माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण पाहिन आज रात्री ओझी वर.>> पण कृपया बॅन् करायची पेटिशन काढू नका थोडी करमणूक आहे. विबासं खरेतर फार अवघड विषय आहे. ९० च्या दशकात सांस नावाच्या सिरीअल मध्ये चांग्लया पद्धतीने हाताळला होता. हा जरा फार्सिकल अंगाने आहे. शनायचे आणि गुरू कसे सर्व मॅनेज करतो हे लक्ष देउन बघणारे पण फॅन्स आहेत. खूप स्त्रिया पण हा प्रश्न कसा हाताळाय चा ह्या त्रासात असतात. त्या ंना पन थोडा कॅथार्सिस आहे. राधिका जिंकते हेच समाधान बारक्या कुरापतीचे. मोठे गहन प्रश्न हाताळलेच नाहीयेत.

हो सांस आठवत्ये, नीना गुप्ता होती त्यात. चांगली मोठी मुलं दाखवली होती त्यात, सगळं कळत असलेली.

कालचा डायलॉग - राधाक्का त्या आनंद ला म्हणते - जिथे एक पुरुष एका बाईशी बोलला तरी लोक त्या बाईकडे बघतात - तत्सम. कुठल्या जगात आहे ही ? ही त्या गुप्ते, आनंद शी बोलते ते चालतं का ? का वहिनी म्हणून ?

कालचा डायलॉग - राधाक्का त्या आनंद ला म्हणते - जिथे एक पुरुष एका बाईशी बोलला तरी लोक त्या बाईकडे बघतात >>> नुसत बघतात नाही तर नाव ठेवतात. बायकांचा दोष आहे अस म्हणतात पण पुरषांना सगळ माफ असत. मी ही तरी काय करते ??? Uhoh सगळा दोष शनायाला देते. करुन सवरुन गुरु मात्र बिचारा. शनायानी नादाला लावलेला. त्याची काही चुक नाही Angry आत्ता कुठे तिला गुरु पण चुकतोय अस वाटतय

भारतीय घरात जनरली पुरुष कुठलच काम करत नाही किवा बायकोला मदतही करत नाहीत, गुरू ला काम करायला लावण्यात मालिका बघणार्‍या
प्रेक्षक वर्गाला बर वाटाव यासाठी असेल.

भारतीय घरात जनरली पुरुष कुठलच काम करत नाही किवा बायकोला मदतही करत नाहीत, गुरू ला काम करायला लावण्यात मालिका बघणार्‍या
प्रेक्षक वर्गाला बर वाटाव यासाठी असेल. >>> हो, आणि राधिकाला त्याला धडा शिकवायचाय ना, म्हणून हे घरकाम-बिरकाम आणि स्वतःची सेवा करायला लावतेय ती त्याला.

कोणी बघत नाही वाटतं. बघूही नका कारण राधिका म्हणाली की मला शन्याला फक्त बिल्डींगमधूनच नाही तर ह्यांच्या आयुष्यातूनही घालवायचे आहे. पहिले पाढे पंचावन्न, येरे माझ्या मागल्या, कुत्र्याचं शेपूूट अशा ब-याच म्हणी आठवल्या. असोच.

बघतेय मी ओझी वर वेळ मिळाला की. फाल्तू च आहे सिरियल
आणि आता रुद्रम फॉलो करते त्यामुळे ही सिरियल अगदीच पाणचट आणि फालतू वाटून राह्य्ली ना...

दक्षिणा.... खरे आहे! Happy
काल ती शनाया सुद्धा म्हणत होती..." ही काय प्रेझेंटेशन देणारे? करुन र्‍हायली अन देऊन र्‍हायली....यक्स! Happy
अगदी बोअर मार्गाने चालली आहे सिरेल. तेच ते...रधिकाचे पतीप्रेम...ह्यांचा वाढदिवस आहे नं.... काऊन बाप्पा.. चांगले र्‍हायले अस्ते तर अथर्व आन मी साजर केला अस्ता नं! . सासूचे फोनवरचे बोलणे --दिवाळी फराळ....माह्या लेक आन तुहा लेक.... हरे राम!
रेवतीचे तेच ते समजावणे---- हिचे रडणे व गुप्ते भाऊ, महाजनींचे तेच ते ड्वायलॉक्स! तीसरी वेळ आहे हेच सर्व रिपीट करण्याची! बहुतेक पाच वेळा असे दाखवतील व मग कुठे राधिकाला उपरती होईल व ती गुरवाला घराबाहेर काढेल! Angry

