्रवाहच्या गोठ ची पण पार वाट लावली गणपतीनंतर.
घाडगे and सून माधवी आहे म्हणून बघत होते पण बेकार पकवतात, अगदी ह्या भाषेत मी भाचीला मेसेज केला. एकतर नायिका आवडली नाही, नायक बघून कांटाळले. सरस्वती एक पहिला भाग सोडला तर क्वचित बघितली असेन. सरस्वतीचं काम करणारी चांगली आहे मात्र.
गुरु मात्र अगदीच बावळट
गुरु मात्र अगदीच बावळट दाखवलाय, बच्चा शिवाय दुसरं काहीच दिसत नाही. हिने आता सोडावंच त्याला. केस करावी, हाकलावे आणि div द्यावा. करुदे मरूदे काहीही, तुला काय करायचं आहे.
नवरा म्हणून नाहीच पण त्यापेक्षाही तो एक बेकार बाप आहे. मुलाबद्दल काहीच नाहीये त्याला त्यामुळे माझी जाम सटकते. हल्ली मध्ये मध्ये बघते ozee वर.
आजचा भाग अपलोड झालाय ओझीवर.
आजचा भाग अपलोड झालाय ओझीवर. आत्ताच पाहिला. रेवती कडे आनंद चा फोन नंबर? किती वेळ असतो या लोकांना, इथे घरातलं करायला घरच्यांना वेळ नसतो... हे मारे काय झालं की जा राधिकासाठी धावून.
सकाळी सकाळी गेलेय ना राधिका पिक्निक्ला? आणि गुरूने शन्यासाठी सकाळी सकाळी चिकन लॉलिपॉप, चिकन फ्राईड राईस आणि पेस्ट्रिज मागवल्या? नाश्त्याला कोण खातं हे असलं?
पिक्निक्ला साडी नेसून? __/\__
पण गुरूने आज अधिर असल्याचा अभिनय चांगला केला. राधिका कधी एकदा घराबाहेर जातेय आणि मी शनायाला कधी घरी बोलवतोय असं त्याला झालेलं त्याच्या देहबोलीतून छान कळत होतं. शिवाय आनंद आल्यावरची पण त्याची देहबोली अगदी सॉलिड होती.
हा बिनडोकपणा अजून सुरु आहे का
हा बिनडोकपणा अजून सुरु आहे का ?? नवल आहे
आनंद एक दिवस फुग्यासारखा
आनंद एक दिवस फुग्यासारखा फुटेल की काय असं वाटायला लागलय. त्याचं वाढणारं वजन हा अर्थात त्याचा खाजगी प्रश्न आहे पण एवढा जाडा नव्हता तो जेव्हा त्याला नाटकात बघितलं होतं ( डोन्ट वरी बी हॅपी).
नवरा म्हणून नाहीच पण
नवरा म्हणून नाहीच पण त्यापेक्षाही तो एक बेकार बाप आहे. मुलाबद्दल काहीच नाहीये त्याला त्यामुळे माझी जाम सटकते. + १२३
धडा शिकवणार म्हणत राधिकाचा परत फालतू टाईम पास सुरु झाला आहे
माझी मुलगी (वय ८) राधिका गुरु
माझी मुलगी (वय ८) राधिका गुरु ला शनायाला हाकलून का नाही देत
राधिकाकडे सबळ पुरावे आहेत.
राधिकाकडे सबळ पुरावे आहेत. Divorce फाईल करून घरावर संपूर्ण हक्क आणि भरमसाठ पोटगी मागावी. इतक जरी केलं तरी गुरुला बरीच शिक्षा होईल. कारण तोपर्यंत शनाया गुरुला सोडून देईल (पैशाची चणचण असल्यामुळे) आणि बायकोने कोर्टात खेचले आहे. म्हणजे ही पण नाही आणि ती पण नाही.
प्राचीस असला शहाणपणा शिरेल
प्राचीस असला शहाणपणा शिरेल वाल्याना सुचत नसतो
अरे कोणी बघितलं आणि काही
अरे कोणी बघितलं आणि काही सेन्सिबल जबरदस्त शिक्षा सुचली झी ला गुरुला द्यायला तर लिहा इथे, मी जरा जास्तच अपेक्षा करतेय , तर मी जाऊन ozee वर बघेन. उगा डोकं आउट करून घेणार नाही माझं.
अन्जू , मी बघते सध्या. मला
अन्जू , मी बघते सध्या. मला आवडत्येय. निदान बदला घ्याय्चा आहे तिला आणि त्याच्यासाठी आप्ल्याला खर काय ते माहिती नाही हे सोंग वठवून , प्लॅन करून त्या दोघांना जीव नकोसा करणे हे बघाय्ला मज्जा येतेय. दुसर्या बाईत गुंतलेला नवरा परत आणाय्चा असा सूर नाहीये , तर आपल्याला मूर्खात काढल्याचा , फसवणूक केल्याचा, आणि वर भोळेपणा दाखवून खर्याला खोट करण्याच्या पापाचा बदला घ्यायचा आहे तिला. डिवोर्स मधे हे साधल जाणार नाही हे पटल. तो नंतर द्यावा.
रावी>>>>+++१ कालचा भाग मस्त
रावी>>>>+++१ कालचा भाग मस्त होता.सळो की पळो करून टाकलं राधिकाने गुरुला..
ओके म्हणजे कालचा बघायला हवा.
ओके म्हणजे कालचा बघायला हवा. Thank u रावी मोक्षू .
मी पण पाहिन आज रात्री ओझी वर.
मी पण पाहिन आज रात्री ओझी वर.
मानबा चे एपिसोड ज्या त्या दिवशी लगेच अपलोड होतात लगेच.
Pages