रेवती आणी गुप्ते भाऊंनी प्रेझेंटेशनला मदत केली, पण मुलाखतीचे काय? कोणी पाहिला का तो एपिसोड? दिग्दर्शक मुर्ख आहे. इंटर्व्ह्युला जाताना राधिका अतीशय अनप्रोफेशनल वागली. नानींच्या पाया पडणे, वॉचमनला डब्बाच देणे, सासुबैला फोन करणे, मग उशिरा ऑफिस मध्ये पोहोचणे, इंटर्व्ह्युचे मुद्दे लॅपटॉप मध्ये चेक न करणे. अरे काय आहे? एवढी समाजसेवाच करायची होती तर हा फार्स कशाला? मुळात राधिकाला इंटरव्ह्यु कशाशी खातात हेच रेवतीने समजावायला हवे होते. डफ्फर मालिका.

अरे काय आहे? एवढी समाजसेवाच करायची होती तर हा फार्स कशाला? Lol

हो मी पहिला .. मला पण कैच्याकै च वाटलं ..प्रेसेंटेशन ला मदत केली मग general बाकी प्रश्न काय विचारले जाऊ शकतात एवढी कल्पना निदान गुप्ते भाऊ /रेवती किंवा किंवा जेनी etc किंवा ते गुरवाचे सर कोण आहेत त्यांनी द्यायला हरकत नव्हती .. या सगळ्यांना माहित होते कि हि १st time ppt आणि interview वगैरे देत आहे ... निदान थोड्या टिप्स अँड ट्रिक सांगायला हव्या होत्या
ppt चा बॅकअप घ्यायला हवा हे कुणाच्याही लक्षात येऊ नये !!!??इथे खऱ्या आयुष्यात लोकं बॅकअप चा बॅकअप घेत असतात ..
सगळाच पांचटपणा (रागाने चिडून लाल झालेली बाहुली )

मला पण कैच्याकै च वाटलं >_+१ . कसली कंपनी, आणि मसाल्याच्या ऑर्डर साठी फक्त प्रेझेंटेशन हा एकच निकष ? राधिकाचा गब्बाळेपणा काही जाईना. इतके अनुभव असुनही शहाणपण येइना. त्या मुलाखत घेणार्‍यांमधे एक प्रतिमा कुलकर्णी होत्या ना. त्या का बनवत नाहीत मालिका हल्ली. ४०५आनंदवन , संसार वाल्याच ना त्या.

प्रतिमा कुलकर्णी का त्या? तरीच चेहेरा ओळखीचा वाटत होता. दुसरे घारोळे म्हणजे चार दिवस सासुच्या सिरीयल मधले मुख्यमंत्री, सुप्रियाचे वडिल. तिसरे गृहस्थ कोण होते, ते जरा खौटच वाटले. आता डोक्यावरुन पाणी गेल्यानंतर तरी राधिकाने गॅरीबाळाला हाकलुन दिले पाहीजे. तो कधीच सुधरणार नाही, कामातुराणां न भयं न लज्जा अशा कॅटेगरीतले गॅरी आणी शनया आहेत. ( कॅरेक्टर्स, खरे जीवनातले नाही)

तीसरी वेळ आहे हेच सर्व रिपीट करण्याची! बहुतेक पाच वेळा असे दाखवतील व मग कुठे राधिकाला उपरती होईल व ती गुरवाला घराबाहेर काढेल! >> पाच वेळा दाखवलं तरी तुम्ही बघणार ना ताई. मग झालं तर.

तिसरे गृहस्थ कोण होते >>> मा म तु झा मध्ये असायचे छोट्या छोट्या भूमिकेत. कधी ज्योतिष सांगणारे, कधी डॉक्टर. नाव नाही माहीती.

ते इंटरव्ह्यू वालं प्रकरण मी जरासं बघितलं (चुकून).
राधिका तिचे मसाले कसे बेस्ट चवीचे आहेत हे दाखवण्यासाठी चक्क ते मसाले वापरून तिने बनवलेले काय काय पदार्थ नेते डब्यांतून. मग ते सुप्रियाचे वडिल हसतात तिला. तर प्रतिमा कुलकर्णी बाई न हसता रागावता तिला प्रोसिजर समजावून सांगतात.
पुढंच काय मी पाह्यलं नाही. एवढे पेशन्स नायत बाय माझ्यात. Happy

असल्या मालिका आठवड्या-दोन आठवड्यातून १दा पाहिल्या तरी पुरतं .. एखादा काही मिस झालं तरी ते फार चुटपुट लागण्यासारखं मुळीच नसतं !
आपल्याला बघायचा कंटाळा येतो .. पण लिहिणाऱ्याला असले बोर संवाद लिहायला ,डायरेक्टर ला डायरेक्ट करायला आणि नटाला तितक्याच बावळटपणे सगळं करायला कंटाळा नसेल का येत ?का पैसे मिळतात मग करायच अश्या विचाराने करतात ?

प्रेझेंटेशनचा नाही बघितला. जेव्हा जेनी, आनंद, पानवलकर आणि श्रेयस म्हणतात की आम्ही मदत करतो, आधीचे प्रेझेंटेशन दाखवतो तेव्हा मारे म्हणते की माझं मीच करणार आणि सगळ्यांच्या चेहे-यावरून कौतुक ओसंडून वहात होतं. रेवतीने मदत आॅफर केल्यावर लगेच हो म्हणते. त्यात अडथळे आणण्यासाठी गुरू अचानक मित्रांना जेवायला बोलवतो पण राधिका बाहेरून जेवण मागवून रेवतीकडे जाते. एवढं करूनही नाहीच जमलं का तीला.

काय तेच तेच तेच तेच गोल गोल फिरवतात. पण टीआरपी चांगला आहे म्हणे.
दर वेळी राधिका तेच तेच बोलते. ती शनाया आहे अन मी आहे . पूढे काही नाही

सगळे ऑफिसवाले पण चुटपूटत होते पण राधिका इतकी अनप्रोफेशनलि गेली मग काय होणार? तिने प्रेझेटेशन एकदाही बघितल नव्हत अस वाटतय, बाकी वरच्या पोस्टला मम,

झी चॅनल च्या कोपऱ्यात लवकरच येत आहे असा लोगो दिसतोय.>> हो आजच दिसला. कधीपासून दिसतोय ? मालिका संपणार कि काय ? तसाही अभिजित चे सुबक निर्मित " पती गेले ग काठेवाडी " चे प्रयोग सुरु झालेत त्या अर्थी शूटिंग नक्की संपलय Happy

अभिजीतचे फक्त पंचवीस प्रयोगांचे नाटक आहे ते. एपिची बॅंक केलेेली असू शकते पण संपली मालिका तर आनंदच आहे. नकटीपण संपायच्या मार्गावर आहे.

अभिजीतचे फक्त पंचवीस प्रयोगांचे नाटक आहे ते >> तरी सुद्धा तालमींना महिना दोन महिने आणि आता प्रयोगांना किती ते महिने तो वेळ देऊ शकतोय त्याअर्थी संपली असेल अशी आशा

नकटीपण संपायच्या मार्गावर आहे.>>>> ती नकटी कसली संपतीय, नकटीला नकटा भेटेना आणी त्या दुसर्‍या चपटीचे फालतु उद्योग संपेनात.

TRP त पहिल्या नं वर आहे ही मालिका, आहात कुठे. एका virtual फ्रेंडने सांगितलं मला. जे लोकस रात्री आठ ला बघतात ते trp वाढवतात. नंतर रिपीट जे बघतात ते नाही कारण पहिला शो धरला जातो trp साठी.

मी रात्री आठ ला बघते.. नंतर बघायचा कंटाळा येतो .. गुरू तर दिवसेंदिवस जास्तच बेरकी होत च्चालाय. शनाया पेक्षा ... बापरे असा रियल लाईफ मध्ये जोडीदार नसावा... Angry

Pages